प्रेम . . .
- - - - - - -
एक असते राजकन्या, गावातील एक गरीब तरुण तिच्या प्रेमात पडतो. तीही त्याच्यावर भाळते. दोघेही भिन्न धर्मांचे. नेहमीप्रमाणे त्याला कडवा विरोध होतो. मग दोघे पळून जातात... लग्न करतात . . . अखेर सच्चा प्रेमापुढे राजा मान झुकवतो. सच्च्या प्रेमाचा आदर करतो. त्यांचा प्रेमाने स्वीकार करतो....
ही झाली पारंपारीक कहाणी. गोष्टींमध्ये ऐकलेली, वाचलेली आणि आधुनिक रुपात चित्रपटांत पाहिलेली. पण या जागतिकीकरणाच्या आधुनिक युगातही ही बाब वास्तवात येणे ख़रेच शक्य आहे? रमझान ईद आणि गणेशोत्सव एकत्र साजरे करणारा समाज आज तरी अशा गोष्टी मनापासून स्वीकारु शकतो? धर्मातील भेद हा तर मुद्दा आहेच; पण त्यापेक्षाही आर्थिक स्तरामधील भेद महत्वाची बाब आहे . सध्याच्या आनर किलिंग’च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर त्या स्वरुपाची पंधरा वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आठवते.
पुण्याच्या नाना पेठेत समीर नावाचा एक तरुण रहात होता. घरची परिस्थिती अतिशय बेताची. रहाते घर म्हणजे वाड्यातील दहा बाय दहाची खोली. वडिलांचा शिवणकामाचा व्यवसाय. हा कुठेतरी गॅरेजमध्ये काम करायचा. शिक्षणाच्या नावाने शिमगा. आजूबाजूच्या युवकांमुळे स्वारी नजीकच्या कॉलेजमध्ये जाऊ लागली. शिक्षणासाठी नव्हे, तर मुलींभोवती गोंडा घोळण्यासाठी. इंप्रेशन तर मारायचे, पण परिस्थिती बेताची. मग कॉलेजवर जाताना एका मित्राचा शर्ट, दुसºयाची पँट आणि तिसºयाची गाडी असा सगळा मामला; पण पठ्याने बघता बघता त्या कॉलेजमधल्या एका मुलीवर म्हणजे जाईवर मोहिनी टाकली. हा दिसायला तसा जेमतेमच, अन् ती तर रुपगर्विता. अप्रतिम सौंदर्य लाभलेली जाई कशी कोण जाणे पण समीरच्या प्रेमात पडली. दोघांचेही हिंडणे-फिरणे सुरु झाले. थोड्याच दिवसात जाईला समीरचे खरे रुप दिसून आले. त्यानेही खरी परिस्थिती तिला सांगून वाड्यातील आपली छोटेख़ानी एकुलती एक खोली तिला दाखवली. प्रेम आंधळं असत म्हणतात तेच खरं. जाईला त्याचा काही फरक पडला नाही... उलट समीरने वस्तुस्थिती सांगितल्याने तिला त्याच्या सच्चेपणाचा अभिमानच वाटला. मग काय उभयतांचे प्रेम अधिकच बहरत गेले. ती नेहमी त्यांच्या घरी येऊ-जाऊ लागली. एकतर मुलगी परधर्मीय तिची आर्थिक स्थिती अतिशय धनाढय. कोणीही पाहताक्षणी प्रेमात पडेल, असे तिचे सौंदर्य. समीरच्या घरची मंडळी घाबरुन गेली. त्यांनी समीरला आणि जाईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जाईच्या घरीही या प्रकरणाची कुणकुण लागली. ती मंडळी बिथरली. समीरला त्यांनी दम भरला. पण अखेर प्रेमच ते. विरोध झाल्यामुळे या प्रेमाला अधिक रंगत चढली आणि एके दिवशी ही पाखरे उडून गेली. मग मात्र एकच गोंधळ उडाला.
जाईचे वडील मुंबईतील बडे उद्योगपती. त्यांनी थेट पोलीस महासंचालकांशी संपर्क साधला. महासंचालक पडला ‘इमानदार’ माणूस. त्यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली. पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी मग एक खास पथकच त्यांच्या शोधासाठी नेमले. अण्णा कोंढरे, उदय मोरे (मो.९८२३२५५३००), दिलीप मोहिते,अशोक ढुमणे, शैलेश जगताप (मो. ९१५८९२४७७७) सुनील पवार (मो. ९९२३४०१२१२) अशा जबरदस्त चेह-यांचा या पथकात समावेश होता. त्यांनी खूप शोधाशोध केली. तेव्हा मोबाईल नव्हते. त्यामुळे या जोडप्याला शोधणे एक कठीण आव्हान ठरले होते. अखेर, एका खब-याकडून त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली आणि ही जोडी पोलिसांच्या हाती लागली. तो १९९७ या वर्षातील जुलै महिना होता. सहजपणे विश्वास बसणार नाही, पण आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावातील अत्यंत दाटीवाटीच्या झोपडपट्टीत हे दोघेही सुखाने संसार करत होते. अब्जाधीश व्यक्तीची मुलगी झोपडपट्टीत सुखाने राहत असल्याचे पाहून पोलीसही चक्रावले. उभयतांच्या प्रेमावर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण भावनेपेक्षा कर्तव्याचे पारडे जड होते. पोलिसांचा नाइलाज होता. त्यांनी त्या दोघांनाही पुण्यात आणले.
जाई सज्ञान होती. पण तिच्यापेक्षा वयाने वर्षभर मोठा असलेला समीर कायद्याने सज्ञान नव्हता. समर्थ पोलिस ठाण्यात समीरविरुध्द गुन्हा दाखल करावा लागला. जबरदस्तीने पळवून नेऊन बलात्कार केल्याचा. शिक्षा थेट जन्मठेपेची. मग दोघांचेही धाबे दणाणले. पण जाईच कौतुक करायला हवे. आपण स्वत:च्या मर्जीने समीरबरोबर लग्न करून राहत असल्याचा स्पष्ट जबाब तिने पोलिसांना दिला. पालकांकडून प्रचंड दबाब आला. पण, जाई तिच्या जबाबावर ठाम होती. तिच्या पालकांनी तक्रार दिल्यामुळे समीरविरुध्द कारवाई करावीच लागली. मग काय समीर गेला तुरुंगात आणि जाई तिच्या पालकांकडे. त्यानंतर अधूनमधून जाई कोर्टात दिसायची. समीरच्या जामिनासाठी तिचा आटापिटा चालला होता. पण त्याला जामीन काही मिळाला नाही. न्यायालयात खटला उभा राहण्यास बरेच दिवस होते. त्यामुळे समीरची रवानगी थेट येरवडा जेलमध्येच झाली. नंतर ना जाई दिसली ना समीरची काही खबर समजली. त्याचे कुटुंबिय राहते घर सोडून अन्यत्र गेले एवढेच समजले. समर्थ पोलिस ठाण्याजवळून जाताना समीर आणि जाईचे ते प्रेमप्रकरण आठवते. दोघांचे चेहरे डोळयासमोर तरळतात. त्या दोघांचे पुढे काय झाले हे समजले नाही. जाईचे तिच्या घरच्यांनी लग्न करुन दिले, ती परदेशतच रहाते असे कानावर आले. समीरबाबत मात्र काहीच समजले नाही. समीर तुरुंगात आहे का? खटला जर मागे घेतला असेल, तर आता तो काय करत असेल? जाई नेमकी कोठे असेल, उभयतांची पुन्हा भेट झाली का? साता समुद्रापार ऐषोरामात राहणा-या जाईला आंध्र प्रदेशामधील झोपडीतील दिवस आठवत असतील का? सर्वात महत्वाचे म्हणजे त्या दोघांना परस्परांची आठवण येत असेल का?

No comments:
Post a Comment