जुबेदा कोठे आहेस......?
- - - -- - - - - -- - - - --
चिमुरडी जुबेदा पुरती भांबावून गेली होती. पोलीस चौकीत यायची तिची पहिलीच वेळ. सगळे पोलीसमामा तिच्याशी चांगलं बोलत होते. तिला चहा बिस्कीट ख़ायचा आग्रह करीत होते. तिला आजिबात इच्छा नव्हती. तिचे डोळे आईवडिलांना पाहण्यासाठी भिरभिरत होते. आजुबाजुला बरीच माणसं होती. नव्हते ते फक्त तिचे आई बाबा. ती पुरती रडवेली झाली होती. पोलिसांनाही काय करावं हे समजत नव्हतं. तिला कसं समजवावं हे उमजत नव्हतं. संध्याकाळ उलटली, तसा जुबेदाचा धीर सुटला. अजुनही तिचे आई बाबा सापडले नव्हते. पोलिसांचा नाइलाज होता. त्यांनी किशोरवयीन जुबेदाची कशीबशी समजूत काढून तिला महिलासेवाग्राममध्ये पाठवले. सतरा वर्षांपूर्वीची ही घटना पिंपरी पोलिस स्टेशनमधील अनेक कर्माचा-यांना लख़्ख़ आठवते. नऊ डिसेंबर 1996 चा तो दिवस होता. पोलीस इन्स्पेक्टर सुरेंद्र पाटील नेहमीप्रमाणे कामाचा आढावा घेत बसले होते. त्यांचा फोन खणखणला. एक किशोरवयीन मुलगी चिंचवड रेल्वे स्टेशनच्या परिसरात फिरत असून काही मुले तिच्या मागावर आहेत. काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका व्यक्तीने त्यांना फोनवरून सांगितले. इन्स्पेक्टर पाटील यांनी आजिबात वेळ दवडला नाही. त्यांनी पोलिसांचे पथक तेथे पाठवले. पोलिसांच्या नजरेस चिमुरडी जुबेदा पडली. काळी-सावळी पण स्मार्ट. पाणीदार डोळे. साध्याच कपडयांतही ती सुंदर दिसत होती. पोलिसांनी तिची विचारपूस केली. तसा इतका वेळ दाबून धरलेला तिचा बांध कोसळला.हमसाहमशी रडत तिने पोलिसांना आपली कर्मकहाणी सांगितली. पोलिसांनी धीर देऊन तिला पोलीस स्टेशनला आणले. तिची समजूत काढून शांत केले. इन्स्पेक्टर पाटील यांनी तिच्या दिमतीला सारा पोलीस स्टाफ दिला.
ख़रंच जुबेदाची अवस्था विचित्र झाली होती. जुबेदा ख़ाजाहुसेन मन्सुरी हे तिचे पूर्ण नाव. मूळची ती खोपोलीची. तेथे तिचे आईवडिल मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत असत. पण, तेथील काम बंद झाले अन हे कुटुंब कामाच्या शोधात पुण्यात आले. चिंचवड रेल्वेस्थानकाच्या परिसरात त्यांना काम मिळाले. तेथेच छोटीशी ख़ोली त्यांनी घेतली. दोघेही कामावर जाऊ लागले. छोटी जुबेदा घरात एकटीच असायची. कोणत्याचदृष्टीने ते योग्य नव्हते. त्यामुळे जुबेदाला पेलेल असे काम ते शोधू लागले आणि त्यांना तसे एक उत्तम काम मिळालेही. बंडगार्डन परिसरातील एका धनिक कुटुंबातील छोट्या मुलांना सांभाळण्याचे ते काम होते. मालक दांपत्य सुस्वभावी होते. त्यांनी जुबेदाची राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था आपल्या बंगल्यात केली. जुबेदा तेथे छान रमली. अधूनमधून तिचे आई-वडिल बंगल्यावर जाऊन तिला भेटत असत. ख़्यालीखुशाली विचारत असत. दिवस मस्त चालले होते. या धनिक परिवाराला विदेशात जायचे होते. त्यासाठीची त्यांची धांदल सुरू झाली. कपडयांची, विविध वस्तुंची ख़रेदी करण्यात आली. जुबेदानेही त्यांना या कामी मदत केली. त्यांचा जाण्याचा दिवस उजाडला. ते मोटारीने विमानतळावर निघाले. जुबेदाही सोबत होती. तिला तिच्या चिंचवडच्या घरी सोडून ते पुढे जाणार होते. जुबेदाने सांगितल्यानुसार त्यांनी तिला चिंचवड स्थानकावर सोडले .तेथून जुबेदा घरी निघाली. पण, काहीतरी गफलत झाली होती. तिचे घरच काहीकेल्या सापडेना. ती खूप फिरली. पण जणुकाही चकवा लागला होता. ती तिथल्या तिथेच फिरत राहीली. एका मवाली टोळक्याने तिला हेरले. तिला पत्ता शोधून देण्याच्या बहाण्याने ते तिच्या मागोमाग फिरू लागले. काही रिक्षाचालकही त्यांना सामील झाले. तेथील एका जागरूक नागरिकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने पिंपरी पोलीस स्टेशनला हा प्रकार कळवला आणि पोलिसांमुळे जुबेदा बचावली. पोलिसांनी जुबेदाला सोबत घेऊन सारा परिसर पिंजून काढला, पण तिचे घर काही सापडत नव्हते. अख़ेर, तीन-चार तासांच्या मेहनतीनंतर त्यांना जुबेदाचे घर सापडले. पण त्याला तर कुलूप होते. पोलिसांनी आजुबाजूला चौकशी केली. जुबेदाचे आई-वडिल कामाच्या शोधासाठी दुस-या गावी गेले एवढीच माहिती त्यांना मिळाली. ते कोणत्या गावी गेले? त्यांचे कोणी अन्य नातलग किंवा परीचित मंडळी येथे आहेत का? याची चाचपणी पोलिसांनी केली. पण,त्यांच्या हाती काही लागले नाही. मग त्यांनी जुबेदा काम करीत असलेल्या बंगल्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण, खूप प्रयत्न करूनही त्यांना तो बंगला काही सापडला नाही. अखेर, जुबेदाला घेऊन पोलीस पुन्हा पोलीस स्टेशनला आले.जुबेदाचे रडू काही थांबत नव्हते. तिच्या निवा-याची काय सोय करायची?असा प्रश्न त्यांना पडला. अख़ेर, तिला महिला सेवाग्राममध्ये ठेवायचा निर्णय त्यांनी घेतला. तिला त्यांनी तेथे पाठवून दिले.पोलिसांकडील नोंदीनुसार जुबेदाच्या कहाणीचा पूर्वार्ध येथेच संपला. जुबेदाचे पुढे काय झाले? तिला तिचे आई-वडील भेटले का?ज्यांच्याकडे ती कामाला होती ती मंडळी भारतात परतली का? की कायमची विदेशात स्थायिक झाली? त्यांचा जुबेदाशी संपर्क झाला का? जुबेदा महिला सेवाग्राममध्ये किती वर्षे राहीली? तिचे कोणी नातलग तिला भेटले का? मोठी झाल्यावर जुबेदाने आपल्या आई-वडिलांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला का?तो सफल झाला का? जुबेदा सध्या कोठे आहे?या प्रश्नांची उत्तरे कोणालाच माहिती नाहीत. सतरा वर्षांनंतरही जुबेदाची ही कहाणी अधुरीच राहीली. तिच्या त्यावेळच्या वयाचाअंदाज घेतला तर आता ती तिशीत असेल .तिच्या कहाणीचा उत्तरार्ध तिच सांगू शकेल. जुबेदा... तू कोठे आहेस?

No comments:
Post a Comment