छायाचित्राचा सूत्रधार
- - - - - - - - - - - - - - - -
पुणे शहराचा इतिहास लिहायचा ठरवला तर पानशेत धरण फुटल्याच्या घटनेशिवाय तो पूर्ण होणार नाही. त्याचप्रमाणे 1976-77 च्या सुमारास घडलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडाच्या उल्लेखाशिवायही तो अपूर्ण राहील. या हत्याकांडाच्या केवळ उल्लेखानेही आजही अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. सुशिक्षित,कलाकार तरुणांच्या टोळक्याने अतिशय थंड डोक्याने दहाजणांच्या केलेल्या या भीषण हत्याकांडाने उभा महाराष्ट हादरला होता. या प्रकरणातील क्रौर्य एवढे आहे, की अद्यापही त्या बाबतच्या अनेक वाद,प्रवाद आणि काळ्याकुट्ट आठवणींचा उल्लेख कोठे ना कोठे, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने होत असतो.
राजेंद्र यल्लाप्पा जक्कल हा या टोळीचा सूत्रधार. दिलीप सुतार, मुनव्वर शाह आणि शांताराम जगताप या साथीदारांच्या मदतीने त्याने पुण्यातील दोन उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित कुटुंबियांचे खून केले आणि कधी नव्हे इतके पुणे त्यावेळी भयभीत झाले. आपल्या मित्राचा, मित्राच्या भावाचा खून करतानाही या टोळक्याचे हात आजिबात कचरले नाहीत. या खूनसत्राने हादरलेले पुणे त्याकाळी सायंकाळी सात वाजताच चिडीचूप होत होते. पोलिसांनी कौशल्याने तपास करून जक्कल आणि चौकडीला गजाआड केले. राजेंद्र जक्कल हाच या हत्याकांडामागील सूत्रधार असल्याचे तपासांतर्गत स्पष्ट झाले. पुढे या सर्व हत्याकांडावर आधारीत 'माफीचा साक्षीदार' या नावाने मराठी चित्रपट आला. त्यामध्ये नाना पाटेकरने साकारलेला थंड डोक्याचा पण अतिशय निर्दयी जक्कल पाहून रसिकांच्या अंगावर सरसरून काटा उभा रहायचा.
या खूनसत्रामध्ये पहिला बळी गेला प्रकाश हेगडेचा. दिवस होता 16 जानेवारी1976.. . तेव्हापासून वर्षभर हत्यांचे हे सुरू होते. हेगडेनंतर दोन आगस्ट 76 ला या टोळक्याने कोल्हापूरमधील एका घरावर दरोडा घालायचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ 31आक्टोबर 1976 ला ला विजयानगर कॉलनीतील अच्युतराव व उषाताई जोशी दांपत्याची व त्यांचा मुलगा आनंद यांची गळफास लावून हत्या केली. एक डिसेंबर 1976 ला तर कहर झाला. तो काळा दिवस उजाडला ते संस्कृतचे विद्वान पंडित काशीनाथ शास्त्री अभ्यंकर, त्यांची पत्नी इंदिरा, मोलकरीण सखुबाई, नातू धनंजय आणि नात जाई या सहाजणांच्य खुनाची निर्घृण हत्या झाल्याची बातमी घेऊनच्. त्या पाठोपाठ 23 मार्च 1977ला अनिल गोखले याचा बळी गेला.
भांडारकर रस्त्यावरील ‘स्मृती’ बंगल्यातील अभ्यंकर कुटुंबियांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र् हादरला. या गुन्ह्यांमुळे नागरीक भयभीत झाले. दहशत वाढली. भीतीचे सावट अधिक गडद झाले. सायंकाळनंतर अंधार पडताच रस्ते निर्मनुष्य होऊ लागले. पोलिसांनी तपासाची दिशा बदलली . निरनिराळी पथके खुन्यांच्या मागावर होती. मनावर दडपण घेऊनच पुणेकर रोजचे वर्तमानपत्र उघडत होते. काशीनाथशास्त्री अभ्यंकरांबरोबरच त्यांची नात जाई आणि मारल्या गेलेल्या सर्व कुटुंबियांची छायाचित्रे पाहून अनेकजण हळहळले. अभ्यंकर कुटुंबियांच्या नातलगांनी ही छायाचित्रे उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी एका आघाडीच्या दैनिकात खून झाल्यानंतर काढलेली प्रत्यक्ष मृतदेहांचीच छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ती पाहून लोकांना मारेक-यांनी गाठलेल्या क्रौर्याच्या परीसीमेची अधिक प्रकर्षाने जाणीव झाली.खुनाचे नेमके हेतूच लक्षात येत नसल्याने पोलिस तपास भरकटला होता. या टोळक्याने एक मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे केले होते. या खूनसत्रामध्ये पहिला बळी पडलेला हेगडे हा तर जक्कलचा मित्रच्, तर गोखले हा मित्राचा भाऊ. हेगडे याच्या खुनाचा तपास का लागत नाही, याचा जाब विचारण्यासाठी जक्कल नेहमी पोलिस ठाण्यात जायचा. एवढेच नव्हे तर हेगडेच्या अंत्ययात्रेत पार्थिवाला खांदा द्यायचा निगरगट्ट्पणा त्याने दाखवला होता. एवढ्या थंड रक्ताच्या, निर्दयी जक्कलनेच हेगडे याचा खून केला असावा अशी यत्किंचीतही शंका पोलिसांना तेव्हा आली नव्हती. परंतु, त्याच्या वारंवार पोलिस ठाण्यात जाण्याने आणि हाती लागलेल्या काही दुव्यांच्याआधारे एके दिवशी पोलिसांनी त्याच्या आणि या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्या तपासातून या सूत्रधाराची एकामागोमाग एक दुष्क़ृत्ये बाहेर पडली.
त्या काळात दूरचित्रवाहिन्या नव्हत्या. रेडिओ,टीव्ही संच मोजके होते. त्यामुळे वृत्तपत्रे हाच माहिती मिळविंण्याचा एकमेव स्त्रोत होता. सर्वच वृत्तपत्रे या हत्याकांडाचे अधिकाधिक तपशीलवार, ताजे वृत्त आणि छायाचित्रे देण्याचे प्रयत्न करीत होती. त्यावेळी दळणवळणाची,संपर्काची साधने मर्यादीत होती. आतासारखे अत्याधुनिक कॅमेरे नव्हते. चॅनेल्सच्या ओबी व्हॅन्सची धावपळ नव्हती. सध्या बहुतेक वृत्तपत्रांच्या पदरी छायाचित्रकारांची फौज असते. त्यावेळी जेमतेम एखादा छायाचित्रकार संस्थेमध्ये असायचा. कित्येकदा एखाद्या समारंभाचे, अपघाताचे अथवा कोणत्याही घटनेचे छायाचित्र वाचकांकडूनच वृत्तपत्रांना दिले जात असे. त्यासाठी मानधन मिळत नसे, पण छायाचित्रकाराचे नाव मात्र आवर्जून दिले जायचे.
जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने प्रसिद्ध झालेल्या या तपासाच्यावेळी सूत्रधार जक्कलचा कमालीचा थंडपणा पोलिसांच्या लक्षात आला. तो शांतपणे, आजिबात विचलीत न होता केलेल्या दुष्कृत्यांची तपशीलवार माहिती पोलिसांना देत होता. या दरम्यान, एका पोलिस अधिका-याने सहजपणे हे हत्याकांड घडले त्यावेळची वृत्तपत्रे चाळली. त्यामध्ये अभ्यंकर कुटुंबियांच्या खुनाच्या बातमीत एका वृत्तपत्राने थेट घटनास्थळी मृतदेह पडल्याचा छापलेला फोटो होता. घटना जर रात्री घडली व दुस-या दिवशी सकाळी उघडकीस आली तर मग तेथील फोटो वृत्तपत्रात कसा? असा विचार त्या अधिका-याच्या मनात आला. त्याची नजर सहजपणे फोटोच्या खाली गेली.
तेथे नाव लिहिले होते : छायाचित्रकार -राजेंद्र जक्कल. हा काय प्रकार आहे, हे पोलिसांना कळेना... त्यांनी तत्कालीन पत्रकारांकडे चौकशी केली. संबंधीत वर्तमानपत्राच्या क्राईम रिपोर्टरकडेही चौकशी केली. त्यातून मिळालेली माहिती अचंबित करणारी होती...
अभ्यंकर कुटुंबियांचे हत्याकांड घडविल्यानंतर जक्कलने स्वत:च तेथील छायचित्रे काढली होती.त्याचा बुधवार पेठेतील बेलबाग चौकात स्टुडिओ होता. त्या स्टुडिओखाली असलेल्या एका खासगी कार्यालयात हा पत्रकार पार्टटाईम काम करायचा... त्यामुळे त्याची जक्कलशी त्याची ओळख होती. पुण्यात हैदोस घालणा-या टोळक्याचा सूत्रधार जक्कल असेल याची त्यांना यत्किंचीतही कल्पना नव्हती..अभ्यंकर कुटुंबियांचा खून झाले त्याच्या दुस-या दिवशी या पत्रकाराने सहजपणे जक्कलशी हा विषय काढला. त्या घटनेचे फोटो असते, तर बरे झाले असते असे ते सहजपणे बोलून गेले. त्यावर अनेक फोटोग्राफर माझे मित्र असल्याचे सांगत फोटो मिळाल्यास आपण जरूर देऊ असे त्याने सांगितले. तसेच, दुपारी त्याने ते फोटो त्या पत्रकाराला दिलेही....त्यावेळी हे फोटो त्याच्याकडे कसे आले असा प्रश्न ना त्या पत्रकाराला पडला ना त्या वृत्तपत्रातील कोणा कर्मचा-यांना...प्रतिस्पर्धी वृत्तपत्रापेक्षा आपण कव्हरेजमध्ये बाजी मारली याच आनंदात सारी मंडळी होती...पण चाणाक्ष पोलीस अधिका-यामुळे या छायाचित्रांमागील 'सूत्रधार' उघड झाला आणि तो पत्रकार मुळासकट हादरला. सूत्रधाराचा हा कमालीचा थंडपणा आणि कोडगेपणा पाहून तो पोलिस अधिकारी अचंबित झाला. या खटल्याची सुनावणी होऊन वीस वर्षांपूर्वी 28 सप्टेंबर 19७८ ला या चारही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. सूत्रधार जक्कलसह चौघे आरोपी 25 आक्टोबर 1983 ला फासावर लटकले आणि एका दुर्दैवी पर्वाची एकदाची अखेर झाली.
(टिप: माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ असलेल्या एका पत्रकाराच्या आयुष्यात हा किस्सा घडला. त्याने आणि संबंधीत पोलीस अधिका-याने आपल्या हयातीत त्याची वाच्यता होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतली. त्यामुळे अगदी मोजक्याच व्यक्तींना हा किस्सा माहिती होता. आता ते हयात नाहीत...त्यामुळे बरेच वर्षे मनात दडवून ठेवलेल्या सूत्रधाराचा हा किस्सा शेअर करावासा वाटला. . ..

No comments:
Post a Comment