राजकारणातील नातीगोती :-
- - - - - - - - - - -
रक्ताची नाती राजकारणात प्रभावी असतात. नगर जिल्ह्यात मागच्या पिढीत खासदार पंढरीनाथ कानवडे प्रसिद्ध पुढारी होते...नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध पुढारी काकासाहेब वाघ हे
त्यांचे व्याही...नगरमधून खासदार झालेले चंद्रभान आठरे हे कानवड्यांचे जावई..कानवड्यांचे
दुसरे जावई म्हणजे बाळासाहेब विखे यांचे बंधू...शिर्डीचे तत्कालीन आमदार अण्णासाहेब
म्हस्के आणि बाळासाहेब विखे एकमेकांचे मावसभाऊ...म्हस्के यांच्या मेव्हण्याचे बंधू म्हणजे अप्पासाहेब राजळे..अप्पासाहेबांचे सासरे म्हणजे माजी मंत्री भाऊसाहेब थोरात...भाऊसाहेबांचे दुसरे जावई म्हणजे नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कम्युनिस्ट नेते अरूण कडू..त्यांचे वडील म्हणजे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व माजी आमदार पी. बी. कडू...भाऊसाहेबांचे तिसरे जावई म्हणजे संगमनेरचे माजी नगराध्यक्ष डॉ. तांबे...भाऊसाहेबांचे चिरंजीव म्हणजे विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात...अण्णासाहेब म्हस्क्यांचे साडू, भाऊसाहेब थोरातांचे मेव्हणे माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे...अण्णासाहेबांचे एक व्याही दौंडचे बाळासाहेब जगदाळे व विहिणबाई उषादेवी जगदाळे...हे दोघेही आमदार होते....दुसरे व्याही व्यंकटराव हिरे आणि चुलत विहिणबाई पुष्पाताई हिरे....व्यंकटरावांचे वडील भाऊसाहेब हिरे आणि चुलतभाऊ डॉ. बळीराम हिरे हे सारे मंत्री होते...माजी आमदार तनपुरे यांचे चिरंजीव प्रसाद तनपुरे आमदार झाले...त्यांचे सासरे म्हणजे राजारामबापू पाटील...व मेव्हणे जयंत पाटील.....काकासाहेब वाघ यांचे चिरंजीव डॉ.प्रताप वाघ नाशिकचे खासदार होते....त्यांचे जावई कोपरगावचे माजी मंत्री व सहकार क्षेत्रातील बडे नाव शंकरराव कोल्हे. दुसरे जावई नाशिकचे माजी आमदार व खासदारही झालेले डॉ. दौलतराव आहेर...नाशिकचे खासदार डॉ. वसंतराव पवार हे शंकरराव कोल्ह्यांचे जावई, म्हणजेच काकासाहेब वाघांचे नातजावई....न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचे चुलते म्हणजे ल. मा.पाटील हे मराठा समाजातील पहिले मंत्री..कोळसे पाटलांचे मावसचुलते म्हणजे कॉम्रेड पी.बी.कडू यांचे चिरंजीव अरूण कडू.......एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, ती म्हणजे ही सर्व मंडळी आपापल्या गुणांनी, कर्तबगारीने आणि हिंमतीने पुढे आली आहेत...त्यांना पुढे येण्यासाठी कुणाचीही मदत लागलेली नाही...आपापली लायकी सिद्ध केल्यावर मात्र राजकीय वर्तुळातील ही मंडळी अधूनमधून एकमेकांना मदत करतात. . . .
सध्याच्या निवडणुकांच्या या दिवसांत काहीशी रंजक असलेली नगर-नाशिक जिल्ह्यातील ही राजकारणातील नात्यागोत्यांची माहिती आम्हाला मिळाली, ती पत्रकार कै. वरूणराज भिडे यांच्याकडून . . . .महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाढा अभ्यास असलेल्या वरूण भिडेंचे विधीमंडळ समालोचन केवळ वर्तमानपत्राचे वाचकच नव्हे, तर सर्वच आमदार, खासदार, राजकीय मंडळी आणि राजकीय तज्ज्ञ आवर्जून वाचत असत. राजकारणातील निष्कर्ष काढण्यापूर्वी किंवा निवडणुकींची भाकीते वर्तवण्यापूर्वी राजकीय समिकरणांचा, राजकारणातील नात्यागोत्यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे हे सांगताना ते नगरमधील राजकीय गोतावळ्याची हे उदाहरण देत असत....गेल्या वीस वर्षांत या गोतावळ्याचा कमालीचा विस्तार झालाय...राज्याच्या सीमा भेदून देशभरात ही नातीगोती पसरत गेली...देशातील राजकारणाचा अभ्यास करताना हे 'नगर मॉडेल' नक्कीच उपयुक्त ठरेल . . .
(सोबतचा फोटो अर्थातच कै. वरूणराज भिडे यांचा...)

वरूण राज भिडे यांचे लेखन कुठे वाचायला मिळतील?
ReplyDelete