Wednesday, 21 November 2018

दाऊद आपल्या भोवतीच वावरतोय

Abid Shaikh writes -

"दाऊद..आपल्याभोवतीच वावरतोय ???
-----------------------------------------------
अजून किती वर्ष दाऊदचा हा फोटो पहायचा आपण? किती वर्षं ऐकायचं की तो कराचीमधल्या क्लिफ्टन एरीयातील व्हाईट हाऊसमध्ये राहतो....लहान पोरासोरांना माहिती असलेल्या या पत्त्यावर खरंच राहत असेल दाऊद??माझ्या मनात तर एक वेगळीच शंका गेल्या काही वर्षांपासून आहे. एखादी व्यक्ती हयात आहे की नाही याबाबत काही निकष असतात. ती व्यक्ती कोणाला तरी दिसते ... कोणाला तरी भेटते...कोणाशी तरी फोन झाल्याचे कानावर येते...गुन्हेगार असेल तर त्याच्या नावावर काही गुन्हे दाखल होतात...कुणाला तरी खंडण्यांचे फोन येतात...फरारी गुन्हेगाराबाबत त्याचे निरनिराळे फोटो प्रसारमाध्यमांतून झळकतात...कधी त्याचे फोनवरील संभाषण टॅप होते...पण दाऊदबाबत असं काहीच घडत नाही..त्याचा फोन गेल्या वीस वर्षांत टॅप झाल्याचे ऐकीवात नाही..गेल्या 20 वर्षांत त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही..त्यानेच थेट फोन करून कोणाला धमकावल्याची तक्रार नाही...
.तो कोणाला प्रत्यक्ष भेटल्याचं कधी कानावर आलं नाही...90-91 पर्यंत तो काही पत्रकारांच्याही संपर्कात होता...मुंबईतील बॉंबस्फोटानंतर त्याचा तसा थेट संपर्क असेल असं वाटत नाही...त्याचे उपलब्ध असलेले सगळे फोटो, व्हीडीओ क्लिप्स 1984 पूर्वीचे आहेत...अरब देशातील आणि पाकिस्तानमधीलही इक्बाल भट्टी, भही असे काही तस्कर त्याच्या मागावर आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशातील पोलीस, गुप्तचर यंत्रणांबरोबरच अमेरिका, युरोपसह कित्येक देशांच्या गुप्तचर यंत्रणा त्याच्या शोधात आहेत...इंटरपोलने त्याला पाचवेळा रेड कॉर्नर नोटीस बजावलीय.. इतकं असूनही तो सापडणं दूरच...पण त्याचा साधा ताजा फोटो एकाही यंत्रणेला मिळत नाही? ...मग नेमकी भानगड काय आहे? कोणत्याही घडलेल्या मोठ्या गुन्ह्याची, जबाबदारी निश्चित केलेली दाऊद ही अस्तित्वात नसलेली व्यवस्था तर नाही ना? मग दाऊद आहे कोठे? त्याला कोण आणि का लपवतंय? सद्दाम हुसेन, लादेन यांना शोधून नेस्तनाबूत केलेल्या अमेरिकेला अथवा इंटरपोललाही त्याची काहीच हालचाल समजत नाही का? की मग देशातील कोणी अभिनेता, राजकारणी, उद्योगपती, पोलीस आफीसर, पत्रकार अथवा तत्सम कुणाचा
मुखवटा घालून तो आपल्यातच वावरत नाही ना? आणि तो अस्तित्वात असूनही खरंच सर्व गुप्तचरांना, तपास यंत्रणांना हुलकावण्या देत असेल तर मग त्याला डॉनच्‌ म्हणायला हवं .. ."

No comments:

Post a Comment