मधुचंद्र
- - - - - - -
तो चार मे 1997 चा दिवस होता. पुणे स्टेशननजिकच्या बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये नेहमीप्रमाणे बरीच वर्दळ होती. स्टेशनवरील चो-यामा-या,तिकीटावरून झालेली वादावादी तसेच बस-रेल्वेवाल्यांविरुद्ध असंख्य तक्रारी घेऊन प्रवासी तेथे जातात. त्याचा निपटारा करता करता पोलिसांच्या नाकीनऊ येतात. सध्या दत्तवाडी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर असलेले सतीश गोवेकर त्यावेळी त्या पोलीस स्टेशनला फौजदार होते. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तरुण युगुलाकडे त्यांचे लक्ष गेले.आकर्षक व्यक्तिमत्वाच्या त्या जोडप्याचे चेहरे चिंतेने काळवंडले होते. गोवेकर साहेबांनी त्यांची विचारपूस केली. त्यांची समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगताना उभयतांना रडू कोसळले. निखिल आणि निशा शहा हे या जोडप्याचे नाव. नुकतेच लग्न झालेले. दोघेही राजस्थानचे. जयपूरला त्यांचा नुकताच विवाह झाला होता. काश्मीर, गोवा ही पारंपारीक ठिकाणे बाजूला सारून मधुचंद्रासाठी त्यांनी महाराष्ट्राची निवड केली होती. मुंबईमध्ये भटकंती करून ते पुण्यात आले. रेल्वे स्टेशनवर त्यांना एका एजंटने गाठले. त्याने या जोडप्याला हॉटेल दाखविण्याच्या बहाण्याने भलतीकडेच नेले आणि शस्त्रांचा धाक दाखवून सर्व ऐवज लुबाडून नेला. घरी परतण्यापुरतेही पैसे या दोघांकडे उरले नव्हते. हादसों का शहर म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबापुरीत निर्धास्तपणे फिरलेल्या या जोडप्याला पेन्शनरांचे शहर असलेल्या पुण्यनगरीमध्ये लुबाडले जाणे ही पोलिसांच्यादृष्टिने शरमेची बाब होती. मधुचंद्रासाठी पुण्यात आलेल्या जोडप्यावर ही वेळ यावी याबाबत पोलिस अधिका-यांनाही मनोमन वाईट वाटले. त्यांनी या दोघांची समजूत काढली. "घरी जाण्याबाबत निर्धास्त रहा; जयपूरची तिकिटे आम्ही काढून देतो, असा धीर दिला. कोल्हापूरच्या मातीतील रांगडे गडी असलेले सतीश गोवेकर जेवढे कर्तव्यकठोर तितकेच संवेदनशीलही. त्यांनी या जोडप्याची एका हॉटेलमध्ये राहण्याची खास व्यवस्था केली. पोलिसांच्या या सरबराईने निखिल आणि निशा संकोचून गेले.
पोलिसांचा तीन दिवसांचा पाहुणचार उरकल्यानंतर या दोघांनी घरी जायची तयारी केली. त्यांची तिकिटे पोलिसांनी काढून ठेवली होती. निघताना ते दोघे गोवेकर यांना भेटायला पोलीस स्टेशनमध्ये गेले. घरी पोचल्यावर आम्हाला कळवा, असे सांगून गोवेकर यांनी त्यांना घरचा टेलीफोन क्रमांक विचारला. पण, घरी फोन नसल्याचे निखिलने सांगितले. मग, अन्य कोणा नातलगाकडे फोन असेल तर त्यांना पोलीस स्टेशनला फोन करून कळवायला सांगा, असे त्यांनी सुचवले. निखिल काहीसा चपापला. त्याची बावरलेली नजर आणि चेह-यावरील बदलते भाव पोलिसांनी अचूक टिपले. काहीतरी काळेबेरे असल्याची त्यांना शंका आली. गोवेकर यांनी निशाला बाहेर थांबवले. निखीललला विश्वासात घेऊन त्याच्याकडे पुन्हा एकदा घरची तपशीलवार चौकशी केली. त्याचवेळी एक महिला अधिकारी निशाचीही चौकशी करीत होत्या. सुरुवातीला आत्मविश्वासाने बोलणारा निखील पोलिसांच्या उलटसुलट प्रश्नांनी गडबडला. त्याचे खरे रुप उघड झाले. सरकारी पाहुणचार झोडलेल्या या जोडप्याची खरी कथा भलतीच होती.
मुळात निखिल आणि निशा यांची नावापासूनची सगळीच कथा बोगस होती. या दोघांची खरी नावे होती मयूर आणि शिरीन. दोघेही मूळचे मालेगावचे रहिवासी. मयूरची आई शिक्षिका. शिरीन त्यांची विद्यार्थिनी. त्यामुळे तिची मयूरशी ओळख आणि नंतर मैत्री झाली. त्याचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. दोघांचेही धर्म भिन्न. दोघांच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. त्यामुळे त्या दोघांनी 16एप्रिल1994ला मालेगावामधून पळ काढला. मयूरकडे थोडे पैसे होते. मालेगावहून ते कोल्हापूरला गेले. तेथे एका मंदिरात त्यांनी विवाह केला. तेथून मग हनिमूनला ते थेट बेंगळूरूला गेले. गोव्याची सफर केली. तेथील शंखनिळया समुद्रकिना-यांवर त्यांनी निवांतपणा अनुभवला. तेथून ते मुंबईला गेले. सगळी पर्यटनस्थळे पालथी घातली. मयुरकडचे पैसे पहिल्या टप्प्यातच संपले होते. पुढे काय करायचे?याबाबत विचार करताना त्यांना एक क्लृप्ती सुचली. चोराने लुबाडले असे सांगितले तर सहानुभूतीने पोलिस मदत करतील, हा त्यांचा होरा खरा ठरला. कोल्हापूरनंतर हनिमूनची पुढची सगळी सफर त्यांनी खोट्या नावाने आणि ही युक्ती वापरुन केली. पोलिसांना मामा बनवून त्यांनी यथेच्छ पाहुणचार झोडला. त्यांची ही कहाणी ऐकून सतीश गोवेकर आणि त्यांच्या सहका-यांना धक्काच बसला. प्रेमासाठी वाट्टेल ते करताना या जोडप्याने पोलिसांनाही गंडवले. पण, पुण्याच्या पोलिसांसमोर त्यांचा बनाव उघड झाला. अर्थात, हे दोघे काही गुन्हेगारी वृत्तीचे नव्हते. परीस्थितीच्या हतबलतेने त्यांनी हा मार्ग स्विकारला होता. त्यामुळे, एवढा सगळा प्रकार घडूनही माणुसकीच्या भावनेने पोलिसांनी त्यांना घरी रवाना केले. राजस्थानला नव्हे, तर ख-या घरी मालेगावला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात पंधरा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाच्या स्मृती अद्याप अनेक पोलिसांच्या मनात ताज्या आहेत.

No comments:
Post a Comment