हिजड्यांची जत्रा
- - - - - - - -
डोंबवलीहून ठाण्याला चाललो होतो...फास्ट ट्रेन नव्हती....रूटीनचा टाईम टळलेला..त्यामुळं खूप गर्दी नव्हती. . . फर्स्टक्लासचा डबा .. नानाविध नमुन्याची माणसं न्याहाळत बसलो होतो....मधल्या कुठल्यातरी स्टेशनवर त्या दोघी डब्यात चढल्या...पुरुषी अंगकाठी, चेह-याला फासलेली पावडर, लिपस्टीक रंगवलेले ओठ...काजळाने माखलेले डोळे...भडक साड्या, हातात बांगड्या... वैशिष्ठ्यपूर्ण टाळी वाजवत पैसे मागत होते.....पूर्वी त्यांच्याबद्दल विचित्र भावना होती ...मग एकदा शुक्रवार पोलीस चौकीत काहीजणांशी ओळख झालेली....हळू हळू त्यांचं जिणं समजत गेलं...लोकांचे तुच्छतापूर्ण, तिरस्कारपूर्ण नजरा टाळत त्यांचं जगणं चाललेलं.......मागे एकदा रामा नायक आणि शामा नायक अशा त्यांच्या दोन गुरूंशी दीर्घ गप्पा झालेल्या...लक्ष्मी त्रिपाठीशी बोलताना निराळं जग पुढं आलेलं...त्यामुळं भीड चेपलेली....त्यांच्या ब-याचशा गोष्टी चांगल्या माहिती झाल्यात. ..पण तरीही दर खेपेला असं कुणी जवळ आलं की गप्पा करतोच मी.....
माझ्याजवळ येऊन एकीने टाळी वाजवली आणि हात पुढे केला पैशांसाठी...हसलो..दहाची नोट दिली...तिने शेजारच्या तरुणीच्या डोक्यावर हात ठेवला...माझ्याही...अच्छा होगा दोनोंका ....तिच्याकडे पाहून हसलो....ती थबकली . . माझ्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागली...वो मेरे साथ नही है, शेजारच्या तरुणीकडं नजर खुणावत मी म्हणालो......फिर क्या हुवा ?...अच्छाही होगा...पोरगी लाजली...तिच्याही लक्षात आलं...ती पुढे निघाली. . ..थोड्यावेळाने दारात उभ्या राहील्या दोघी...बहुदा सारा डबा फिरून आल्या असाव्यात...भसाड्या आवाजात गप्पा चालल्या होत्या त्यांच्या...खाली साड्या कशाही असल्या तरी डोईवर पदरासम असलेली ओढणी कसोशिने सांभाळत होत्या....मी उठलो. . .तिथं गेलो....त्यांच्याकडं पाहून हसलो.....निरनिराळ्या विषयांवर त्यांच्या गप्पा सुरू होत्या.....मी बोललो त्यांच्याशी......आपमेंसे कई लोगोंको जानता हूं पूना में....लक्ष्मी हमारी दोस्त है....लक्ष्मी त्रिपाठीचा संदर्भ पटकन लक्षात आला त्यांच्या . . .जरा आश्वस्त झाल्या... ..हळू हळू थोडंफार बोलू लागल्या...फार काही जाणून घ्यायची इच्छा नव्हतीच तशी माझी... नुकतीच सुप्रीम कोर्टाने तृतीय पंथियांची स्वतंत्र ओळख मान्य केलीये. . . मी विचारलं तसं...फिर क्या होगा?? वो तो होना ही था....आज नही तो कल....हम अलग है... तो अलग है...उसमे झूठ् क्या है...लेकीन जाती जिंदगी में क्या फर्क् पडेगा?? हां हमारी लक्ष्मी बहेन और कुछ लोग बहोत लडे थे कोरट मे ..जीत गये..अच्छा हुवा....बबली आणि किरणची रिआक्शन एवढीच होती....
त्यांची नावं तशी कॉमन म्हणजे स्त्री आणि पुरुष नेमकं काय ही समजणारी असतात..बॉबी, किरण, बब्बू वगैरे....भेंडीबजारवाला, बुलाकवाला, लालनवाला, लखनौवाला, पूनावाला, दिल्लीवाला, हादीर इब्राहिमवाला ही त्यांच्यातील सात प्रमुख घराणी . . याशिवाय रायघर, गंगारामी, जमालो, सौतन, नागिण, दिल्लीवाली, अशी एकंदर वीसएक घराणी आहेत...देशात सगळीकडेच त्यांच्या वस्त्या....पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकता आदी महानगरांमध्ये मोठ्या वसाहती.....मुंबईत मुंब्रा, भायखळा, कलीना इथं यांची बरीच घरं....बबली सांगत होती....आमची तीन लग्न होतात...एक देवासोबत, दुसरं गुरूसोबत आणि तिसरं तुमच्यासारख्या माणसासोबत...लग्नाचा विधी रात्रभर चालतो...घराण्यानुसार रितीरिवाज निरनिराळे....गुरूला कमालीचा मान....त्याची आज्ञा फुलासारखी झेलली जाते...गुरूही चेल्यांची खूप काळजी घेतो...ही मंडळी सर्वधर्मिय....भोजराजदेवी ही अनेकांची कुलदेवता....मरीअम्मालाही खूप पूजतात...नांदेडमधल्या माळेगावचा खंडोबा हा ही अनेकांचं दैवत....दरवर्षी फेब्रुवारीत देशभरातील तृतीयपंथियांचं संमेलन भरतं...प्रत्येक वर्षी ठिकाण निरनिराळं. ...खूप विचित्र आणि लिंग छेदनासारख्या काही अमानुष प्रथाही आहेत.....पण त्यापेक्षा त्यांच्याबाबत गैरसमजच जास्त....कारण साहजिक आहे...नेहमीच्या समाजापासून ही मंडळी फटकून राहतात...आपण तरी कुठं स्विकारतो मनापासून त्यांना...असेल त्याचं राहणीमान भडक....पण राहतील की ते ही नीट मूळ प्रवाहात आले तर ...आणि आपण स्त्री किंवा पुरुष आहे म्हणून काय असे वेगळे तीर मारतो.....पोरं जन्माला घालण्यापलीकडे....ते मुलं जन्माला घालू शकत नाही आणि जन्मही देऊ शकत नाहीत...एवढाच शारीरिक फरक....पण..ही मंडळी किमानपक्षी सच्ची असतात....तृतीयपंथिय असं सर्वसाधारणपणे त्यांना म्हटलं जातं...हिजडा हा त्यांच्यासाठी वापरला जाणारा कॉमन शब्द. ...त्यांच्या जिव्हारी लागणारा....त्यांची हेटाळणी करणारा...त्यांना तुच्छ लेखणारा...एकदा बोलतं झाल्यावर बबली काय काय माहिती सांगत होती...किरण शांत ..लक्षपूर्वक ऐकत होती . . .
बबली, किरणशी कधी कुणी रेल्वेच्या डब्यात फारशा गप्पा केल्या नसाव्यात....त्यांना नवल वाटलं आणि बहुदा जरा हायसंही....कोर्टानं त्यांना स्वतंत्र दर्जा दिलाय त्याबद्दलही ती बोलली..नेमका निर्णय काय? हे त्यांनाही कळलं नसावं बहुदा...पण काहीतरी ठोस निर्णय झालंय एवढंच त्यांना समजलं होतं....तुम्हाला आता ब-याच ठिकाणी सवलती मिळतील, आरक्षणं मिळतील आणि ती ही हक्काने ...असं म्हटल्यावर चेहरा फुलला त्यांचा...पण मग तृतीयपंथिय किंवा हिजडा असण्याचे नेमके निकष काय? मुद्दयालाच हात घातला मी....हिजडा नेमका कुणाला म्हणायचं? देह पुरुषाचा असून भावना उलट असणा-यांना की नेमकं काय? शारीरिकदृष्ट्य़ा न्यूनत्व असलेल्यांना? की मग नेमकं कुणाला ? ? ? या प्रश्नासरशी आणि बहुदा त्यातील हिजडा या शब्दामुळं इतकावेळ गप्प असलेली किरण एकदम उसळून बोलली....हम में कुछ भी कमी नही.....ना तन में...ना मन में...हम जों हैं..बस ऐसे हैं...उपरवालेने हमको ऐसा बनाया है...अल्लावाले बंदे हैं हम....और अगर हममें कुछ कम है इसलिए हम हिजडे हैं, तो वो बिल्कूल गलत है....कितने लोगोंमे कुछ ना कुछ कम है...खास करके नियत सफ नही होती...नजर अच्छी नही होती....काम अच्छे नही होते...बात अच्छी नही होती.... कितने इन्सान बोलते एक और बर्ताव अलग करते है.. कितने लोग इन्सानियत को लज्जा लानेवाली बाते करते है...गंदे काम करते है.....फिर उनको मन के हिजडे बोलना चाहिए....मी गारच झालो.....बबलीच्या लक्षात आलं....तिला वाईट वाटल्याचं लगेच चेह-यावरून समजलं...भैय्या, तुमको नही बोली वो .... जरा गुस्सेवाली है वो.....जाने दो....किरण शांतच होती....ती बोलल्यानं मी दुखावलो असं वाटल्यानं बबलीला राहून राहून वाईट वाटत होतं....मला वाईट वाटायचं कारणच नव्हतं......किरणने मानसिक तृतीयपंथी या नव्या जमातीचा किडा माझ्या मेंदूत सोडला होता.....पुढे थोड्याफार गप्पा झाल्या....त्यात फारसं लक्षच् लागलं नाही माझं....माझ्याभोवती स्त्री-पुरुषांच्या देहात वावरणा-या कितीतरीजणांचे चेहरे नजरेसमोर तरळून गेले....मानसिक हिजड्यांची जत्राच जणु माझ्या नजरेसमोर भरली होती . . . .

No comments:
Post a Comment