अत्तराचे दिवस
- - - - - - - - -
बारा-पंधरा वर्षांपूर्वीची घटना. . .अरविंद इनामदार राज्याचे पोलीस महासंचालक झाले होते..त्यांची खास मुलाखत घ्यायला मुंबईला गेलो होतो...इनामदार साहेबांचा स्वभाव मनमोकळा....त्यांच्याशी परीचयही आधीपासूनच होता..त्यामुळं छान गप्पा रंगल्या..तिथून पुण्याला निघालो...मग..लक्षात आलं की आग्रीपाडा पोलीस स्टेशनला जायचंय..विजय साळसकर तेव्हा तिथं नेमणुकीस होते.. त्यांच्याशी फोन झाला होता...ते वाट पाहत थांबले होते...पण मलाच जास्त उशीर झाल्यानं ते निघाले होते...त्यांची पांढरी शुभ्र टाटा सिएरा पोलीस स्टेशनच्या दारातच आमच्या फियाटला क्रॉस झाली..मी चटकन गाडीतून उतरलो..ते त्यांच्या लक्षात आलं...गाडी थांबवून ते उतरले...एका नजरेतच मला ओळखलं ...दणकट पंजानं हस्तांदोलन केलं..थोडंफार बोलणं झालं...खूप आपुलकीनं विचारपूस केली त्यांनी...त्यांना अर्जंट कुठतरी जायचं होतं..कीप इन टच म्हणून ते निघाले...साळसकर साहेबांची ती माझी पहिली ओळख...
साळसकरांचं व्यक्तिमत्व उमदं..स्वभाव ऋजू..मितभाषी.. आमच्या अनेकदा भेटी झाल्या..कधी मुंबईत, कधी पुण्यात.....त्यांची पोस्टींग पुण्यात कधी नव्हती...त्यांचं नाव गाजलं ते मुंबईत.....ते ही अंडरवर्ल्ड ऐन भरात असताना..... 90 च्या दशकात गॅंग़वॉरमुळं मुंबापुरी भयभीत झाली होती.....दाऊद इब्राहिम, अमर नाईक, छोटा राजन, अरुण गवळी यांच्या टोळ्या मुंबईवर वर्चस्व ठेवण्यासाठी झुंजत होत्या..शोध प्रतिशोधाच्या नाट्य़ाने भरदिवसा रक्ताचे सडे रस्त्यावर पडत होते.. ..अखेर, गोळीला गोळीनेच उत्तर देण्याचे आदेश निघाले अन् मुंबई पोलीस दलातील शूटर्स रस्त्यावर उतरले..प्रदीप शर्मा, दया नायक, प्रफुल्ल भोसले,रवींद्रनाथ आंग्रे, प्रदीप सावंत अशा जिगरबाज पोलीस अधिका-यांच्या या फळीत साळसकर अग्रभागी होते..गुन्हेगारी टोळ्यांमधील आघाडीचे मोहरे तर साळसकर यांनी टिपलेच...पण, अमर नाईकला लोळवून एका बड्या डॉनला यमसदनी पाठवण्याची अतुलनीय कामगिरीही त्यांनी केली...त्यामुळंच आदरानं त्यांना अनेकजण `महाराज' म्हणू लागले होते...असा हा शूटरोंका शूटर असलेला हा मित्र प्रत्यक्षात खूप मृदू स्वभावाचा आणि कसलाही अभिनिवेश नसलेला...पांढरी टाटा सिएरा त्यांची लाडकी गाडी..परफ्युम्सची खूप आवड..त्यामुळं आमच्यात नेहमीच अत्तराच्या कुप्यांची देवाणघेवाण व्हायची..कुठलं अनोखं अत्तर मिळालं की ते आवर्जून पाठवायचे..मुंबईत अफाट जनसंपर्क असलेल्या साळसकर साहेबांचे पुण्यातही अनेक मित्र होते...स्टेशनजवळच्या एका लॉजमध्ये ते अनेकदा उतरत..तिथंच गाडी लावून रिक्षानं ते पुण्यात फिरायचे...त्यांची कामं काय असायची हे त्यांनी कधी कळू दिलं नाही...मी ही विचारायचो नाही...ते ही सांगायचे नाहीत..पण आमच्या गप्पा दिलखुलास व्हायच्या...मितभाषी असलेल्या या मित्राकडून अंडरवर्ल्डमधील एकेक कहाण्या उलगडत गेल्या...बातम्यांमागील बातम्या लक्षात आल्या..
एकदा साळसकर यांच्यासोबत पुण्यातल्या पॅनकार्ड क्लबला बसलो होतो..समोरच्या उघड्या जागेत एक मुलगा लघुशंका करताना दिसला..संतापाने त्यांनी हातातला चमचा त्याला फेकून मारला...पोरगा होता स्थानिक..आपल्या एरीयातच आपल्याला कुणी मारायचा प्रयत्न केला हे काही त्याला सहनच झालं नाही..तो गेला वस्तीत धावत....तिथल्या भाईला सांगितलं..पोरांची जमवाजमव केली.....ते सारे क्लबबाहेर दबा धरून बसले...थोड्या वेळानं आम्ही तिथून बाहेर पडलो.....बाहेर तरुणांचं मोठं टोळकं...हल्ल्याच्या तयारीत..पण, तिथंला भाई चलाख होता...त्याने ओळखलं.. हे तर साळसकर साहेब... धावत जाऊन त्यानं अक्षरश: लोटांगण घातलं ... त्या पोरालाही माफी मागायला लावली...साळसकरांचा स्वभाव उमदा...त्यांनीही तिथंच विषय संपवून टाकला .. ती आख्खी पोरं कायमची त्यांची फॅन बनली..पुण्या-मुंबईतल्या कित्येक एरीयातली पोरं त्यांनी अशी जोडली होती...त्यांचं खब-यांचं नेटवर्क सर्वोत्तम होतं...कोणत्याही कामासाठी सदैव सज्ज असलेली तरुणांची मोठी फौजच त्यांच्या उमदेपणामुळे तयार झाली होती..त्यामुळं अंडरवर्ल्डमधल्या भल्याभल्यांना धडकी भरवणारा हा महाराज कधी कुणाला घाबरला नाही...कुणापुढं झुकला नाही...कुणी त्याला वाकवू शकलं नाही...कुणी त्याला घाबरवू शकलं नाही....अत्यंत निडर असलेल्या या अधिका-याचा कमालीचा दरारा अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झाला..आणि पोलीस खात्यात क्रेझ..
मधल्या काळात माझी साळसकरांशी मैत्री चांगलीच फुलली होती..फोनवरून नेहमीच आम्ही संपर्कात असायचो..26 नोव्हेंबर 2008 ला गॅंगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा अन्वर याला दुबईच्या विमानतळावर अटक झाल्याची माहिती मला समजली...काहीजण ती अफवा असल्याचं सांगत होते...त्यामुळं संभ्रमात पडलो...दुपारी साळसकरांना फोन लावला..थोड्या ख्याली-खुशालीच्या गप्पा झाल्या..त्यांना अन्वरच्या अटकेबाबत विचारलं...ते म्हटले...कानावर आलंय खरं....संध्याकाळी फोन कर...मी कन्फर्म करून सांगतो..
संध्याकाळी एक निराळंच झंगट मागं लागलं.. त्यात गुंतून राहीलो होतो...अन्वरच्या बातमीचा तपशीलही दरम्यान एकाकडून समजला...त्यामुळं साळसकरांना फोन करायचं राहून गेलं..संध्याकाळच्या कामाची गडबड सुरू असतानाच मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ल्या केल्याची बातमी येऊन थडकली .. सा-यांचीच धावपळ उडाली...मग लक्षात आलं साळसकरांना फोन करायचा राहून गेलाय..हल्ल्याच्या बातमीबाबत त्यांना फोन करावा असा मी विचार करत होतो...अन तितक्यात
' एन्काउंटर स्पेशालीस्ट विजय साळसकर शहिद' ....अशी ब्रेकींग न्यूज टीव्हीच्या स्क्रीनवर झळकली..काळजाचा ठोकाच् चुकला...अक्षरश: मुळासकट हादरलो..छातीत धडधडू लागलं...अंगातलं त्राणच गेलं...मी मटकन् खुर्चीत बसलो..हे कटु वास्तव मन स्विकारतच नव्हतं..हेमंत करकरे, अशोक कामटे या जिगरबाज अधिका-यांसोबत अतिरेक्यांशी दोन हात करायला गेलेले साळसकर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले होते..त्यांचा फ्रेममधला फोटो टीव्हीच्या स्क्रीनवर झळकू लागला होता..भल्याभल्या गुन्हेगारांना धडकी भरवणा-या या उमद्या मित्राशी काही तासांपूर्वी बोलतो काय? त्यांच्याबाबत विचार करतो काय? आणि तेच फोटोच्या चौकटीत जाऊन बसतात काय? . . सारंच अनाकलनीय...अविश्वसनीयच...आजंही अत्तराची कुपी घेताना साळसकरांचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो.. त्यासाठी वारंवार अत्तरं खरेदी करतो....ते अत्तराचे दिवस पुन्हा परत येणार नाहीत हे माहित असूनही.....

Jackpot City - Casino, Hotel, Spa, Casino & SkyPod
ReplyDeleteFind great prices for rooms at Jackpot City - 거제 출장샵 Casino, Hotel, Spa, Casino 창원 출장안마 & SkyPod in 경상남도 출장안마 Las Vegas. See 15 photos and read 군산 출장샵 2214 reviews. Hotel? trivago! Rating: 강릉 출장안마 8.4/10 · 22,314 reviews