झाप पाड़यावर डोंबारी....
- - - - - - -- - - ----
डोईवर सूर्य तळपत होता..डांबरी सडकांमधून जणू वाफा निघत होत्या.
.हवेत कमालीचा उष्मा होता...जव्हारहून मी झापच्या दिशेला चाललो होतो..
चोथ्याची वाडी, पोंढीचा पाडा, पवारपाडयाहून काळशेती नदीवरून पुढं निघालो....नदीचं पात्र भलंमोठं... सारं कोरडं ठणठणीत पडलेलं.... कुठंतरी एखाद्या खळग्यात पाणी दिसत होतं..
सारे आदिवासी पाडे एकसारखेच्... तशीच लालसर धुळमाती...कुडाची शेणामातीनं लिंपलेली खोपटं...हातापायाच्या काडया झालेली, पोटं खपाटीला गेलेली माणसं...वाळक्या गवतात हिरवा चारा शोधणाऱ्या शेळ्या, गावभर फिरणाऱ्या कोंबड्या.....इथलं जग एवढंच...इथं नागली,पिकते.....भात पिकतो आणि वरईही होते.....सध्या शेतीकामं बंद... मजुरी कामंही बंद.....लोक आपले पाड्यातच घराबाहेर निवांत बसलेले.....उकडलेला भात आणि एखादी रानभाजी एवढं जेवण मिळालं तरी ते तृप्त असतात...अन् कुपोषितही....
घरात साधा पंखाही नाही....मग बाहेर जरा सावली धरून लोक बसलेले...
इथं वर्तमानपत्र नाही. कॉम्प्युटर नाही..इंटरनेट नाही... फेसबुक, ट्विटर, वोट्स ऍप वगैरे या लोकांपेक्षा दुसऱ्या दुनियेतले....परस्परांशी सुखदुःखाच्या गप्पा एवढीच त्यांची एंटरटेनमेंट...बरं हे चित्र आजचं नाही.....स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे आदिवासी बांधव उपेक्षितच आहेत....नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असून अन ढोर मेहनतीची तयारी असूनही या भूमीपुत्रांच्या नशिबी कायम दारिद्र्यच् आलंय..... इथं पावसाळ्यात धो धो पाऊस कोसळतो अन् उन्हाळ्यात प्यायलाही पाणी मिळत नाही....पावसाचं पाणी साठवून ते वर्षभर पुरवण्यासाठीची ठोस उपाययोजनाच नाही इथं.....राजकीय अनास्था एवढंच त्यांचं कारण.....नाहीतर इथं डाळिंब, मतस्यशेतीसारखे खूप चांगले प्रयोग राबवता येतील, असं इथले जुने जाणते लोक सांगतात.... काहीजणांनी कल्पकतेने मोगऱ्याचे मळे फुलवलेत.नाशिक, मुंबईच्या फुलबाजारात अन विदेशातही इथल्या मोगऱ्याचा सुगंध घमघमतो...सरकारी यंत्रणांनी ठरवलं तर मोगऱ्यासारखे असे कित्येक प्रकल्प हाती घेता येतील...पण करणार कोण ? सरकारं कितीतरी आली.....कितीतरी बदलली....परिस्थिती जैसे थे.....त्यामुळं इथं लोकांना राजकारणात इंटरेस्ट नाही....स्थानिक आमदार, खासदारांची नावंही माहिती नसतात कित्येकांना.....
पोंढीच्या पाड्यावरून पुढं चाललो असताना वाटेत एक आदिवासी आज्जी भेटली.....तळपत्या उन्हात तापलेल्या डांबरी सडकेवरून अनवाणी पायानं हातात पातेलं घेऊन पाण्याच्या शोधार्थ निघालेली...मी गाडीतून उतरलो....तिचे फोटो काढले...
..मला म्हणाली....एक रुपया देतास का ?
मी खिशातलं नाणं तिच्या हातावर टेकवलं.....
बब्बाबा दोन रुप्ये ????? तिचे डोळे विस्फारले.... अविश्वासानं ती त्या नाण्याकडं पाहत राहिली....एकदम दोन रुपये मिळणं तिच्यासाठी बहुदा अप्रूप होतं...तिची ती नजर दारिद्रयानं पिचलेल्या आदिवासी समाजाच्या गरिबीचं प्रतीक होती...पाय भाजू लागल्यानं ती रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतावर उभी राहिली....तेव्हा तिच्या पायांकडं लक्ष गेलं... ऊन, वारा पावसात अनवाणी फिरून निबर झालेले तिचे पाय कोरडे ठणठणीत आणि कृश झालें होते....मला कसनुसं झालं... खूप अस्वस्थ झालो....पायातले 'नायकी'चे शूज तिथंच काढून फेकून द्यावंसं वाटू लागलं...मनाचा संताप झाला....खरंच किती विषमता आहे ना !
एकाच देशात दोन दुनिया जगतो आपण....
पुढं झाप गावात पोचलो...पाड्यापेक्षा थोडा मोठा गाव.... अडीच हजार लोकवस्ती....वारली, ढोरकोळी, कोळी समाजाचं इथं वास्तव्य....काही घरं विटांची... बाकी सारी कुडाची....गाव ओस पडलेलं.... गावालगतच्या मैदानात सारे जमलेले....डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता....मुलंबाळं, बाया, बापडे खेळ बघण्यात दंग झालेले....कधीतरी येणारा मदारी, डोंबारी, दरवेशी हिच् त्यांची करमणूक... लोक टाळया पिटून कसरतीच्या खेळांना दाद देत होते...त्यांच्या गमतींना खळखळून हसत होते...आता याच लोकांना खायला काही नाही, खिशात पैसे नाहीत; ते डोंबाऱ्याच्या झोळीत काय टाकणार ? गावची स्थिती लक्षात आल्यावर त्यानेही खेळ आटोपता घेतला... त्याच्या फाटक्या झोळीत फारसं काही पडलं नाही.... पण, लोकांनी घासातला घास काढून देऊन त्या कुटुंबाला जेवण दिलं....
झाप गावात ग्रामपंचायत आहे..... गावापर्यंत डांबरी सडक आहे... गावात मात्र रस्ते नाहीत...शौचालयं नाहीत.... देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षं उलटलीत, पण इथं अजून पाण्याचे नळ नाहीत.....विहिरीवरून पाणी आणावं लागतं.... ईश्वर शंकर भरताव तिथं भेटले...त्यांच्या बऱ्याच पिढया इथल्याच.... गावच्या समस्या सांगता सांगता त्यांना अक्षरशः दम लागला.....कुणी लक्षच् देत नाही हो इकडं..... विहिरीचं पाणी आत्ताच आटलंय...पुढचे दोन महिने कसे जाणार ? या चिंतेनं रात्र रात्र झोप लागत नाही....म्हणताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले...
जव्हार, मोखाडा, वाडालागतच्या पाड्यांवर फ़िरताना दरवेळी अशाच जखमा भेटतात... दरखेपेस मन अधिक निराश होत जातं..मुंबई, ठाणे, नाशिक आणि गुजरातच्या बेचक्यात असलेल्या या पाड्यांवर रात्री मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वेचे आवाज येतात.....शिटी ऐकू येते....एक मोठा रस्ता झाला तर थोडक्या वेळेत ते हायवेवर जाऊ शकतात.. ठाणे, नाशिक जेमतेम पन्नास साठ मैलांवर आहेत.....पण त्या महानगरांची शान, सुबत्ता
कुठे ?अन् इथली पूर्ण विरुद्ध अवस्था पाहता आपल्या भारत देशात दोन स्वतंत्र देश आहेत की काय ? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.....मनात नैराश्याचे मळभ साचले असतानाच पाड्यावर भेटलेली पिटुकली वीरा अन चमकदार डोळ्यांच्या आर्याला पाहून उगवत्या पिढीबद्दल मनोमन जरा आशा वाटली एवढंच्...

No comments:
Post a Comment