(कुसुमाग्रजांची क्षमा मागून)
- - - - - - - - - - - - - - - - - - -
ओळखलंत का सर मला?
दारात आला कोणी
कपडे होते खादीचे
खांद्याला शबनम झोळी
ओठ दुमडून किंचित हसला
उसनं अवसान आणून
नोकरीसाठी फिरतो आहे
कात्रणांच्या फायली घेऊन
प्रेस क्लबच्या स्पर्धांसाठी
तुम्हीच सर उत्तेजन देत होता
स्पर्धेत यश मिळवण्यासाठी
नवे विषय सुचवीत होता
नवनव्या बातम्यांसाठी धडपडलो
विसरून तहानभूक
लेखन दर्जेदार होण्यासाठी
प्रयत्न केले खूप
चमकदार दिवस होते ते
धमक वाढवत होते
काळ बदलतोय हे मात्र
लक्षात येत नव्हते
जे पूर्वी लेखणीला टरकत होते
कार्यालयं फोडत होते
तेच आता संपादकांच्या
गळ्यात गळे घालून फिरत आहेत
संस्थेलाही नको आता
प्रामाणिक बातमीदार
व्यवस्थापनाची आहे सारी
जाहिरातदारांवर मदार
त्यामुळे होतंय काय सर...
कामगार, शेतकरी, झोपडपट्टीवासियांच्या बातम्या
टोपलीत पडत आहेत
कारस्थानी धनदांडग्यांच्या प्रतिमा मात्र
बातम्यांमधून उजळत आहेत
चाटूगिरी, भाटगिरी
'पुरस्कार'प्राप्त बनली आहे
लोकशाहीचा चौथा स्तंभ
तृतीयपंथी होत आहे
माफ करा सर मला
मी एक निर्णय घेतला आहे
भाटांच्या या गर्दीतला
मी ही प्रवासी होतो आहे
टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी
दुसरं काय करू शकतो????
तत्व मूल्य गुंडाळण्याचा निर्णय
तेवढा घेऊ शकतो . . . . . . . . . . .
- - - - - - - - - - - - - - - - - - -
ओळखलंत का सर मला?
दारात आला कोणी
कपडे होते खादीचे
खांद्याला शबनम झोळी
ओठ दुमडून किंचित हसला
उसनं अवसान आणून
नोकरीसाठी फिरतो आहे
कात्रणांच्या फायली घेऊन
प्रेस क्लबच्या स्पर्धांसाठी
तुम्हीच सर उत्तेजन देत होता
स्पर्धेत यश मिळवण्यासाठी
नवे विषय सुचवीत होता
नवनव्या बातम्यांसाठी धडपडलो
विसरून तहानभूक
लेखन दर्जेदार होण्यासाठी
प्रयत्न केले खूप
चमकदार दिवस होते ते
धमक वाढवत होते
काळ बदलतोय हे मात्र
लक्षात येत नव्हते
जे पूर्वी लेखणीला टरकत होते
कार्यालयं फोडत होते
तेच आता संपादकांच्या
गळ्यात गळे घालून फिरत आहेत
संस्थेलाही नको आता
प्रामाणिक बातमीदार
व्यवस्थापनाची आहे सारी
जाहिरातदारांवर मदार
त्यामुळे होतंय काय सर...
कामगार, शेतकरी, झोपडपट्टीवासियांच्या बातम्या
टोपलीत पडत आहेत
कारस्थानी धनदांडग्यांच्या प्रतिमा मात्र
बातम्यांमधून उजळत आहेत
चाटूगिरी, भाटगिरी
'पुरस्कार'प्राप्त बनली आहे
लोकशाहीचा चौथा स्तंभ
तृतीयपंथी होत आहे
माफ करा सर मला
मी एक निर्णय घेतला आहे
भाटांच्या या गर्दीतला
मी ही प्रवासी होतो आहे
टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी
दुसरं काय करू शकतो????
तत्व मूल्य गुंडाळण्याचा निर्णय
तेवढा घेऊ शकतो . . . . . . . . . . .
No comments:
Post a Comment