गॅंगस्टर आणि दोस्त
- - - - - - - - - - - - -
विदेशात कधी तुम्ही पासपोर्टविना गेलाय का? ? तुमचे जवळचे पण निरनिराळ्या गावचे मित्र कधी भलत्याच गावी आकस्मिक भेटलेत का? कोणत्याही नियोजित कार्यक्रमाशिवाय तुमची मित्रमंडळी कधी विदेशात भेटलीत का..? इतके दिवस मला नव्हता असा कधी अनुभव....पण नुकताच अशी अनोखी, अविस्मरणीय घटना मला अनुभवता आली....मला वाटतंय माझ्या आयुष्यातील हा खूपच निराळा आणि दुर्मिळ योगायोगाचा हा अनुभव असेल.....झालं काय...की परवा उकाड्याने दिवसभर खूप हैराण झालेलो....संध्याकाळी मुठा नदीच्या पुलावर बसलो होतो...छान हवा सुटली होती....जराशी तंद्री लागली माझी...मोबाईलच्या रिंगने भानावर आलो.....नंबर विदेशातील होता.......घ्यावा की नाही ? या विचारात असतानाच फोन कट झाला.....पुन्हा फोन वाजू लागला....+855..म्हणजे कंबोडीया किंवा त्या भागातील कोणता तरी देश असावा असा विचार करत फोन रिसिव्ह केला...
'' काय रेऽऽऽऽएवढा वेळ फोन उचलायला??'' करडा आवाज कानावर पडला....लगेच लक्षात आलं...हा तर गुरू भाई...गुरू साटम..गुरूनाथ नरहरी साटम....मुंबईतून पळालेला आणि गेली 30 वर्षे विदेशातच असलेला गॅंगस्टर....मागं पुण्यात भेटला होता एक-दोनवेळा....अधूनमधून फोन करतो....पण तो तर बॅंकॉकला असल्याचं माहिती होतं...मग ही आफ्रीकन कंट्री कुठली?? विचारलं त्याला...कामासाठी आलोय इकडं वगैरे म्हणत गप्पा सुरू झाल्या...म्हणाला....ये इकडं .....
म्हटलं कशाला??
सहज ये...फिरायला...
अरे बाबा. . . माझा पासपोर्ट एक्सपायर झालाय....
तुला कशाला लागतोय पासपोर्ट?? ये इकडं नेपाळमध्ये...माझी माणसं आणतील तुला पुढं माझ्याकडं......
मी कसाकाय होकार दिला हे मलाच समजलं नाही ....मग त्याने पिच्छाच पुरवला....मग आठवडाभरानं गेलो नेपाळला....' शांती -सरोवर' ला उतरलो...दुस-या दिवशी लाली भेटला....लाली जुना दोस्त...संध्याकाळी गुरू भाईची माणसं आली....काठमांडू एअरपोर्टवरून दुस-या दिवशी चार्टर प्लेनने रवाना झालो.....गुरू साटम 1985 पासून वॉन्टेड....मूळचा कल्याण-डोंबवलीचा...सुरेश मंचेकरबरोबरच्या खुन्नसमधून हा दाऊदला जॉईन झालेला....पुढे राजनकडे गेला....मागे राजनवर बॅंकॉकमध्ये हल्ला झाला..ती गुरूनेच टीप दिल्याचा संशय ....पण हा बिनधास्त फिरतो...याचं एकमेव कारण म्हणजे तो कुणाच्याही संपर्कात नाही....चेह-याने त्याला कोणी ओळखत नाही....मुंबई पोलिसांकडं असलेला त्याचा फोटो 1980 सालातील आहे...तर असो....गुरूची माणसं....त्याचं विदेशातलं साम्राज्य.....त्याचा भव्य पॅलेस आणि त्याच्या पाहुणचाराने भारावून गेलो....'अब तक छप्पन'मधला नाना पाटेकर डोळ्यासमोर आला.....आठवडाभर गेला तिथंच आणि भारतात परतायचे वेध लागले मला....निघायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी समुद्रावर गेलो.....निळ्याशार समुद्राकाठी निवांत टेबल टाकून बीअरचा आस्वाद घेत आमच्या गप्पा चालल्या होत्या...नीरव शांततेचा छेद देत माऊथ ओर्गनचे सूर आसमंतात घुमले....'शोले' मधलाच तो मास्टरपीस होता तो...नक्कीच कोणी तरी भारतीय शौकीन असणार अशी खूणगाठ बांधून आवाजाच्या दिशेनं पाहीलं.....थक्क व्हायची वेळ माझी होती....तिथं चक्क मंदार माऊथ आर्गनवर गाणी वाजवत बसला होता....समोर लिझी कौतुकानं त्याच्याकडं पाहत बसली होती....काहीच अर्थ लागेना....हे दोघेही माझे फेसबुक फ्रेंड.....मध्यंतरी एका लग्नानिमित्त आलेल्या मंदारची पुण्यात प्रत्यक्ष भेट झालेली....मस्त माणूस.....लिझी त्याची दोस्त....तिचीही ओळख झालेली....काऽऽय रे?? कस्साहेस तू? म्हणत फोनवर बोलणा-या लिझीचे गोमंतकीय उच्चार खूप आवडतात मला.... या दोघांना भेटायला गोव्याला जायचं प्लॅनिंग अनेकदा केलेलं...पण, जमलंच नव्हतं . . . आणि प्रत्यक्ष हे दोघं थेट इथं भेटलेले.....डोळ्यांवर विश्वासच बसेना माझ्या....मला इथं बघून ते ही थक्क झालेले. . .. खूप खूप आनंद झाला आमच्या तिघांनाही.....मग गुरूला पुढे पाठवून आम्ही खूप मजा केली....खूप गप्पा मारल्या....समुद्र किना-यावरून आम्ही भटकत, गप्पागोष्टी करत चाललो होतो....एके ठिकाणी वाळूत बांधलेला किल्ला दिसला....लहान मुलं बांधतात त्यापेक्षा जरा मोठा साधारणत: चार फूट उंचीचा तो किल्ला होता...छानपैकी त्याला दारं-खिडक्या केलेली.....त्याची रचना पाहून आम्ही चकीत झालो ..कुणी हा किल्ला बनवला असावा? याचा विचार करत असतानाच बंगल्याआडून दोन डोळे लकाकले...आणि आम्ही तिघेही अचंबित झालो....त्या वाळूच्या बंगल्याआडून आमच्याकडं पाहत नीता हसत होती.....काय प्रकार आहे हेच मला समजेना......नीतासुद्धा फेसबुकमुळेच झालेली दोस्त......ठाण्यात...पुण्यात आमच्या अनेकदा भेटी झालेल्या...ती माझ्याआधी मंदार आणि लिझीची फ्रेंड....त्यांच्यात छान बॉंडींग आहे . . .पण आम्ही चौघे अशा अज्ञात देशामध्ये कधी भेटू अशी मनात कधी कल्पनाही केली नव्हती.....नीता तिथं आहे हे मंदार आणि लिझीलाही माहित नव्हतं....पण, मला तर हा प्लॅन वाटला...त्या तिघांचा....मला सरप्राईज द्यायचा तर त्यांचा विचार नव्हता ना? आणि तसं असेल.तर नीता पुन्हा भलत्याच हॉटेलात कशी राहीली??? मी इकडे आल्याचं त्यांना कसं समजलं?? काहीच कळेना.....
गुरूची दोन माणसं माझ्या मागावर होती.......माझे मित्र-मैत्रीण इथे कसे??? हे त्यांनाही समजेना.... त्यांची फोनाफोनी झाली बहुदा...आणि .....'' कभी हां...कभी ना '' मधला डॉन येतो.....तसा एका भल्यामोठ्या गाडीतून गुरू आला.... त्या तिघांकडे पाहून भुवया उडवल्या....आता इथे मीच भंजाळलो होतो.....त्याला काय सांगणार? हे कसे भेटले ते....? मी काहीही सांगितले असते..तरी त्याचा विश्वास बसणं कठीण होतं........ वेगळीच काही शंका घेऊन हा दगाफटका तर करणार नाही ना या भावनेने जरा धास्तावलो.....तरीपण बोलण्याच्या ओघात मी इकडे आल्याचं राजनला आणि शकीलला माहिती आहे.....हे त्याच्या लक्षात आणून दिलं.....पण ...तो शांत होता...आपल्यापेक्षा जास्त दुनिया त्यानं बघितलीय....त्याने असे अनेक योगायोग पाहिले असतील . .. रात्री मी हॉटेलवर आलो.....दुस-या दिवशी सकाळच्या प्लेनने मी काठमांडूला जाणार होतो....गुरू भाई गुड नाईट करायला खोलीत आला....निघताना मला म्हणाला....तू काही गिफ्ट घेत नाहीस...तरीही विचारतो ...तुला काय हवंय??? मी पाहिलं त्याच्याकडं....डोळ्यात रोखून म्हणालो ....तुझी खूपच इच्छा असेल तर दोन गोष्टी सांगतो....दोन्ही तू देऊ शकणार नाहीस....? तू फक्त बोल...गुरू म्हणाला......मला ना....मला पन्नो हवी आणि दाऊद हवा......पन्नो तू देऊ शकणार नाहीस...कारण ती या दुनियेतच नाही....आणि दाऊद.....! वो तेरे बस की बात नहीं....
दाऊद कशाला पाहिजेल तुला? गुरूने विचारले.....त्याचं काय आहे ना....दाऊदला काही वर्षांपूर्वी मी दोन लिस्ट करून दिल्या होत्या....त्याला फेमस व्हायचं होतं....मसिहा व्हायचं होतं....त्याच्याबाबत काही गैरसमज आहेत...त्याची प्रतिमा मुद्दाम खराब केली जातीयं .....असं त्याचं म्हणणं होतं.... मी त्याला दोन प्रकारच्या याद्या करून दिल्या होत्या....एका चिठ्ठीत काय करायला हवं हे लिहिलं.....दुस-यात काय टाळायला हवं हे लिहिलं होतं.....पण झालंय काय...की त्याची काही गफलत झालीये.....जे टाळायला सांगितलं ते तो करतोय . .. आणि जे त्यानं करायला हवं ते तो टाळतोय...माझं बोलणं ऐकून मंदार, लिझी आणि नीता हरखून गेले...टाळ्या वाजवू लागले.....गुरू खजिल झाला बहुदा...मलाच कसंतरी झालं...अखेर तो यजमान होता माझा...गुड नाईट म्हणून तो निघून गेला.... ते तिघंही दुस-याच दिवशी निघणार होते..नीता मुंबईला....आणि मंदार व लिझी गोव्याला..... त्यामुळं पुन्हा आमच्या गप्पांचा फड रंगला....किती ठरवून...कितीवेळा प्लान करूनही आपण भेटू शकलो नव्हतो...पण इथं या अज्ञात प्रदेशात किती आकस्मिकपणे भेटलो या भावनेने मला गहिवरून आलं....या भेटीमागे काही दैवी संकेत असावेत का? असंही वाटू लागलं....डोळ्यांतून घळाघळा पाणी ओघळू लागलं......
. . . . . . .तर मित्रांनो ..........अशी काहीही ......वाट्टेल ती स्वप्नं पडत असतात मला....मध्यंतरी डॉक्टरना सांगितलं मी...ते म्हणाले एखादं स्वप्न लिहून काढ....हे तुलनेत ताजं स्वप्न आहे...सकाळी मी उठायच्या काही मिनिटं आधीच साधारणत: नऊच्या सुमारास पडलेलं हे स्वप्नं....डॉक्टरनी सांगितलं म्हणून मी लिहून काढलं. . .. एवढंच....

No comments:
Post a Comment