अंजनाबाई - एक क्रौर्य
- - - -- - - - - -- - -- - - -
आरुषी प्रकरणानंतर एक स्त्री एवढे क्रौर्य करू शकते का? असे अनेक पोस्टवर बोलले गेले..चर्चा झड्ल्या...इथे आता अंजनाबाई डहाळेची माहिती देणे क्रमप्राप्तच आहे. . .ही मूळची बहुदा पंढरपूर किंवा नाशिक भागात राहणारी . .. सीमा आणि रेणुका या तिच्या तरूण मुलींसोबत पुण्याला रहायची...रेणुकाचं लग्न झालेलं..तिचा नवराही त्यांच्याच घरी रहायचा...90 च्या दशकात अंजनाबाई होती पन्नाशीत . .अट्टल पाकीटमार म्हणून पोलिसांना ती माहिती होती...पुणे, सातारा,सांगली अशा अनेक पोलिसांकडं तिचं रेकॉर्ड होतं...पाकीटं मारायची, महिलांच्या गळ्यातल्या सोनसाखळ्या, मंगळसूत्रं पळवायची तिची स्टाईल अनोखी आणि क्रूर होती..एक लहान मूल कडेवर घेऊन अंजनाबाई तिच्या मुलींसह गर्दीच्या ठिकाणी जायची...बायकांच्या घोळक्यात घुसली, की ती मुलाच्या पार्श्वभागाला बाम चोळायची.. त्याला चिमटे काढायची. . . ..साहजिकच मूल कळवळून जोराने रडायला लागायचं... काय झालं हे पहायला आजुबाजूच्या बायका गोळा व्हायच्या...ती संधी साधून सीमा आणि रेणुका बायकांचे दागिने, पाकीटं लांबवायच्या...
अंजनाबाईला अनेकदा अटक झाली...त्यावेळी त्यांच्याकडील मूल रेणुकाचं असल्याचे ती सांगायची.... फरासखाना पोलीस स्टेशनला दिलीप शिंदे आणि विनोद सातव ही जोडगोळी इनचार्ज असताना एकदा तिला अटक झाली....त्यापाठोपाठ हडपसरला पाकीट मारताना ती पकडली गेली...त्यावेळी तिच्या अनेक सुरस कहाण्या पोलिसांना समजल्या...अनेक चो-या करून या तिघींनी बक्कळ माया जमवली होती...कोथरुड भागात पॉश फ्लॅटमध्ये त्या रहायच्या...स्वत:च्या मालकीच्या फियाटमधून गोव्याला वगैरे ऐश करायला जायच्या.... एका चाणाक्ष पोलिसामुळे त्यांची आणखी एक भीषण बाजू पुढे आली....दोन्हीवेळा अटक केल्यानंतर अंजनाबाईकडे दोन निरनिराळी मुले दिसून आली...पोलिसांनी कसून चौकशी केली...तेव्हा अंजनाबाई आणि तिच्या मुलींनी ठिकठिकाणांहून अनेक बालके पळवल्याचं स्पष्ट झालं...एवढंच नव्हे, तर कित्येक बालकांचे त्यांनी अमानुष पद्धतीने खूनही केले होते...तपासात ही बाब पुढे येताच राज्यभर सर्व पोलिसांना वायरलेसवर ही बाब कळवली. ठिकठिकाणच्या बालके बेपत्ता झाल्याच्या प्रकरणांसाठी अंजनाबाईची चौकशी सुरू झाली...हा तपास एकत्रित होण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला..त्यात अंगावर शहारे आणणारी माहिती पुढे आली...
या तिघींनी पुणे, नवी मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि नाशिक येथून अनेक बालकांचे अपहरण केले होते....चो-या करण्यासाठी स्वत:जवळ बाळगले आणि काम होताच या बालकांचे गळे आवळून खून केले... एक मुलगा शू येते म्हणून रडायचा...मग यांनी त्याच्या इंद्रियालाच दोरी बांधून टाकली...लघवी बाहेर न पडल्याने पोट फुगून, अंग काळेनिळे पडून हा मुलगा तडफडून मरण पावला. .. आणखी एक मुलगा सारखा कुरकूर करतो म्हणून त्याला चक्क धुणे धुताना कपडे आपटतात तसे आपटून आपटून खलास केले...यापुढच्या गोष्टी न सांगण्यासारख्या, न लिहिण्याजोग्या आहेत. . .पंकज महामूलकर नावाचा तीन वर्षाचा गोंडस मुलगा होता...बहुदा नवी मुंबई किंवा नाशिक भागातून त्याचे अपहरण केले होते...त्यालाही या तिघींनी अत्यंत वाईट पद्धतीने मारून टाकले...कोथरूड भागातील एका निर्जन परिसरात सिमेंटच्या गोणीत त्याचा मृतदेह टाकला होता...ही बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली....अंजनाबाई आणि तिच्या मुलींना पंकजचे नेमके नाव माहित नव्हते...पण त्याला कुठून पळवलं हे त्यांनी पोलिसांना सांगितलं..त्या गावातून सहा महिन्यांत बेपत्ता झालेल्या मुलांची माहिती पोलिसांनी घेतली. त्यातून वय, वर्णनासह सर्व माहिती घेतली असता तो पंकजचाच मृतदेह असावा या निष्कर्षाप्रत पोलीस आले...कोथरूड पोलीस ठाण्यात पंकजच्या आई-वडिलांना मृतदेहाचे फोटो दाखवण्यासाठी बोलवले होते...फोटो काहीसे अस्पष्ट होते.. . .पण ते पाहताना त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू बरसायला लागले. . हवालदाराने मुद्देमाल विभागातून पंकजचे कपडे आणले आणि त्याचा तो लाल फुलांचा शर्ट पाहताच मोठ्ठा हंबरडा फोडून पंकजची आई बेशुद्ध पडली...त्या माऊलीच्या त्या हंबरड्याचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो....
जून 1990 ते आक्टोबर 96 दरम्यान अंजनाबाई आणि तिच्या दोघा मुलींनी राज्यभरातील तेरा मुलांचे अपहरण केल्याचं पोलीस तपासात पुढे आलं...त्यापैकी सहा मुलांचे त्यांनी अतिशय क्रूरपणे खून केले...कुणाला लाईटच्या खांबावर आपटून मारलं. कुणाला गळा आवळून, कुणाला हाल हाल करून.....नाशिकचा तर एक मुलगा अवघा एक महिन्याचा होता....त्याचा मृतदेह नाशिकच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सापडला...दोन वर्षांच्या बंटीला खंडाळा घाटात फेकून दिलं.. . .स्वाती,श्रद्धा, मीना,हे निष्पाप जीवही या तिघींच्या सैतानी कृत्यांना बळी पडले....कोल्हापूरमध्ये खटला चालला......त्यांनी सहा बालकांचे खून केल्याचे उघड झाले असले, तरी प्रत्यक्षात त्यांनी अपहरण केलेल्या आणि ठार केलेल्या बालकांची संख्या तेरा ते पंधरा असावी असा पोलिसांचा अंदाज आहे...या तिघी वेडसर होत्या का? आजिबात नाही....त्या उत्तम कपडे घालायच्या...व्यवस्थित बोलायच्या..रेणुकाचं तर लग्न झालं होतं..सीमाचे काहींशी प्रेमसंबंध होते..त्यामध्ये काही पोलिसांचा समावेश होता असं त्यावेळी बोललं जात होतं...कामधंदे न करता चैन करण्याच्या वृत्तीने त्या काहीही करायला तयार झाल्या...पण इतक्या नीच स्तराला त्या कशा गेल्या? बालकांचे बळी घेताना, त्यांच्यावर अत्याचार करताना त्यांचे हात थरथरले का नाहीत?? एखादी विकृत असू शकते..पण तिघीही विकृत, अमानुष कशा?? काही...काही कळत नाही.....
रेणुकाचा नवरा किरण शिंदे काही कृत्यांमध्ये त्यांच्या समवेत होता...त्याला माफीचा साक्षीदार करण्यात आले...त्यामुळे केस अधिक भक्कम झाली...आयुष्यभर बालकांची अपहरणं, अत्याचार आणि खून केलेल्या तिघींना फाशी नव्हे तर कणाकणाने मृत्यू यायला हवा होता...वेदना काय असते?....आपण केलेल्या अत्याचारांवेळी किती आणि कशा वेदना होतात ते समजायला हवे होते......किती पालकांची हाय लागली असेल या सैतानी बायकांना...हाल हाल होऊन त्यांना मृत्यू यायला हवा....पण दुर्दैवाने खटला चालू असताना नाशिक कारागृहात साध्या हार्ट अटेकने, सेकंदभराची कळ येऊन अंजनाबाई स्वान्त सुखाय मरण पावली...रेणुका आणि सीमा नाशिकच्या तुरुंगात फाशीच्या प्रतिक्षेत आहेत...त्यांना हार्ट अटॅक यायच्या आत तरी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी असं वाटतं. .

No comments:
Post a Comment