अखेर,बाबाजी भेटले . . .
- - - - - - -- - - - - - - - - -
तसा मी खूप श्रद्धाळू नाही....अंधश्रद्ध तर मुळीच नाही...पण कुठलीतरी एक सुप्रीम पॉवर आहे यावर विश्वास जरूर आहे..त्या पॉवरला मी मनोमन पूजतो...कुठल्या ना कुठल्या चेह-यात पहायचा प्रयत्न करतो...जेजुरीच्या खंडेरायाच्या कडेपठारावर, ओंकारेश्वरच्या मंदिरात, जंगली महाराजांच्या देवळात, महालक्ष्मीच्या गाभा-यात विशिष्ठ वेळी गेलं की ही शक्ती नक्की जाणवते...काही ठिकाणच्या विशेषत: रात्रीच्या किंवा पहाटेच्यावेळी होणा-या अजानमध्येही ती ताकद लक्षात येते. . .माथेरानसारख्या आडवळणाच्या गावातील चर्चच्या नीरव शांततेत ही पॉवर जाणवते...आमच्या गणेश पेठेतील गुरुद्वारात थंडगार सरबत पितानाही या अनामिक शक्तीचा साक्षात्कार होतो...
लहानपणी गोंदवल्याला ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे वास्तव्य असलेल्या राम मंदिरात आम्ही खेळायचो. घराला लागूनच हे मंदीर...लहानपणापासून महाराजांचा चेहरा मनात ठसलेला...ते कुणी परके आहेत असं कधी वाटलंच नाही...आपले आजोबा आहेत असंच वाटतं नेहमी....आमच्या घरी यायचे ते पूर्वी...पुढे शाळेत असताना पक्का नास्तिक झालेलो...बारावीत असताना एका जवळच्या मैत्रिणीच्या आईच्या पोटाचं आप्रेशन होतं...ती टेंशनमध्ये होती खूप...मी ही घाबरलो...एक मित्र म्हणाला,''थोरल्या शेखसल्लाचा दर्गा लय पॉवरफुल्ल...तिथं जाऊ''...गेलो मी ..पहिल्यांदाच कुठल्या दर्ग्यात गेलेलो..तिथं मनोभावे हात जोडले .. .मनातल्या मनात आर्जव केली....मग खूप शांत वाटू लागलं...ते आप्रेशन सुखरूप पार पडलं...तेव्हापासून दर गुरुवारी जायचो त्या दर्ग्यात...कॉलेजला असताना दररोज संध्याकाळी तळ्यातल्या गणपतीला जायचा आणि दर शनिवारी भिकारदास मारूतीला जायचा नेम कधी चुकला नाही....12-15 वर्षे शनिवारचा उपास करायचो....तसं काही खास मिळावं म्हणून कधीच भक्ती केली नाही...हवं ते आपोआप मिळत गेलं,मागायच्याही आधी,. . ...मग कधी दत्त मंदिरात जा...कधी दगडूशेठ गणपती...असं करता करता स्वामी समर्थांच्या मठापासून गजानन महाराजांच्या मठापर्यंत अनेक ठिकाणी थोडा थोडा वावरलो . ...शंकर महाराजांच्या मठातील आणि शिवापूरच्या कमरअली दर्वेश दर्ग्याची ओढ खूप काळ टिकली...निरनिराळ्या कारणाने.....मधली काही वर्षं सगळंच सोडून दिलं....स्नान करताना निरनिराळ्या नावांनी इश्वराचं स्मरण करायचा अणि सूर्यनारायणाचं दर्शन घेताना गायत्री मंत्र म्हणायचा प्रघात वर्षानुवर्षे टिकलाय
.. . पण गेल्या साधारण वर्षभरापासून महाअवतार बाबाजींबद्दल कमालीची ओढ वाटू लागली....योगायोगाने अनुषंगिक व्यक्ती भेटू लागल्या . ....नेमकं त्यांच्याशी संबंधीत साहित्य हाती पडू लागलं...मराठीत फारच कमी साहित्य आहे त्यांच्याबाबत...पण, हिंदी आणि इंग्रजीही पुस्तकं हाती पडू लागली...तसं पुस्तकं वाचण्याइतकं माझं इंग्रजी फार थोर नाही...पण तरीही सहजतेनं पुस्तक वाचून काढली....महाअवतार बाबाजींबद्दल अनामिक आकर्षण वाढलेलं असतानाच त्यांचे अनुयायी श्री.एम यांच्याशी आकस्मिक भेट झाली...तेव्हापासून जरा स्मरण करू लागलो बाबाजींचं...पण शंकर महाराजांबद्दल जो प्रॉब्लेम मला व्हायचा, तोच प्रॉब्लेम बाबाजींबद्दल होऊ लागला.....म्हणजे मला तरी शंकर महाराजांचे एक वैशिष्ठ्य जाणवलंय, ते म्हणजे कितीही वेळा, कितीही वेळ महाराजांसमोर बसलं तरी नंतर मला त्यांचा नेमका चेहराच डोळ्यासमोर येत नाही....त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले अनेकजण सांगतात की महाराज दरवेळी निराळेच दिसत...ते ही कारण असावं या मागे...किंवा माझ्या नजरेत ते सामावले जात नसतील....कारण काहीही असो....पण महाराजांचा नेमका चेहराच कळत नाही....सगळीकडे महाराजांचा जो दाढीवाला फोटो आहे किंवा अगदी मठातही त्यांची जी प्रतिमा आहे ना दाढीधारी....तसे महाराज अगदी शेवटी शेवटी दिसायचे...निर्वाणाच्या फक्त सहा महिने आधी त्यांनी दाढी वाढवली होती.... ते जसे रागीट दिसतात...तसेच भरजरी वस्त्रे घातल्यावर कमालीचे राजबिंडे दिसत....नाईकांच्या वाड्यातील त्यांचे अस्सल फोटो पाहण्याजोगे आहेत....
महाराजांसारखेच महाअवतार बाबाजींचाही चेहरा काही मन:चक्षुसमोर येत नाही....कित्येकदा रात्री निरनिराळ्या विचारांनी झोप लागत नसेल, तर इश्वराचं किंवा देवपुरुषांचं स्मरण करायची माझी सवय आहे. स्वार्थात परमार्थ साधता येतो...झोपही येते आणि चित्त शुद्धीही....मध्यंतरी असंच बाबाजींचं स्मरण करायची सवय लागलेली. . .पण चेहराच नेमका डोळ्यांसमोर येईना....मग अस्वस्थ व्हायला व्हायचं....त्याचकाळात एका मैत्रिणीनं नेमका व्हॉटस अपवर बाबाजींचा फोटो पाठवला...मी तोच वॉलपेपर म्हणून ठेवला....वास्तविक, कोणत्याही देवाचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवायला किंवा देवाची आरती वगैरे रिंगटोन, कॉलर ट्यून ठेवणे मला नामंजूर...त्याबाबत माझी काही वैयक्तिक मते आहेत....पण इतक्या वर्षांच्या या कडव्या तत्वाला तिलांजली देत मी बाबाजींचा फोटो फोनचा वॉलपेपर म्हणून ठेवला...मग मात्र त्यांचा चेहरा नजरेत सामावला...मनात ठसला...ह्र्दयाच्या कुपीत बंदिस्त झाला....काही दिवसांनी रोजच रात्री त्यांच्याशी संवाद सुरू झाला.....हिमालयाची पांढरी शुभ्र हिमाच्छादित शिखरे....कोवळी सोनेरी किरणे सगळीकडे पसरलेली आणि एका शिखरावर अगदी टोकाला सुवर्णकांतीचे बाबाजी ध्यानस्थ बसले आहेत हे चित्र नेहमीच माझ्या डोळ्यासमोर येते...भले आपल्यासाठी कोणतीही वेळ असो, मग ती सकाळची, दुपारची किंवा अगदी मध्यरात्रीची....मानेवर रूळलेल्या सोनेरी केसांचे बाबाजी सोनेरी सूर्यकिरणांमध्ये मिसळून गेल्याचे स्पष्ट दिसते...त्यांच्याशी संवाद होतो . . .कधी ते त्यांच्या ध्यानातच मग्न असतात...कधी केवळ मंद स्मित करून चालत निघून जातात...कधी खूप ममतेने बोलतात...या संवादाला सुरूवात होण्यापूर्वी मी खूप आर्जवे केली...खूप विनवण्या केल्या...पण ना बाबाजी डोळ्यासमोर दिसत, ना कधी संवाद होत...पण एकदा झालं काय, की उत्तर मध्यरात्री किंवा पहाटेच्याआधी ओंकारध्वनी माझ्या कानावर पडला....खालच्या फ्लॅटमधले गृहस्थ तसे धार्मिक वृत्तीचे....स्नानशूचिर्भूत झाल्यावर देवपूजा करून घराबाहेर पडणारे...त्यांची ध्यानधारणा सुरू असावी असा समज झाला....पण त्यांच्याच घरातील जोरदार भांडणाच्या आवाजानेच खरंतर रात्री उशीरापर्यंत मी जागा होतो...त्यातच त्यांनी 'सोमरस' प्राशन केलेला...मग कडाकडा भांडणे करून हे महाशय काय लगेच ध्यानधारणेला बसले की काय? असेही वाटले...बरं माणसाचं काही सांगता येत नाही...असतात असेही अवलिये....पण मला जो सुस्पष्ट ओंकारध्वनी ऐकू आला ना तो आगळाच होता....दोन-तीनवेळा मला असा अनु्भव आला...मग एकदा सरळ खालच्या त्या गृहस्थांना विचारून टाकले...ते म्हटले मी अशी काही ध्यानवगैरे काही करत नाही...बाकी आजुबाजूला तसा प्रकार करणारे कुणी नाही...मग माझ्या लक्षात आला सगळा प्रकार....सोमवारी बाबा भेटतात अनेकदा असं या संप्रदायातील अधिकारी व्यक्तीने मला सांगितलं होतं...मध्यंतरी माझा छान संवाद झाला त्यांच्याशी....एक लाईफटाईम गिफ्ट दिलंय त्यांनी मला....मध्यंतरी खंड पडला संवादामध्ये.... खूप बोलायचं होतं त्यांच्याशी...काही शंका विचारायच्या होत्या....सर्वात महत्वाचं म्हणजे दैवी पुरुषांचं या पृथ्वीवर अस्तित्व असूनही माणूस त्याच्या अन्न, वस्त्र निवा-यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित का राहतो? काही कळायचं वय नसलेली अजाण बालकं आकस्मिक देवाघरी का जातात? वर्षानुवर्षे कष्ट करूनही कित्येकांचं आयुष्य दु:खी,कष्टीच का असतं? का त्याच्या आयुष्यात कधी आनंदाचं झाड नाही उगवत? जाती-धर्माच्या वादातून लोक एकमेकांच्या जीवाचे वैरी का बनतात? जगभरातील प्रमुख देश यादवीच्या उंबरठयावर का उभे आहेत? एकीकडे धनिकांच्या सोन्याचांदीच्या महालांची लकाकी वाढत असताना गरींबांच्या कुडाच्या भिंती खचतच कशा चालल्यात...पार नितीमत्ता सोडल्यासारखे बलात्काराचे आणि इतर गुन्हे सर्रास का वाढू लागलेत? कुणीही येतो आणि कुणालाही मारून जातो...पत्ताही लागत नाही...डॉ. दाभोलकरांचं काय झालं? उन्हाळा इतका कडक का झालाय? असे कितीतरी प्रश्न विचारायचे होते.......कारण ...माझं हे नेहमीचं आहे...आपण एवढ्या भक्तीभावाने एखाद्याला पूजायचं आणि त्याचं आपल्याकडं लक्ष नाहीच् असा अनेकदा अनुभव यायचा पूर्वी....त्यावर ''देव तुमची परीक्षा पाहतोय''....किंवा ''सोसू शकेल त्याच माणसाला देव यातना देतो'' अशी सोयिस्कर उत्तर मिळतात काहीजणांकडून.. पण माझं समाधान होत नाही अशाने....आणि मी म्हणतो आहेत ना हक्काचे आपले बाबाजी.....मग का सोडा???एकदा क्लिअर होऊन जाऊ दे की त्यांची आणि आपली दुनिया निराळी आहे का? त्यांच्या अध्यात्माचा या दुनियेशी काहीच संबंध नाही का? या दुनियेतील व्यक्तींना या देवपुरुषांचा काहीच फायदा नाही का? नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे पोळून निघालेल्या जनतेला या देवत्वाचा काही फायदा आहे की नाही???? खूप खूप विचारायचं होतं....पण, बाबाजीच गायब....मग या संप्रदायातील एक-दोघा अधिकारी व्यक्तींना विचारलं.....ते म्हणाले खरंय...बाबाजी खूप महत्वाच्या कामात आहेत. त्यामुळं ''आऊट आफ रीच'' आहेत...पण 10-12 दिवसांनी होईल भेट..... पण मी काही पिच्छा सोडला नाही......तुम्ही मला भेटल्याशिवाय जाऊच शकणार नाही असं साकडंच घातलं....काल जरा लवकर झोपलो होतो...मध्यरात्रीच्या सुमारास झोप चाळवली...पुन्हा उठलो ...वाचत बसलो....पुन्हा झोपलो....अंग तापल्यासारखं झालं होतं.... काही वाईट, विचित्र स्वप्नं पडायला लागली....वैतागून गेलो....नेमकी नाही वेळ सांगता येणार...पण बहुदा लौकीकार्थाने सकाळचे सात-आठ वाजले असावेत.. गाढ झोपेत होतो आणि सोनेरी किरणं पसरलेल्या बर्फाच्छादीत शिखरांमधून काष्ठवत अंगकाठीचे बाबाजी मंद स्मित करत पुढे आले....मानेवर छान सोनेरी केस रूळत होते . .. हर्षभरीत मनाने मी निकट गेलो....मी काही बोलावं असं त्यांनी सुचवलं....पण, सारे प्रश्न मनातच राहिले....देहभान हरपून त्या तेजस्वी आकृतीकडे पाहत राहीलो....कितीतरी वेळ . . .. मंदस्मित करून ते निघाले....माझ्या घशात आवंढा दाटून आला....कितीतरी प्रेमाने त्यांनी आलिंगन दिले....काळजी करू नकोस बेटा...कली मस्तवाल झालाय....त्याला काबूत आणायची जबाबदारी गजानन महाराजांकडे सोपवलीय.... नागपूरच्या ताजुद्दिन बाबांवर न्यायव्यवस्थेवर अंकुश ठेवायला सांगितलाय...काळजी करू नकोस....
बाबाजी त्यांच्या स्थानाकडे रवाना झाले.....भेटतील बहुदा लवकरच. . . त्यांची नजरच सांगत होती मला . . ..

No comments:
Post a Comment