Wednesday, 21 November 2018

खाकी लिफाफ्याचं गूढ-2

खाकी लिफाफ्याचं गूढ.(उत्तरार्ध) :
 - - -- - - - - - - - - - - - - - - -- -
नाही .. . आज काही दीर्घ आणि भीषण लिहिणार नाही...पण कदाचित धक्कादायक असू शकेल... मोहिते कुटुंबियांच्या सामुहिक आत्महत्येच्या पोस्टबाबत अनेक मित्रांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया आल्या..त्यामुळे त्या पुढची थोडी माहिती देणं माझं कर्तव्य आहे...साधारणत: दहा वर्षांपूर्वी मी गर्भपाताच्या बातमीचं संकलन करीत होतो...70 रुपयांत गर्भपात..प्रेस्टीज चेम्बर्स अशा जाहिराती त्यावेळी पीएमटी बसेसमध्ये चिकटवलेल्या असायच्या...नेमका काय प्रकार आहे? म्हणून डेक्कनवरच्या त्या चेंबरमध्ये एका मैत्रिणीसोबत गेलो...तिथली गर्भपात करणा-या महिलांची तुफान गर्दी पाहून हबकलो. तरूण विवाहित-अविवाहितांची गर्दी होती तिथे...तेथील प्रोसिजरची माहिती घेतली..दररोज साधारण किती केसेस होतात त्याची संख्या घेतली...अनुषंगिक माहिती जमवली...या क्षेत्रात काही एनजीओ काम करतात का याची माहिती घेताना सुनीता मॅडमच्या (बहुदा साथी, साथसाथ अशा नावाच्या...नेमकं नाव आठवत नाही) एनजीओची माहिती आणि नंबर मिळाला..त्यांच्याशी फोनवर बोललो...भेटायला गेलो ....फ्लॅटवजा घरात सुनीता मॅडम आणि त्यांच्या चार-पाच सहका-यांनी आफीस थाटले होते...लाईट जपून वापरत होते बहुदा..कारण काहीसं अंधारं वाटत होतं...त्यांनी महिलांच्या गर्भपाताबाबत तपशीलाने माहिती दिली...बेकायदा गर्भपात सेंटर्स कशी काम करतात? तेथे महिलांना कसा धोका उद्‌‌भवू शकतो? औषंधांमधील फरक, कॉलेज युवतींचा बेफिकीरपणा याबाबत त्या भरभरून बोलल्या...राज्यभरातील त्यांच्याकडे असलेला डेटा दिला...महिला असा धोका का पत्करतात? याबाबत काळजी व्यक्त केली... संवाद सुरू असताना माझं आजुबाजूचं निरीक्षण चालूच होतं..सुनिता मॅडमचे सहकारी पहिले पाच-दहा मिनिटे आमच्यासोबत होते..मग ते पुन्हा आपापल्या कामात गढले...कॉम्प्युटरवर काहीतरी काम चाललं होतं त्यांचं. . .कुणी कुणाशी बोलत नव्हत...बाजूच्या एक -दोन खोल्यांमधूनही दोघे तिघे हलक्या आवाजात बोलत आपापली कामं करीत होते..मॅडमची पर्सनालिटी जरा निराळीच भासली...जेमतेम उंची.. बारीक चण. . . .जीन्स-खादीचा कुर्ता...नजरेत भरलं ते त्यांचे काजळ लावलेले डोळे...पण होत्या खूप हुशार...बोलणं अत्यंत आदबशीर किंवा औपचारीक...आणि त्यांच्याशी हास्यविनोद करण्यासारखा विषयही नव्हता...कॉफी दिली होती त्यांनी..ती ही एकदम कडक...प्रश्नोत्तरे संपली...फारसं काही विचारण्यासारखं आणि सांगण्यासारखं उरलं नव्हतं...त्यांचा निरोप घ्यायला उठलो....नाही म्हणायला गेल्यापासून त्यांना  एक बाब विचारायची मनात होती...पण ते ओठांवर येत नव्हतो..पायात कोल्हापुरी सरकवताना मनाचा हिय्या केला आणि त्यांना म्हणालो...तुमचं आफीस केव्हापासून आहे इथे??
''झाले..एक-दिड वर्ष''
''का?''
''तसं काही नाही...पण तुम्हाला माहिती का हा फ्लॅट कोणाचा आहे?''
''नाही..आम्हाला दिलाय तो एकाने ...''
''इथं डॉ. राजीव मोहिते आणि त्यांची फॅमिली राहत होती...पाच-सहा वर्षांपूर्वी त्यांनी याच घरात आत्महत्या केली...''मी बोलून गेलो....आणि
 मॅडमकडे पाहिलं....त्यांचा चेहरा निर्विकार होता...
''असेल..असेलही...आपल्याला काय त्याचं?? '' असं म्हणून अत्यंत कोरडेपणाने त्यांनी मला निरोप दिला... अजूनही आश्चर्य वाटतं या घटनेचं...त्या फ्लॅटमध्ये काय घडलंय याची मॅडमना कल्पना नसेल यावर माझा विश्वासच नाही..त्यांना सोसायटीने किंवा मोहितेंच्या नातलगांनीच चांगल्या कामासाठी हा फ्लॅट दान केला असावा...काहीही असो...पण डेऽऽरींगच म्हणायची ना राव...त्या फ्लॅटमध्ये काम करायची...
(ता.क. :-  मित्रांनो हा आजिबात काल्पनिक किस्सा नाही...माधवराव चिरमे हे रिटायर्ड पोलीस आधिकारी त्याच सोसायटीत राहतात...त्यांच्याकडून किंवा कोणाकडूनही ही माहिती कन्फर्म करता येईल...मोहिते फॅमिलीच्या आत्महत्येनंतर नव्या बातमीसाठी पुन्हा त्याच सोसायटीत आणि त्याच फ्लॅटमध्ये जावे लागेल असे मला कधीही वाटले नव्हते...पण तो योगायोग असा जुळून आला...आणि हो...फ्लॅटची बेल वाजवताना चांगलाच टरकलो होतो मी......सध्या तिथं त्याच्‌ संस्थेचं आफीस आहे का कुणाचं? हे माहिती नाही....कोण जाईल राव तिकडं उगाच्‌????????)

No comments:

Post a Comment