सल...
- - - - - - - - -
दहा वर्षांपूर्वीचा पावसाळा. रिमझिम पाऊस पडत होता. गावातली कामं संपवून मी नव्या पुलावरून चाललो होतो. खिशातला मोबाईल वाजला. विक्रमचा फोन होता.
'' तुझ्या एका जुन्या मित्राला भेटायचंय का?'"
''कोण रे?
''तू कल्पनाही करू शकणार नाही, पण मी आता धनेशच्यासमोर उभा आहे.''
धनेशचं नाव ऐकताक्षणीच कसलाही विचार न करता मी गर्रकन गाडी वळवली. शनिवारवाड्याच्या दिशेला विक्रमने सांगितलेल्या ठिकाणी पोचलो आणि समारेचे दृश्य पाहून अक्षरश: हादरलो. समोर धनेशला पाहिले. पण हा आमचा धनेश नव्हता असं वाटण्याइतपत त्याच्यात बदल झालेला.क्षणात धनेशच्या स्मृतींनी मनाभोवती फेर धरला. पाऊस आता दणादणा कोसळू लागला होता. पावसाच्या सरींपेक्षाही धनेशच्या स्मृतींनी मी चिंब झालो होतो.
धनेश...पुण्यातला एक गाजलेला क्राईम रिपोर्टर. वीस-बावीस वर्षांपूर्वी त्याचं बोट धरून आम्ही नवी मुलं या क्षेत्रातील बातमीदारी शिकत होतो. स्वभाव जुळल्याने धनेश कधी मित्र झाला हे मलाही समजलं नाही. जेमतेम उंची, मजबूत शरीरयष्टी, घनदाट कुरळे केस आणि तशीच दाढी असं त्याचं भारदस्त पण काहीसं मितभाषी व्यक्तिमत्व. पोलिस खात्यात जबरदस्त ओळखी. अगदी कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिका-यांपर्यंत सर्वांशी घरोब्याचे संबंध. राजकीय क्षेत्रात विशेषत: पिंपरी-चिंचवड भागात दांडगा जनसंपर्क. तो कुणाशीही फार कधी बोलायचा नाही. त्यामुळं अनेकांना त्याचं व्यक्तिमत्व गूढही वाटायचं. पण एकदा का सूर जुळले,की मग भरभरून गप्पा मारायचा.
नव्वदचं शतक नुकतंच सुरु झालेलं. क्राईम रिपोर्टींगमध्ये त्यावेळी धनेश, निसार, मारूती आणि मी असा भिन्न वृत्तपत्रांतील पत्रकारांचा छान ग्रुप जमला होता. पोलीस खात्यातील कितीतरी गोपनीय गोष्टींचा खजिना असायचा. त्यातून आम्ही खूप निरनिराळ्या बातम्या द्यायचो. कित्येक बातम्यांचा सुगावा त्याला आधीच लागायचा. दररोज रात्री काम संपल्यानंतर त्याच्याबरोबर गप्पाटप्पांची मस्त मैफल जमायची. नावाप्रमाणेच मनानेही श्रीमंत असलेला धनेश आमच्या कित्येक पार्ट्यांचे यजमानपद आनंदाने स्विकारायचा.नंतरच्या काळात हळूहळू त्याच्या गप्पांचे विषय बदलत गेले. पिंपरीत आपल्याशी दगाबाजी झाली असं तो म्हणायचा. प्रेम प्रकरणात आपली फसवणूक झाली असं तो बोलून दाखवायचा. कुणीतरी माझ्यावर करणी केलीय, ब्लॅक मॅजिक केलंय असंही म्हणायचा. नेमकं काय ते कळत नव्हतं. पुढे तो हे वारंवार सांगू लागला .त्यासाठी तो तासंतास गप्पा मारत बसायचा. स्थळ, काळ, वेळाचंही त्याचं भान सुटत चाललं होतं. रात्ररात्रभर जागून गप्पा मारायचा. पण पूर्वीसारखे वैविध्यपूर्ण विषय नसायचे. एका मुलीने ,काही पत्रकारांनी मला फसवलंय हे सांगताना तो मनाचे मांडे रचू लागला होता. धनेशचं वागणं बदलत असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं. काही मित्रांनी त्याबाबत अन्यत्र चौकशी केली. त्यावर हे सगळे त्याच्या मनाचे भ्रम असल्याचे लक्षात आले. त्यातून त्याला बाहेर काढण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. पण ते विफल ठरले. त्याच्यातील भ्रम वाढू लागला होता.वृत्ती संशयी बनली. कोणत्याही छोट्यामोठ्या,किरकोळ
घटनांबाबत तो काहीही संशय व्यक्त करू लागला. आम्हा मित्रांबाबतही तो काहीबाही ग्रह करून बसला होता. कुणीतरी ब्लॅकमॅजिक केलंय असं तो सारखा म्हणू लागला. अनेक मित्रांनी त्याला खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण धनेश त्याच्या विचारांशी घट्ट होता. समजावून सांगण्याच्या पलिकडे तो गेला. जसे दिवस जात होत होते,तसा तो अधिक विक्षिप्त वागू लागला. मित्र त्याला टाळू लागले. एक एक करत सोडूनही गेले. त्याच्या वागण्याचा कामावरही परिणाम होत होता.जुना कर्मचारी असल्याने संस्थेने त्याला सांभाळून तिथल्या सहका-यांनीही कमालीचा सोशिकपणा दाखवत त्याला खूप मदत केली. पण, सर्वांनाच मर्यादा होती. हळूहळू, एकएक करीत सारे मित्र तुटले. भ्रमिष्ट स्वभावामुळे कुटुंबाने त्याच्याकडे पाठ फिरवली. नोकरीही सुटली. त्याच्याबद्दल कणव असल्याने काही मित्र अधुनमधून त्याच्या घरी चक्कर टाकायचे. पण तो आतां सर्वांच्या परिघातून सटकला होता.एक दिवस तो सहज घराबाहेर पडला आणि परांगदा झाला. मित्रांनी त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला. पण, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अधुनमधून काहीजणांनी त्याला अक्षरश: तुटक्या स्लिपरवर फिरताना काही ठिकाणी पाहिलं. काहींनी बोलायचा प्रयत्न केला.पण प्रत्येकाला निरनिराळं सांगून त्याने वाटेला
लावलं.आता आमच्या मित्रांबद्दलचतो काहीही बोलू लागला होता.पण काही विचारायला हातीही लागत नव्हता. बरीच वर्षं त्याचा पत्ताच नव्हता. हा मित्र कोठे असेल?हा विचार अनेकदा माझ्या मनात घोळत असायचा. त्यामुळंच इतक्या वर्षांनी थेट धनेशचाच पत्ता समजल्याने मी खूप ओढीनं तिथं धावलो. तो धनेशच होता; पण त्याच्यात अविश्वसनीय बदल झाला होता. राहणीमानाबाबत कमालीचा जागरूक असणा-या धनेशच्या अंगावर फाटका, मळकट शर्ट आणि गुडघ्यापर्यंत दुमडलेली तशीच कळकट पँटहोती. कित्येक महिने त्याच्या अंगाला पाण्याचा स्पर्श झालेला नाही,हे त्याच्या अंगावरील मळाच्या पुटावरून समजत होतं.डोईवर पिकल्या केसांचं जंगल दाटलंहोतं.दाढी अस्ताव्यस्त
होती. डोळ्यातील चमक हरवली होती. कोसळणा-या पावसात धनेश कुडकुडत दोन टप-यांच्या बेचक्यात उभा होता. त्याचा तो अवतार बघून अक्षरश: गलबलून आलं. त्या अवतारामुळे त्याच्यासमोर जायची हिंमत होत नव्हती. कसातरी मनाचा हिय्या करून विक्रमबरोबर त्याच्याशेजारी जाऊन उभा राहिलो. त्याचा एकंदर अवतार पाहता त्याला काही आठवत असेल का?त्याला समजत असेल का? असा प्रश्न पडला होता.अखेर,धीर करून बोललो.
"कायधनेश?" त्याने थंडपणे माझ्याकडे पाहिले आणि मधल्या काळात काही घडलेच नाही अशा पद्धतीने विचारले,"काय रे?'"कुठे आहेस सध्या? तो पूर्वीसारखाच बोलू लागला. गप्पा मारू लागला. त्याने मित्रांची चौकशी केली. कोण,कुठे काम करतंय असंही विचारलं. मी अवाक् झालो. दहा वर्षानंतरही त्याची स्मरणशक्ती पूर्णपणे शाबूत होती. पण,तो आजही मनाने पूर्वीच्याच काळात वावरत होता. ब-याच गप्पा मारल्या त्याने. पण गाडी पुन्हा पूर्वपदावरआली. पुन्हा तो पूर्वीप्रमाणेअसंबद्ध बोलू लागला. विषय बदलत मी सहज विचारले, "जेवलास का?' '' तू जेवायला घातलेस तर जेवीन की...'' 'त्याच्या उत्तराने पोटात अक्षरश: तुटायला झाले. कितीही इच्छा असली, तरी त्याच्या त्या मनस्थितीत ,त्या अवतारात त्याच्याबरोबर मी कुठे जाऊच शकत नव्हतो.थरथरत्या हाताने त्याच्या हातात काही पैसे ठेवून मी तेथून निघून गेलो.
धनेशच्या या परिस्थितीची कल्पना अनेक मित्रांना दिली.पण कुणीच त्याच्यासाठी काही करण्यास रस दाखवला नाही. माझ्याही काही प्रापंचिक समस्या होत्या. तसाही मी एकटा काय करू शकणार होतो? सर्वांनीच टोलवाटोलवी केली. काही दिवसांनी मी पुन्हा त्याच्याकडे गेलो. वृत्तपत्रांच्या जगात हयात घालविलेला धनेश बसस्टॉपलगतच्या फूटपाथवर अंगावर एक रद्दी वर्तमानपत्र घेऊन झोपला होता.बाजूने माशा घोंघावत होत्या.तिथं उग्र दर्प सुटला होता.तिथं थांबणं असह्य झालेलं.मी तसाच निघून आलो. काही दिवसांनी मी सहज तिथे चक्कर टाकली. पण धनेश तिथं दिसला नाही.तिथल्या टपरीवाल्यांकडे चौकशी केली. भेळवाल्यांना पाणी भरून द्यायची, साफसफाई करायची कामं तो करायचा. त्या बदल्यात त्याला दोनवेळा वडापाव मिळायचा,हे समजलं अन डोळ्यांत अश्रुंनी गर्दी केली.निरनिराळ्या घडामोडींनी मधला बराच काळ मी धनेशचा विषय विसरून गेलो.गेल्या वर्षी मी सहजच सी.पी.ऑफीसला म्हणजेच पोलीस आयुक्तालयात गेलो
होतो.सीपी ऑफीस म्हणजे पूर्वीपासूनचा आम्हा क्राईम रिपोर्टर्सचा ठिय्या. त्याच्या एका बातमीने एका पोलीस उपायुक्ताची एकारात्रीत बदली झाली होती.विशेष म्हणजे हा अधिकारी आम्हा बहुतेक क्राईम रिपोर्टर्सचा आणि धनेशचाही खास दोस्त. पण,नोकरी आणि मैत्रीत गल्लत केली नव्हती. सीपी ऑफीसमधील खंडणीप्रतिबंधक विभागाचे इन्स्पेक्टर किशोरजाधव यांच्याशी मी गप्पा मारत बसलो होतो. बाहेर गलका ऐकू येत होता. मी चौकशी केली.तिथल्या सामाजिक सुरक्षा विभागाने शहरातील भिका-यांची धरपकड केली होती.त्या पंचवीस-तीसजणांना तिथं आणलं होतं.साहेबांशी गप्पा मारून मी बाहेर पडलो. सहज त्या भिका-यांचे चेहरे न्याहाळले आणि अक्षरश: गोठूनगेलो.ज्या सी.पी.ऑफीसवर धनेशने अक्षरश: राज्य केलं होतं ,जिथल्या इन्स्पेक्टरांच्या, एसीपींच्या, डीसीपींच्या मांडीला मांडी लावून गप्पांचे फड जमवले होते,जिथल्या पोलिसांचे सलाम झेलले होते; तो धनेश पोलिसांनी दिलेला वडापाव खात गुडघ्यावर उकीडवा बसला होता. आता तर त्याची पार रया गेली होती.डोळ्यांत प्राणच उरले नव्हते. डोईवरच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. कपड्यांची तर दशा विचारायचीच सोय नव्हती. अंगावरच्या मळाची पुटं वाढली होती. मी हळूच लांबून मोबाईलमधून त्याचा फोटो काढला. कशी काय पण त्याची नजर माझ्याकडे वळाली.अतिशय सावकाश तो मान वर उचलून बघत होता. ती परत खाली झुकली.बहुदा मान उचलण्याचेही त्राण त्याच्यात उरलं नव्हतं. मी परत जाधवसाहेबांकडं गेलो. त्यांना धनेशची कहाणी सांगितली."त्यालासोडूनद्यायलासांगूका?'त्यांनी विचारलं. माझ्या गळ्यात आवंढा दाटून आला. "नको. पोलीस जिथं पाठवतील,तिथं किमान त्याच्या खाण्याची, आस-याची तरी सोय होईल' असं कसबसं म्हणून मी बाहेर पडलो.
धनेशचं बहुदा ते शेवटचंच दर्शन असावं. या घटनेला आता वर्ष उलटून गेलं.शनिवारवाड्याच्या रस्त्याने जाताना नेहमीच माझी नजर तिथल्या फूटपथवर धनेशला शोधत असते.पण आता तो तेथे नाही. त्याचं पुढं काय झालं हे ही समजलं नाही.किमान निवा-याची,खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही मित्र सहज करू शकलो असतो.खासगी हॉस्टेलला त्याला ठेवता आलं असतं.अगदी काहीच नाही तरी मेंटल हॉस्पिटल, जेल, भिक्षेकरीगृह असेही पर्याय होते. पण कोणीच पुढं आलं नाही. मित्रांनी, पत्रकारांनी थोडा मदतीचा हात पुढे केला असता, तर?..त रकदाचित धनेशसाठी बरंच काही करता आलं असतं ही सल मनाला
कायम बोचत राहते...

No comments:
Post a Comment