बोल शोनू
काय?
काय म्हणतेस?
काही नाही?
म्हणजे?
काही नाही
असं का?
तसंच
तू बोल
काय?
काहीही
काहीही??
हो काहीही
काय पण...'?
चालतं मला...
एक विचारू?
होऽऽऽ
मला समजत नाही...
काय?
तू कशी भेटलीस?
म्हणजे?
तू कशी भेटलीस?
का?
नाही...अजून विश्वास नाही बसत....
कशावर?
हेच की...
'काय?
आपण दोघं प्रेमात पडलोय..
हं...
हं...काय शोनू?
मग काय?
सांग ना काहीतरी...
मला कळलं असतं तर....
तर...काय?
मग प्रेमात पडलेच नसते मी...
हे कॉलेजच्या पोरांसारखं बोलणं झालं....
खरच नाही रे राजा सांगता येत...
नाही... मला एक प्रश्न छळतोय...
काय...?
तू एवढी मोठी वकील...
आणि...?
आणि मी हा असा फाटका
म्हणजे...
इतकी वर्षं सरली पण अजूनही कसलाच पत्ता नाही
ते चालणारचं....
पण तू कशी भाळलीस?
तसं काही नसतं रे....
इतक्या वर्षांनंतरही कळलं नाही..?
नाही....?
मलाही वाटलं होतं...
काय?
की आपल्या लक्षात येईल म्हणून
मग?
नाही ना लक्षात आलं....
मी पण एक प्रयोग केला...
कसला?
आपण बोलायला लागल्यापासूनचे मेसेजेस वाचून काढले...
कशाला?
नेमक्या कोणत्या क्षणी मी तुझ्यावर भाळलो हे समजून घ्यायला
खरंच सांगते...मला कळलंच नाही....
शोनू ...
काय?
तसं तर जेमतेच चार दिवस तर बोललो आपण
हो..ना ..ते ही वॉट्स अप वर
मग अशी काय जादू घडली???
खरं सांगू का...
बोल
मलाही खूपच उत्सुकता आहे
कसली?'
आता आपण मध्यमवयात आहोत
हो
लग्नाला बरीच वर्ष झालीत आपल्या
मीन्स?
आपापल्या...
हं
तरीपण एवढी हूरहूर...
हो ना
मलाही आश्चर्यच वाटतंय
कसलं?
या वयातही इतकं अपार आकर्षण वाटू शकतं याचं...
त्यात मी इथे आणि तू लांब कुठंतरी....
काहीच समजत नाही...
खरंतर प्रेम इतकी तरल आणि पवित्र भावना आहे...की..
काय?
त्याची कधी चिकीत्सा करू नये....
जमेल तसं जमेल तितकं प्रेम करावं पण..
काय पण?
ते का आणि कसं झालं याचं मूळ शोधू नये...
का?
मग गंमत जाते त्यातली...
मला नाही तसं वाटत...
का?
माझ्यापुरतं बोलायचं तर ...
काय?
मला ना शाळेत कळलं ना कॉलेजला कळलं
आणि मला तर आत्ताही कळत नाहीये...
प्रेम कसं होतं ते..ना?
त्याचसाठी अगदी अलिप्तपणे मी शोध घेतोय
कसला?
तुझ्यामाझ्यातलं नातं कसं बदलत गेलं ते...
आणि?
आणि प्रेम कसं झालं ते..
मेसेजवरून काय समजलं.?
काही नाही...पण...
पण ...काय?
पुण्यातून तू गेल्यानंतरच्या क्षणापासूनचा
काय?
हो...तेव्हापासूनच्या आपल्या बोलण्यात आकर्षण वाढलेलं दिसलं...
कसं काय??
मूळ भेटीत गप्पा करणारी आणि हे मेसेज केलेली स्त्री एकच आहे यावर विश्वास बसत नाही...
आणखी काय दिसलं तुला त्यात?
एक म्हणजे आपण दोघे खूप पूर्वीपासून मनाने जवळ असल्यासारखं बोलत होतो
आणि?
दोघांचंही बोलणं एकाचवेळी अकृत्रीम आणि खूप ओढीचं वाटतंय
हो का?
हो.. पहिल्या दिवसापासूनच बोलणं इतक्या जवळीकीचं वाटलं की...
काय?
खूप वर्षांपासून परस्परांची दाट ओळख असावी इतकी बोलण्यात सहजता दिसते....
तू सांग ना?
काय?
तुला केव्हापासून ओढ वाटायला लागली...?
तसं नेमकं नाही सांगता येत...पण...
पण काय?
त्या दिवशी माझी गाडी सुटली आणि तू स्टॅन्डवर पोचलास..
तेव्हा?
तेव्हा गाडीतून उतरून तुला भेटायचा खूप मोह झाला..
आणि प्रेम कधी झालं?
ते नाही सांगता येत...
सांगूही नकोस...
का?
बघ ना एवढी रम्य संध्याकाळ....
हं
समुद्राची गाज ऐकत परस्परांच्या मिठीत विरघळतोय आपण...
माझ तर भानचं हरपलंय बघ....
हे परस्परांमध्ये हरवणं असतं ना त्यालाच बहुदा प्रेम म्हणत असावेत...
हो..ना..राजा...
पवित्र मनाने ...पवित्र भावनेने परस्परांच्या आत्म्यांशी एकरूपता साधणे म्हणजे प्रेम
परस्परांची सर्वार्थाने काळजी घेत भावना जपत एकमेकांच्या अंगभूत वृत्त्तींचा स्वीकार म्हणजे प्रेम
सर्व बंधनं, पाश दूर सारून परस्परांच्या आत्म्याशी तादात्म्य पावणं म्हणजे प्रेम
कधी अवखळपणे, कधी समंजसपणे परस्परांची घ्यायची काळजी म्हणजे प्रेम
निरामय, निर्लेप मनाने मनावर केलेला संस्कार म्हणजे प्रेम...
तुझ्या माझ्या मोरपंखी स्वप्नांना सत्यात आणण्याची भावना म्हणजे प्रेम
'दमल्याभागल्या जीवाला दिलासा देणारे शब्द म्हणजे प्रेम
एकमेकांची सय येता काळजाचा फुटणारा बांध म्हणजे प्रेम
प्रेम म्हणजे लीन होण
प्रेम म्हणजे व्यक्त होणं
प्रेम आहे तुझ्यामाझ्या मनांचा खेळ
प्रेम म्हणजे नात्यांमधलं सौदर्याचं लेणं
कुणासाठी झुरणं म्हणजे प्रेम
कुणासाठी प्रार्थना म्हणजे प्रेम
प्रेम म्हणजे इबादत
प्रेम म्हणजे इश्वराशी संवाद
आणि प्रेम म्हणजे
प्रेम फक्त प्रेम............
No comments:
Post a Comment