अश्विन नाईक - - एक माणूस. . . .
- - - - - - - - - - - - - -
15 वर्ष उलटली या घटनेला . .. पण अजून स्पष्ट आठवतंय...सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास फोन वाजला...नीलम लहान होती तेव्हा...पटकन पळत जाऊन फोन उचलायची....तिनेच फोन उचलला...पलिकडून कोणतरी बोलत होतं आणि ही छानपैकी गप्पा मारत होती...काय चाललंय..कसं चाललंय...कुठल्या शाळेत जाते...कोणत्या इयत्तेत आहे....कोणता विषय आवडतो...मॅडम कोणत्या आहेत?....वगैरे वगैरे....ऐकत होतो सारं......नीलूला खुणेनेच कोण आहे हे विचारले? तिने आकाशाकडे बोट दाखवले...मला काही उलगडा होईना....मी फोन घेत हॅलो म्हणालो....आकाश बोलतोय...पलिकडून आवाज आला... ......किती भारी वाटतं रेऽऽऽ ....छोट्या मुलांशी बोलून....माझीही मुलगी साधारण एवढीच आहे....मी बोलतो तिच्याशी..पण भेटू शकत नाही रेऽऽऽ......तो म्हणाला.....
काळजात हललं माझ्या...तो अश्विन होता...अश्विन मारूती नाईक . .. मुंबई अंडरवर्ल्डमधील तत्कालीन प्रमुख सूत्रधार ....एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या जीवनात स्थित्यंतरं तरी किती येऊ शकतात?? आणि इरेला पेटून त्यावर मात करत....संघर्षाशी सामना करीत माणूस स्थिरसावर व्हायचा किती आटोकाट प्रयत्न करतो...याचं अश्विन एक उत्तम उदाहरण ठरेल...
मुंबई अंडरवर्ल्डमधील अश्विन नाईक या नावाला काय वजन आहे किंवा होते हे बहुतेकांना ठावूक आहे...रंगनाथ पठारेंनी '' हारण'' मध्ये एका स्त्रीच्या आयुष्यात किती उलथापालथी होऊ शकतात हे दाखवलंय..त्यास्वरूपाची आणि त्यापेक्षाही भयंकर स्थित्यंतरं अश्विनच्या आयुष्यात घडलीत....त्या बदलांचा...घटनांचा...मी दूरून का होईना पण एक साक्षीदार आहे... दादरमध्ये भाजी विक्रेत्याच्या घरात जन्मलेला अश्विन कुशाग्र बुद्धीचा...क्रिकेट उत्तम खेळायचा...रमाकांत आचरेकरांचा लाडका शिष्य....बलविंदर संधू, लालचंद राजपूत, सुलक्षण कुलकर्णी हे त्याचे तत्कालीन सहाध्यायी...काही दिवस वय कमी पडलं म्हणून अश्विनचा महाराष्ट्राच्या रणजी संघातील प्रवेश हुकला.... पुढे बरीच समिकरणं बदलत गेली...त्याच्या आयुष्याचा पटही बदलत गेला.....तो कितीही साधाभोळा असला, तरी त्याचा मोठा भाऊ अमर म्हणजे अमर नाईक हा मुंबईतील बडा गॅंगस्टर होता...80-90 च्या दशकात मुंबईवरील वर्चस्व राखण्यावरून दाऊद, अमर नाईक आणि अरूण गवळी यांच्या टोळ्यांमधील संघर्ष टीपेला पोचला होता...त्यामध्ये दाऊदने त्याचा भाऊ शाबीर व गवळीने त्याचा भाऊ पापा गवळी गमावले.....खबरदारीचा उपाय म्हणून अमरने अश्विनला आक्सफर्डला शिकायला पाठवले...तेथे त्याने इंजिनीयरींगची पदवी घेतली...तेथून मुंबईला परतल्यावर त्याच्यावर दाऊद टोळीनने प्राणघातक हल्ला केला...त्यानंतर काही दिवस त्याने निरनिराळे नोकरी, व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला...पण, मुंबईत राहणं दिवसेंदिवस कमालीचे जोखमीचे झाले होते...लागोपाठ झालेल्या हल्ल्यांमुळे त्याला प्राण वाचवण्यासाठी तो जीवाच्या आकांताने पळाला....आणि पळतच राहीला . . ..
जगायचं असलं तर शिका-याची शिकार करावी लागते....पारध व्हायचं का शिकारी हे ठरवावं लागतं.....पारध होऊ द्यायची नसेल, तर शिका-याची शिकार करावी लागते हा अंडरवर्ल्डचा नियम....अश्विन कसा अपवाद ठरणार? पण पारध टाळण्यासाठी त्याला जी दिव्य पार पाडावी लागली त्याला अंतच नाही....जगभर तो फिरला....देशोदेशींचे मित्र जोडले...पावडर सिंडीकेट म्हणजेच मादक पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय माफीयांशी त्याची दोस्ती असल्याचं बोललं जाऊ लागलं....एलटीटीई च्या लोकांशी त्याचे लागेबांधे असल्याची चर्चा होती.....त्यातच एकदा मुंबईत भर कोर्टात गवळी गॅंगच्या रवींद्र सावंतने पिस्तुलातून त्याच्या मस्तकाचा वेध घेतला.. डोक्यातून गोळी आरपार जाऊनही अश्विन बचावला खरा...पण, कमरेखालचा भाग लुळा झाला...कायमचाच....एकेकाळचा उत्तम क्रिकेटपटू कायमचा अपंग झाला...अंडरवर्ल्डमध्ये खळबळ उडाली....अश्विनच्या डोळ्यांसमोर काळोख पसरला....सारं काही संपलंच जणू असं वाटू लागलं होतं....त्यानंतर, वैद्यकीय जामिन मिळालेल्या अश्विनला घेऊन अमर विदेशात रवाना झाला...निरनिराळ्या देशांमध्ये त्याच्यावर इलाज केले...पण काही उपयोग झाला नाही...त्यानंतर, अमर भारतात परतला व काही दिवसांतच पोलिसांच्या चकमकीत ठार झाला . .. अश्विनवर आभाळ कोसळलं....त्याचा सर्वात मोठा आधारच संपला...त्या ही संकटातून तो मनाने उभा राहीला.. प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ लागला....जगातील बहुतेक देशांमध्ये तो राहीला......विदेशात असतानाच तो माझ्याशी जोडला गेला...त्याच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडल्यानं तो ख-या अर्थाने मला मित्र मानू लागला...आकाश या नावाने त्याच्याशी बोलायचो... काहीजण त्याला डॉक्टर म्हणतात . . .. विदेशातून तो दिल्लीत वास्तव्याला होता काही वर्षं....तिथून पुन्हा विदेशात जाताना बांगलादेशाची सीमा ओलांडत असताना 2000 साली तो पकडला गेला...मग तिहार जेलमध्ये रवानगी....त्याच्याविरूद्धच्या सर्व केसेसची सुनावणी सुरू झाली...दिली, मुंबई आणि पुणे अशा निरनिराळ्या ठिकाणी त्याला खेटे सुरू झाले....मुंबईत कोर्टातच झालेल्य गोळीबाराच्या अनुभवामुळे त्याची प्रत्येक खेप चिंता करायला लावणारी ठरली...त्यातच त्याच्या लाडक्या पत्नीचा नीताचा गोळ्या झाडून खून करण्यात आला...त्याचाही आरोप त्याच्यावरच ठेवण्यात आला...आई गेली...वडील गेले....अमर गेला... जीवाभावाचे कितीतरी दोस्त एकापाठोपाठ गेले....कायमचे अपंगत्व आले . . .पत्नी नीताही गेली.....एकापाठोपाठ एका धक्क्यांतून सावरत असलेल्या अश्विनची सारी जवानी प्रतिस्पर्ध्यांशी लढण्यात आणि नंतर खटले लढण्यात गेली . . ..दोन वर्षांपूर्वी सर्वच्या सर्व खटल्यांतून त्याची निर्दोष सुटका झाली....
कधीकाळी नाइलाजाने का होईना पण चुकीच्या मार्गाला लागलेला अश्विन पुन्हा एकदा सन्मार्गाच्या वाटेवर आहे....एक कन्स्ट्रक्शन फर्म त्याने सुरू केलीय......दादरमधीलच आफीसमधून त्याचा कारभार चालतो....अंडरवर्ल्डला त्याने रामराम ठोकलाय....वाट चुकलेल्या सहका-यांना निरनिराळे व्यवसाय देऊन मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलाय....मागचे कसलेही हिशेब आता उरलेले नाहीत आणि करायचेही नाहीत....दॅट वॉज माय पास्ट.....मला सन्मानाने जगायचंय...असं तो नेहमी म्हणतो आणि तसं जगायचा बहुदा प्रामाणिक प्रयत्नही करतोय...गेल्या आठवड्यातील ठाणे-मुंबईच्या धावत्या दौ-यात त्याची भेट हुकली......खरंतर एरवीही संपर्क अथवा संवाद क्वचितच होतात. . .. काही गरजच पडत नाही ना....पण एक कायम लक्षात असतं...आहे आपला हा मित्र.....ठिक आहे....होता निराळ्या वळणावर...पण सध्यातर चांगल्या मार्गावर आहे ना! ....मी कधीच हिंसेचं अथवा गुन्हेगारीचं समर्थन करीत नाही आणि कुणाचचं उदात्तीकरण करत नाही....फक्त जे काही अनुभवलं...जे काही जगतो...ते आडपडदा न ठेवता लिहितो एवढंच.....आश्विनचा आज वाढदिवस....अश्विन खूप खूप शुभेच्छा....सन्मार्गावर चालताना अनेक काटे तुला बोचतीलही....पण, त्यानंतर दूरवर हिरवळच हिरवळ पसरलीये.....आणि ही हिरवळ हवी असेल, तर काट्यांकडं दुर्लक्ष कर....सन्मार्गावर चालतोयस ना!...कधीच हा मार्ग सोडू नकोस.....दाखवून देऊ जगाला.....वाल्मिकी या युगातही पैदा होऊ शकतात. . .

No comments:
Post a Comment