स्वीटहार्ट ऽऽऽऽ
- - - - - - -
दसरा माझ्यासाठी खास असतो..लहानपणी आणि कॉलेज डेजमध्ये सोनं वाटण्याचा आनंद काही औरच असायचा..या सणाच्या दिवशी स्नानशूचिर्भूत होऊन, नवे कपडे लेवून आम्ही पोरं एकत्र जमायचो..चाळीतल्या शस्त्रांचं पूजन करायचो..दुपारी घरी गोडधोड असायचंच..त्यादिवशी दुपारनंतरही गप्पांचा कट्टा सुरू...संध्याकाळी चाळीचाळीत फिरून आम्ही सोनं वाटायचो...सोन्याला कुणी नाही म्हणत नाही म्हणून 'प्रवेश निषिद्ध्' असलेल्या घरात जाऊन आवर्जून सोनं द्यायची ही सुवर्णसंधीच असायची...कॉलेजला असताना सुट्टी असली, तरी आम्ही सोनं देण्यासाठी मित्र-मैत्रिणी आवर्जून कट्ट्यावर जमायचो..कॉलेजच्या एरियात फिरायचो..धमाल गप्पा करायचो..' मुक्ता' मध्ये कॉफी प्यायचो..दिवस कसा मस्त जायचा...
कॉलेजला असतानाच 'लोकसत्ता' मध्ये जॉईन झालेलो..पण दस-याचा नेम कधी मोडला नाही...दोस्तांना भेटत राहणे आणि सोनं देणे यातला आनंद कधी जाऊ दिला नाही..कॉलनीतले मित्र, कॉलेजचे दोस्त, मंडईतला मित्र परिवार असं कुठे ना कुठे..पण दसरा साजरा होतोच...नोकरीत असताना काही वादग्रस्त घडामोडींनंतर 2001 मधे आमचे संपादक बदलले...आपण नवीन काय तरी करतोय हे दाखवण्यासाठी नवा माणूस काहीतरी वेगळे प्रयोग करतोच...तसं पेपरमध्ये काही नवीन सदरं सुरू झाली..काही चालू सदरं बंद केली..माणसांच्या जबाबदा-या बदलल्या..आणि एका प्रसन्न सकाळी मला त्यांचं एका ओळीचं पत्र मिळालं..आपली बदली सोलापूर आवृत्तीसाठी उपसंपादक म्हणून करण्यात आली आहे..पूर्वीच्या साहेबांच्या मर्जीतील असल्याच्या भावनेने त्यांनी हा बडगा उगारला..आता इतके वर्षं रिपोर्टींग केल्यानंतर डेस्कवर काम जमेल का? या भावनेनं हैराण झालो..पण अरूण खोरें असल्यानं निम्म टेंशन कमी झालं..डेस्कवर गेल्यानं रिपोर्टींगच्या सवलतीही गेल्या..मीन्स आफीसचा मोबाईल आणि हिरो होंडा जमा करायला लागली..,माझी स्कूटर होतीच...पण नवीन बाईकच घ्यायची हे ठरवलं...तशा मी होंडा स्लीकपासून बहुतेक गाड्या वापरलेल्या...मग शॉर्ट लिस्ट करत यामाह -350 किंवा बुलेट या दोन गाड्यांपर्यंत आलो..यामाह भारीच होती...आणि माझ्या फास्ट स्पीडसाठी ती गाडी बरी पडली असती..तशी बुलेटचीही आवड होतीच..आवड म्हणण्यापेक्षा एक तरी बुलेट घरात असावी अशी माझी आणि भय्याची हौस होती..मग म्हटलं बुलेटच घ्यावी...कॅम्पात एकबोटेंचं शो रूम होतं बुलेटचं..'इलेक्ट्रा' हे नवं मॉडेल काढलं होतं तेव्हा एनफिल्डनं... रेड आणि ब्ल्यू कलरची गाडी जाहीरातीत तरी मस्तच दिसत होती...मी आणि विक्रम शो रूमला गेलो..तिथं मॉडेल्स पाहिली.. ती गाडी चांगली होती..पण शॉर्क अॅब्सॉर्बर्सला कव्हर नसल्यानं भल्यामोठ्या हेडलॅंपखाली ते पातळ शॉक अॅब्सॉर्बर्स बरोबर दिसत नव्हते..तिथं एन्फिल्डचं सदा पॉप्युलर 'स्टॅन्डर्ड' मॉडेल उभं होतं...काळाभोर रंग, रूबाबदार हॅंडल, दणकट पोलादी बॉडी आणि चकचकीत स्टीलमुळे गाडी चटकन नजरेत भरली..घ्यायचंही लगेच निश्चित केलं. विक्रमने बॅंकेतून पैसे काढून आणले आणि गाडी बुकही केली..आरटीओमध्ये गेलो...तेव्हा चॉईस नंबरची स्कीम नुकतीच सुरू झालेली...मला बुलेटसाठी 9 हा नंबर हवा होता....लकी नंबर माझा...सकाळी मी तो घेतला...पण दुपारनंतर पुन्हा विचार बदलला..म्हटलं मला 9999 हा नंबर द्या...म्हटले नाही देता येणार...का? तर सीएमच्या गाड्यांचे नंबर आहेत...मग दीपक पायगुडे आणि मी गेलो प्रत्यक्ष..म्हटलं .नंबर देऊ नका...पण तसं लेखी द्या...मग अधिकारी गडबडले...नंबर मिळाला...दस-याच्या मुहुर्ताला सोन्यासारखी ' बुलेट '
दारी आली....
बुलेट पाहून हरखलो होतो..पण, 250 किलोचं हे धूड चालवताना दमछाक होऊ लागली...एवढ्या वजनाची बाईक चालवायची सवयच नव्हती कधी..त्यात गीअर्स कमालीचे टाईट, प्रत्येक गीअरनंतर न्यूट्रल गीअर तापदायक वाटत होता.....एकतर गीअर्स उजव्या पायात आणि ब्रेक डाव्या पायात याची सवयच होता होत नव्हती. ब्रेक म्हणून गीअर दाबला जायचा आणि घोटाळा व्हायचा....गीअर्सची रचनाही उलट.. किक भलतीच टाईट..त्यामुळं गाडी चालू करायलाच वैताग यायचा..पाय दुखून यायचे...गाडी स्टॅंडवर घेतानाही दमछाक होऊ लागली ...वैतागून गेलो...चौथ्या दिवशी तापच आला...पण एकदा गाडी खरेदी केल्यावर काय करायचं...?? पण, तशीच गाडी रेमटायला लागलो...त्या रविवारी गणेशपेठ मासळी बाजारात गेलो..बाळासाहेब परदेशी भेटले...मच्छी बाजारातील मोठे व्यापारी.माझ्या जुन्या परिचयाचे ..ते ही बुलेटचे शौकीन..त्यांना बुलेट दाखवली...त्यांनी किक मारायची आणि गाडी मिडल स्टॅंडवर घ्यायची ट्रीक शिकवली.. तेव्हापासून आजतागायात बुलेट चालवण्यात आणि स्टॅंडवर घेण्यात कधी प्रॉब्लेम आला नाही.. .
बुलेट अक्षरश: एकजीव झाली माझ्याशी...गेली तेरा वर्षे ही गाडी वापरतोय ..... दिवसा..रात्री..उन्हात, पावसात, थंडीत....कधीही...कशीही...पण या तेरा वर्षांत ना मीकधी कुणाला धडकलो, ना मला कोणी धडकलं...पूर्वी भन्नाट वेगाने गाडी चालवण्याची माझी सवय बुलेटमुळे आपोआप कमी झाली...संथपणे, निवांत इकडेतिकडे पाहत, गाडीच्या अदभूत फायरींगचा आनंद घेत दिमाखात दौडत जाणे ही बुलेटची स्टाईल..ती अंगवळणी पडली..शांतपणे गाडी चालवण्यानं मनही शांत राहतं..काय असेल ते असेल...पण बुलेटमुळं एक अनोखा आत्मविश्वास वाटतो..कुठंही कधीही जायची, घुसायची कधी भीती वाटत नाही...एकेकाळी कमालीच्या निर्जन असलेल्या मुळा रोडवरून मी केव्हाही रात्री-अपरात्री, पहाटे कधीही बुलेटवरून निर्धास्तपणे जायचो ..कधीच कुठला धोका झाला नाही..चोराचिलटांचं , लूटमारीचं भय कधी वाटलं नाही..त्यामुळेच कधी अपरात्री जायचं असेल तर मी बुलेटलाच प्राधान्य देतो...नीलम लहान होती, तेव्हापासून तिला शाळेत सोडायला जायचो बुलेटवरून...आणि तिच्या कॉलेजलाही बुलेटवरूनच जायचो आम्ही...आपल्या बुलेटकडे मैत्रिणी कौतुकानं पाहतात म्हटल्यावर तिलाही भारी वाटायचं..नीलमनं बुलेट चालवावं अशी माझी इच्छा होती...तिला शिकवलीही होती...पण तिचा कोवळा जीव आणि बुलेटचे कडक गीअर्स हे समिकरण काय जुळेना..पुढे
अकरावीतच तिने अॅक्टीव्हा पळवायला सुरूवात केली ..मग कसली बुलेट चालवणार ती....!!! पण एक आहे..मी अन्य कुठली बाईक घ्यायचा विचार केला तर मात्र ते नाही तिला चालणार.......हल्ली पुण्यात वाढलेल्या वाहनांच्या गर्दीत बुलेट चालवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय...350 सीसीचं हे धुड जेमतेम दुस-या गीअरवर चालवावं लागतंय...गाडीचीही घुसमट होते ना...नव्या जमान्याच्या बाईकही मस्त आल्यात......तेरा वर्षांपूर्वी 54 हजार रुपयांना बुलेट घेतली होती...मध्यंतरी तिची किंमत दिड लाखांवर गेली...आता तर हे मॉडेलच बंद झालंय...पण, शौकीनांकडून या मॉडेलला भलतीच मागणी आहे..मध्यंतरी भय्यानेही रॉयल एनफिल्ड घेतलीय..हल्ली फारशी वापरात नसलेली बुलेट नुसतीच ठेवून काय उपयोग?? या विचारानं मध्यंतरी मी ती विकून टाकायचा विचार करत होतो...पण, भय्याने आणि नीलमने कडाडून विरोध केला...
कधीकधी वाटतं या बुलेटलाही भावना असाव्यात...कधी कधी रुसल्यागत ती चालूच होत नाही...कारण काही नसतं...पण आता इतक्या वर्षांनंतर ते लक्षात आलंय..मग किका नाही मारायच्या... गप बसायचं..आणि जरावेळानं जरा तिच्यावर मायेनं हात फिरवून किक मारायची..झटक्यात चालू होणार..तिला वेळेवर तेलपाणी करणं महत्वाचं....मागे दोन्ही टायर्स बदलले ..ते सोडलं तर तेरा वर्षांच्या माझ्या बुलेटचा एक स्क्रू ही बदलला नाही....बदलावा लागला नाही...तेरा वर्षांचा काळच जणु थांबवून ठेवलाय तिनं...मध्यंतरी दिलीप शिंदे भेटले...म्हटले...चांगलीच ताणतोय रे बुलेट..... जरा सावकाश जात जा...म्हटलं ती डार्लींग आहे माझी...कधी धोका देणार नाही....मलाच नव्हे, तर मित्र आणि घरचेही निर्धास्त असतात...मी बुलेटवरून निघाल्यावर . .. खरंच.....बुलेटने एक विश्वास निर्माण केलाय...माझी ही स्वीटहार्ट आज तेरा वर्षांची झाली...लांबलचक रपेट मारून माझ्या या स्वीट हार्टचा वाढदिवस साजरा केला...एक सांगायचं राहिलं...माझ्या या डार्लिंगला मी पहिल्या दिवसापासून बंधनात कधी ठेवलं नाही...चोरांच्या भीती कधी वाटली नाही आणि ट्रॅफीक पोलीस पार्कींगमधून उचलण्याचीही कधी चिंता केली नाही त्यामुळं..बुलेटला आजतागायत कधी कुलूप लावलेलं नाही ..मिडल स्टॅंडला हॅंडल सरळ करूनच दिमाखात ती उभी असते....विश्वास आहे माझा..भरवसा आहे...माझ्या या स्वीटहार्टला ना ट्रॅफीक पोलीस उचलू शकणार...ना चोर पळवू शकणार...आणि बुलेटनं या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही....तडा जाणारही नाही...जुग जुग जियो मेरे डार्लींग....

No comments:
Post a Comment