वर्गशिक्षिकेस पत्र
- - - - - - - - - - -
आदरणीय बाई
सगळेच विद्यार्थी वाईट नसतात
नसतात सगळेच चांगलेही
हे कळेलच् माझ्या मुलीला
कधी ना कधी
पण तिला हे शिकवा
स्वार्थी मैत्रिणींगणिक
असतात निकोप मैत्रीचे कित्येक धागेही
फक्त परिक्षेपुरता अभ्यास करणा-यांबरोबरच
असतात अनेक मुळापासून चिकाटीने अभ्यास करणा-याही
असतात काही फक्त फजिती पाहणा-या
तशाच काही जीवापाड प्रेम करणा-या सख्याही . .. .
मला समजतंय
सगळ्या गोष्टी अल्पकाळात नाही शिकवता येत
तरीही जमलं तर तिच्या मनावर बिंबवा
शाळेत लक्ष देऊन केलेला अभ्यास
खासगी शिकवण्यांपेक्षा सरस असतो
अपयश कसं पचवायचं हे तिला शिकवा
आणि शिकवा यशाचा आनंद संयमाने घ्यायला
अपयशानं खचायचं नसतं
आणि यशानं मातायचं नसतं
हे तिला कळलं पाहीजे . .. .
शाळेत तिला हा धडा मिळू दे
अभ्यास करूनही कमी गुण मिळाले तरी चालतील
पण कॉपी करून गुणवत्तेचा आभास निर्माण करू नकोस
तिला मायेने वागवा
पण लाडावून ठेवू नका
जरूर तेव्हा छड्या मारायला
तुम्ही आजिबात कचरू नका . .
तुम्ही लावा तिला गोडी वाचनाची
जीवनात तोच ठेवा अमूल्य असतो
इसापनीती, पंचतंत्र, बिरबलाच्या गोष्टी
आणि रामायण, महाभारताच्या कथा तिने वाचल्या पाहिजेत
कुसुमाग्रज, पु.ल., टागोर आणि प्रेमचंदांच्या
साहित्याचीही तिला माहिती व्हायला हवी
मिळू द्या तिच्या मनाला विरंगुळा
निसर्गाची जादू अनुभवायला
पाहू दे तिला उंच उंच पर्वत
आणि खोलच खोल द-याही
फेसाळत्या समुद्रलाटा अंगावर घेऊ द्या तिला
घेऊ द्या आनंद
रानावनात भटकण्याचा
शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या
गड कोटांवरही तिची पावलं पडली पाहिजेत
बागडू द्या तिला मनसोक्त
खेळू द्या मैदानी खेळ
त्याचबरोबर लपंडाव, सूरपारंब्या,सागरगोटे आणि काचापाणीही
फेर धरून गाऊ द्या तिला भोंडल्यात
झिम्मा, फुगड्या खेळू द्या नागपंचमीला
तिचं शरीर तर चपळ होईलच
पण आपल्या परंपरांचीही जाणीव तिला होईल
तिला सांगा
स्वत:चे विचार व स्वत:च्या कल्पना
यांच्याशी तिने ठाम राहीले पाहिजे
इतरांना ते चुकीचे वाटले तरी हरकत नाही
अर्थात तिचं हे विचारविश्व
दूरदर्शनवरच्या सवंग मालिका पाहून
चुकीचं बनलेलं नसावं
तसंच आपल्या संस्कृतीचा व परंपरांचा
अनादर करणारंही नसावं
तिने चांगल्याशी चांगलं वागावं
आणि वाईटांशीही चांगलंच वागावं
कुणी अगदीच दांडगाई करीत असलं तर
त्याला चांगली अद्दल घडव म्हणावं तिला....
माझ्या मुलीला हे पटवता आलं तर पहा
प्रवाहाबरोबर वाहत जाण्यापेक्षा
प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जिगर
तिने कमवायला हवी
हे ही सांगा तिला
ऐकून घेण्याची अगदी सगळ्यांचं ऐकून घ्यायची
सहनशीलता तिनं अंगात भिनवायला हवी
पालक, शिक्षक किंवा काही मैत्रिणींचे बोल
तिला कधी कडवट वाटतीलही
पण ते सगळे तिच्या भल्यासाठी
आणि प्रेमापोटीच बोलत असतात
जमलं तर तिच्या मनावर बिंबवा
हसत रहा हृदयातलं दु:ख लपवून
पण ते दु:ख़ कधी दडपूही नकोस
पालकांकडे, शिक्षकांकडे, सख्यांकडे
कुणाकडे का होईना
पण मन मोकळं कर
आणि सांगा तिला
दु:खाचा वणवा कधी
अश्रुंच्या धारांनी विझत नाही
तरीही अश्रू ढाळायची
लाज वाटू देऊ नकोस
कारण तेच मनातल्या
भावनांचं प्रतिबिंब असतं
तिला शिकवा
मत्सरी वृत्तींपासून दूर रहायला
कुणाबद्दलही असूया न बाळगायला
आणि लोचटांपासून सावध रहायला . . . . .
तिला हे पुरेपूर समजवा
भरपूर पैसे कमवावेत तिने
ज्ञान आणि कर्तृत्वाच्या बळावर
पण त्यासाठी कधीही पणाला लावू नये
हृदय आणि आत्मा
आणखी एक सांगत रहा तिला
केवळ नशीबावर हवाला ठेवू नकोस
आपला पक्का विश्वास हवा स्वकर्तृत्वावर
आपलं कर्मचं आपलं भविष्य घडवत असतं
यशासाठी संघर्ष करायची
तिची तयारी हवी
संघर्ष केल्याशिवाय
अंगात कणखरपणा येत नाही
धीर अन् संयम पाळलाच पाहिजे तिने
जर तिला गाजवायचं असेल कर्तृत्व...
पण संघर्ष अन भांडण...
स्पष्टवक्तेपणा अन् फटकळपणा, तसंच
उत्सुकता आणि उताविळपणा
यातील फरक तिच्या लक्षात आणून द्या
भोंदू बुवा महाराजांच्या
कधी भजनी लागू नको म्हणावं
महाराष्ट्राच्या मातीला
ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांची
गौरवशाली परंपरा आहे
गांधीजी, शाहू, ज्योतिबा, नेताजी
आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू
हिच आपली दैवतं असल्याचं तिला कळलं पाहिजे
वर्तमानपत्रं रोज वाचत जा म्हणावं डोळसपणे
फुगे खेळायचं वय असलेली मुलं
फुगे हातात घेऊन विकतानाची
छायाचित्र तिला त्यात दिसतील
आणि ती वाचेल तिच्याच वयाची मुलं
दुर्गम भागात पिण्याच्या पाण्यासाठी
मैलोंमैल वणवण करताहेत म्हणून
आपल्याला मिळणा-या सुविधांचं, सुबत्तेचं आणि
भोवतालच्या परीस्थितीचं भान तिला यायला हवं
कष्टक-यांचं जिणं तिला कळलं पाहिजे
दारीद्र्याने पिचलेल्या आपल्या बांधवांपोटी तिला
कणव वाटली पाहिजे
ज्येष्ठांचा मान तिने राखायलाच हवा
गुणवंतांचं कौतुक करतानाच
अपयशाशी झगडणा-यांचीही कदर
तिने करायला हवी
फॅशनेबल कपडे जरूर घालावेत तिने
पण, कधी तरी सणसमारंभांपुरतेच्
एरवी अंगभर पेहरावच योग्य
हे तिला समजून सांगा
तिची महत्वाकांक्षा उच्च जरूर असावी
पण आधी चांगली व्यक्ती होण्यासाठी
तिने धडपडायला हवं
सर्वांच्या मदतीला धावून जायला हवं
आणि हो.... . हे कायमचं तिच्या मनावर ठसवा
जातीभेद, धर्मभेद या निष्फळ बाबी आहेत
सर्वजण एकाच आभाळाची लेकरं आहेतं....
चौसष्ठ कला कुणालाच नसतात अवगत
तिला नेमकी कशात गती आहे
हे तुम्हीच ओळखा
आणि ती विकसित करण्याकडे
कृपया लक्ष द्या . . .. .
माफ करा बाई............
मी खूप काही मागतो आहे
फार अपेक्षा ठेवतो आहे
शिक्षकांवर कामाचा बोजा
किती मोठा असतो
याची पूर्ण जाणीव आहे मला
आणि तिच्यावर संस्कार करण्याची
आम्हा पालकांचीही तितकीच
जबाबदारी आहे हे ही समजतयं
पण काय करू.................?
तुमच्यावर तिचं खूपच प्रेम आहे हो . ..
आणि आमचा विश्वासही...
पहा जमेल तेवढं अवश्य कराच् . ..
माझी मुलगी . . . नीलम . .. . . . .
खूपच...निरागस ...फूल आहे हो ते. . . . .
- - - - - - - - - - -
आदरणीय बाई
सगळेच विद्यार्थी वाईट नसतात
नसतात सगळेच चांगलेही
हे कळेलच् माझ्या मुलीला
कधी ना कधी
पण तिला हे शिकवा
स्वार्थी मैत्रिणींगणिक
असतात निकोप मैत्रीचे कित्येक धागेही
फक्त परिक्षेपुरता अभ्यास करणा-यांबरोबरच
असतात अनेक मुळापासून चिकाटीने अभ्यास करणा-याही
असतात काही फक्त फजिती पाहणा-या
तशाच काही जीवापाड प्रेम करणा-या सख्याही . .. .
मला समजतंय
सगळ्या गोष्टी अल्पकाळात नाही शिकवता येत
तरीही जमलं तर तिच्या मनावर बिंबवा
शाळेत लक्ष देऊन केलेला अभ्यास
खासगी शिकवण्यांपेक्षा सरस असतो
अपयश कसं पचवायचं हे तिला शिकवा
आणि शिकवा यशाचा आनंद संयमाने घ्यायला
अपयशानं खचायचं नसतं
आणि यशानं मातायचं नसतं
हे तिला कळलं पाहीजे . .. .
शाळेत तिला हा धडा मिळू दे
अभ्यास करूनही कमी गुण मिळाले तरी चालतील
पण कॉपी करून गुणवत्तेचा आभास निर्माण करू नकोस
तिला मायेने वागवा
पण लाडावून ठेवू नका
जरूर तेव्हा छड्या मारायला
तुम्ही आजिबात कचरू नका . .
तुम्ही लावा तिला गोडी वाचनाची
जीवनात तोच ठेवा अमूल्य असतो
इसापनीती, पंचतंत्र, बिरबलाच्या गोष्टी
आणि रामायण, महाभारताच्या कथा तिने वाचल्या पाहिजेत
कुसुमाग्रज, पु.ल., टागोर आणि प्रेमचंदांच्या
साहित्याचीही तिला माहिती व्हायला हवी
मिळू द्या तिच्या मनाला विरंगुळा
निसर्गाची जादू अनुभवायला
पाहू दे तिला उंच उंच पर्वत
आणि खोलच खोल द-याही
फेसाळत्या समुद्रलाटा अंगावर घेऊ द्या तिला
घेऊ द्या आनंद
रानावनात भटकण्याचा
शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या
गड कोटांवरही तिची पावलं पडली पाहिजेत
बागडू द्या तिला मनसोक्त
खेळू द्या मैदानी खेळ
त्याचबरोबर लपंडाव, सूरपारंब्या,सागरगोटे आणि काचापाणीही
फेर धरून गाऊ द्या तिला भोंडल्यात
झिम्मा, फुगड्या खेळू द्या नागपंचमीला
तिचं शरीर तर चपळ होईलच
पण आपल्या परंपरांचीही जाणीव तिला होईल
तिला सांगा
स्वत:चे विचार व स्वत:च्या कल्पना
यांच्याशी तिने ठाम राहीले पाहिजे
इतरांना ते चुकीचे वाटले तरी हरकत नाही
अर्थात तिचं हे विचारविश्व
दूरदर्शनवरच्या सवंग मालिका पाहून
चुकीचं बनलेलं नसावं
तसंच आपल्या संस्कृतीचा व परंपरांचा
अनादर करणारंही नसावं
तिने चांगल्याशी चांगलं वागावं
आणि वाईटांशीही चांगलंच वागावं
कुणी अगदीच दांडगाई करीत असलं तर
त्याला चांगली अद्दल घडव म्हणावं तिला....
माझ्या मुलीला हे पटवता आलं तर पहा
प्रवाहाबरोबर वाहत जाण्यापेक्षा
प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जिगर
तिने कमवायला हवी
हे ही सांगा तिला
ऐकून घेण्याची अगदी सगळ्यांचं ऐकून घ्यायची
सहनशीलता तिनं अंगात भिनवायला हवी
पालक, शिक्षक किंवा काही मैत्रिणींचे बोल
तिला कधी कडवट वाटतीलही
पण ते सगळे तिच्या भल्यासाठी
आणि प्रेमापोटीच बोलत असतात
जमलं तर तिच्या मनावर बिंबवा
हसत रहा हृदयातलं दु:ख लपवून
पण ते दु:ख़ कधी दडपूही नकोस
पालकांकडे, शिक्षकांकडे, सख्यांकडे
कुणाकडे का होईना
पण मन मोकळं कर
आणि सांगा तिला
दु:खाचा वणवा कधी
अश्रुंच्या धारांनी विझत नाही
तरीही अश्रू ढाळायची
लाज वाटू देऊ नकोस
कारण तेच मनातल्या
भावनांचं प्रतिबिंब असतं
तिला शिकवा
मत्सरी वृत्तींपासून दूर रहायला
कुणाबद्दलही असूया न बाळगायला
आणि लोचटांपासून सावध रहायला . . . . .
तिला हे पुरेपूर समजवा
भरपूर पैसे कमवावेत तिने
ज्ञान आणि कर्तृत्वाच्या बळावर
पण त्यासाठी कधीही पणाला लावू नये
हृदय आणि आत्मा
आणखी एक सांगत रहा तिला
केवळ नशीबावर हवाला ठेवू नकोस
आपला पक्का विश्वास हवा स्वकर्तृत्वावर
आपलं कर्मचं आपलं भविष्य घडवत असतं
यशासाठी संघर्ष करायची
तिची तयारी हवी
संघर्ष केल्याशिवाय
अंगात कणखरपणा येत नाही
धीर अन् संयम पाळलाच पाहिजे तिने
जर तिला गाजवायचं असेल कर्तृत्व...
पण संघर्ष अन भांडण...
स्पष्टवक्तेपणा अन् फटकळपणा, तसंच
उत्सुकता आणि उताविळपणा
यातील फरक तिच्या लक्षात आणून द्या
भोंदू बुवा महाराजांच्या
कधी भजनी लागू नको म्हणावं
महाराष्ट्राच्या मातीला
ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांची
गौरवशाली परंपरा आहे
गांधीजी, शाहू, ज्योतिबा, नेताजी
आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू
हिच आपली दैवतं असल्याचं तिला कळलं पाहिजे
वर्तमानपत्रं रोज वाचत जा म्हणावं डोळसपणे
फुगे खेळायचं वय असलेली मुलं
फुगे हातात घेऊन विकतानाची
छायाचित्र तिला त्यात दिसतील
आणि ती वाचेल तिच्याच वयाची मुलं
दुर्गम भागात पिण्याच्या पाण्यासाठी
मैलोंमैल वणवण करताहेत म्हणून
आपल्याला मिळणा-या सुविधांचं, सुबत्तेचं आणि
भोवतालच्या परीस्थितीचं भान तिला यायला हवं
कष्टक-यांचं जिणं तिला कळलं पाहिजे
दारीद्र्याने पिचलेल्या आपल्या बांधवांपोटी तिला
कणव वाटली पाहिजे
ज्येष्ठांचा मान तिने राखायलाच हवा
गुणवंतांचं कौतुक करतानाच
अपयशाशी झगडणा-यांचीही कदर
तिने करायला हवी
फॅशनेबल कपडे जरूर घालावेत तिने
पण, कधी तरी सणसमारंभांपुरतेच्
एरवी अंगभर पेहरावच योग्य
हे तिला समजून सांगा
तिची महत्वाकांक्षा उच्च जरूर असावी
पण आधी चांगली व्यक्ती होण्यासाठी
तिने धडपडायला हवं
सर्वांच्या मदतीला धावून जायला हवं
आणि हो.... . हे कायमचं तिच्या मनावर ठसवा
जातीभेद, धर्मभेद या निष्फळ बाबी आहेत
सर्वजण एकाच आभाळाची लेकरं आहेतं....
चौसष्ठ कला कुणालाच नसतात अवगत
तिला नेमकी कशात गती आहे
हे तुम्हीच ओळखा
आणि ती विकसित करण्याकडे
कृपया लक्ष द्या . . .. .
माफ करा बाई............
मी खूप काही मागतो आहे
फार अपेक्षा ठेवतो आहे
शिक्षकांवर कामाचा बोजा
किती मोठा असतो
याची पूर्ण जाणीव आहे मला
आणि तिच्यावर संस्कार करण्याची
आम्हा पालकांचीही तितकीच
जबाबदारी आहे हे ही समजतयं
पण काय करू.................?
तुमच्यावर तिचं खूपच प्रेम आहे हो . ..
आणि आमचा विश्वासही...
पहा जमेल तेवढं अवश्य कराच् . ..
माझी मुलगी . . . नीलम . .. . . . .
खूपच...निरागस ...फूल आहे हो ते. . . . .
No comments:
Post a Comment