पीटर अंकल
- - - -
मध्यंतरी आम्ही शाळकरी मित्र एकत्र जमलो होतो...'पूनम' ला बीअर , मासे... मस्त गप्पा रंगल्या होत्या..खास काही कारण नव्हतं..सहज नेहमीच्या धबडग्यातून जरा निवांत व्हायचं होतं..आमच्यातले.बहुतेक सारे निरनिराळ्या क्षेत्रात मोठे झालेत...फार सवड काय कुणाला मिळत नाही...पण वर्गातले मित्र भेटणार म्हणून आवर्जून आलेले...शाळेच्या जुन्या आठवणी निघाल्या...मोरपंखी दिवस डोळ्यांसमोर तरळले.. मधल्या सुटीत एकत्र डबे खायचे दिवस आठवले...शाळेची प्रार्थना....एनसीसीचे सर, भूगोलाच्या बाई.. .गृहपाठाच्या वह्या...सांडलेल्या दौती...ग्राउंड .. .पीटी.. इन्स्पेक्शन.. मुलींची शाळा .बरंच काही काही कुणा कुणाला आठवत होतं .. खूप मजा आली...दंगा, मस्ती, शेरोशायरी...काय.. काय धमाल सुरू होती.. ...संध्याकाळी लवकर सुरू झालेली मैफल मध्यरात्रीपर्यंत सुरूच....अखेर कुणाला तरी घरची आठवण आली....पण पाय कुणाचा निघेना....जाताना पानवाल्याकडं पुन्हा गप्पा रंगल्या .. एकानं शाळेच्या सा-याच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा करायची आयडीया काढली...सर्वांनी उचलून धरली..
रियुनियनसाठ्ठी बरीच धावाधाव करायला लागली...मित्रांनी निरनिराळी काम अंगावर घेतली...पेपरमध्ये जाहिराती दिल्या ...फ्लेक्स लावले...संपर्क कार्यालय सुरू केलं .माजी विद्यार्थ्यांचा ओघ वाढला .. जुने लोक भेटू लागले.....आमच्या मागच्या -पुढच्या बॅचची मुले येऊ लागली..आपाल्या मित्रांचे नाव पत्ते शोधू लागली.. ..नवनवीन ओळखी होतं गेल्या ...पीटर अंकलची ओळख तिथंच झाली...आमच्यापेक्षा वयस्कर...पण ताठ कणा...बोलणं संथ,,मृदू..सर्वांशी छान बोलायचे..मस्त मिसळायचे...ते रहायचे येरवड्यात....आधी मला वाटलं ते ..पाच सात बॅच सिनियर असतील...गप्पांच्या ओघात विचारलं तर म्हणाले...पासष्ठ पासआऊट ....मी उडालोच....म्हणजे माझा जन्मही झाला नव्हता तेव्हा ते एसएससी झालेले...अंकलनी वयाची सत्तरी ओलांडली असेल असं त्यांच्याकडं पाहून कधीच वाटत नाही...सरकारी नोकरीतून ते रिटायर्ड झालेत..खाऊनपिऊन सुखी आहेत ...मेळाव्याच्या पहिल्या मिटिंग पासून ते आम्हाला जॉईन झाले...मेळावा होईपर्यंत त्यांनी मिटिंगचा नेम कधी चुकवला नाही.. खूप उत्साहाने आमच्यात मिसळले..मेळाव्यात मनापासून भाग घेतला...कुणाला कधी वाईट बोलले नाहीत...त्यांच्या बॅचचं कोण भेटतं का? याची त्यांना खूप उत्सुकता होती...पण नाही....नाही आलं त्यांच्या बरोबरचंच कुणी...मनोमन हिरमुसले असावेत... तसं दाखवलं नाही काही...आमच्यात मस्त रमले...
मेळावा सॉलिड झाला...खूपच अविस्मरणीय दिवस होता तो..त्यानंतर आम्ही काही मित्र आठवड्यातून एकदा तरी पुन्हा भेटू लागलो..अंकल काही आले नाहीत...ते कुठतरी जेरुसलेमच्या टूरवर गेले होते....प्रभू येशूच्या त्या जन्मभूमीच्या भेटीला जाताना खूप हळवे झालेले.. आम्हा मित्रांचा आवर्जून निरोप घेऊन गेले...तसं म्हटलं तर...अंकल आमच्या शाळेत कसे काय असावेत ? हा प्रश्न मला पडायचा...आमची शाळा एकतर पेठेतली...बहुतांश मुले सदाशिव, शनिवार , नारायण पेठेतली असायची .. संघाच्या मंडळींची शाळा म्हणून शिक्का बसलेला ..तेव्हा पेठेत ख्रिश्चन मंडळी फारच अभावाने रहायची ....गुरुवार पेठेत काही कुटुंबे होती..कॅम्पात मोठी वस्ती.....गावात जे काही मोजके परिवार होते ...ते ही राजगुरू, साळवी..मिसाळ, हिवाळे अशा मराठी आडनावांचे होते...त्यातलंच एक पीटर अंकलचं कुटुंबही असावं..
अंकल मोजकं बोलायचे..त्यात ते आमच्यापेक्षा बुजुर्ग ...त्यामुळं फार कांही विचारता यायचं नाही..गेल्या आठवड्यात त्यांचा फोन आला....म्हणाले सगळ्यांना जेवायला बोलवयाची खूप इच्छा आहे..येतील का रे आपले मित्र माझ्याकडं ? म्हटलं...हो त्यात काय अडचण नाही...नेहमीचा आपला ग्रुप आहे तो सारा येईल....सा-यांच्यावतीनं मी होकार कळवून टाकला....अंदाज चुकीचा नव्हता..मित्रांना फोन करून मी अंकलचा निरोप कळवला..सारे आनंदाने तयार झाले यायला....कोण व्हेज...कोण नॉनव्हेज अशी अंकलनी सारी यादी विचारून घेतली....जवळपास वीस-पंचावीसजण होतो आम्ही....सारे आले...अंकलसाठी कुठून कुठून आवर्जून आले...अंकलचं घर छान टुमदार....आम्ही सारे घरी आल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता... आमच्या स्वागताला ते तासभर आधीपासूनच घराखाली येऊन वाट पहात होते..खूप छान वाटलं त्यांना...शाळा, कॉलेजात खेळांमध्ये.. वक्तृत्व स्पर्धांमध्ये मिळालेली मेडल्स त्यांनी अलवार जपून ठेवलीत...तेव्हाची पुस्तकं जपलीत...त्यांच्या तेव्हाच्या मित्रमैत्रीच्या फोतोंन्चा स्वतंत्र अल्बम केलाय.. एकेका मित्रांची माहिती देताना त्यांच्या डोळ्यांत आगळी चमक आली ...त्यांच्या नजरेसमोर ते दिवस तरळत असावेत..शाळेचे दिवस, तेव्हाची कडक शिस्त, अभ्यासाचा नेम ते सांगत होते....त्यांच्या दर वाक्यात कुणा ना कुणा मित्राचं नाव यायचं... सा-यांची नावं तोंडपाठ होती...प्रत्येकाच्या घराचे पत्ते जसेच्या तसे आठवत होते...त्यापैकी खूपच लोक त्यांना भेटत असावेत..
अंकलच्या घरात आम्ही सारे रमलो..गप्पा रंगल्या.त्यांच्या बोलण्यात रम्य भूतकाळाची अन अस्वस्थ भाविष्याची झाक डोकावत होती.. मस्तपैकी सा-यांची पंगत झाली...मसाले भात, वरण भात, अळुची भाजी, पुऱ्या, जिलेबी मठ्ठा, भजी असा पुणेरी बेत होता..मांसाहारी मंडळीसाठी चिकन बिर्याणी, सुरमई फ्राय, कोलंबीचा रस्सा असा फक्कड़ मेनू.... खुबानी का मीठा, रसमलाई जोडीला होती...आचा-याला खास ऑर्डर देऊन त्यांनी सुरेख जेवण बनवून घेतले होते.. नातवंडांची त्यांनी ओळख करून दिली...मित्रांनी शाळेचा मोमेंटो ,शाल, श्रीफळ भेट दिले...फोटो काढले...अनौपचारिक सत्कार स्वीकारतानाही ते काहीसे बुजून गेले..पण ते पहायला मुलाबाळांना आवर्जून त्यांनी हाका मारून बोलावलं ...खूप अप्रूप वाटलं त्यांना...
अंकल ....सरकारी नोकरीतले..जुन्या काळातले...त्यामुळं थोडीफारचं पेन्शन मिळते....तीन मुलं.....दोन मुली...आठ- दहा नातवंडं..असा मोठा परिवार ..एक मुलगा लंडनला..बाकी सारे पुण्यातच..पाच सात वर्षांपासूनच्या बबलूपासून ते बावीस वर्षांच्या किंजेलपर्यंत सा-या नातवंडांवर त्यांचं अतोनात प्रेम..ही लहान मुलं आणि इतर सारेच नातलग आम्हाला आग्रहाने जेवायला वाढत होते..सा-यांची भरपेट जेवण झाली...गप्पा काही थांबेनात.. .बाहेर पावसाची जोरदार सर येऊन गेली..हवा कुंद होती.निरोप देताना अंकलचा स्वर काहीसा जड झाला...कधीही येत जा तुम्ही...मी इथेच असतो....या घरात एकटाच राहतो....बायको गेली....मुलं वेगळी राहतात....मोठा बोलावतोय लंडनला...इथली मुलंमुलीही यायचा खूप आग्रह करतात....मलाच नाही आवडत....नाही रमत आता इतर ठिकाणी....वाचायची आवड आहे...लिहायचा छंद आहे..इथल्या मातीत आयुष्य गेलंय ..आता कुठे या वयात कुणाचा भार होऊ ?.नाही पटत मनाला..शाळेत खूप धमाल केली..गॅदरिंगमध्ये भाग घ्यायचो..खेळांमध्ये असायचो...कायम मित्रांच्या गोतावळ्यात असयचो .सोळाव्या वर्षापासून नोकरी करतोय ..इस्त्रीच्या दुकानात काम करून कॉलेज शिकलो.तिथंही स्पोर्ट्समध्ये असायचो.निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो...मोठा ग्रुप होता कॉलेजचा...शिकल्यासावरल्यावर सारे कामाधंद्याला लागले..कुणाचे व्यवसाय होते..
सुरुवातीला भेठीगाठी व्हायच्या..गेल्या काही वर्षात कुणी भेटलं नाही...काहीजण टचमध्ये आहेत....पण येणंजाणं होत नाही ..सारे म्हातारे झालेत...बरेचसे वर गेलेत..सरकारी नोकरी केली..मालमत्ता विभागात होतो...मी कामावर यायच्या आधीपासून लोकांची गर्दी असायची..पार घरी जाईपर्यन्त ऑफिसमध्ये लोक असायचे.धड जेवायलाही वेळ मिळायचा नाही. नातलगही भरपूर. पिढ्या बदलत गेल्या..नात्यांची वीण सैल होतं गेली...नव्या लोकांना वेळ नाही .. जे ते आपापल्या घरात खुष.ज्याला त्याला आपापली चिंता .कष्टाचं असलं तरी खूप सुंदर आयुष्य होतं.आताही काही कमी नाही..माझा खर्च मी भागवतोय मुलं...मुली.. सारे हवं नको बघतात..असं तुमच्यासारखं कुणी येणार असलं की येतात माझ्याकडं..तसा मोबाईल आहे म्हणा माझ्याकडं.तेवढाच विरंगुळा..वयोमानामुळं फारसं कुठं जात नाही ...भीती वाटते ट्राफीकची...रस्ता ओलांडताना जीव घाबरा होतो....इतक्या वर्षात काय झालं नाही...तेव्हा काय झालं तर हवं नको पाह्यला बायको होती...आता तसं नाही.आपलेच लोक परक्या नजरेन पहातात हो...वाईट नाही वाटत ...पण धास्ती वाटते.. पेंशन नसती तर काय झालं असतं? या विचारानं अंगावर काटा येतो....इथंच बसून राहतो आता......उभी हयात माणसांच्या गर्दीत गेली...माणसांमध्ये रमलो...आता एकांत...एकटेपणा इतका सवयीचा झालाय की गर्दीत बावरायाला होतं....खूप वेळ लोकांमध्ये नाही वावरता येत ... ठिक आहे....मी एकट्यानं राहावं अशी प्रभूचीच इच्छा असेल.... तसा मजेत आहे मी...तुम्ही आहात ना आता सोबतीला....चिंता नाही कसली...येत जा...गुड बाय... म्हणत अंकलनी निरोप दिला.त्यांच्या पांढुरक्या पापण्या ओलावल्या .कितीतरी वेळ घराच्या चौकटीत असलेला अंकलचा चेहरा नजरेसमोर तरळत होता...

No comments:
Post a Comment