खाकी लिफाफ्याचं गूढ
--------------------------
बरीच वर्ष झाली या गोष्टीला...अगदी नेमकं सागायचं तर 30 मार्च 1996 हा तो दिवस...सकाळमध्ये आमची नेहमीची संपादकीय मिटींग सुरू होती... शहरात कुठे काय घडलंय का? याचा फोनवरून राऊंड घेत होतो.....सिटी कंट्रोलला फोन लावला, तर इन्स्पेक्टर तुळशीदास महाजन लाईनवर होते...म्हणाले रात्रीपासून खास काही नाही..पण जस्ट एक खबर आलीये शिवदर्शन भागातून...दोन-तीन डेड बॉड्या सापडल्यात..सोसायटीचं नाव आपली....पळालो मग लगेच तिथं...आफीसपासून जेमतेम 8-10 मिनिटांचा रस्ता...आपली सोसायटी शोधली...बाहेर तुरळक गर्दी दिसत होती...एक दोन पोलिसांच्या गाड्या होत्या...स्वारगेटचे पीआय दारा इराणी आणि बरीच मंडळी होती. ते ही बहुदा नुकतेच पोचलेले... दोन बिल्डींगची छोटीशी सोसायटी...त्यातील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील फ्लॅटमधून खूप दुर्गंधी येत होती..एसीपी अनंतराव शिंदेंसोबत नाकाला रुमाल बांधून फ्लॅटमध्ये गेलो...समोरच्या हॉलमध्ये दोन कॉटवर दोन मृतदेह होते..खूप फुगलेले आणि पिवळे-सोनेरी असे भलत्याच रंगाचे...दोन्ही कॉटच्या मधल्या गॅपमध्ये सलाईनचा स्टॅंड...त्यातून दोघांच्या हातात सलाईनच्या नळ्या टोचलेल्या...सलाईन केव्हाच संपलेले...दोन्ही मुलांच्या पोटात भलेमोठे स्क्रू ड्रायव्हर खुपसलेले...शेजारच्याच खोलीत फॅनला गळफास घेतलेला आणखी एक मृतदेह.. भयानक दृश्य होतं सगळं...वास असह्य झाल्याने तेथून बाहेर पडत होतो, तोच प्रवेशद्वाराच्या अलिकडे उजव्या बाजूला पडदा हलल्याचा भास झाला. आत जाताना तेथे खोली असल्याचं लक्षातंच् आलं नव्हतं...शिंदेंनी पडदा सरकावला.... पाहतो तर समोर किचनमध्ये पंख्याला लटकलेला स्त्रीचा मृतदेह ..सगळंच भयाण दृश्य...सतरा वर्ष झाली या घटनेला... तरी आजही त्या स्त्रीचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर चटकन उभा राहतो....
पोलिसी सोपस्कार झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांकडून माहिती घेतली..मोहितेंच्या चौकोनी कुटुंबाची दुर्दैवी कहाणी...डॉ. राजीव मोहिते, डॉ. राजलक्ष्मी मोहिते, प्रसाद मोहिते आणि संतोष मोहिते...ही त्यांची नावं... ही हत्या की आत्महत्या हा मुद्दा पहिल्या तासांतच निकाली निघाला. घरात या चौघांनी लिहिलेली पोस्टकार्डे ठिकठिकाणी सापडली...या जगाचा आम्ही निरोप घेतो आहोत...आम्ही आजारी आहोत...आम्हाला जगायचे नाही...आम्ही देवाघरी चाललो आहोत...अशी पत्रे त्यांनी लिहिली होती...पोलिसांनी ती ताब्यात घेतली.....मोहिते कुटुंब सोसायटीत कोणाशीही बोलत नव्हते. डॉ. राजीव काहीसे विक्षिप्त होते. त्यांच्या पत्नी डॉ. राजलक्ष्मी नेहमी आजारी असायच्या...त्यांच्या आजाराचे नेमके स्वरूप समजले नाही...मुलेही कधी कुणात मिसळत नव्हती...दोन्ही मुले कॉलेजला शिकत होती. मोहिते कुटुंब स्पष्ट भाषेत सांगायचे ,तर माणूसघाणे होतं...कधी कुणाकडे गेले नाहीत...कधी कोण त्यांच्याकडे आले नाही...त्यांचे खूप जवळचे नातलग शिवाजीनगरला राहत असत...त्यांना निरोप पाठवला,पण अखेरपर्यंत ते आले नाहीत...मोहिते कुटुंबिय मुंबईतील एका राजकीय नेत्याचे जवळचे नातेवाईक असल्याचे समजले..पण त्यांनीही काही रस दाखवला नाही... त्यांच्या मित्रमंडळींबाबत फारशी काही माहिती समजली नाही आणि घडला प्रकार कळूनही कोणी तिकडं फिरकलंही नाही...सदाशिव पेठेत एका प्रकाशन संस्थेत त्यांचा एक नातलग असल्याचं समजलं...तिथं एक पोलीस गेल्यावर तो बिचारा आला. अत्यंत साधा माणूस होता तो...सत्यजीत प्रधान त्याचं नाव...सुरुवातीपासून अखेरपर्यंत थांबून त्याने पोलिसांना सर्व ते सहकार्य केले...सगळी माहिती दिली...मोहिते कुटुंबिय या टोकाला का गेले असावेत हे तो काही सांगू शकला नाही...नाही म्हणायला घरात एक खाकी बंद लिफाफा पोलिसांच्या हाती लागला...हा लिफाफा दहा दिवसांनंतर पंचांसमक्ष फोडून पत्र वाचावे असे त्यावर ठळक अक्षरात लिहिले होते...त्यामुळे त्याबाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले. स्वारगेटला त्यावेळी दारा इराणी इन्स्पेक्टर होता...रगेल आणि रंगेल दाराची पर्सनालिटी जबरदस्त होती..दोस्तीलाही मस्त...त्याला बजावून ठेवलं...पत्र उघडताना मलाही बोलाव म्हणून... आफीसला येऊन बातमी लिहिली खरी..पण त्या मृतदेहांची अवस्था विशेषत:मुलांच्या पोटात खुपसलेले भलेमोठे स्क्रू ड्रायव्हर आणि घराबाहेर पडताना अचानक लटकताना दिसलेला डॉ. राजलक्ष्मी यांचा मृतदेह आणि त्यांची बाहेर आलेले डोळे नजरेसमोरून हटत नव्हते...कमालीचे अस्वस्थ करीत होते... हे सगळं कसं झालं असावं, याचा उलगडा पोलिसांनी केला...मोहिते दांपत्याने सामुहिक आत्महत्येचा निर्णय आठवडाभरापूर्वीच घेतला होता...तसा विचार त्यांच्या मनात कायम घोळत असावा...आठवड्य़ापूर्वी डॉ. मोहितेंनी जवळच्या हार्डवेअरच्या दुकानातूनच ते स्क्रू ड्रायव्हर खरेदी केल्याचे तपासात समजले...पोलिसांनी काढलेल्या तर्कानुसार, दोन्ही मुलांना या दांपत्याने सलाईनमधून विष दिले...झोपेच्या गोळ्या दिल्या.. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी पोटात स्क्रू ड्रायव्हर खुपसले असावेत...किंवा थोडाफार जीव असेल, तर तो जाण्यासाठी किंवा पूर्णपणे ठार करण्यासाठी ते स्क्रू ड्रायव्हर खुपसले असावेत...त्यानंतर या जोडप्याने गळफास लावून आत्महत्या केली असावी...त्यामध्ये कोणी आत्महत्या पहिली केली हे कळण्यास मार्ग नाही...मुळात उच्चशिक्षित दांपत्य सामुहिक आत्महत्येस का प्रवृत्त झाले...मुलांनी त्यांना विरोध का केला नाही..त्यांनी आई-बाबांना का समजावून सांगितले नाही? असा काही प्रकार घडणार आहे याची कल्पना मित्रांना, नातलगांना का दिली नाही?? का मुलेही अशीच मानसिक रुग्ण होती?? पण तसेही नव्हते..कारण आपटे महाविद्यालयात शिकणारा संतोष 4-5 दिवस कॉलेजला का आला नाही हे पाहण्यासाठी त्याचा एक मित्र येऊन गेला होता..घर उघडले न गेल्याने तो परतला...त्यानेही हा प्रकार इतरांना का सांगितला नाही??? पोटच्या मुलांना विष देताना या मातापित्यांचे हात थरथरले का नाहीत??? काहीच कळू शकले नाही....कारण खरा प्रकार काय घडला? हे सांगायला कोणी हयातच नाही ना..! जे काही आहे हा सगळा वैद्यकीय पुरावा आणि पोलिसांच्या तपासातील तर्क...मला याबाबतीत अनेक प्रश्न आजही छळतात...मुलांना सलाईन लावल्यानंतर ती काही लगेच मृत पावली नसणार...त्याला काही तास लागले असतील...हे सलाईन लावण्यापूर्वी या कुटुंबियांचा परस्परांशी काय संवाद झाला असेल?? विष देण्यापूर्वी त्या माऊलीने आपली माया, ममतेला फुटलेला पाझर कसा रोखला असेल??आपल्या मुलांशी हे दोघेही अखेरचे काय बोलले असतील?? मुले मरण पावल्यानंतर त्यांच्या पोटात राजीव यांनी की राजलक्ष्मी यांनी स्क्रू ड्रायव्हर खुपसले??? ते करताना त्यांचे हात थरथरले असतील काय? दोन्ही मुले गेली हे सांगताना त्यांना काय वाटले असेल? ऐकणा-याला काय वाटले असेल...दोघांनीही गळफास घेताना अखेरचा निरोप कोणत्या शब्दांत घेतला असेल?? सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना सलाईनमधून विष दिल्यानंतर ते मरेपर्यंत हे दांपत्य परस्परांशी काय बोलत बसले असावेत? की मुलांना सलाईन लावल्यावर डॉ. राजलक्ष्मी यांनी लगेच गळफास लावून घेतला??मग डॉ. राजीव एकटेच काय करत बसले असावेत?? काही . .. काही . ..कळायला मार्ग नाही...
या सर्व तर्क-वितर्कांमुळेच मोहितेंच्या घरात सापडलेल्या खाकी लिफाफ्याबाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले होते. या चौघांच्या अंत्यसंस्काराला सोसायटीतील चार- दोन लोक आणि त्यांचा तो प्रकाशन संस्थेतला नातलग एवढेच होते...आम्ही दिवस मोजत होतो..तसं पाहता तो लिफाफा लगेच फोडला असता, तरी काय फरक पडला नसता...पण मृतांची अखेरची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने दारा इमानदारीत दहा दिवस थांबला. अकराव्या दिवशी लिफाफा फोडण्यापूर्वी मला फोन केला...मी स्वारगेट पोलीस स्टेशनला पोचलो..घटना घडली त्या दिवशी दिवसभर थांबलेल्या सत्यजीत प्रधानलाही बोलावलं होतं. दाराने कपाटात ठेवलेला तो लिफाफा फोडला. सर्वांचीच उत्सुकता शीगेला पोचली...दाराने पत्र वाचायला सुरुवात केली...पहिल्या दोन शब्दांनंतर तो थबकला...पत्रावर नजर फिरवली आणि त्याने ते आमच्यासमोर ठेवलं....विक्षिप्तपणा म्हणा किंवा विकृती किती असावी डॉ. राजीव मोहितेंची??...पूर्ण पत्रातील पहिले दोन शब्द होते सत्यजीत प्रधान....पुढे पानभर फक्त एकाहून एक इरसाल आणि एकाहून एक घाणेरड्या शिव्या आणि फक्त शिव्याच...कपाळावर हात मारून घेण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता . . जन्मदात्या मातापित्यांनी आरूषीचा खून कसा केला असावा? अशी पोस्ट एका मित्राने परवा टाकली होती...त्याबाबत विचार करतानाच अचानक मोहिते कुटुंबियांच्या या सामुहिक आत्महत्येच्या प्रकरणाला उजाळा मिळाला....तो दिवस असा लख्ख डोळ्यासमोर उभा राहीला....

No comments:
Post a Comment