जव्हारचा उरूस
.........................
जव्हारला जाणं मला आता नवलाईची गोष्ट राहिली नाही; पण अप्रूपही अजून संपलेलं नाही. दर भेटीत नवा, निखळ निसर्ग भेटतो. हिरवेगार डोंगर अन् शंखनीळ पाण्याचे झरे डोळ्यांचं पारणं फेडतात. कसलंही प्रदुषण नसलेली, स्वच्छ, मोकळी हवा तन मन तजेलदार करते ..गेली पाच वर्ष या आदिवासीबहुल भागात भटकतोय.कधी काही कारणानं, कधी उगाच पाड्यांवर मुशाफिरी..दरखेपेस नवी माणसं भेटतात. नवे अनुभव मिळतात..बोहाडा, दसरा, दिवाळी, होळी अशा इथे जोमानं साजऱ्या केल्या जाणाऱ्या पारंपारिक सणांना उपस्थित राहिलो..मोहाचे घुटके घेत तारप्याच्या तालावर थिरकलो...हळदीच्या समारंभाची धूम अनुभवली ..बघायचा राहिला होता तोराहिला होता सदरुद्दीन बाबांचा उरूस....यंदा या उरुसाला जायचा, आदिवासी जत्रा बघण्याचा योग् गाठता आला.
जव्हार, विक्रमगड, वाडा, मोखाडा, डहाणू आणि पंचक्रोशीतल्या दोन-तीनशे पाड्यांत सदारुद्दीनबाबांना महत्वाचं स्थान......पंधराव्या शतकातील हा योगीपुरुष..हे सदरुद्दीन बाबा की सदानंद महाराज असेही पूर्वापार मतभेद आहेत..पंधरा वर्षापूर्वी दर्गा असलेली इमारत कोसळली...ती बाजूने पत्रे लावून तशीच ठेवलीय...भाद्रपद महिन्याच्या षष्ठी आणि सप्तमीला बाबांचा उरूस साजरा करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून पाळली जाते. यंदाही
मस्त जत्रा भरली होती..गणपतीत पुण्यात गर्दी होते, तशी लोकांची तुडुंब गर्दी झालेली..या भागातल्या गरीब, आदिवासी लोकांना मुळात मनोरंजनाची साधनेच् नाहीत..आता मोबाईल, इंटरनेट आलंय, पण त्याचं फॅड कमीच्.. विजेअभावी रोजचे किमान बारा- चौदा तास अंधारात राहणाऱ्या इथल्या लोकांना सण, उत्सव हिच आनंदाची बेटं... त्यामुळं आजुबाजूच्या पाड्यांवरचे हजारो आदिवासी एसटी,टेम्पो,रिक्षा, दुचाकी अशा मिळेल त्या वाहनांनी जव्हारला सदरुद्दीन बाबांच्या मजारवर माथा टेकवण्यासाठी आले होते..एकंदर माहोल पाहून पुण्याच्या चतुशृंगीची, वीरच्या म्हस्कोबाची, विरारच्या जीवदानी देवीची, बांद्र्याच्या मोतमाऊलीची, पालच्या खंडोबाची, खरसुंडीच्या सिध्दनाथाची यात्रा डोळ्यांसमोर तरळून गेली...तसंच चैतन्यमय अन श्रद्धेनं भारलेलं वातावरण..नाही म्हणायला माणसांमधला विशेषतः त्यांच्या स्तरातील फरक मात्र प्रकर्षानं लक्षात येतो..इथल्या निसर्गाप्रमाणेच इथली माणसंही निर्लेप, नितळ मनाची....झोळी फाटकी असली तरी उमद्या मनाची..
गेली तीन वर्षे ऐन उरुसाच्या काळात वरुणराजा कोपला होता..त्यामुळं यात्रा भरूनही भाविकांचा हिरमोड झाला...गेले महिनाभरही इथे जोरदार पाऊस पडतोय.. जव्हारचा सारा परिसर हिरवागार झालाय... यंदा उरुसाच्या आदल्या दिवसापासून पाऊस उघडला...त्यामुळं भाविकांचा उत्साह दुणावला. उरुसाला तुफान गर्दी उसळली...नजर जाईल तिथवर हिरव्यागार पाचूसारखी पसरलेली हिरवळ, धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या डोंगर दऱ्या, चारही बाजूने वेढलेले घनदाट जंगलाच्यामध्ये जणु बेटासारख्या असलेल्या जव्हारच्या उरसाला लांबलांबच्या पाड्यातून आदिवासी एकवटले होते...गावभर माणसांचं मोहोळ फुटलं होतं. गर्दीमुळे अगदी एसटीसह सर्वच गाड्यांना गावात यायला रस्ता उरला नव्हता...रस्त्याच्या दुतर्फा फुगे, खेळणी, कपड्यांची दुकाने थाटलेली होती. गरागरा फिरणारे पाळणे, मौत का कुवा, छोटी आगगाडी याचं आकर्षण अद्याप तिथं टिकून आहे.....बांगड्या, गळ्यातल्या माळा, खड्यांची ब्रेसलेट्स यांचं तिथल्या लोकांमध्ये अपार आकर्षण आहे.. रंगीबेरंगी कपड्यांनी, पादत्राणांनी दुकानं सजली होती.. आपल्याकडे सहसा न वापरल्या जाणाऱ्या पिवळयाधमक, राणी, गडद पोपटी अशा रंगांचे कपडे, सोनेरी, रुपेरी, चंदेरी बांगड्या हातोहात खपत होत्या...लोबान, धूप, उदबत्तीच्या आणि निशिगंधाच्या हार,शे-यांच्या अनोख्या गंधाने वातावरण भारले गेले होते...गुडदाणी जिलेबी, हलवा, रेवड्या, गोडीशेव, नारळाच्या बर्फीची जोरदार विक्री सुरू होती. लाल भडक गुलाब पेरलेला केशरी हलवा, दालचा चावल, खिचडा, फिरनी असे खाद्यपदार्थ मस्त सजवून ठेवले होते. जत्रेत सोरटचा जुगारही होता..तिथं पाच दहा रुपये लावून दसपट पैसे मिळवण्यासाठी अनेकजण नशीब अजमावत होते. गावच्या स्टॅंडपासून ते दर्ग्यापर्यंत आणि संबंध गावात तुफान गर्दी उसळली होती..मजारचं दर्शन घेऊन, तिथं फूल , शेरा अर्पण करून लोक जत्रेचा आनंद घेत होते..कपड्यालत्त्याची खरेदी करत होते..मुलाबाळांना खाऊ घेत होते..
उरुसाच्या पहिल्या दिवशी संदलची मिरवणूक झाली..गावातले सगळ्या जातीधर्माचे, पंथाचे लोक उत्साहाने त्यात सहभागी झाले..स्पीकरवर हिंदी, उर्दू धार्मिक गाणी लावली होती. दर्ग्याजवळ स्थानिक मान्यवर मंडळी बसली होती...महिलांचीही संख्या लक्षणीय होती.. संपूर्ण गावभर फिरून संदल दर्ग्यावर नेऊन वाहण्यात आला..दर्ग्याच्या परिसरात कव्वाली सुरू होती.. लोक डोलत होते, भक्तीभावाने झुलत होते..आनंदाने नाचत होते...आगळं चैतन्य आसमंतात निर्माण झालं होतं...उरुसाला रंग चढला होता..
..जत्रा रात्रभर सुरू होती...मध्यरात्रीनंतर कधीतरी दमलेले लोक आपापल्या टेम्पो, रिक्षात जाऊन नातलगांची, सहप्रवाशांची वाट बघू लागली...तांबडं फुटलं तसं ड्रायव्हर लोक गरम गरम चहा पिऊन ताजीतवानी झाली...जव्हारमधून चारहीबाजूच्या पाड्यांकडं वाहनं पळू लागली... लोक शेतीच्या कामासाठी घराकडं निघाले...थोडाच् वेळ गेला अन् मराठी, कोळी, हिंदी, भोजपुरी गाण्यांचा कल्लोळ स्पीकरवर सुरू झाला.. पाळणे पुन्हा गरागरा फिरायला लागले..आगिनगाडी धावू लागली..'मौत का कुवा'मधल्या मोटारसायकलींचे सायलेन्सर्स आसमंतात गुरगुरू लागले..जत्रेत फिरून दमल्याने मी घराकडे निघालो होतो अन् आदल्या दिवशी उरुसाला यायला न जमलेले शेकडो दूरदूरच्या पाड्यांवरचे बायाबापडे मुलाबाळांसकट ट्रक, रिक्षा, टेंम्पोमधून जव्हारमध्ये यायला सुरुवात झाली...दिवसभर आदिवासी बांधवांची एकच गर्दी दाटली...संस्थानच्या परंपरेनुसार जव्हारचे राजे महेंद्रसिंह मुकणे उरुसाला आले..संस्थानतर्फे दर्ग्यावर त्यांनी चादर अर्पण केली... बाबांच्या नावाचा एकच जयघोष झाला. कव्वालीची जुगलबंदी सुरू झाली..सलग तीन दिवस उरुसाचा जल्लोष सुरू होता..तिथून पुण्याला परतलो...मनात अजूनही जत्रा सुरू आहे....
फ

No comments:
Post a Comment