Wednesday, 21 November 2018

पुरुष

पुरुष
 - - --
'' जाओ घरको...बोलो अपने घरवालोंसे ...उन्होंने आदमी को नही हिजडे को जनम दिया है............''
स्टार गोल्डला  'प्रहार' लागला होता... सोपवलेलं काम करायला कचरणा-या कमांडोंना त्यांचा बॉस असलेला नाना शिव्या घालत होता.. चाळीतल्या चौकात सगळेजण एकत्र पिच्चर बघत बसलेलो...नानाच्या कडक अभिनयाला दाद देत होतो...अचानक सुरेशमामा उठले...संतापाने घरात गेले.... आम्ही फारसं काही बोलूही शकलो नव्हतो...बोलू शकतही नव्हतो.....एकाने सहज त्यांच्या घरात डोकावलं...मामा रडत होते...हो ...मामा चक्क रडत होते...हातात  घट्ट धरलेला त्यांच्या शिरीषचा फोटो होता....कधीतरी लहानपणी काढलेला.  . हौसेनं फ्रॉक घालून...पण...त्या फ्रॉकनेच त्यांचा घात केला होता
 अख्ख्या कॉलनीत दरारा असलेल्या मामांचा मुलगा..शिरीष काहीसा मुलींसारखा वागू लागला होता..... किशोरवयात त्याचा आवाज फुटला नव्हता.मिसरुडाच्या जागी पातळ मऊशार दिसेल न दिसेल अशी लव होती...चालणं बोलणं तर मुलींसारखंच होतं . . .. चर्चा सगळीकडं व्हायची. . कॉलेजमध्ये...क्लासमध्ये....कॉलनीत....सगळीकडे.....मामींनी खूप समजावून सांगितलं...पण शिरीषमध्ये काहीच परिणाम नव्हता...मामी जवळपास खचून गेल्या होत्या. . .. कामाच्या व्यापात गर्क असलेल्या मामांच्या अंमळ उशीराच ही बाब लक्षात आली...मामा मनात कुढायला लागले....करणार काय? एरवी समाजात वाघ असलेले मामा काय करू शकत होते?
 चाळीशीला पोचले असले तरी दणकट शरीरयष्टीमुळं मामांचं वय लक्षात यायचं नाही... कंपनीत युनियन लिडर होते ते...अंगात रग होती आणि धाडसही...त्यामुळे भलीभली टाळकीही त्यांना टरकून असायची...कॉलनीतल्या कुणा मुलींची टिंगल करायची कुणाची टाप नव्हती आणि फालतूपणा करणा-यांनाही मामांचा चाप असायचा. गावात ओळखीपाळखी चांगल्या...त्यामुळं मामा आमच्या कॉलनीत सर्वांचा आधार वाटायचे. . ते मूळचे  कोकणातील ...पोट भरायला पुण्यात आले आणि इथलेच रहिवासी झाले. कॉलनीतल्या सगळ्या सण उत्सवांमध्ये ते उत्साहाने सहभागी होत....मामीही तशाच मनमिळावू....शिरीष आमच्यापेक्षा 7-8 वर्षांनी लहान...वाढला आमच्यासोबतच...शेजारच्या सावनीशी त्याची खास मैत्री...लहानपणापासून अगदी कॉलेजमध्येही दोघं एकत्र...एकाच वर्गात...त्यामुळं सावनीची खूप सावली त्याच्यावर पडलेली...कदाचित त्याच्या भाषेत बायकी लहेजा असायचा...अय्या...इश्श...वगैरे मधूनच बोलून जायचा...चालही काहीशी बायकी झाली होती... मामांमुळं कुणी उघडपणे काही बोलत नव्हते...पण चर्चा व्हायचीच..मामी दैवाला दोष देत एकांतात अश्रू ढाळत...मामांना सुरुवातीला फारसं काहीच समजलं नव्हत...कानावर आलं तेव्हा विश्वास बसला नाही...पण , बारकाईने नजर ठेवल्यावर त्यांना लक्षात आलं आणि कमालीचा धक्का बसला....पण करणार काय? काळजी करू नकोस. . . . कॉलेजला गेल्यावर त्याच्यात फरक पडेल . .असं सांगून त्याच्या काही मित्रांनी समजूत काढली खरी....पण मामा मनातून कोसळले होते...कधीकाळी जीव की प्राण असलेला शिरीष त्याला डोळ्यासमोरही नको होता....मामीने गुपचूप काही देवदेवस्कीचे उपाय केले. . . पण शिरीषवर काहीच परीणाम झाला नव्हता  . . .कॉलेजमध्येही तो  तसाच वागत होता. . पण, त्याला स्वत:ला काहीच वेगळं वाटत नव्हतं..कॉलेजमध्येही तो पोरांच्या टिंगलीचा विषय बनला होता. . . सुरूवातीला वाईट वाटलं त्याला. .  .पण नंतर त्याने सरळ दुर्लक्ष करायला सुरूवात  केली....अखेर सुरेश मामाचा पोरगा होता तो. . .शरीर दणकट नसलं म्हणून काय झालं? मन तर कणखर  होतं ना. . . .कॉलेजमध्ये त्याला मित्र नव्हते अशातला भाग नव्हता...पण रमायचा तो सावनी आणि तिच्या मैत्रिणींमध्ये . .. खरंतर या वयातील मुले मुलींशी बोलायला लागली की पालकांना उर कसा भरून येतो....पण शिरीषच्याबाबत उलट घडत होतं....तो मुलींच्या ग्रुपमध्ये दिसला की मामा-मामींचा जास्तच तडफडाट व्हायचा . . . पण एक होतं.....शिरीष नेमका 'तसा' आहे की तसा आभास होतो? याबाबत पोरांची मतभिन्नता होती. . .काहींना वाटायचं तो पूर्णपणे 'मधला' आहे....काही म्हणायचे तो निम्मा 'तसा' आहे...काही म्हणायचे असेलही राव तो पुरुष. . . कुणी तपासून पाह्यलं त्याचं...पोरं आपापलं ज्ञान पाजळायचे. . .तसा शिरीष आमच्यातही यायचा. . . काय दादा..काय भाऊ म्हणत गप्पा मारायचा. . . त्याचं मन निर्लेप असायचं. . .आमच्याच मनात काहीबाही यायचं . .. विशेषत: तो रात्रीच्या सुमारास भेटला की भलतंच मनात यायचं. .  .एकमात्र खरं की त्याचा स्पर्श मात्र नक्कीच थंडगार आणि काहीसा नकोनकोसा वाटणारा असायचा . . .मामाचा पोरगा म्हणून पोरं गप्प होती. . .सगळं काही सभ्य व्यवहार . . . . असेच दिवस चालले होते. . .मामी काळवंडत चालल्या होत्या. . मामा गप गप राहू लागले होते....काहीसे आमच्यापासून फटकून राहत होते....गणपतीचे दिवस आले. . .आम्ही वर्गणीसाठी मामांना यायचा आग्रह केला . . .ते आले नाही . . मामा पूर्वीचे राहीले नव्हते . .शिरीष आला...सावनी आली. . . कॉलनीतली इतर पोर-पोरी जमली . . उत्सव धडाक्यात सुरू झाला. . रोज निरनिराळे कार्यक्रम व्हायचे. . .खूप मजा यायची. . पोरंपोरी निरनिराळे कार्यक्रम करायचे .. .सगळी ज्येष्ठ मंडळी एकत्र बसून कार्यक्रमाचा आनंद लुटायची. . .या कार्यक्रमांना मात्र मामा - मामी आवर्जून यायचे. . . यायलाच लागायचं...कारण घरात थांबायची परवानगीच नसायची ना . .
 उत्सवामध्ये त्या दिवशी मात्र एक आगळाच प्रसंग घडला . .फडकेंचा गाण्याचा कार्यक्रम ठरवला होता. . . कॉलनीतली सगळी पोर एकाबाजूला, मुली दुस-या बाजूला आणि मधे ज्येष्ठ् मंडळी बसली होती. .. सावनी आमच्या डाव्या बाजूला पुढे आणि शिरीष आमच्याच ग्रुपमध्ये मागे बसला होता...अन्या सगळ्यात मागे होता. . .
सुरूवात तर मस्तच झाली . ..सगळी गाणी एकाहून एक सरस होत चालली होती...कार्यक्रम भलताच रंगात आला होता.  .माझे लक्ष अधूनमधून सावनीकडे जायचे. .  होतीच तशी ती रसरशीत . .एका गाण्यानंतर मी पाहिले, तर सावनीची जागा मोकळी होती . .मी चमकलो. . अन्याकडे पाह्यलं, तर तोच मला खुणावत होता. . .शक्य तो कुणाचं लक्ष जाणार नाही अशा बेताने मी तिथं गेलो...''शिरीष आणि सावनी शिरीषच्या घरात गेलेत .. .  मगाशी मी पाह्यलंय .. चल बघू काय भानगड आहे ते ''. मग आम्ही दोघे अलगद जिना चढून वरच्या मजल्यावर गेलो. . दारं खिडक्या बंद होत्या. . .चौकातला लाईट बंद असल्याने आम्ही मागच्या गॅलरीत गेलो...खिडकीच्या कठड्यावर चढून मी व्हेंटीलेटरवरून आत डोकावलो आणि हादरलोच....शिरीष आणि सावनी यांचा प्रणयाचा खेळ बहरात आला होता...श्वास-उच्छवासांच्या आवर्तनांनी दोघेही घामजली होती...शिरीष आजिबात 'मधला' नव्हता...तो पूर्ण पुरुष होता .. .
एकंदर अंदाज घेऊन आन्या आणि मी खाली आलो...छाती धडधडत होती. . .पायात गोळे आले होते....पण मन कुठतरी सुखावलं होतं...पण हे मामाला कळणं अधिक गरजेचं होतं. . . .आन्याने हळूच मामाला बोलावलं .. घरात बहुदा कोणतरी चोर शिरलाय. . .शटरमधून पाहून आधी खात्री करा आणि आम्हाला आवाज द्या...आम्ही तयार राहतो ..  . मामा लगबगीने वर गेले. . .शटरमधून त्यांनी डोकावले....शिरीष आणि सावनीच्या प्रणयाने बहुदा शिखर गाठले असावे. .. . मामाला काहीच सुचेना. . .आम्ही अंधारातून पाहत होतो सगळं . . . कसाबसा मामा .. जिने उतरून खाली आला. .. . त्याचे डोळे आसवांनी डबडबले होते .. . कार्यक्रमात सुवर्णाचा आवाज टीपेला पोचला होता...
''हमने पी चाँदनी आधी रात को,
 चाँद आँखों में आया आधी रात को
बेला महका रे महका आधी रात को
मन क्यूं बहका रे बहका आधी रात को...
सुवर्णा मनसोक्त गात होती . . .श्रोत्यांचा प्रतिसादही उत्स्फूर्त होता. . .मामांचे डोळ्यांतून घळाघळा आनंदाश्रू ओघळत होते. . .

No comments:

Post a Comment