दोन भाई, एक बाबा-- तीन 'तरुण'
----------------------------
डॉ.बाबा आढाव आणि भाई वैद्य ....पुण्याच्या,राज्याच्या समाजकारणात आणि राजकारणात मूठभर शिल्लक असलेल्या ध्येयनिष्ठ अन निस्पृह,सात्त्विक पिढीतील हे दोन नेते ... गेली तब्बल सहा दशके हे दोघे समाजसेवेत व्यस्त आहेत...दोघेही मूळचे राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत तयार झालेले...सुरुवातीची काही वर्षे सोडली, तर बाबा राजकारणात रमले नाहीत..हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद, काचपत्रा वेचणा-यांची संघटना आणि तत्सम संघटनांच्या माध्यमातून गरीब, शोषित, श्रमिक वर्गासाठी त्यांच्या सेवेचा यज्ञ अहोरात्र सुरू असतो..तळागाळातल्या माणसांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अवघं आयुष्य वेचलं....
भाई समाजकारणातून राजकारणात आले....पुण्याचे, नगरसेवक, महापौर, आमदार, राज्याचे गृह राज्यमंत्री झाले...हमीद दलवाईंनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत भाईंचा मोलाचा वाटा आहे... पुरोगामी विचारांच्या संघटनांना भाई आणि बाबा कायम भक्कम पाठबळ देत असतात...
समाजवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी भाईंनी स्वतंत्र राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.. या पक्षाच्या बैठकांसाठी देशभर त्यांचे दौरे सुरू असतात...स्वातंत्र्य चळवळीत आणि गोवा मुक्ती आंदोलनात पोलिसांच्या काठ्या अन तुरुंगवास झेललेल्या भाई आणि बाबांच्या नसानसात समाजवाद भरला आहे....राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण अशा दिग्गज नेत्यांच्या सहवासात त्यांच्यातील समाजवादाची मुळं घट्ट रुजलीत...
जव्हारचे रवींद्र वैद्य हे ही भाई आणि बाबांप्रमाणेच सच्चे समाजवादी....हाडाचे कार्यकर्ते....जव्हार आणि लगतच्या परिसरात ते भाई वैद्य या नावानेच परिचित ... त्यांनीही गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी पोर्तुगीज लष्कराच्या काठ्या झेलल्यात... तुरुंगवास
सोसालाय....जव्हार आणि आजुबाजूच्या परिसरातील आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी आयुष्यभर लढा दिलाय....आदिवासिंचे मेळावे घेत त्यांना त्यांच्या हककांची जाणीव करून दिलीय..त्यांच्या हककांसाठी मेळावे घेतले, मोर्चे काढले... तिथल्या प्रत्येक पाड्याची, प्रत्येक माणसांची त्यांना बारीक माहिती आहे...समाजाच्या मूळ प्रवाहापासून कोसो मैल दूर असलेल्या या आदिवासिंचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी भाई आजही मंत्रालयात खेटे मारत असतात...
बाबा आढाव वय वर्षे 86, भाई वैद्य वय वर्षे 88 आणि जव्हारचे रवींद्र उर्फ भाई वैद्य वय वर्षे 82.....या 'तरुणांची' या वयातही समाजसेवेसाठी चाललेली धडपड पाहून अवाक् व्हायला होतं....गेल्या आठवड्यात या तिघांशी दिलखुलास गप्पा करण्याचा योग आला... आमचं कुटुंब सेवादलाचं.... भाई, बाबा माझ्या पप्पाचें, काकांचे लहणपणापासूनचे मित्र....त्यामुळे दोघांना लहानपणापासून पाहत आलोय...शुक्रवार पेठेतल्या आमच्या घरी त्यांचे नेहमीचे येणे जाणे होते....त्यांचे ते संबंध आजतागायत टवटवीत आहेत...
भाई नुकतेच अलाहाबादहून परतले होते..पण चेहऱ्यावर आजिबात थकवा जाणवत नव्हता... नेहमीसारखाच प्रसन्न, प्रेमळ अन तजेलदार चेहरा....त्यांची स्मृती खूप शार्प आहे अजून...गप्पाच्या ओघात ते कुठल्या कुठल्या आठवणी सांगत असतात..सध्याच्या राजकारणाबद्दल भाई म्हणाले, की मोदींची लोकप्रियता वेगाने घसरते आहे..राहूल गांधींवर जरी चौफेर टीका होत असली तरी त्यांच्यात क्षमता आहे....काँग्रेसने नेतृत्वाची पूर्ण जबाबदारी सोपवली, तर धोरणांत बदल करून ते पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतात... आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीत तामिळनाडूमध्ये जयललितांशी युती केल्याने भाजपच्या हाती काही लागू शकेल...तेथेही करुणानिधींचा प्रभाव हळूहळू वाढतोय..इतर राज्यांत त्यांच्या हाती काही लागेल असे वाटत नाही...देशात केंद्रात असलेले सरकार ना मोदींचे आहे ना भाजपाचे.... हे तर संघाचे सरकार आहे..अटलबिहारी वाजपेयींच्या काळात अशी परिस्थिती नव्हती....संघ वाजपेयींना झुकवू शकत नव्हता..अलिकडच्या काळात संघाचा विस्तार वाढलाय...आवाका वाढलाय...मोदींवर दबाव आणून ते आपला अजेंडा राबवू शकतात... गप्पाच्या ओघात यशवंतराव चव्हाण यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या बोरगावच्या आत्माराम पाटील, शंकरराव मोहितेंचे कडवे प्रतिस्पर्धी असलेले माळशिरसचे शिवाजीराव पाटील ( माझे सासरे)....अशा कित्येक धुरंदर नेत्यांच्या आठवणी भाईंनी जागवल्या... जुन्या राजकारणातले गमतीदार किस्से सांगितले...
भाईंनी समाजवादासंबंधी विपुल लेखन केलंय...आताही ते दोन पुस्तके लिहिण्याच्या तयारीत आहेत...समाजवादाविषयी विस्तृत विवेचन करणारे एक पुस्तक त्यांच्या मनात आहे...आचार्य नरेंद्र देव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादाविषयी विचारांचा परामर्ष घेऊन, त्याची संगती मांडून विस्तृत विवेचन ते या पुस्तकात मांडणार आहेत...त्यांना आत्मचरित्रही लिहायचंय...त्यांच्या या आत्मचरित्रातून राज्याच्या अन देशाच्या गेल्या साठ वर्षांच्या राजकारणाचा पट उगवत्या पिढीपुढे उलगडला जाईल....त्यांच्यासाठी तो मोलाचा ठेवा ठरेल.....
बाबांकडे ऐन दुपारच्या रणरणत्या उन्हात गेलेलो....नेहमीप्रमाणे हातात त्यांनी सोनचाफ्याचं फूल दिलं... श्रमिकांच्या प्रश्नांसाठी लढा देण्यात बाबांची उभी हयात गेली... ते कधीच निराश नसतात...खचत नाहीत...त्यांच्यात दुर्दम्य आशावाद आहे...बोलणं परखड आहे...सत्यशोधक समाजाची विचारधारा स्पष्ट आहे...त्यांच्याशी गप्पा मारताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा अद्याप तपास न लागल्याचा मुद्दा पुढे आला... बाबा म्हणाले, की ही हत्या सनातनी शक्तींनी केलीय यात कुठलाच संदेह नाही..त्यामुळे या सरकारला तपास करण्यात स्वारस्यच् नाही..त्यामध्ये जनमताचा रेट आणखी वाढवायला हवा... कोकणासारख्या भागात बुवाबाबांचं प्रस्थ अधिक आहे..धर्माधिकारी, नरेंद्र महाराज अशी कित्येक उदाहरणे त्याबाबत देता येतील...कोकणातच महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला .....आपणही तेथूनच जागर करायला सुरुवात करू... अगदी महाडमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारली, तर तिथल्याच आजुबाजूच्या गावातून आंदोलन उभं करू... तुम्ही तरुणांनी त्यात मोठया प्रमाणात सहभागी व्हायला हवं... अगदीच पोलिसांनी परवानगी नाकारली तर सत्याग्रह करू.... माझी या वयातही तुरुंगात जायची तयारी आहे....डॉ. दाभोलकरांच्या लढ्याचे सूत्र विवेकवादी होते..त्यामुळे आपणही विवेकवादानेच लढा द्यायला हवा.....आणि त्यामार्गाने प्रश्न सुटू शकतात यावर माझा ठाम विश्वास आहे...
शनी मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा मुद्यावर बाबा म्हणाले, की त्याबाबत शरद पवारांनी वैयक्तिक भूमिका घेऊन त्यातून अलगद अंग काढून घेतले...पण त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका काही स्पष्ट केली नाही...
गेल्या आठवड्यात जव्हारच्या भेटीत रवीन्द्र उर्फ भाई वैद्यांशी भेट झाली..नव्या जुन्या राजकारणावर संवाद झाला.....समाजवादी विचारांच्या भाईंनी सडेतोडपणे विचार मांडले... नदीत उगवणारं सोळ उकडून खाणारे आदिवासी बांधव पाहिले आणि मी त्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारायचा निर्णय घेतला...1962 पासून .अनेक आंदोलनं केली...आदिवासी समाज एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न केले..आदिवासिंचे प्रश्न मांडून शहरात जनाधार मिळत नाही.....म्हणून कित्येक नेत्यांनी या भागाकडे पाठ फिरवली...मी बॅ. नाथ पै, नानासाहेब गोरे, एस एम जोशी, चंद्रशेखर, रवींद्र वर्मा, प्रा.ग.प्र. प्रधान यांच्यासोबत विविध आंदोलनात होतो...बॅ. पै कोकणातील थोर नेते होते..त्यांचं चरित्र, त्यांची भाषणं पुस्तकरूपाने नव्या पिढीसमोर ठेवली पाहिजेत....आणीबाणीत मी येरवडा कारागृहात होतो..अनेक दिग्गज नेत्यांना जवळून पाहता आलं।..बोलता आलं... आमची जव्हारची भूमी तशी कधीच समाजवाद्यांना अनुकूल नव्हती.... पण मी लढत राहिलो..7 सप्टेंबर 1979 ला हाताला काम द्या, खायला भाकरी द्या या मागणीसाठी 41 हजार आदिवासिंचा भव्य मोर्चा काढला...त्यानंतरही कित्येक छोटी मोठी आंदोलने केली....मी आधी प्रजा समाजवादी पक्षात होतो..नंतर संयुक्त समाजवादी पक्षात गेलो....पण निवडणूक लढवायची नाही, राजकीय पद घ्यायचे नाही हा माझा तेव्हाचा निर्णय..... आजही त्यावर ठाम आहे...
सध्याच्या राजकारणाबाबत भाई म्हणाले, की आता जनमत वेगाने बदलतंय... मुळात मोदी निवडून आले, ते काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध केलेल्या जोरदार प्रचारामुळं... मीडिया ताब्यात घेतल्यामुळं..संघाकडे अफाट पैसा आहे...निवृत्त लोकांची भक्कम यंत्रणा आहे...पण, आता जनमत बदलतंय... संघाची विचारसरणी भांडवलशाही असल्याचं आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय.. समाजवादयांनी व्यवहारी व्हायला हवं..कुठल्याही विषयाचं अवडंबर करून, सोज्वलपणाचा, संतपणाचा आव आणून उपयोगाचं नाही..
पूर्वीची काँग्रेस आता उरली नाही..स्वातंत्र्यानंतरच्या पिढीला काँग्रेस समजलीच् नाही..सध्याच्या एकंदर घटना पाहता हा देश एकसंघ राहील का ? याचीच मला शंका वाटते...पोलिसांचा बंदोबस्त असताना दिल्लीत कन्हैयाला झालेली मारहाण काय सूचित करते ?
भाईंनी समाजवादी नेत्यावरही टीकास्त्र सोडले... समाजवादी नेत्यांनी स्वतःचा चांगुलपणा, निस्वार्थीपणा याचं भांडवल करून समाजवादी विचारच संपवले..त्यांनी वैचारिक लढाच् कधी दिला नाही....काँग्रेसला संपवायचं म्हणून संघाला साथ दिली...कम्युनिस्टांना संपवायचं म्हणून शिवसेनेशी हातमिळवणी केली...आता पुन्हा भाजपला संपवायचं म्हणून काँग्रेसला साथ देतील....तुम्ही ज्यांच्याशी लढताय त्यांना मूल्यच् नव्हती हे या नेत्यांच्या लक्षातच आलं नाही...पण असो....मी झगडणारा साथी आहे....समाजमूल्यांच्या वाढत्या विषमतेमुळे पुढील पन्नास वर्षांनी का होईना, या राज्यात क्रान्ती होईल अशी मला आशा वाटते.....
भाईंचा निरोप घेऊन निघालो. जाताना त्यांनी पुण्याच्या 'साधना' मासिकाची त्यांची वर्गणी भरायला पैसे दिले....मला खाऊसाठी पैसे दिले....भाई असो बाबा असोत की जव्हारचे भाई.....खरंतर ही कर्तबगार, ध्येयनिष्ठ माणसं शब्दांत मावूच शकत नाहीत..वयाची ऐंशी वर्षं उलटली तरी विचारांशी त्यांची बांधिलकी पक्की आहे...विचार स्पष्ट आहेत...निस्वार्थीपणा, शुचिता कायम आहे....स्मरणशक्ती तल्लख आहे....मनातला माणुसकीचा निर्मळ झळा अजूनही वाहतोची आहे.....कुठुन ही ऊर्जा येत असावी त्यांच्यात!!
हे एक कोडंच आहे....

No comments:
Post a Comment