Wednesday, 21 November 2018

एसपीची शताब्दी : एक अमृतानुभव

एसपीची शताब्दी यात्रा...केवळ.अमृतानुभव.....
---------------------------------

                  काय असतंना ...आयुष्यात काही व्यक्ती इतक्या निराळ्या वळणावर भेटतात की आपण  हरवूनचं  जातो...काही घटना इतक्या सुंदर , अमिट असतात .... शब्दबद्ध करायच्या म्हटलं तरी शब्द सापडत नाहीत...... काही प्रसंगांनंतर मनाची स्थिती इतकी निराळी होते की काही काळ आपण निशब्द होऊन जातो...शब्दांत नाही मांडू शकत सारं.....कुणाला तपशीलाने सांगू शकत नाही...काही लिहिता येत नाही....तसं करायला मन तयारच् नसतं....त्या घटनेच्या स्मृतीतचं काळीज रेंगाळलेलं असतं...परवाची आमच्या एसपी कॉंलेजची मिरवणूक अशीच अत्यानंद देणारी....मन तृप्त करणारी ..जिंदगीतल्या मोजक्या  सुंदर.. मोरपंखी  क्षणांमध्ये ही मिरवणूकं सामावलीय ...चार दिवस उलटले तरी ...मिरवणूक अद्याप मनात चालूच आहे......

..गेले पाच महिने आम्ही ज्यासाठी प्रयत्न करत होतो...त्या एसपीच्या शताब्दी यात्रेने अनेकांच्या मनात घर केलं.... आगळ्यावेगळ्या रीतीने ही मिरवणूक कुणाकुणासाठी खास ठरली...गेले चार महिने या यात्रेच्या आयोजनात गुंतलो होतो....प्रत्यक्ष दिवस उजाडेपर्यंत मनात धाकधूक होती....पण सकाळी नूमविजवळ 'नादब्राम्ह' च्या ढोल ताशांचा गजर झाला...सा-या  शंका निघून गेल्या... पुढे तीन तास चालला होता तो केवळ आनंद सोहळा...आंनद यात्रा...आनंदोत्सव...

       कॉलेजचा पहिला वर्ग १०० वर्षांपूर्वी १४ जून १९१५ ला नुमवी शाळेत भरला.... मिरवणुकीची सुरुवात तिथनंच् केली...सरस्वती पूजन केलं... ग्रंथ पूजले..आळंदीच्या वारक-यांची दिंडी भागवत धर्माची पताका फडकावत मिरवणुकीच्या अग्रभागी होती.. सनई चौघडयाच्या मंगल सूरांनी  आसामंत भारून गेला......भव्य रथामध्ये कॉलेजचे माजी प्राचार्य, नव्वदी उलटलेले विद्यार्थी विराजमान झाले...मागे 'नादब्रम्ह'चं ढोलताशां पथक...क्रीडापटूंचं मशाल पथक...त्यामागे  सारे माजी विद्यार्थी...पांढराशुभ्र झब्बा, सलवार, दिमाखदार फेटयांनी विद्यार्थी नटले होते...विद्यार्थिनी पारंपारीक  पेहारावामध्ये   सहभागी झाल्या.... पुण्याच्या इतिहासात माजी विद्यार्थ्यांनी काढलेल्या पहिल्या आणि अनोख्या मिरवणुकीला प्रारंभ झाला

..एकतर रविवारची सकाळ...पुणेकरांच्या विश्रांतीचा दिवस...आरामाची वेळ...रहदारी सुस्त ...मिरवणूक लक्ष्मी रोड ने निघाली...सर्व बॅचचे तीन हजारांहून अधिक मित्र मैत्रिणी जोषात....चेह-यावर आनंद....कॉंलेजविषयीची आस्था ...जिव्हाळा ...अभिमान ..मनात मोर उमटलेले .....आगळ्या वेगळ्या मिरवणुकीच पथिक  असल्याची सुखद भावना ..लक्ष्मी रस्त्यावरून मस्त धमाल मिरवणूक....ढोल ताशाच्या तालावर मंडळी चालत होती...नाचत होती..कैक वर्षांनीनी मैत्र भेटलेले ..मने सुगंधीत झाली .. विलक्षण समाधान च-येवर झळकत होतं...मिरवणुकीत सानथोर सारेच सहभागी झालेले... अगदी गेल्या वर्षी पासआउट झालेल्यांपासून ते अगदी सत्तर ऐँशी वर्षाचे विद्यार्थी.. कॉलेजच्या मातीशी आस असलेले..आस्था असलेले...  नाळ जुळलेले... कधी ना कधी या एसपीची दुनियादारी अनुभवलेले.....पुण्यनगरीने , पुणेकरांनी  अनेक मिरवणुकी पाहिल्यात..निरनिराळ्या पक्षांच्या, संघटनांच्या...कोणत्याही कॉंलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी काढलेली ही बहुधा पहिलीच मिरवणूक असावी...मिरवणुकीत दिमाख होता...भपका नव्हता...थिल्लरपणा नव्हता .. मजा होती.. मस्ती नव्हती....मस्त जल्लोषात भलीमोठी मिरवणूक नवा इतिहास रचत पुढे चालली होती...

       कॉलेजचं हे शताब्दी वर्ष..या वर्षांत सा-या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावं ही अनेकांची भावना...त्यासाठी आम्ही काही मित्र गेले चार -पाच महिने झटत होतो...जुन्या मित्र मैत्रिणींचे नंबर मिळवले....एकाकडून दुस-याचा...दुस-याकडून तिस-याचा...असे पत्ते शोधत जास्तीत जास्त मुलांपर्यंत जायचा प्रयत्न केला..मुलींची  लग्न झाल्याने नावे बदललीत...कोण कोल्हापूरला तर थेट कुणी काश्मिरला...कुणी फलटण ला तर कुणी जर्मनी, युरोप, कॅनडा, अमेरिका अशा निरनिराळ्या देशांत स्थायिक..कलकत्ता, राजस्थान यासारख्या  राज्यातही कित्येक  सेटल झालेत..खूप चिकाटीने सारे पत्ते शोधत ठावठिकाणे ढुंडाळत आम्ही निरोप पोचवले...१ मे ला जंगी मेळावा झाला...त्यात शताब्दी यात्रेचा विषय नक्की झाला...तेव्हापासून सारेच या यात्रेसाठी निरनिराळ्या माध्यमातून झटत होते..निरनिराळ्या कामांमध्ये गढले होते...एकच् लक्ष्य होतं १४ जून..१४ जून ची धून प्रत्येकाच्या मनात निनादात होती...त्याची खूप सुंदर प्रचिती शताब्दी यात्रेत  आली... ..अत्यंत तजेलदार अनुभव .. एसपीच्या या शताब्दी यात्रेने कित्येकांच्याच्या मनात घर केलं.. आगळ्यावेगळ्या रीतीने ही मिरवणूक प्रत्येकासाठी काही ना काही कारणानं खास ठरली...मिरवणूक जोषात निघाली....वाटेवरचे रहिवासी कौतुकाने माजी विद्यार्थ्यांचा सोहळा पाहत होते...फोटो काढत होते...टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते..ढोल ताशांचा निनाद टिपेला पोचला.. सा-यांचेच पाय थिरकू लागले...मुले नाचू लागली...मुलीही सहभागी झाल्या...अलका टॉकीजच्या चौकात सर्वांनी फेर धरला.. फुगड्या खेळल्या...सर मॅडमही मागे नव्हते...विद्यार्थ्यांच्या आनंदात मनापासून सहभागी झाले.. उमेद वाढवली...पावलागणिक मिरवणुकीची रंगत वाढत होती...चौकाचौकांमध्ये एस्पीच्या या शिलेदारांवर पुष्पवृष्टी झाली...

        चौकाचौकांमध्ये लोक स्वागत करत होते.. दाद देत होते....जल्लोषाला सलाम करत होते....टिळक चौकात फुगड्या झाल्या...ढोल ताशांच्या साथीत सारे मनसोक्त नाचले...फेटे उडवले...टाळ्या वाजवल्या...शिट्ट्या घुमल्या ....अर्रर्र ....घुमतयं काय...!!!!!एसपी कोलेजशिवाय आहेच काय??? ....आरे आले रे आले एसपी वाले....एका दोन तीन चार....एसपीचा जयजयकार....अशा घोषणांनी आसमंत भरून गेला....आगळं चैतन्य निर्माण झालं. ...पुढे टिळक रोडच्या दिशेने निघालो...मिरवणुकीतली गर्दी वाढली..दुप्पट झाली...कित्येकजण टिळकरोड ला या जल्लोष यात्रेत सामील झाले...जुने मित्रमैत्रिणी कडाडून भेटत होते...आलिंगने देत होते.....उराउरी भेटत होते....जुन्या आठवणींना उजाळा मिळत पावले पुढे चालली...ताशांचा गजर वाढला....इस्कॉनचे पथक हरे राम ...हरे कृष्णा म्हणत जॉईन झालं.. धमाल वाढली....मौजमजा वाढली...हास्य विनोदांना बहार आला...चेष्टा मस्करीला ऊत आला...चालता चालता गप्पांचे फड रंगले...उरातल्या.... जुन्या जखमा सुगंधीत  झाल्या...वेदनांना फुंकर मिळाली...मन आल्हाददायक झालं...इतक्या मित्रमैत्रिणींचा सपोर्ट पाहून मन उचंबळून आलं...आपण एकटे नाही...एकाकीही नाही या भावनेने  उमेद वाढली....पोलीस, प्रशासन, राजकारण.. समाजकारण...शिक्षण अशा कितीतरी निरनिराळ्या क्षेत्रातले सारे मित्र मैत्रिणी आपले सारे अधिकार आणि वर्दीची झूल बाजूला ठेवून मोकळेपणाने मिरवणुकीत आलेले....मनापासून सहभागी झालेले...परस्परांना दोस्तीचा हवाला दिला...दिलासा दिला...डोण्ट वरी...वुई आर एसपीअन्स असा धीर मिळाला.. मित्र आश्वस्त झाले...निर्धास्त झाले.... तनामनावर  कित्येक वर्ष साचलेलं  व्याधींचं मळभ पावलागणिक दूर होत चाललं होतं....टपो-या थेंबांचा शिडकावा करत वरूणराजांनं तथास्तू म्हटलं.....यात्रा पुढे चालू राहिली...

साहित्य परिषदेचा चौक ओलांडला.. कॉलेज फक्त दोन चौकावरच उरलेलं....मिरवणुकीने कळस गाठलेला...टाळ चिपळ्यांचा निनाद टिपेला पोचलेला....हरे रामा हरे कृष्णा म्हणत इस्कॉनवाले देहभान विसरून नाचत होते... झिंग चढ़ली होती...ढोल ताशे कडाडत होते....वाटेतल्या रांगोळ्या चुकवत  सारे ठेका धरून नाचू लागले...गाऊ लागले...शिट्ट्यांचे आवाज घुमले....शेले आकाशात उडाले....आरोळ्या वाढल्या...घोषणांना जोर चढला...भव्य दिव्य मिरवणुकीने सारा टिळक रोड बंद झाला... वाहतूक ठप्प झाली......सर्वांचा उत्साह शिगेला पोचलेला...मुले ..मुली नाचण्यात तल्लीन झालेले....कधीकाळचे मित्र गळ्यात पडून हसू लागले...रडू लागले....भावना अनावर झाल्या...कॉलेजचा अलीकडचा चौक आला आणि एकाएक सारी वाद्ये थांबली....कॉलेज काही पावलांवरच होतं....वातावरण स्तब्ध झालं..सारा उत्साह गोठला....सारेच निशब्द झाले....वातावरण भावूक झालं...उर दाटून आले...का ? आणि कोण ? थांबलं समजलंच नाही.....मग एकाने मिरवणुकीचा नूर ओळखला...चौकात पुष्पवृष्टी सुरू झाली....वाद्ये दणाणू लागली....ग्रंथ दिंडी घेउन आम्ही कॉलेजमध्ये गेलो....पाठोपाठ....रथ , वारकरी आणि सारी मिरवणूक आत आली....हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी कॅम्प्ससमध्ये जमले...स्वागतासाठी आत असलेया बॅंडवाल्यांनी मुंगळा मुंगळा ....ची धून सुरू केली ....पुन्हा एकदा चैतन्य संचारलं.. धुव्वा सुरू झाला.. पेढ़े भरवले गेले.. अत्तरांच्या फायांनी मिरवणूक सुगंधीत झाली.....बेभान होऊन सारे नाचत होते....हसत होते....पळत होते....सारेच बेभान आणि बेपाश झालेले... जिंदगीतला बहुदा हा सर्वात अविस्मरणीय क्षण....सर्वात सुंदर घटना ....कॉलेज लाईफमधे जे एंजॉय करायचं राहून गेलं.. त्याची सारी कसर भरून निघाली.... मिरवणुकीनं तनं..मनं तृप्त झाली...सारे...लोक काळजापासून बोलू लागले...सांगू लागले...कळू लागले....कसलाही स्वार्थ नाही...कसलाही उद्देश नाही..कोणताही हेतू नाही....फक्त आणि फक्त एसपी ची शताब्दी...माझ्या कॉलेजची शताब्दी....एवढीच भावना सा-यांच्या मनात दाटलेली.. ..खाकी..खादी..भाषा.....स्टेटस, वय, लिंग, प्रदेश, जात, धर्म.......कसलेही  भेद नव्हते...सारे काही गळून पडलेले....अनेकांच्या मनातली ठसठसणारी वेदना निघून गेलेली... ग्रामीण भागातल्या... कोंडमारा झालेल्या विवाहितेची सारी शारीरिक आणि मानसिक कोंडी जशी पोतराजाच्या हलगीसमोर गळून पडते...निर्धास्त होते...निःशंक होते...तशीच काहीशी  भावना उरी दाटली. . .
 आयुष्यातल्या पूर्वार्धाच संचित मागं ठेवून ...उत्तरार्धासाठी झगडत असलेल्या कित्येकांना एसपीची शताब्दी यात्रा संजीवनी ठरली...सारेच उघडपणे बोलतात असं नाही....तरीपण  खूप मित्र मैत्रिणींनी निरनिराळे मेसेज दिले....मतितार्थ एकच्....आम्ही मोकळे झालोय....खरं  आहे ...अनेकांच्या अगदी मनातली भावना आहे ही...
 या एसपीच्या समुद्रामध्ये आम्ही कधीतरी प्रवासी होतो...तो समुद्र अजूनही वाहतोची आहे....हजारो.. लाखो विद्यार्थी येतील आणि जातील.. या कॉलेजचा शिक्का काही फक्त  आयकार्डरवर नाही बसत....तो हृदयावर बसतो...सर्वांगावर उमटतो.. कायमचा.. एसपीचं हे गारूड कायम मोहीत करत राहतं.....ते कधी विरणार नाही..संपणार नाही...थिजणार नाही...कोरडं होणार नाही....आस सोडू नका....कायम तुमच्या सोबत आहे... हा एसपीचा संदेश आहे....माजी विद्यार्थ्यांचा दिलासा आहे....कधीच खचू नका...निराश होऊ नका...डगमगू नका....तुमचा लढा कोणत्याही पातळीवरचा का असेना...कायम चालू ठेवा .....आम्ही सोबत आहोत...सारे माजी विद्यार्थी साथीला आहेत..म्हणजेच आख्खी एसपी तुमच्या पाठीशी आहे...जिंदगीचा हा सेकंड हाफ....आताचे प्रश्न वेगळे..विवंचना निराळ्या...समस्या भलत्याच...प्रत्येकाला त्या सतावतात...स्वरूप निरनिराळं...एवढाच काय तो फरक....पण एका कायम लक्षात ठेवा आपण सारे एक आहोत....सारी एसपी पाठीशी आहे...मेळाव्याच्या...मिरवणुकीच्या निमित्ताने मनमोकळेपणाने जमलेले सारे दोस्त लोक आता एकत्र आलेत...डरू नका....या जिंदगीला.....परवाच्या मिरवणुकीने हा संदेश मिळाला... काहीच शंका नाही...उगा बाता नाही....सवंगपणा नाही...ठोस पाउल आहे हे....मेळावा....मिरवणूक ही जस्ट नांदी आहे.......सारी दुनिया बाकी आहे....हेच खरं....


No comments:

Post a Comment