कोवळे दिवस
........................
लहानपणापासून कॉलनीत रहायचो...अकरा चाळींची होती आमची कॉलनी...प्रत्येक चाळीत चाळीस..पन्नास कुटुंब...फक्त चाळच नव्हे तर आख्खी कॉलनी एक कुटुंब होती...प्रत्येक व्यक्ती निराळी असं गृहीत धरलं तर दीड -दोन हजार जणांच्या तो कुटुंब कबिला होता...त्यामुळं नाना प्रकारच्या मानवी स्वभावांचे कंगोरे जवळून बघता आले...माझ्या पिढीतल्या कित्येकांचं बालपण, पौगंडावस्था, तारुण्य या कॉलनीनं अनुभवलं...इथंच शाळेतले धडे मिळाले अन किशोर वयातली कोवळीक ही इथंच अनुभवली...एरवी जेव्हा कामजीवनाबद्दल कुठं काही वाचनात आलं की कॉलनीतल्या कामजीवनावरही कधीतरी लिहावं असं कायम मनात येतं... कारण इथं खूप निराळे अनुभव मिळाले..पौगंडावस्थेतली मनाची घुसमट, कोवळ्या वयातलं प्रेम अन् लैंगिक भावनांचं दमनही इथं जवळून पाहता आलं .. विकृतीच्या पल्याड असलेल्या इथल्या काही व्यक्ती, घटना मनात कायमच्या रुतल्यात...
चाळीत संडास, बाथरूम, नळ कॉमन..चौघांनमध्ये एकेक..बाथरूममध्ये तेव्हा पाणी नसायचं...त्यामुळं तिथं काहींनी स्टोअर रूम केलेली.....पण, बहुतेक बाथरूम धूळ खात पडलेली असायची...चाळीतल्या काही नवथर पोरापोरींची ती शृंगाराची ठिकाणं बनली....चाळीतल्या या बाथरुमांनी अनेक पिढ्याचे रोमान्स बघितलेत..तेव्हा कळत नव्हतं किंवा जाणवलं नव्हतं पण आता वाटतं की चाळीतले नळ हे सुद्धा आकर्षणाचं केंद्र असायचं...तिथं पाणी भरायला येणाऱ्या मुली, महिला, नवविवाहित स्त्रिया यांच्याशी साधला जाणारा संवाद, त्याचे पैलू, विषय याच्या तऱ्हा निरनिराळ्या असायच्या...
चाळीत आम्ही लहानाचे मोठे झालो.. सोबतच्या मुलीही मोठया होत होत्या.... वयात येताना मिसरूड फुटणं, आवाज घोगरा होणं, अंगावर कोवळी लव फुटणं हा बदल होत गेला...तसा मुलींच्या अवयवांना गोलाई येत असल्याचं लक्षात येत होतं.. .या वयातले उष्ण श्वास, कुणाकुणाला पाहून होणारी अनामिक हुरहूर कळत होती..नजरेतली प्रतीक्षा उमगायला लागली..छायागीत बघण्याच्या निमित्ताने एकत्र येण्यातही मौज होती..अन् खेळांच्या, पर्वतीला एकत्र फिरायला जाण्याच्या निमित्तानं एकत्र येण्याला आगळा आयाम प्राप्त झाला होता...'कावळा शिवणं' म्हणजे नेमकं काय हे समजत नव्हतं.. पण ती संज्ञा तेव्हा माहीत झाली..अवयवांबद्दल उत्सुकता दाटण्याचं हेच् वय ..अन अन बाहेर वाळत घातलेल्या अंतर्रवस्त्रांबद्दल कुतूहुल वाटण्याचंही हाच काळ...याच काळात मुलांची भाषा बदलली...शिव्यांमधली झ ची बाराखडी उमगायला लागली..खरंतर त्यावेळी लैंगिक माहिती पुरवणारी व्यवस्था असायला हवी होती..चौकातल्या दुकानात मिळणारी पिवळी पुस्तकं हे अनेकांचं याबाबतचं कुतूहुल शमवण्याचं साधन होतं... गप्पाटप्पांमध्ये मोठी मुलं या माहितीत काहीबाही भर घालायचे..अर्थातच त्याला काही शास्त्रीय गाभा नसायचा..त्यामुळं याबाबतीत नेमकी अधिकृत माहिती पुढं बहुदा अनुभवातनंच् मिळाली..
कॉलनीत तीन तृतीयपंथी होते.खरंतर अडीच..म्हणजे दोघे पूर्ण अन एक अर्धा..त्याला निमगांडु म्हणतात हे कॉलनीतच् समजलं..पुढं हा शब्द अन संज्ञा फार कुठं कानावर आली नाही....म्हणजे असं होतं की तो स्त्रीशी संग करू शकत होता; पण त्याआधी अन्य पुरुषाने त्याच्याशी संबंध ठेवणं ही त्याची गरज होती..ती शारीरिक की मानसिक हे कळायचं ते वय नव्हतं...तर, या अडीचजणांनी कॉलनीतली बरीच पोरं नादाला लावलेली...पूर्ण सज्ञान व्हायच्या आतच् त्यांना वासनेची चटक लावली...अनेक मुलांचं कौमार्य हे कुठल्या स्त्री शी नव्हे,तर या अडीच तृतीयपंथीयांशी संग करण्यात भंग झालं हे एक कटू वास्तव आहे..कॉलनीतल्या एकीला मदनवायू होता...म्हणजे तिच्यात सर्वसाधारण प्रमाणापेक्षा वासनेची तीव्रता खूपच् जास्त होती..त्याबाबतचे अनेक रसभरीत किस्से अगदी अलीकडपर्यंत चवीनं चघळले जायचे..खरंतर मदनवायू हा शब्द कुठून आला ? त्याची उत्पत्ती काय ? हे कधी समजलं नाही...पुढेही कधी हा शब्द कानावर आला नाही...खरंतर हे सारे विकृत प्रकार..पण उमलत्या वयात आम्ही ते जवळून पाहिलेत..तसल्या उद्योगांमुळं काहींना गुप्त विकारांचीही बाधा व्हायची..त्याचाही पोरांमध्ये बभ्रा व्हायचा...तसल्या आजारांना व्हेरी डेंजर या अर्थानं व्हीडी असा कोडवर्ड ठरलेला असायचा..स्वारगेटजवळ कुलकर्णी म्हणून एक डॉकटर या उपचारांसाठी ठरलेले होते....ते त्यासाठी 'डॉक्सी' हे औषध देतात ही माहितीही पोरांकडं असायची...कित्येकदा परस्पर केमिस्टकडं जाऊन ही गोळी घ्यायचे..तो अर्थपूर्ण हसून गोळी द्यायचा..नान्या म्हणून कॉलनीत एकजण रहायचा..चेहऱ्यावरूनच् विकृत भासायचा..त्याची लैंगिक भूक विचित्र होती..प्राण्यांशी संग करण्याची घाणेरडी सवय त्याला होती...समलैंगिक संबंधांचेचं ही बरेच प्रकार तिथं पाहिले..योग्य त्या वयात नेमकी माहिती नसल्यानं करपत असलेली जवानी आजूबाजूला दिसायची...
कॉलनीत काहींना दहा बाय बाराची खोली.... भिंतीला लागूनच शेजारशेजारी घरं....एकंदरच् प्रायव्हसी नावालाही नव्हती..नव्या नवरीची त्यामुळं कुचंबणा व्हायची...पण, तशाच परिस्थितीत तिथं कित्येक पिढयांनी संसार केलेत...एखाद्याकडं नवीन लग्न झालं की पोरांसाठी ती पर्वणी ठरायची... घरांची शटर्स अनेकांचे रोमान्स उघड करायची..अशावेळी भिंतींचे कान अधिक तिखट व्हायचे ...पण, या कॉलनीत फक्त विकृत चाळेच् पाहिलेत असं आजिबात नाही..कोवळ्या वयात फुललेल्या, काही आयुष्यभर अव्यक्त राहिलेल्या प्रेमकहाण्या तिथं पाहिल्या...देहात बदल होत असताना शरीरभर फुलणारी पालवी अनुभवली...नवथर प्रेमातले तिरपे, चोरटे कटाक्ष दिले अन झेललेही..प्रेमपत्र लिहिणं म्हणजे काय माहित नसताना इथंच ती लिहिली, छुपे खलिते पाठवले, नजरेची भाषा कळू लागली अन कुठल्याही चित्रपटात नसतील असे प्रेमाचे निसर्गसुंदर आविष्कार अनुभवले..त्यावेळी एकमेकांसाठी मन लावून लिहिलेल्या पत्रामुळंच् अक्षर सुधारत गेलं असावं.. अन् आताच्या लिखाणाचं बीजही बहुदा त्याच लेखनात दडलं असावं असं वाटतं..तिथले काही मित्र आता कथा, कविता लिहितात..त्यामागं ही कॉलनीत पाहिलेल्या,अनुभवलेल्या काही यशस्वी अन बऱ्याच अधुऱ्या कहाण्या असाव्यात असंही जाणवतं.... कॉलनी सोडून वीस वर्षं उलटली...पण, तिथली नाळ काही तुटत नाही..कुठल्या ना कुठल्या निमित्तानं तिथल्या घटना आठवत राहतात...मोरपंखी दिवसांच्या स्मृती मन तजेलदार करतात.कोवळ्या वयातले कित्येक क्षण मन हळवं करतात.अन् काही तप्त अनुभव लिहायला उद्युक्त करतात.....

अबिद जी, "कोवळे दिवस" वाचायला सुरुवात केली आणि नंतर भरभर वाचतच राहिलो. अत्यंत कमी शब्दांत 'ते' दिवस 'ते' चाळीतील वातावरण आपण प्रभावी पणे चितारलेत. वाचायला मजा आली. कृपया असेच लिहीत रहा!
ReplyDelete