बुलंदी
.........
टीव्हीवर जेव्हा जेव्हा 'सत्या' बघतो ना, तेव्हा तेव्हा त्यातला भिकू म्हात्रे पाह्यल्यावर मला प्रदीप आठवल्याशिवाय राहत नाही....सेम टू सेम तशीच देहबोली, तशीच भाषा आणि पेशाही तोच्... ..प्रदीप सोनवणे आणि अश्रफ रामपुरी या दोन नावांभोवती पुण्यात 90 च्या दशकात भलतच वलय होतं. दोघेही गँगस्टर्स.. ..दोघेही उमद्या व्यक्तिमत्वाचे आणि मुंबईतल्या अंडरवर्ल्डशी डायरेकट् कनेक्टेड...त्यामुळं माझी त्यांच्याशी असलेली मैत्री अनेकांना खटकायची..पण खरंतर हे दोघेही 'भाई' होण्याच्या आधीपासून माझे मित्र होते..आणि त्यांनी कधीच् माझ्या कामात किंचितही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्नही केला नव्हता..उलट माझ्या लेखणीचे फटकारे त्यांनी गुमान सोसले होते..या दोघांची भलतीच क्रेझ त्यावेळी पुण्यात होती.. त्या काळात म्हणजे 90 च्या दशकात मी लोकसत्तातून क्राईम रिपोर्टींग सुरू केली..तो काळ सर्वच क्षेत्रात अमूलाग्र बदल होण्याचा होता..गुन्हेगारी विश्वही त्याला अपवाद नव्हतं.. प्रदीपसह त्याच्या समकालीन गुंडांमध्ये भाषेपासून कार्यपद्धतीपर्यंत सर्व शैलीत बदल झाला..त्यांना राजकीय वरदहस्त लाभला. अवघ्या विशीतले तरुण या क्षेत्राकडे खेचले गेले..उच्च आर्थिक स्तरापासून सामान्य स्तरातली पोरं त्यात होती..पहिल्या वर्गाला मुंबईतल्या माफियांचं आकर्षण होतं; तर, सामान्यांसाठी चट्कन पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय ठरला..कधीकाळी केवळ वर्चस्वासाठी होणाऱ्या गुन्हेगारीत बक्कळ पैसा आला..'मॅटर' हा परवलीचा शब्द बनला.. गुन्हेगारीतील बदलाची ती चाहूल होती.. संघटित गुन्हेगारी अधिक चकचकीत झाली...गुन्हेगारांचा परंपरागत पांढरा ड्रेस बदलला...जीन्स, टी शर्ट, जॅकेट घालणाऱ्या नव्या पिढीतील गुन्हेगारांच्या गळ्यात सोन्याच्या चेन्स लकाकू लागल्या..रामपुरी चाकूची जागा देशी-विदेशी कट्टयांनी घेतली..प्रदीप, अश्रफ बरोबरच मेघनाथ शेट्टी, मुन्ना शेख, रफिक शेख, अनिल हेगडे, नितीन जाधव, बाबा भोसले, अण्णा पिल्ले, थॉमस, दिलबाग सिंग ही नावे गुन्हेगारी विश्वात उदयाला आली..त्यांच्याआड मुंबईत बसलेल्या अरुण गवळी, अश्विन नाईक, छोटा राजन या त्यांच्या गॉड फादर्सचे चेहरे डोकवायला लागले होते..त्यामुळं पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं होतं....त्यांचा निडरपणा,कौशल्य, नेटवर्क पणाला लागलं..त्या सुमारास या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिलीप शिंदे, विनोद सातव, राजेंद्र जोशी, अजित जोशी, अरुण वालतुरे,राम जाधव, सतीश गोवेकर,किशोर जाधव असे अनेक दमदार पोलीस अधिकारी माझे घट्ट मित्र बनले..त्याचकाळात गुन्हेगारी विश्वात जबरदस्त दरारा निर्माण केलेलं एका बुलंद व्यक्तिमत्व होतं ते अण्णा कोंढरेंचं..
अण्णा पोलीस खात्यात हवालदार होते...पण, त्यांच्या कामाचा धडाका अवाक् करणारा होता..अण्णांचं खरं नाव विठ्ठल कोंढरे.. मुळशीतल्या कोंढुर या छोट्याश्या गावातून हा रांगडा गडी पोलीस खात्यात भरती झालेला..गावातल्या शुद्ध हवेवर, गावरान दुधातुपावर आणि तालमीतल्या व्यायामावर पोसलेला अण्णांचा देह पिळदार आणि कणखर होता.. त्यामुळं कित्येक लोक त्यांना पैलवान या नावानंही ओळखायचे..त्यावेळी बदलत्या काळाची गरज ओळखून क्राईम ब्रँचनं दरोडा प्रतिबंधक पथक नव्यानं सुरू केलं होतं..अर्थातच अण्णा हेच या पथकाचे सर्वेसर्वा होते..त्यांच्यासोबत उदय मोरे, दिलीप मोहिते, अशोक ढुमणे, प्रदीप क्षीरसागर असे बिनीचे शिलेदार होते.या पथकाने गुन्हेगारांवर जबरदस्त वचक निर्माण केला होता.कित्येक अट्टल गुंडांची भर रस्त्यात चामडी सोलून काढली..दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची कंबरडी मोडून काढली..कोलेजवर दादागिरी करणाऱ्या, मुलींची छेड काढणाऱ्या रोमिओंना धडा शिकवला. त्यामुळं अण्णांचं नाव ऐकूनच भल्याभल्या गुंडांची गाळण उडायची..पत्रकारितेच्या प्रारंभीच्या दिवसांतच माझे अण्णांशी स्नेहबंध जुळले ते कायमचेच..
.वैयक्तिक आयुष्यात कित्येक कठीण टप्प्यावर ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले...त्यामुळेच अडचणीचे प्रसंग सुकर झाले. आणि हा जसा मला त्यांचा आधार वाटला, तसे ते अनेकांचे आधारस्तंभ होते.तेवढा विश्वास त्यांनी कमावला होता.त्यामुळेच त्यांची जबरदस्त हवा तयार झाली..तो काळ सोशल मिडियाचा नव्हता..तेव्हा व्हॉट्स अप, फेसबुक असतं तर नक्कीच त्यांच्या नावाचे कित्येक ग्रुप तयार झाले असते आणि त्याला फॅन फॉलोइंगही जबरदस्त लाभली असती..केवळ पुणे शहरच नव्हे तर आजूबाजूची उपनगरं, पिंपरी चिंचवडचा परिसर आणि ग्रामीण भागात ही अण्णांना मानणारा युवक वर्ग मोठा होता..त्याचं मुख्य कारण म्हणजे पूर्णतः निर्व्यसनी असलेल्या अण्णांचं बुलंद व्यक्तिमत्व...जितके प्रेमळ तितकेच गुन्हेगारासाठी कठोर असणारे अण्णा शब्दाला पक्के होते..कुठल्याही अट्टल गुन्हेगाराला थेट भिडण्याची त्यांची हिम्मत होती..खब-यांचं अफाट नेटवर्क आणि गुन्हेगारांचा माग काढण्याचं त्यांचं कौशल्य वादातीत होतं..प्रत्येक गुन्हेगारांचा अड्डा, त्याचे जवळचे साथीदार, लपायची ठिकाणं ,त्याची व्यसनं अइत्यंभूत माहिती त्यांच्याकडं असायची.. येरवड्यातील मेघनाथ उर्फ बुधल्या शेट्टीची येरवडा परिसरात खूप दहशत होती..बरेच दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता..अखेर, एकदा तो आता पोलीस उपअधीक्षक असलेल्या राजेंद्र जोशींच्या पथकाच्या हाती लागला खरा, पण त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. जोशींच्या पथकानेही प्रत्युत्तर दिलं. त्या चकमकीत तो मारला गेला...हे एन्काऊंटर पुण्यात बरंच गाजलं..त्या मोहिमेत अण्णांचा सहभाग मोलाचा होता..प्रमोद माळवदकर या कुप्रसिद्ध गुन्हेगाराने त्या काळात खूप उपद्रव निर्माण केला होता.. पण तो पोलिसांच्या हाती काही लागत नव्हता...अण्णांनी त्याची नेमकी टीप काढली..दिल्ली आग्रा भागात बरीच शोधाशोध केली आणि तिथल्या एका ढाब्यावर त्याच्या मुसक्या आवळल्या.. त्यानंतरच्या काळात एक प्रेमप्रकरण पोलिसांसाठी आव्हान ठरलं होतं.. मुंबईतली किशोरवयीन मुलगी पुण्यातल्या एका श्रमिक वस्तीतल्या मुलाबरोबर पळून गेली होती.. खूप तपास करूनही या जोडीचा थांगपत्ता लागत नव्हता.एकतर या प्रकरणाला धार्मिक रंग होता..त्यात मुलीचे वडील उच्चभ्रू उद्योगपती होते..त्यामुळं तत्कालीन गृह मंत्रालयाने या प्रकरणाचा विशेष तपास करायचे आदेश दिले होते.. खूप शोध घेऊनही त्यांची माहिती मिळत नव्हती...वरिष्ठ अधिका-यांनी अण्णांकडं तपास सोपवला. बरेच प्रयत्न केल्यावर अखेर हे जोडपं आंध्र प्रदेशमधल्या एका खेडेगावात असल्याचं अण्णांना समजलं..मग ते पथकासह तिथं गेले..वेशांतर करून बरेच दिवस तिथं शोधाशोध केली...आणि या प्रेमी युगुलाला तिथून घेऊनच ते पुण्याला आले.पुण्यातल्या टोळीयुद्धातले बरेच तपास त्यांनी केले.संघटित टोळ्यांवर वचक निर्माण केला.कित्येक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यात अण्णांचा मोठा सहभाग होता..तसं तर अण्णांनी तपास केलेल्या गुन्ह्यांवर लिहायची म्हटलं तर एखादं पुस्तक सहज तयार होईल, इतकी त्यांची कारकीर्द लखलखीत होती.
कोणत्याही क्षेत्रात चमकदार काम करणाऱ्याला किंवा चाकोरीबाहेर जाऊन काम करणाऱ्याला अनेकदा टीकाही सोसावी लागते...अण्णांनाही ते चुकलं नाही..त्यांच्यावर अनेकदा विवादास्पद आरोप झाले..चोहोबाजूने वाढत असलेल्या वलयामुळं, गुन्हे उघडकीस आणण्याच्या वाढत्या स्कोअरमुळं खात्यातल्या अनेकांचा जळफळाट व्हायचा..त्यातून त्यांच्या कामात खुसपटं काढायचे प्रयत्न झाले.. बाळू आंदेकरपासून संदीप मोहोळपर्यंत गुन्हेगारांच्या अनेक पिढ्या पाहिलेल्या अण्णांवर अंडरवर्ल्डचे सूत्रधार असल्याचे आरोप केले गेले..त्यांच्या संबंधांबाबत आक्षेप घेतले गेले..पण साऱ्या चौकशांमधून ते तावून सुलाखून बाहेर पडले... दुप्पट जोमाने काम करत राहिले.प्रदीप शिंदे, सुनील पवार Sunil, शैलेश जगताप Shailesh अशी पोलीस खात्यातली रत्ने शोधून त्यांना पैलू पाडून ती अधिक चमकदार केली...दहा वर्षांपूर्वी अण्णा निवृत्त झाले... मग त्यांनी गाव गाठलं...तिथं ते शेतीकामात मग्न झाले..
..गेल्या दहा वर्षांत पुण्यातली परिस्थिती पुन्हा बिघडायला लागलीय...गुन्हेगारी टोळ्यांनी तोंड वर काढलंय.... अधूनमधून गॅंगवॉर भडकतं.. आता पुन्हा एकदा अण्णांची टीम असण्याची गरज निर्माण झालीय.अनेक नवी पोरं गुन्हेगारीत आलीत..सगळ्याच क्षेत्रातली जुनी मंडळी हळूहळू निरोप घेऊ लागलीत..साधारणतः कुठलीही एखादी व्यक्ती गेली की त्या वर्तुळातली दुसरी व्यक्तीही पाठोपाठ जाते अशी अनेक उदाहरणं मला माहिती आहेत...पंधरा वर्षांपूर्वी प्रदीप गेला .त्यानंतर दोन चार महिन्यांतच् अश्रफ गेला...बुधल्या शेट्टी गेला....रफिक गेला...निवृत्त पोलीस अधिकारी माणिकराव दमामे आणि बापू साळुंखे खास मित्र..मध्यंतरी ते दोघे एकापाठोपाठ गेले..अगदी आत्ता चार महिन्यांपूर्वी अण्णांच्या टीममधला माझा खास मित्र उदय मोरे गेला...त्यातून आम्ही मित्र सावरतोय न सावरतोय तोच् परवा अण्णाही अचानक हे जग सोडून गेले..हा बुलंद धक्का पचवणं खरंच खूप कठीण आहे..

No comments:
Post a Comment