Wednesday, 21 November 2018

सेक्स बोल्ड अँड ब्युटीफूल



सेक्स : बोल्ड & ब्युटीफूल
-  -  -  -  -  -  -  -  -  -  - 
'' Vagina The Shadow Of woman '' या मूळ कथेवर आधारीत असलेले ' त्या चार योनींची गोष्ट ' हे बहुचर्चित नाटक काल पाहिले...सेक्सबाबतचे गैरसमज दूर करणारे हे नाटक नक्कीच नाही...याउलट काही ढोबळ समज या गैरसमजुती आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करतानाच नव्या गैरसमजांना जन्म घालणारे हे नाटक आहे, असे माझे मत बनले...
                आपल्याकडे सेक्स या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत नाही हा आक्षेप घेतला जातो...तो काही अंशी मान्य करतानाच नव्या पिढीतील कित्येक स्त्री-पुरुष त्यांच्या मित्र-मैत्रिणी , आफीसमधील सहकारी, डॉक्टर्स यांच्यासोबत  सेक्सबाबतच्या शंकांचे निरसन करताना दिसतात हे मान्य केले पाहिजे...कधीकाळी पिवळ्या पुस्तकांमधून निरनिराळ्या ' आसनांची' छायाचित्रे पाहून आंबटशौकीन मंडळी आपलं सेक्सबाबतचं कुतूहूल शमवत असत...त्यानंतर त्या टाईपची बया, अपल व तत्सम काही मासिके आली.. हिंदी, इंग़्रजी ब्लू फिल्म्स 90 च्या दशकात खूप फेमस होत्या...हल्ली तर गुगल महाराज प्रसन्न असल्याने कोणालाही विषय वर्ज्य नाही....त्यामुळे नवी पिढी अधिक सुजाण व सूज्ञ आहे असं वाटतं....मेनॉपॉज सारख्या संवेदनशील विषयांवर आजची युवती पिढी धडाधड बोलते...ती आपल्या आईला या बदलत्या शारीरिक स्थितीची आणि त्यामुळे बदलणा-या मानसिक स्थितीची सहजपणे माहिती देते. उगवत्या पिढीमध्ये लैंगिक ज्ञानाची माहिती वाढते आहे. पण, त्याचबरोबर पोर्नोग्राफीमुळे काही जबरदस्त गैरसमजही वाढत आहेत ही वस्तुस्थिती आहे. खरंतर सेक्स ही मानवी जीवनातील सर्वांगसुंदर भावना आहे. शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यासाठी व प्रजोत्पादनासाठी निसर्गाने दिलेली ही देणगीच मानावी लागेल. प्रत्येक व्यक्तीगणिक, संस्कृतीगणिक व प्रदेशागणिक सेक्सचे स्वरूप बदलत असले, तरी ते निश्चितपणे सुखासीनच असते यात काहीच वाद नाही. पण, दुर्दैवाने अलिकडच्या काळात पोर्नोग्राफीसारख्या विकृत साधनांमुळे सेक्सबाबतचे गैरसमज कमालीचे वाढले आहेत...मध्यंतरी एका मित्राचे लग्न झाले...माझ्यापेक्षा वयाने तो लहान . . .त्याची बायकोही माझी मैत्रिण....दोघंही स्वभावाने छान...एकाच कंपनीत दोघंही काम करतात....उत्तम पगार आहेत....छान चाललेलं होतं...वर्षभरानंतर त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या....पहिल्यांदा आम्ही मित्रांनी दुर्लक्ष केलं....पण भांडणांचं स्वरूप गंभीर झाल्यावर आम्ही समजवायचा प्रयत्न केला.... पण भांडणाचं मूळच काही कळेना....मग एके दिवशी तिचा फोन आला...बोलायचंय तुझ्याशी म्हटली....आफीसला आली...खूप मोकळेपणानं ती सगळं सांगत होती....तिने सांगितलेली माहिती मी क्रॉसचेक केली आणि धक्काच बसला....एरवी आमच्याशी छान गप्पा करणारा हा मित्र पोर्न फिल्म पहायचा..कुणी काय पहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न...ज्याची त्याची आवड....त्याच्या बायकोनंही त्याला आक्षेप घेतला नाही...पण, जेव्हा पोर्न क्लिप्समधील विकृत शारीरिक क्रिया करायला तो तिला सक्ती करू लागला तेव्हा खटका उडाला आणि भांडणं वाढली....मी त्याला समजावून सांगितलं ...अगदी साधेपणाने, सोपेपणाने .....माणसाचा अपवादवगळता अन्य कोणत्याही प्राणी पक्ष्यांमध्ये Anal Sex वा Oral Sex नाही...तसं कधी कुठं दिसलंही नाही....आणि तसं कुठं कधी वाचनातही आलं नाही.....मुळात हे प्रकार पूर्णत: अनैसर्गिक आहेत... एखाद्या जोडप्याला या क्रिया आवडत असतीलही...तो त्यांच्या मर्जीचा भाग आहे...त्याची सक्ती पूर्णत: चुकीची आहे...
               काहीजणांच्या बाबतीत सेक्सच्या वेळा, सेक्सची जागा, सेक्सचे कपडेही ठरलेले असतात..विशिष्ठ मूडमध्ये सेक्स करणे पसंत करतात...काहीजणांना स्नानशुचिर्भूत झाल्यावर को-या अंगाने सेक्स करणे पसंत असते; तर काही स्त्रियांना दमलेल्या पतीचा कळकटलेला चेहरा सेक्सी वाटतो...मर्दानगीची व्याख्याही प्रदेशानुसार बदलत असते...बाईलवेडा किंवा बोलीभाषेत रंडीबाजी करणारा पुरुष काही भागात मर्द समजला जातो....अधिक भाकरी चुरून खाणारा पुरुष काही ठिकाणी मर्द समजला जातो...तर पिळदार मिशा असणारा पुरुष काही प्रदेशांत मर्द समजला जातो...काही नवविवाहित तरूण रात्री कित्येकवेळा संग केला अशा फुशारक्या मारत आपली 'मर्दानगी' सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात..त्यातूनच सेक्सबाबतचे गैरसमज अधिक पसरत जातात....डॉ. विठ्ठल प्रभू, डॉ. जीवन व मीना मोहाडीकर यांच्यापासून ते अलिकडच्या काळातील डॉ. शशांक सामक यांच्यापर्यंत कितीतरी सेक्सॉलॉजिस्ट एकट्‌य़ा पुण्यात आहेत. मनोविकार तज्ज्ञांच्या मदतीला ज्याप्रमाणे काऊन्सिलर असतात, तसे अनेक सेक्स काऊन्सिलरही असतात....गरजुंनी आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घ्यायला हवी. त्याचबरोबर अनेक जगद्‌‌विख्यात तज्ज्ञांच्या पुस्तकांची मराठी भाषांतरेही उपलब्ध आहेत....इंटरनेटवर हवे ते साहित्य उपलब्ध होऊ शकते...मग असे असताना 'त्या चार योनींची गोष्ट' सारख्या नाटकांमधून काय साध्य होते....
चुंबन घेतल्याने स्त्री प्रेग्नंट राहते, स्त्रीची कामवासना पुरुषाच्या इंद्रियाच्या लांबीवर अवलंबून असते यासारखे कित्येक वर्षांपूर्वी असलेले समज हे वस्तुत: गैरसमज आहेत हे त्या नाटकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रबोधन, मनोरंजन की निव्वळ चावटपणा करायचा? या गोंधळात दिग्दर्शक सापडलेला दिसतो... सेक्स कसा करावा? त्याच्या पाय-या काय याचे अशास्त्रीय निकष सांगतानाच सेक्स करताना स्त्रियांच्या कथित चित्कारांचे पोर्नोग्राफीतील आवाज ऐकवून असे आवाज आले, तरच महिला पूर्णत: तृप्त झाल्या आहेत असे समजावे असे सांगत या नाटकाने नव्या गैरसमजांना जन्म दिला आहे. वास्तविक सेक्स ही खूप खासगी व वैयक्तिक बाब आहे.. जाहीर प्रदर्शन करण्याची ती गोष्ट नाही..हां..त्याबाबत काही शंका अथवा अडचणी असल्यास त्याबाबत चर्चा करण्यात (तज्ज्ञांशी) काहीच हरकत नाही. या नाटकामध्ये आक्षेपार्ह व अशास्त्रीय अनेक वाक्ये आहेत.... मुळात, सेक्स,लेस्बियन या संज्ञांबाबत दिग्दर्शकाचाच गोंधळ आहे...मग कशासाठी ही उठाठेव करायची?? आणि आणखी एक म्हणजे....जशी चार महिलांच्या लैंगिक असमाधानाची अथवा लैंगिक समाधानाची बाब सांगण्याच्या निमित्ताने किंवा उद्देशाने या नाटकाची निर्मिती केली असेल, तर ते पूर्णत: चुकीचे व फसवे आहे...यात आणखी एक मुद्दा म्हणजे पुरुषांच्याही लैंगिक भावनांचे दमन होत असते..पण त्याचे प्रतिबिंब कधी साहित्य, सिनेमा वा नाटकामध्ये पडलेले दिसले नाही.....लैंगिक समस्या किंवा लैंगिक गैरसमज हे फक्त स्त्रियांबाबतच आहे हाच मुळी मोठा गैरसमज आहे...मजुरी काम करणा-या पुरुषापासून ते कार्पोरेट सेक्टरमधील पुरुषांपर्यंत प्रत्येक पुरुषाच्या लैंगिक भावना, तृप्ती आणि प्रकार निरनिराळे आहेत....सध्याच्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे, फास्ट फूडमुळे व सकस अन्नाच्या अभावामुळे पूर्वी पन्नाशीमध्ये येणारी शिथीलता पस्तिशीतील युवकामध्येही दिसू लागली आहे. त्यामुळे सैरभैर झालेले हे युवक व्यसनांच्या आहारी जातात. सर्वसाधारणत: पस्तिशीपर्यंत कोणताही पुरुष विशिष्ठ भावनांनी उद्दिपीत होत असतो....त्यापुढे मात्र आकर्षण असलेल्या अथवा प्रेम असलेल्या स्त्रिच्या सहवासातच त्याची वासना जागृत होते असे शास्त्र सांगते....त्यामुळे या युवकांनी लगेच निराश होण्याचे कारण नसते...
मुळात पुरुषाची तृप्ती कितीवेळा सेक्स करतो यात नसते....सेक्स हा कधीच शारीरिक ताकदीवर अवलंबून नसतो; तर ही एक सहजसुंदर कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया आहे....पुरुषाने ताकदीचा वापर करण्यापेक्षा  स्पर्शातील जादू कमवायला हवी...केवळ हस्तस्पर्शही स्त्रियांना हवाहवासा वाटला पाहिजे....त्यासाठी पौष्टीक अन्न, थोडाफार व्यायाम आणि योगसाधना महत्वाची ठरते...आपल्या शरीराभोवतालचे तेजोवलय (Aura) अधिक स्वच्छ व तेजस्वी राखला पाहिजे....प्रेम हाच समाधानी कामजीवनाचा पाया असतो....नजर व नियत स्वच्छ ठेवून आत्मविश्वासाने तुम्ही जीवन जगत असाल आणि कोणताही किंतू मनात न आणता  सर्वांगसुंदर अशा सेक्सला तुम्ही सामोरे जात असाल, तर नक्कीच ही  बोल्ड  भावना ब्युटीफूल असल्याचे सहजपणे जाणवेल..

No comments:

Post a Comment