जव्हार-विक्रमगडची कैफीयत :-
- - - - - - - - - - - - -
आदिवासी जमात म्हणजे डोक्याला पिसं खोचणारे, रंगिबेरंगी पोषाख घालणारे, भडक मेकअप करणारे, धनुष्यबाणानं शिकार करणारे लोक अशी एक प्रतिमा मनात होती....त्यांचा राजा मस्तपैकी शहामृगाच्या पिसांचे मुकुट घालून बसलाय...रात्री हरणांची शिकार करून विस्तवावर ते भाजतायेत.....चहुबाजूला आदिवासी लोक छानपैकी नृत्य करताहेत...राजाबरोबर खास मेहमान म्हणून मातीच्या वाडग्यातून कसल्याशा प्राण्याचं रक्त प्राशन करतोय...मोहाची दारू पितोय वगैरे..वगैरे...स्वप्नं पडली होती काहीवेळा.....सिनेमातली दृश्य पाहून...कथा-कादंब-यांमधील वर्णन वाचून तशी प्रतिमा तयार झाली असावी....पण परवाच्या दौ-यात पार छेद गेला या प्रतिमांना....वास्तव समोर आलं...वास्तव जवळून पाहिलं..वास्तव अनुभवलं..... वाईट वाटलं....अस्वस्थ झालो... ऐषोरामी, विलासी राहणीमानाची लाज वाटली....आपल्याकडे कुटुंबातील माणसांपेक्षा घरातील वाहनांची संख्या जास्त....पण ठाणे, मुंबई, नाशिकपासून जेमतेम शंभर कि.मी. अंतरावरील या आदिवासी पाड्यांवर रोजच्या जगण्याची मारामार...दोनवेळा पोट भरण्याची मारामार....इथं प्रदुषण नाही...कसलंच...वाहनं नाहीत...कारखाने नाहीत....धूर,धूळ येणार कुठून?? ओझोन आहे खूप...पण नुस्ता ओझोन मिळून पोट तर भरत नाही ना??? जव्हार-विक्रमगड परिसरातील शेकडो पाड्यांची ही कैफीयत आहे....
जेमतेम आठ-दहा हजार लोकसंख्या आहे जव्हारची.....आजुबाजूला...पार द-याखो-यांमध्ये, आपण कल्पनाही करू शकत नाही अशा दुर्गम भागात शंभरएक पाडे आहेत....तिवसपाडा, वेहेलपाडा, पासोडीपाडा, वाघीपाडा अशा नावांचे....कशिवली, खुडेद अशा नावाच्या छोट्या वस्त्या.....सर्व पाड्यांवर विहीरी...आणि पाणी एकातही नाही....नळ वगैरे अजून पोचलेलेच नाहीत....कोरड्या ठणठणीत पडलेल्या विहिरींच्या पार तळाशी गेलेलं पाणी आणायला बायका-मुलांना चार-पाच मैल लांब जावं लागतं.....एसटीसाठीही किमान असंच अंतर कापावं लागतं... एसटीने गेले, तर परतायचं पायी...किंवा पायी गेले तर येताना एसटी...दोनवेळा एसटीही परवडतं कुणाला....? खूप गरीब आणि साधी भोळी माणसं आहेत इथंली.....परीस्थितीनं हतबल केलंय त्यांना...भात आणि नागली एवढीच दोन पिकं घेता येतात तिथं...त्याचीही विक्री नाही....कुटुंबाचं कसंबसं पोट भागेल इतकंच पिक मिळतं.... मेथी, शेपू, चवळी, माठ, अंबाडी, गवार...असली एकही भाजी नाही...सा-या रानभाज्या....कुणाकडं समारंभ असला तर तिथं वांग्या-बटाट्याची भाजी.....तसं तर वांग्या-बटाट्याची भाजी मला खूप आवडते...पण, परवा तिवसपाड्याला प्रियांका धूमच्या हळदीला गेलो.. तिथं खाल्लेल्या वांग्याबटाट्याच्या भाजीइतकी चविष्ठ भाजी कधी खाल्ल्याचं स्मरत नाही........इकडं लग्नापेक्षा हळदीला महत्व जास्त....सगळे पै-पावणे हळदीला येणार...दुपारी सगळे विधी झाले,की पांढरा भात, वरण आणि वांग़्या बटाट्याच्या भाजीचं जेवण....इथला हाच मेनू असतो... आपल्यासारखी जिलेबी, लाडू, गुलाबजाम अशी स्वीट डीश नाही....चांगल्या परीस्थितीतलं लग्न असलं तर कोंबड्या कापतात... पण गोड नाही.....रात्री बाजावाले येतात.....मोहाच्या दारूच्या नशेत म्युझिकच्या तालावर सगळे मस्त ताल धरून नाचतात...मोहाची दारू इथं अनिवार्य....मी ही चाखली....मोहाच्या फुलांचा उग्र गंध, कडवट चव आणि त्यात गावठी गुळाचा गोडवा....एकाच ग्लासमध्ये तरंगायला लागलो होतो...खूप काळजी घेतात हे लोक पाहुण्यांची....पाड्यावर त्या दिवशी कुणाकडेच नव्हती...पण, मला हवी आहे म्हटल्यावर कितीतरीजण निरनिराळ्या पाड्यांवर धावले ....खरंतर परत जायला निघालो होतो...पण त्यांनी थांबवलं आग्रह करून..आणि कुठून कुठून आणलेल्या बाटल्या आणल्या...त्या पाहूनच चक्रावलो...म्हटलं आता महिनाभर झोपतोय इथंच पाड्यावर.... .. पण..तसं काही घडलं नाही..... रात्री पुन्हा यायचं आश्वासन देऊन मी जव्हारला परतलो...
जव्हार, विक्रमगड, मोखाडा भागात आदिवासींच्या वारली, कातकरी, ठाकूर, महादेव कोळी, ढोर कोळी, कोकणा अशा अनेक जमाती.... हा समाज मुळातच उत्सवप्रिय...म्हणूनच त्यांच्या जीवनात नृत्याचं मोठं स्थान .. ... तारा नृत्य, डांग नृत्य, टिपरी नाच, वाघोबा नृत्य, तबला नाच, ढोल नाच, कोंबडी नाच, सांगळे नाच, तूर नाच, गौंड नाच असे नाचाचे काही प्रकार ... तारपा नृत्य हे सर्वाधिक प्रसिध्द..पावसाळ्यानंतर आलेल्या पिकाच्यावेळी, नवीन भाताच्या लावणीच्यावेळी , घरी आणलेल्या पिकाच्या पूजेच्यावेळी नृत्याच्या माध्यमातून उत्सव साजरा करतात.... .... दुधी भोपळ्यापासून तारपा बनवतात. शेतीची कामं आटोपली की रात्री ढोलकीच्या तालावर फेर धरून कामड्यांचा नाच करतात. निसर्गाच्या कोपामुळे बऱ्याच वेळा पाऊस वेळेवर न पडल्यास गीत व नृत्यामधून मेघदेवतेची आळवणी करतात....
इथल्या लोकांना बच्चन कळत नाही....दाऊद कळत नाही...मोदी कळत नाही आणि मुशर्रफही कळत नाही...त्यांना पुरेसं पौष्टीक अन्न नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही....रहायला साधी मातीची,कुडाची घर आहेत....करायचयं काय यांना राजकारणाशी? कुठला गॅंगस्टर इथं राज्य करणार??कशासाठी??? इथं भौतिक संपत्तीच नाही........इथल्या माणसांना आता मोबाईल कळतो...पण बोलणार काय? अन कुणाशी??? लग्नात इथं हुंडावगैरे काही नाही....सारा खर्च मुलाने करायचा...भांडणं नाही . . .तंटा नाही.....पत्रिकेमध्ये प्रेषकांमध्ये फक्त पुरुषाची नावे...बाकी सर्व नावे महिलांची.....मुलांची नावं काकडी, माडी, सोमी, रिफील, सेहवाग, शिडी, चमिक्षा अशी काहीही ...त्याला काय अर्थच नाही...आवडलं म्हणून ठेवलेलं....पण म्हणून ही माणसं वेडी नाहीत ....हे कळत नाही म्हणून त्यांचं काही अडतही नाही....पाऊस पडतो...हे भात पिकवतात....भात खातात...मोहाची बाटली पितात....सणसमारंभ करतात...देव पूजतात...नाच करतात...इकडच्या पाड्यावरची मुलगी तिकडच्या पाड्यावर दिली जाते......पाड्या पाड्यांवरच नातीगोती होतात....इथं देवदेवस्की करणारे भगत आहेत...पण ज्योतिष, भविष्य सांगण्याच्या नावाखाली लुटणारे ज्योतिषी नाहीत...या समाजात राशी बघितल्या जात नाहीत...कुंडली बघत नाहीत.....पण लगिन झोकात करतात..........
या आदिवासींचं अवघं जीवन हलाखीत गेलं.....पण उगवती पिढी आश्वासक आहे....डॉ. भरतकुमार महाले त्याचं सर्वोत्तम प्रतिक...इथल्याच आदिवासी पाड्यांवर वाढलेले भरतकुमार जिद्दीने शिकले...एमबीबीएस झाले...स्त्रीरोग विषयांत प्राविण्य मिळवलं...पुढं पदव्या मिळवल्या...पुण्या-मुंबईसारख्या महानगरातूनच नव्हे, तर विदेशातूनही खूप मागणी असूनही ते इथंच सरकारी नोकरीत राहीले ..आदिवासी बांधवांची सेवा करायला....डॉक्टरांचं समर्पित वृत्तीने सुरू असलेलं काम थक्क करणारं आहे....किती तळमळीने राबतो हा माणूस...इथलं कॉटेज हॉस्पिटल म्हणजे शासकीय रुग्णालय आपल्याकडल्या कुठल्याही ग्रामीण रुग्णालयांपेक्षा कितीतरी उत्कृष्ठ....खूप समर्पित वृत्तीने काम चालतं इथे....त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अनिता पाटील यांचं त्यांना तितकंच तोलामोलाचं सहकार्य लाभलंय....डॉक्टर मॅडमचा रिच खूप...खूप निरनिराळे कॉन्टॅक्टस जपलेले... माणसं जमवलेली.....त्यांच्या हॉस्पिटलमधील नर्स सविता भेटली...ती ही दुर्गम पाड्यावरची....पण शिकली ती जिद्दीने....चांगलं काम करतेय....हळदी समारंभात छोटीशी चेतना धूम भेटली...तिला विचारलं कितवीत आहेस....ती म्हणाली....सेव्हनथ् स्टॅन्डर्ड......मी चमकलो...तिच्या वडिलांनी ठाण्यात नोकरी धरली...आई-बाबांसोबत चेतनाही तिथं गेली...छानपैकी इंग्रजी शाळेत शिकते...अशोक जाधवही याच पाड्यावरचा....ठाण्याच्या टोल नाक्यावर नोकरी करतो...रबाळ्याला राहतो..त्याचीही मुलगी छान चुणचुणीत...मुलं शिकू लागलीत....इथं असं राहून उपयोगाचं नाही..हे लक्षात आलंय त्यांच्या....कुणी कंडक्टर...कुणी सुरक्षा रक्षक...कुणी मिळेल ते काम करतंय....प्रियांका कामाडी....चक्क पोलीस दलात....तिच्याशी सहज गप्पांमधून आदिवासी रीतीभातींची बरीच माहिती समजली... .... पूर्ण आदिम अशा आदिवासी पाड्यातून तिचं कुटुंब जव्हारला स्थलांतरीत झालेलं...ती बारावीपर्यंत शिकली...पुढं कॉलेज करत असताना पोलीस भरती जाहीर झाली....तिने परीक्षा दिली ....फिजिकलला जिद्दीने धावली...पळाली...उड्या मारल्या...वजनं उचलली...आणि सिलेक्ट झाली....ठाणे पोलीस दलात आहे आता ती...काळी सावळी, चुणचुणीत प्रियांका मूळ प्रवाहाशी तोल सावरताना आदिवासी भागाशी असलेली मूळ नाळ विसरली नाही....वेळ मिळेल, सुटी मिळेल तशी येते ती जव्हारला... सगळ्याच पाड्यांवर लोक छान बोलले....सध्या बाएफ, प्रगती प्रतिष्ठानसारख्या एनजीओंनी चांगलं काम चालवलंय इथं....त्यांच्यामुळं काजूपाडे...आंबापाडे उभे राहू लागलेत..इथल्या झेंडू, मोग-याचा सुगंध ठाणे, मुंबई, नाशिकमध्ये घमघमू लागलाय....
......रात्री पुन्हा गेलो मी तिवसपाड्यावर....लोक लाईट यायची वाट बघत होते...रात्री दहाला लाईट आले...मग बाजा सुरू झाला....एक तीन-चार वर्षांची मुलगी आली . . . एकटीच डाव्या हाताची तर्जनी वर करून नाचू लागली...मग एक स्त्री आली...एक-दोन मुले....एकेक करत माहोल बनत गेला...आणि थोड्याच वेळात सगळेच नाचू लागले...मी ही ठेका धरला...इथं हाताचे बोट वर करून नाचायची एक वेगळीच पद्धत आहे....ते त्यांच्या रक्तातच भिनलंय की काय कल्पना नाही...पण मग ती मुलगी कशी आपोआप तशी नाचू लागली...?
.रात्र चढत चालली होती....हळदी समारंभाने जोर पकडला होता.... 'मोहा' चा अंमल वाढू लागला होता .....बॅंड बाजाचे सूर टीपेला पोचले होते......नवरी नाचायला आली...हळदीने नखशिखांत माखलेली नवरी एक बोट वर करून ताल धरू लागली..
..'' गो-या गो-या गालावरी
चढली लाजेची लालीऽऽऽगं...
पोरी नवरी आली."....चे स्वर घुमू लागले ..
... मुलं-बाळं, पुरुष, स्त्रिया, वृद्ध, सारे सारे एका लयीत बोट वर करून नाचू लागले होते.............त्या माहोलमध्ये माझ्या पायांनी कधी ताल धरला समजलाच नाही....नाचता नाचता सहज नजर गेली.....नवरी छान ठुमकत नाचत होती खरी....
.कुणाचं फारसं लक्ष नसल्याचं पाहून
आसवांत गोठवलेल्या नदीला तिनं हळूच मार्ग करून दिला होता.....

No comments:
Post a Comment