हौस जोड्यांची
- - - - - - - - -...
पुणेरी जोडे, पुणेरी टांगा आणि पुणेरी पगडी जगात प्रसिध्द आहेत..नंतरच्या काळात पुणे सायकलींचं शहर बनल..पेन्शनरांच शहर अन विद्येच माहेघर बनलं..विकासाच्या भयचकित वेगानं काळाच्या ओघात या ओळखी कधी पुसट होत गेल्या हे समजलंच नाही.. टांगे गेले...पगड्या गेल्या..जोडे गेले..इतर खाणाखुणाही नामशेष झाल्यात...
पुणेरी पगडी केवळ समारंभामध्ये मिरवण्याची फेशन पुरती दिसते...ती नेमाने कुणी वापरताना दिसत नाही.. टांग्यात कैक वेळा बसलोय..पण चटाचटा वाजणा-या लालचुटूक पुणेरी जोड्याचं आकर्षण टिकून आहे. तो ही सध्या कुणी वापरताना दिसत नाही..खूप ठिकाणी चौकशी केली, पण जोडा बांधून देणारे लोक काही भेटले नाहीत. हल्ली काही दुकानांमध्ये पुणेरी जोड्याच्या नावाखाली भलतंच नाजूक पायताण मिळत..
आमच्या सोसायटीत जगताप राहतात..पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ..बहुदा एसटीत नोकरीला असावेत..त्यांचे वडील यायचे अधूनमधून पुण्यात..खेड्यात राहिलेल्या त्या आजोबांना काही हे शहराचं वातावरण मानवायचं नाही...करमायचं नाही ..दिवसभर टाकीजवळच्या कट्ट्यावर बसून असायचे..सत्तरी ओलांडलेले हे आजोबा अंगकाठीने मजबूत..धोतर, अंगरखा, डोईला फेटा, हातात जाडजूड काठी आणि पायात मजबूत जोडा...माझ लक्ष कायम त्यांच्यां जोड्याकड जायचं ..चांगलच मजबूत प्रकरण होत ते ...अस्सल चामड्याचे अन भलतेच दणकट ...नुस्त पाहिलं तरी लक्षात यायचं ...या जोड्याने कैक उन्हाळे पावसाळे पाहिलेत ते..मग मी त्यांच्याशी गप्पा मारू लागलो....हळूच जोड्यांचा विषय छेडू लागलो...त्यांनी ते जोडे गावाकड बनवून घेतले होते..त्या जोड्यांची घडण पाहता पुण्यात किंवा आसपास कुठे तसे जोडे बनवून मिळणार नाहीत हे लक्षात आलं..मग एकदा गप्पांमधून हळूच त्यांच्याकडे जोड्यांची मागणी केली....बदल्यात हवे ते नवेकोरे पायताण द्यायची तयारी दर्शवली....पण आजोबा काही बधले नाही....खूप वेळा विनंती केली..आर्जवे केली..पण ते जोडे द्यायला काही तयार झाले नाहीत...आमचा बोरीबेलचा चांभार बनवून देतो हे जोडे.....तू त्यांच्याकडून बांधून घे म्हणायचे.....बराच प्रयत्न करूनही ते बधत नाही म्हटल्यावर मी नाद सोडून दिला..पण डोक्यातून काही तो जोडा जाईना....
सहा-सात वर्षापूर्वी एकदा शिवाजीराव पाटलांना म्हणजे माझ्या सास-यांना भेटायला गेलो होतो माळशिरसला..परताना सोलापूर रोडने आलो...दौंडजवळ ...वाटेत खडकी पिंपरी गाव लागलं...माझी एक मैत्रीण होती त्या गावाची.. स्थायिक पुण्यातच आहे...अतीव प्रेमाने तेव्हा म्हणाली होती, माझी शेती तुझ्या नावावर..ती शेती त्या गावात होती...सहज आठवण आली तिची... माझ्या नावावर न झालेली ती शेती पाहून घेतली...पुढे निघालो...वाटेत बोरीबेल असा गावाचा उजवा दिशेला बाण असलेला फलक दिसला...लक्षात आलं .. जगताप आजोबा म्हणतात ते हेच बोरीबेल...मग विचार केला जाऊनच येऊ तिथं..चौकशी केली ...तिथून जेमतेम पन्नास साठ किलोमीटरवरच होत बोरीबेल..मग गाडी तिकडे वळवली...उन्हाळ्याचे दिवस होते.. सूर्य तळपत होता..गाडीला एसी नव्हता...सारा रस्ता कच्चा, खडबडीत.. धूळ फुफाटा खूप होता...पण आता हौसच भागवायाची म्हटल्यावर निघालो ..तासाभरात पोचीन असं वाटलं होत ...पण कसचं काय दीड तास उलटून गेल्यावर एकदाचं ते बोरीबेल आलं ..समोर रेल्वेचा फलाट दिसत होता...पण गर्दी,गोंगाट नव्हता..गाव छोटसंच..फारशी काही समृद्धी दिसली नाही...साधी विटांची मातीची घर..पत्र्याच्या शेडमध्ये काही दुकानं ...कासाराची..स्टेशनरीची...तिथं चौकशी केली..ते म्हटले गावात चांभार एकच...पण आता ते थकलेत...पायताण बांधून देत नाहीत...तयार चपला, बूट विकतात...मग त्या दुकानाकड मोर्चा वळवला..पत्र्याच्या दहा बाय बाराच्या जागेत दुकान थाटलेल...वहाणा दुरुस्तीची हत्यार एका बाजूला होती..एका बाजूला चप्पला बूट विकायला ठेवले होते..एक मुलगा बसला होता दुकानात...त्याला बळेच मी जगतापांची ओळख सांगितली...खूप लांबून प्रवास करून आलोय आजोबांना भेटायला सांगीतलं ..त्याने सांगावा धाडला ...घर बहुदा मागंच असावं...पाच दहा मिनिटांत सत्तरी ओलांडलेले आजोबा आले.. खूपच कृश अंगकाठी होती..अंगात बंडी ..अन साधा पायजमा... आयुष्यभर काबाडकष्ट केल्याचं त्यांच्या चर्येवरून सहज जाणवतं होत ..त्यांना सांगितल..खूप लांबून आलोय...मला जोडा बांधून घ्यायचाय..जगातापांनी पाठवलय...बाबांनी नकारार्थी मान हलवली...म्हटले, एकतर मला आता काम होत नाही..आणि तुम्ही म्हणता तसल्या जोड्याला खूप मेहनत लागते ..त्याचं सामानही मिळत नाही...जरा त्यांच्याशी गप्पा केल्या...तारीफ केली....मग बाबा खुलले..एकवार माझ्या पायावर नजर टाकून अंदाजानेच त्यांनी वर्तमानपत्रावर जोड्यांची आखणी करून त्यावर पाय ठेवायला सांगितला...कसलंही माप न घेता त्यांनी केवळ नजरेनच अचूक मापाची प्रतिकृती केली होती...अखेर नाही होय म्हणताना शेवटी ते जोडा बांधून द्यायला तयार झाले...मी सर्व पैसे बहुदा चारपाचशे रुपये त्यांना आगावू देऊन टाकले...जोडा दणकट हवा...जगताप आजोबांसारखा हवा हे पुन्हा पुन्हा आवर्जून सांगीतलं ..त्यांचा मुलगा एसटीत कंडक्टर...त्याचा मोबाईल नंबर घेतला...जोडा तयार झाला की मुलगा कळवेळ असं त्यांनी सांगितलं....खूप आनंदाने मी बाहेर पडलो...खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली होती...
पुण्याला परतलो खरा...पण जोडा कधी तयार होईल याची उत्सुकता लागून राहिली होती..अधेमध्ये मी त्यांच्या मुलाला फोन केला...पण जोडा तयार झाला नव्हता... मग पंधरवड्याने त्यांच्या मुलाचा फोन आला की जोडा तयार झालाय. .. खुष झालो ...पण आता जोडा तिथून आणायचा कसा? हा प्रश्न पडला..तेवढ्यासाठी पुन्हा शंभर किलोमीटर जाणं जीवावर आलं होतं.. मग दौंडच्या मित्राला फोन केला...त्याने एक माणूस बोरीबेलला पाठवला..तो जोडा घेउन दौंडमध्ये आला...मग दौंडच्या मित्राने तो जोडा एका मित्रामार्फत आमच्या कात्रजच्या ऑफिसला पाठवला...तिथून एका सहका-याने तो पुण्याच्या ऑफिसला आणला... ..नेमका तेव्हा मी सुट्टीवर होतो....ऑफिसमधून कुणी तो जोडा पळवू नये म्हणून त्या दिवशी अनंता या ऑफीस बॉयने तो घरी नेला...दुस-या दिवशी मी ऑफिसला गेलो...तर अनंताची सुट्टी...त्याचा फोनही लागेना...कधी एकदा जोड हातात येतोय अस वाटत होतं.. आणि इथ तर जणू लपाछपीचा खेळ सुरू झालेला...मला चैन पडेना.. सुटीवर गेलेला अनंता थेट आठवडाभरानंच उगवला...बर येतानाही त्याने जोडा काही आणला नव्हता...गावाहून एसटीने स्वारगेटला उतरून थेट ऑफीसलाच आलेला..मग आम्ही त्याच्या घरी जायला निघालो..तितक्यात मोठे साहेब येणार असल्याची वर्दी मिळाली...झकत आम्हाला ऑफीसलाच थांबायला लागलं ...दुपारनंतर कामाची धावपळ सुरू झाली..थेट रात्री एकदाचं काम उरकल..मग रात्री उशीरा अनंताला घेऊन त्याचं घर गाठलं ..वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून साध्या प्लास्टीकच्या पातळ कॅरीबेगमधलं जोड्याच पार्सल त्याने चटकन हातात दिलं ...ते वजनदार पार्सल पाहून जीव भांड्यात पडला...तिथंच उघडून पाहिलं..चांगला जाडजूड, दणकट जोडा बनवून मिळाला होता.. अगदी जगताप आजोबांच्या जोड़यासारखाच .पुणेरी जोड्यांची सारी वैशिष्ठ्ये त्यात होती...टोकाची मोरनी घट्ट चिकटवली होती...रंग लाल चुटूक होता...मागच्या बाजूचा गोल विशिष्ट पद्धतीने घट्ट घडी केला होता...जोड्यावर पितळी गोल आणि फुलं ठोकली होती..सोनेरी जर गुम्फली होती..सोल तर डबल टिबल जाड...त्यातही चालताना घसरू नये यासाठी तळाचा भाग विशिष्ठ पद्धतीने तयार केलेला... .कुठलाही जोडा कुठ्ठ्ल्याही पायात घालता यावा यासाठ्ठीची अनोखी घडण...एका कसबी कारागिराने कसल्याही यंत्राचा वापर न करता फक्त हातांनी आणि एकाही खिळ्याविना बनवलेला हा जोडा जबरीच होता ...खुश झालो....तिथून घरी परतलो...घरची मंडळी झोपली होती...त्यांना झोपेतून उठवून जोड दाखवला...
हा जोडा मध्यंतरी मी नेमाने घालायचो ..पण भलताच जाडजूड अन जड वजनाचा असल्याने पायाला पेलवेना..पण हुक्की आली की अधूनमधून घालतोच अजूनही..सगळीकडे मिरवला त्याला ...मित्रांना, नातलागांना हौसेन दाखवला.. एक आहे दर्जा सर्वोत्कृष्ट असला तरी केवळ हातांनी बनवला असल्याने या जोड्याचे फिनिशिंग बाजारात मिळणा-या पादत्रांणांइतके चकाचक नसेलही कदाचित..पण त्याची एकंदर घडण पाहता तो बनवताना तोळामासा प्रकृती असलेल्या त्या म्हातारबाबांना किती कष्ट पडले असतील हे सहज जाणवतं..वापरात नसला की हा जोडा मस्तपैकी पॅक करून व्यवस्थित ठेवलेला असतो....मध्यंतरी घराचं रंगाम करताना काळी प्लास्टीकची वजनदार पिशवी माळ्यावर मिळाली...काय असेल त्यात याचा नीलमला अंदाज आला नाही...तिने माझ्याकडं दिली...एका मिनिटात मी ओळखला हा तर आपला जोडा...त्यातून काढून पाहिला...होता तसाच आहे अजून मजबूत...तो पुन्हा एकदा न्याहाळताना या जोड्याची हौस कशी निर्माण झाली ?...तो बनवला कसा .?..अन बोरीबेलहून पुण्यात कसा आणला ? याचं चित्र डोळ्यासमोर उभ राहीलं ....मला खात्री आहे...असा हॅण्डमेड मजबूत जोडा फारसा कुणाकड नसावा....माझ्याकड तो आहे याचा आनंद आहे...अभिमान आहे...तो मिळवण्यासाठी केलेली यातायात आठवली की प्रत्येक गोष्टीचं मूल्य केवळ पैशांत होत नाही...हे प्रकर्षानं लक्षात येतं....

No comments:
Post a Comment