साबण पुराण :
- - - - - - -
नाही निर्मळ मन, काय करील साबण...! हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे .. यावरून साबण सोळाव्या शतकातही होता...अगदी आत्तासारखा साफसुथरा पांढराशुभ्र फेसच फेस हो्णारा नसेलही....त्याकाळी रीठे, राख, शिकेकाईचा उपयोग साबणाप्रमाणे केला जात असावा...स्नानासाठी, शरीर स्वच्छतेसाठी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे साबण असे तेव्हा
म्हटले जात असावे....केवळ स्वच्छ आणि भरपूर पाण्याने स्नान करण्याने शरीर निर्मळ होत नाही...त्यासाठी साबणाचे प्रयोजन आहे...साबणामुळं अंगावरील मळ निघून जातो....घामटलेले शरीर स्वच्छ होते.....साबणाच्या गंधाने चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात....तनामनाचा थकवा, शीण पळून जातो....एकदम फ्रेश वाटायला लागतं.....तसं होत असेल, तरच त्या साबणाचा उपयोग...तसं उगाच साबण फासत बसायला आपण काय चिखलात लोळायला जात नाही म्हणा....
प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार साबणातही नानाप्रकार आहेत. त्यांचंही मार्केट खूप विस्तारलंय...मी लहान होतो, तेव्हा हमाम, लाईफबॉय, जेंटील आणि लक्स हे साबण आठवतात....ग्रामीण भागात खासकरून लाईफबॉय असायचा...वापरण्यापूर्वीच सुरीने त्याचे दोन तुकडे केलेले असायचे...म्हणजे तो हातात बसायचाही व्यवस्थित आणि पुरायचाही छान....याचं एक वैशिष्ठ्य म्हणजे कितीही टाळायचा प्रयत्न केला, तरी हा साबण हमखास डोळ्य़ांत जायचाच...मग आंघोळीनंतर साबणाच्या रंगासारखेच डोळेही लाल व्हायचे....आतापर्यंत कितीतरी निरनिराळ्या रंगाचे, वासांचे,कंपन्यांचे साबण वापरलेत...पण भले लाईफबॉय कितीही कोरडा साबण असला, तरी त्याच्या गंधासारखा कोणताही गंध मला आवडला नाही.....या साबणाला सुगंध नाही...एकप्रकारचा आगळा ताजा गंध आहे आणि आंघोळीनंतर त्यामुळे कमालीची ताजगी वाटते......ओके नावाचा एक साबण आला होता....त्या कंपनीने हुबेहूब लाईफबॉयची कॉपी केली होती...पण लाईफबॉयचा ताजगीचा गंध काही त्यांना कॉपी करता आला नाही..त्यामुळे काही काळ मार्केटमध्ये स्पर्धा करूनही अखेर तंदुरस्ती की रक्षा करणारा लाईफबॉय अव्वल ठरला.....हमाम हा मध्यमवर्गियांचा साबण...फारतर फार बदल म्हणजे रेक्सोना....दोन्ही हिरवे साबण...भरपूर फेस असणारे आणि ब-या वासाचे.....त्यांना पर्याय म्हणून जेंटील नावाचा एक साबण आला होता...छान होता तो...पण बंद पडली कंपनी ती....
80च्या दशकात लक्सने सॉलीड्ड् जाहीराती करीत मार्केट काबीज केलं....निरनिराळ्या हिरॉईन या साबणाच्या जाहीराती करीत...मला खरंच वाटायचं ...की त्या ही हाच साबण वापरतात म्हणून....मग आपण आंघोळ करताना भारी वाटायचं.....त्यातही इंटरनॅशनल लक्स हा एक भारी साबण होता....महाजन वर्गातील लोक महागडे विदेशी ब्रॅंड्सचे साबण वापरत असत....जन-अभिजन वर्गामध्ये अधूनमधून जाईच्या वासाचा जय, चंदनाच्या वासाचा संतूर, लिंबाच्या वासाचा लिरील असे काहीवेळा प्रयोग होत असत...शहरात अवजड ट्रक घेऊन येणारे ड्रायव्हर्स असतात ना त्यांच्याकडे 'चंद्रीका' हा साबण हमखास दिसतो....त्या कुतूहलापोटी मी एकदा तो विकत आणला होता....भरपूर फेस निघणारा चंद्रीका आवडला आणि मैलोंमैल प्रवास करणारे ट्रक ड्रायव्हर्स तो साबण का वापरतात हे ही लक्षात आलं....'चंद्रीका ' प्रमाणेच काहीसा कडवट वासाचा 'नीम' हा साबणही छान होता....जनरली दिवाळी असली, की बहुतेक घरांमध्ये 'मोती' साबण असायचा...पुढे 'मोती' ला 'म्हैसूर सोप'ची स्पर्धा करावी लागली...मध्यंतरी 'लि सान्सी' नावाचा विचित्र आकाराचा पण छान सुगंधाचा एक साबण आला होता...चांगला होता...पण ती ही कंपनी बंद पडली बहुदा...संतूरने आकारापासून रंगांपर्यंत बरेच प्रयोग केले.....एक काळ लिरीलची जाहीरात बरीच फेमस होती...साबणापेक्षा ती मॉडेल जास्त लक्षात राहीली होती....अंगाच्या साबणांमध्ये लिरील, लक्सने बराच भाव खाल्ला.....'सिंथॉल'चा विनोद खन्नाही अनेकांच्या स्मरणात आहे.....अलिकडच्या काळात 'डव' ची ब-यापैकी चलती आहे....
नवी पिढी या साबणांऐवजी निरनिराळ्या देशी-विदेशी कंपन्यांचे बॉडीवॉश वापरताना दिसून येतात...त्यांना आपल्या लहानपणीच्या साबणांची गंमत कळणार नाही.....नवा साबणाचे वेष्टन फोडून पहिल्यांदा वापरण्याचा आनंद समजणार नाही.....झालं काय दोन दिवस जरा पुण्याबाहेर होतो....लॉजमध्ये राहिलो....गावंनुसार, दर्जानुसार लॉजेसमधे फरक असतो.. खोल्यांचे आकार लहान-मोठे असतात, बेडशीट्स पिलो कव्हरचा दर्जा कमी जास्त असतो...पाण्याची उपलब्धता कमी-जास्त असते...टीव्ही, एसीमध्ये फरक असतो.....सुविधा कमी-अधिक असतात...सर्व्हीसचा दर्जा निराळा असतो....पण मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं...तुम्ही पुण्यात, ठाण्यात, मुंबई, दिल्ली, गोवा, अहमदाबाद, कन्याकुमारी कुठेही जा.... अगदी सासवड, फलटण, दहिवडी, टेंभुर्णी, ओतूर, लासलगाव, जव्हार, सोलापूर, कोल्हापूर, नगर......पासून राज्यातील कुठल्याही खेडेगावांपासून ते देशांतील महानगरांमधील कोणत्याही दर्जाच्या लॉजेसमध्ये जा.....तुम्हाला नक्कीच निरनिराळ्या बाबतीत काही ना काही बदल जाणवतील....फरक आढळतील...पण एक बाब खात्रीने सांगतो.....तुम्हाला दिलेल्या टर्कीश टॉवेलसोबत '' मेडीमिक्स '' साबण हमखास असणारच्....काय गौडबंगाल आहे हे समजत नाही....पण खरंच मानलंच पाहिजे मेडिमिक्सच्या टीमला....मार्केटींगचा यापेक्षा प्रभावी प्रयोग मी कोणत्याही प्रॉडक्टबाबत कुठेही पाहिला नाही...साधारणत: 90 च्या दशकात हा साबण बाजारात आला...72 औषधी वनस्पतींचं त्यात मिश्रण असल्याची जोरदार जाहीरात अजूनही आठवते....त्यामुळे आवर्जून बाजारातून साबणाची केलेली खरेदी आणि प्रत्यक्ष आंघोळीच्यावेळी कोथिंबीर, आयुर्वेदीक भस्मांसारख्या त्याच्या विचित्र वासाने आलेला वैताग अजून आठवतो....परत अंगाला कधी हा साबण फासला नाही....कुणाच्या घरातही तो फारसा दिसत नाही...पण झाडून सगळ्या लॉजेसमध्ये ही एकमेव कॉमन गोष्ट दिसून येते.....यापूर्वी किमान शंभरवेळा मेडिमिक्स फासल्यानंतर काल तरी लॉजला निराळा साबण मिळेल, अशी अपेक्षा होती....तसा छोटा पांढरा लक्स मिळाला....आणि टर्कीश टॉवेलच्या जोडीसोबत पुन्हा मेडीमिक्सची जोडी होतीच्..........हा मेडिमिक्सच आजच्या साबणपुराणाला कारणीभूत ठरला . . . .

No comments:
Post a Comment