गँगस्टर्सना शरण जायचं काय ?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पुण्यात 80 च्या दशकात देवदेवस्कीच्या आमिषानं महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या वाघमारे बुवाचं प्रकरण गाजलं होतं. बहुतेक सर्व स्तरातल्या स्त्रियांना त्यानं नादाला लावलं होतं. सहजपणे विश्वास बसणार नाही, इतका तो सारा प्रकार अतिशय विकृत होता..पुण्यातल्या गुन्हेगारीवर वचक ठेवलेले दत्ता टेमघरे तेव्हा कसबा पेठ चौकीला होते आणि त्यांनी हे प्रकरण धसाला लावलं. बुवाला सक्तमजुरीची शिक्षा झाली. 90 च्या सुमाराला मी पत्रकारितेत आलो तेव्हा तो सजा संपवून आरामात घरी राहत होता..एकदा त्याला भेटायला गेलो होतो. त्याचा चेहरा आणि शरीर बरंच सुजलं होतं. त्याबद्दल विचारलं तर तो म्हटला अटक झाल्यावर पोलिसांचा खूप मार बसला आणि येरवडा जेलमध्ये गेल्यावर आंदेकर गँगच्या पोरांनी तर लय बडवलं.. माझं पोटाचं ऑपरेशन झालं होतं..त्या जखमेवर फायटी मारल्या...टाके तुटले..रक्तबंबाळ झालो तरी ते मारत होते...बुवाच्या मनात कोरली गेलेली त्या माराची, गुंडांची दहशत बुवाच्या डोळ्यांत साकळली होती. उन्नाव, कठुवा, सुरत इथल्या बलात्कारांच्या निर्दयी आणि घृणास्पद घटनांच्या पार्श्वभूमीवर हा वाघमारे बुवा डोळ्यासमोर आला.
देशातील तीन राज्यांत त्या चिमुकल्या जीवांवर झालेले अत्याचार मन दीर्घकाळ अस्वस्थ करणारे आहेतच्. त्याहीपेक्षा आपले प्रचलित कायदे कानून त्या गुन्हेगारांना कायमची जरब बसेल अशा तीव्रतेची शिक्षा देऊ शकत नाही ही भावना मनावर निराशेची अन हतबलतेची काजळी चढवणारी आहे. एखाद्या शिक्षेचा धाक किंवा कठोर कायद्याचा चाप बसेल अशा काही तरतुदी प्रचलित कायद्यात अस्तित्वात नाहीत, हे या स्वरूपाचे गुन्हे घडले की दरखेपेस अधिक गदडपणे अधोरेखित होत जाते. त्यामुळेच् या मस्तवाल अन मुर्दाड वृत्तींना ठेचायला कुणी अंडरवर्ल्डमधल्या गँगस्टर्सची किंवा नक्षलवादी मंडळींसारख्या समांतर यंत्रणांची मदत घ्यावी असा विचार बोलून दाखवणं टोकाचं वाटत नाही इतकी दाहकता समाजमनावर सध्या कोरली गेलीय.
जनावरालाही लाज वाटावी अशा कमालीच्या अमानवी पद्धतीनं कोवळ्या कळ्या खुडण्याच्या या कृत्यांनी महिलांच्या मनात जी अनामिक भीती स्वतःबद्दल आणि आपल्या छोट्या मुलींबद्दल ती सहजासहजी कमी होणार नाही.जो क्षोभ निर्माण झालाय तो सहजासहजी क्षमणार नाही. दर खेपेस महिला एकत्र येऊन कुणाचा तरी अक्कु यादव करतील हे ही शक्य नाही.पुण्याच्या डायसप्लॉट झोपडपट्टीत असेच अत्याचार करणाऱ्या दीपक दुधाणी या विकृत गुंडालाही अखेर जमावानेच ठेचून मारलं...पण हे असं कधीतरीच घडू शकतं. खरंतर अशा विकृत वृत्ती आणि व्यक्ती ठेचून काढायला स्वतंत्र व्यवस्था हवी, जी सध्या तरी या देशात निर्माण होणं अशक्य आहे. मग, या कृत्यांना चाप लावायचा असेल किंवा अशा व्यक्तींना अतिशय निर्दयी पद्धतीनं धडा शिकवायचा असेल ,तर समांतर यंत्रणांना साकडं घालायला हरकत नाही, अशी मांडणी अनेकांकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या व्यक्त होताना दिसतेय. मार्ग कोणतेही वापरा पण त्या गुन्हेगारांना त्वरित कठोर शासन करा ही एकच् मागणी जोरकसपणे पुढे येताना दिसतेय. तसं तर यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या माध्यमातून देशविघातक शक्तींना चाप लावण्याचे केलेले प्रयत्न ओपन सिक्रेट ठरले आहेत. 90च्या सुमारास माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी हरजींदरसिंग उर्फ जिंदा आणि सुखविंदरसिंग उर्फ जिंदा हे खलिस्तानवादी अतिरेकी येरवडा कारागृहात होते.त्यांना जाड पुस्तकातून पिस्तुल पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा कारागृहात असलेल्या अरुण गवळीने ती माहिती पोलिसांना दिली आणि तुरुंगात आलेले पिस्तुल पकडून देऊन घातपाताचा मोठा कट उधळून लावला. इतरही काही गँगस्टर्सनीही या स्वरूपाची कामे करून शासकीय यंत्रणांना मदत केली असण्याचीही शक्यता आजिबात नाकारता येत नाही.तीच गोष्ट नक्षलवादी मंडळींचीही आहे.हत्ती आणि माणसांच्या शेकडो हत्या केलेल्या हस्तिदंत तस्कर वीरप्पनला पकडण्याच्या कामी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या या लोकांची मदत घेतली गेली होती ही चर्चाही जुनी आहे. त्यामुळे देशविरोधी कृत्ये करणारी ही मंडळी शासकिय यंत्रणांसाठी पूर्णतः त्याज्य आहेत असेही समजण्याचे कारण नाही..उद्या कुणी या निगेटिव्ह समजल्या जाणाऱ्या समांतर व्यवस्थेची मदत पॉझिटिव्ह कामासाठी घेतली तर ?? तर ते कदाचित कायद्याच्यादृष्टीने समाजविघातक कृत्य ठरेलही; पण, चिमुकल्या मुलींशी, महिलांशी विकृत, वाईट कृत्य करणाऱ्यांना जरब बसवणारा जलद संदेश देण्यासाठी कदाचित ते परिणामकारक ठरेल. सध्याच्या विपरीत परिस्थितीत आपण दुसरं काय करू शकतो ? तत्व मूल्य गुंडाळण्याचा निर्णय तेवढा घेऊ शकतो......

Good
ReplyDelete