जगताप ब्रदर्स . . .
- - - - - - - - -
मंडईत मुकुंद दादाकडं उदय जगतापची ओळख झालेली...त्यालाही दहा-पंधरा वर्षं होऊन गेली असतील..कष्टाने, संवाद कौशल्याने व साफ नियतीने माणूस किती मजल मारू शकतो याचं उदय हे ढळढळीत उदाहरण....खुरट्या प्राण्यांच्या जंगलात तुरा असलेला मोर कसा उठून दिसतो ना..तसा आमचा हा उदय कुठंही चटकन उठून दिसतो...समाजाचं एकही क्षेत्र असं नाही की जिथं उदयची पोच नाही...किंवा त्या क्षेत्रातील कुणी उदयला ओळखत नाही...केवळ पुण्यातच नव्हे, तर सातारा,सांगली, कोल्हापूर आणि लगतच्या भागांत मित्रांचं सॉलीड्ड् नेटवर्क हा उदयचा प्लसपॉईंट...आणि त्या बळावरच त्याने स्वत:ची प्रगती साधलीये...मित्रांनाही हात धरून तो शिडीच्या वरच्या पाय-यांवर घेऊन जायचा प्रयत्न करतोय....
उदय सध्या धनकवडीत राहत असला तरी मूळचा मंडईतलाच...अकरा मारूती कोप-याच्या बखळीत जुनं घर...पूर्वी परीस्थिती बेताचीच...अगदी मंडईत कामं करून शिक्षण घेतलेलं...डोळ्यांत अपार जिद्द होती...तायक्वोंदो खेळायला शिकला..त्यात प्रवीण झाला...सॉलीड जंप किक मारायचा...त्या खेळात राजकारण असल्याचं लक्षात आल्यावर तिथून बाजूला झाला..पण खेळाच्या निमित्ताने गावोगावी मित्र झाले...90 च्या दशकानंतर बॅंक रिकव्हरी एजन्सीजचे पेव फुटलं होतं...त्यात अनेक वाईट प्रवृत्तींचा शिरकाव झालेला ...बहुतेक एजन्सीज गुंडांनीच ताब्यात घेतल्या होत्या..त्या वृत्तींना बाजूला करून त्यात शिरकाव करणे महाकठीण होते...पण जिगरबाज उदयनं अफाट मित्रपरिवाराच्या मदतीने ते शक्य केलं. एवढेच नव्हे, तर या क्षेत्रात सॉलीड्ड जम बसवला..त्यामुळं कित्येक बहुराष्ट्रीय बॅंकांच्या निरनिराळ्या गावच्या मॅनेजर्सशी, कर्मचा-यांशी चांगला दोस्ताना आहे..पोलीस अधिका-यांशी दाट मैत्री आहे..आणि अर्थातच...सगळी गुंड मंडळी त्याला चांगली ओळखून आहेत...वचकून आहेत...
खरंतर उदयएवढं मैत्र कुणाचं असतं तर एखादा केव्हाच हवेत गेला असता...पण तो त्याचे पाय जमीनीवर घट्ट रोवून उभा आहे.त्याच्या यशस्वी जीवनाचं हेच गमक असावं बहुधा...उदय कुणाशीच कधी अरे तुरे बोलत नाही....मला मोठ्या भावासारखा मान देतो...कुणाशीही ओळख करून देताना साहेब, सर म्हणतो...त्यामुळं मला संकोचल्यासारखं होतं...पण, तो आदब सोडत नाही...संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या दोषांकडं तो कानाडोळा करतो आणि त्याच्या जमेच्या बाजुचा कसा उपयोग करता येईल याचा विचार करतो...व्यवसायाच्या व्यापात त्याची समाजसेवाही चालूच असते...अनोख्या समाज कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या धनकवडीच्या आदर्श तरूण मंडळाचा तो अध्यक्ष व प्रमुख आहे...या मंडळाच्या माध्यमातून तो खूप निराळे उपक्रम राबवत असतो..गुन्हेगारी त्याने जवळून पाहिलीय....गुंडांची मुले गुंड होताना पाहिलीय..गुन्हेगारांच्या मुलांकडं समाजाचा असणारा हीन दृष्टीकोन त्याने नेमकेपणाने टिपलाय...त्यामुळंच तुरुंगातील कैद्यांच्या मुलांना दत्तक घेण्याची, त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उभारण्याची योजना त्याने आखली, मांडली आणि कार्यान्वितही केलीये..त्यामुळं कित्येक मुलांच्या काळवंडलेल्या आयुष्यात सोनेरी पहाट उगवली..खूप निरनिराळ्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून उदयचे सारखे काहीतरी कार्यक्रम, उपक्रम सुरूच असतात....त्याला कधीही फोन करा तो एंगेजच लागणार....अर्थात, मिसकॉल पाहून त्याने फोन केला नाही असंही कधी होत नाही...त्याची रेंज अफाट आहे..अथकपणे तो काम करत असतो...काम किंवा अडचण कसलीही असो ...तो पाचच मिनिटांत काम फत्ते करतो....
उदयच्या आणि माझ्या मैत्रीमुळं अनेकांचा जळफळाट होतो...एकदा आमच्या दोघांत आणि एका गाजलेल्या पोलीस अधिका-यात मतभेद निर्माण करण्याचा मोठा प्रयत्न काही 'हितचिंतकांनी' पद्धतशीर केला...काही वेळ तिघेही संभ्रमित झालो होतो...पण एवढी कच्ची नाही ना आपली दोस्ती...थोड्याच वेळात पिक्चर क्लिअर झालं...कुणी, काय आणि का उद्योग केला हे लक्षात आलं..आमची दोस्ती अभंगच राहीली आणि 'उद्योग'पती जायबंदी झाले....गेल्या काही वर्षांत खूप कष्ट करून उदयने व्यवसायाचा विस्तार केलाय... समाजसेवेचं व्रतही कायम आहे... परवाच् त्याचा धनंजय थोरात स्मृती पुरस्कार देऊन सत्कार झाला......धनंजयही मित्रच होता...अकाली एक्झिट घेतली त्याने...त्याच्या नावाचा पुरस्कार उदयला मिळाल्यानं आनंद झाला...उदयने फार काही गवगवा केला नाही त्याचा..उलट त्याच्या शिरावरील जबाबदारी वाढल्याचंच त्याच्या चर्येवरून जाणवलं....मध्यंतरी काहीकाळ तो राजकारणाकडेही आकृष्ठ झाला होता...पण, कट, कारस्थाने, घातपात हा आपला प्रांतच नसल्याने या क्षेत्रात टिकाव धरणे कठीण आहे हे त्याने पटकन ओळखलं.. पुन्हा त्याचा व्यवसाय आणि समाजकारण सुरू झालं.....
उदयचा उल्लेख केल्यावर बाळासाहेब जगताप यांचा उल्लेख येणं अपरिहार्य आहे..बाळासाहेब म्हणजेच आमचा बाळा नात्याने उदयचा भाऊच लागतो...पण त्याची माझी ओळख मुंबईच्या एका मित्राच्या मध्यस्थीने झाली...उदय शांत आणि बाळा एकदम डॅशिंग..कमालीचा तापट...मध्यम उंची आणि तगडी शरीरयष्टी...भेदक डोळे...एकदम डायनॅमिक पर्सनालिटी...आणि वृत्तीही तशीच..अंगात कमालीची रग,आडमाप ताकद...त्याच्या जोडीला अमर्याद धाडस.. असा अपूर्व संगम बाळाच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे.... भीती हा शब्दच त्याला ठावूक नाही...कुणाच्या नादाला लागायचं नाही...आणि कुणी नादाला लागलं तर आजिबात सोडायचं नाही हा नेम त्याने कसोशिने पाळलाय...तसा तो रहायला शाहू चौकातल्या आंग़्रे वाड्यात...पुणेरी लोकांना आंग्रेवाडा आणि लगतचा परिसर कसा आहे? हे चांगलं माहितीय..तिथल्या पोरांमध्ये बाळा खूप फेमस....सर्वांच्या मदतीला पतकन धावून जातो..शाहू चौकातील त्याच्या म्हसोबा उत्सवाला पार मुंबई-दिल्लीपासून वर्गण्या येतात आणि माणसंही येतात एवढ्यावरून बाळाची महती लक्षात यावी...त्यामुळंच समाजकारण व राजकारणातील अनेक 'मान्यवर' बाळाला धरून असतात...त्यामुळंच बाळा जगतापचं नामकरण बाळासाहेब जगताप कधी झालं हे आम्हालाही समजलं नाही...त्याचं एकंदरच सर्वच क्षेतातलं नेटवर्क अफाट...त्यात त्याचा निडर स्वभाव आणि त्याचं नेटवर्क लक्षात घेता भलेभले त्याच्या नादाला लागत नाहीत....आणि जे लागले ते कायमचे जायबंदी झालेत....अर्थात, ठकाशी ठक असलेला बाळा प्रत्यक्षात बोलायला मृदू आहे...काटेरी फणसासारखं त्याचं व्यक्तिमत्व....वरून काटेरी पण आतून गोड...
निरनिराळ्या गॉगल्सची आणि घड्याळांची त्याला आवड...आणि त्याला ते शोभतातही ..कधीही फोन केला की म्हणणार या की 'गणराज ' ला.... गणराजला खरंच त्याची शाही बडदास्त असते... बंद असलेलं एसी दालन त्याच्यामुळं उघडलं जातं ..खास निरशा दुधातला स्पेशल चहा बनवला जातो...कधी जेवायला गेलो..तर मेनूकार्डवर नसलेले पदार्थ खास बाळाच्या अॉर्डरनुसार बनवले जातात...त्याची खायची आवडही खास..म्हणजे फळं, दुध-दुभतं, असं सारं पौष्टीक ...सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही त्याला...त्याची यामाहवरची सुसाट रायडींग बघितली की कुणी परत त्याच्या गाडीवर बसायची हिम्मत नाही करत....गुन्हेगारांसाठी उलट्या काळजाचा वाटणारा बाळा दोस्तांसाठी खूप मृदू आहे...खूप इज्जत देऊन बोलतो...लहानमोठं कसलीही अडचण असो, बाळा ती नक्कीच मार्गी लावतो हे नक्की......बाळाची लोकप्रियता त्याच्या लग्नाच्यावेळी दिसून आली..पार कोथरूड ते सिंहगड रोडपर्यंतची ट्रॅफीक जाम् झालं होतं त्याच्या लग्नाच्या गर्दीमुळं...काहीही असो बाळा जिगरी आहे हेच माझ्यासाठी खूप आहे...उदय आणि तो परस्परांना पूरक कामं करत असतात. या दोघा जगताप ब्रदर्समध्ये मी जगताप नसतानाही त्यांचा भाऊ आहे याचा नेहमीच अभिमान वाटतो आणि त्यांची कवचकुंडलं लाभल्यामुळे कायमच निर्धास्तही असतो...

No comments:
Post a Comment