बल्ल्या :-
- - - - - -- - - काही लोकांबाबत आपल्या मनात एक प्रतिमा निर्माण झालेली असते...त्यांचं बोलणं, वागणं, वावरणं याबाबत काही खूणगाठी मनाशी बांधलेल्या असतात...त्यामुळं ही माणसं कुठे अनपेक्षित ठिकाणी भेटली की मनाचा गोंधळ होतो...म्हणजे बघा नेहमी खाकी गणवेशात घरी येणारा पोस्टमन पोस्टमन कधी अवचित साध्या वेशात मंडईत भेटला आणि आपल्याकडे पाहून हसला की हा कोण? या विचारानेच आपण हैराण होतो....मध्यंतरी असंच झालं....बारामतीहून सोलापूर रस्त्याने येताना यवतजवळ जेवायला ढाब्यावर थांबलो.....मस्तपैकी बाजेवर मांडी टाकून बसलो....घरची मंडळीही होती सोबत...थोड्यावेळाने शेजारच्या बाजेवर दोन-तीन लोक आले....त्यांच्या गप्पा, जेवणखान सुरू होतं....त्यातील एकजण माझ्याकडं पाहून हसला....मी ही हसलो..पण तो कोण? हे काही लक्षात आले नाही....मग डोक्यात चक्र सुरू झाले....जेवण पूर्ण झाले तरी तो कोण? हेच समजेना.... नीलमला हळूच खुणावलं....हात धुवून निघालो.....तसा तो म्हणाला....साहेब इकडं कुठं??? मी म्हणालो जरा लग्नाला गेलो होतो बारामतीला....तुम्ही इकडं काय करताय? माझं गाव इथंच आहे....शनिवार-रविवार येतो मी इकडं.... त्याच्या या उत्तरानं मी अजून गोंधळात पडलो.....गाडीत बसताना नीलम् म्हणाली ....बाबा...तुम्ही तर ग्रेटच आहात...अहो तो आपला गॅसवाला...नेहमी सिलींडर घेऊन येतो ना आपल्याकडे......मग कुठं डोक्यात प्रकाश पडला....कालही तसंच काहीसं झालं...
नेवरेकरांच्या मुलीचं लग्न होतं ....नेवरेकर हेल्थ होमवाले सुनील नेवरेकर.. पुण्यातलं एकमेव भंडारी हॉटेल...मस्त मा्णूस...बॉक्सिंगचा पंच...हॉटेल व्यवसायामुळे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचा चांगला संपर्क.....त्यांच्या मुलीचं मृगयाचं लग्नं झालं काल... खरतर उनं बरीच तापली होती...कंटाळा आला होता जायचा....पण नेवरेकरांच चेहरा डोळ्यासमोर आला आणि निघालो पटकन.....या समारंभांचा एक फायदा असा होतो की एरवी ठिकठिकाणी विखुरलेले निरनिराळ्या क्षेत्रातील मित्र तिथं भेटतात...एकप्रकारे गेट टुगेदरच असतं ते.....कार्यालयात शिरतानाच
Pratap Mankar भेटला....मी प्रताप म्हणत असलो, तरी खरंतर ते मानकर साहेब....पुण्यामुंबईत पोलीस दलात उत्तम काम केलंय त्यांनी...सध्या नानविजला आहेत....प्रताप कॉलेजचा मित्र......पोलीस इन्स्पेक्टर आहे... उत्तम खेळाडू आणि शायरीचा जाणकार...खूप छान मित्र....दोघेही पुण्यातच असूनही कधी फोनवर आणि फेसबुकवर भेट होते...काल तिथं भेटला..खूप छान वाटलं.....फेसबुकवरच्या माझ्या पोस्टबाबत खूप कौतुक केलं...म्हणजे एरवीही करतच असतो.. काय असतं ना....आपल्या शाळा-कॉलेज-गल्लीतल्या मित्रांनी कौतुक केलं की मनापासून आनंद होतो...या मंडळींनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेलं असतं....त्यामुळे काय चुकलं तर ते हक्काने कान धरतातच....पण आपला मित्र योग्य मार्गावर असला की त्यांना मनापासून आनंद होतो....जरा इकडे तिकडे घसरू लागला, तर सावरायला असतातच ते. . . . या मित्रांनी केलेलं कौतुक मनाला खूप भावतं...तू खूप खालपासून आलायसं..तुझ्या लिखाणाला तो स्मेल आहे....त्यामुळं तुझं आवडतं लिखाण...त्यानं मनापासून प्रतिक्रीया दिली.....दोस्त लोकांनी असं कौतुक केलं की अंगावर मूठभर मांस चढतं..उत्तेजन मिळतं...हात आणखी लिहिता होतो....सहजपणे लिहितानाही ते अधिक नेमकं, अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो....कारण हे सारं दोस्तलोक वाचणार आहेत....याची जाणीव असते.....
प्रतापनंतर एसीपी Arvind Patil अरविंद पाटील भेटले.. हा ही विरळा माणूस....पोलिसांच्या कडक सेवेतही शायरी जपणारा.....विनोद सातव भेटले....ते नुकतेच रिटायर्ड झालेत एसीपी म्हणून.....कित्येक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचं मोठं काम केलंय त्यांनी...मी पत्रकारीतेत नवखा असताना ते फौजदार होते....त्यांच्या एसीपी पर्यंतच्या प्रमोशनचा मी साक्षीदार् आहे आणि माझ्या सर्व बदलत्या नोक-यांचे, प्रमोशन्सचे, जीवनातील चढउतारांचे आणि सा-या लिखाणाचे ते साक्षीदार आहेत...एकदम राजा माणूस....क्रिकेटचे शौकीन आणि स्वत: उत्तम खेळाडू....क्रीडा, कस्टम्समध्ये त्यांची चांगलीच जानपहचान....किती निरनिराळ्या क्षेत्रातील मित्र त्यांनी कमावलेत याला तोडच नाही....त्यानंतर बरेच मित्र भेटले... सातवसाहेब ब-याच दिवसांनी भेटल्याने त्यांच्यासोबतच जेवायला गेलो.... .जेवणं झाली.. छान गप्पा सुरू होत्या...आजुबाजूला बहुतांश पोलीस आणि कस्टम्समधील जुने अधिकारी होते.......एकंदर खाकी महोल . . .. पलिकडे एक साहेब होते...गोरा वर्ण..वार्धक्याकडे झुकलेले पण ताठ कण्याचे...साधेच पण नेटके कपडे...मध्यम बांधा आणि मागे वळवलेले केस....कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत होतं ...आवाज परिचयाचा वाटत होता....पण ते कोण हेच लक्षात येईना . . ..आइस्क्रीम्स आली....सातव साहेबांनी अत्यंत अदबीने आईस्क्रीमचा एक कप पलिकडे बसलेल्या साहेबांकडे दिला...नको रे मला...हल्ली टाळतो मी....साहेबांनी स्पष्ट बोलून आईस्क्रीम टाळले.... मी जरा तर्क बांधायचा प्रयत्न केला...पण छ्या... काहीच लक्षातच येईना.....सुरेंद्र पाटील, दारा इराणी, मारुतराव देशमुख, बाप्पू साळुंखे, विनायकराव जाधव, शांताराम थोरात, हिंदुराव थोरात, दिलीप शिंदे, अशोक चांदगुडे, शरद माने, धैर्यशील जाधव, सुभाष कांबळे, विष्णू कांबळे, अब्दुल सत्तार शेख, विलास जाधव, शरद अवस्थी.......खूप नाव आठवली... कितीतरीजणांचे चेहरे डोळ्यासमोर आणले...पण काय पत्ताच लागेना....बरेच लोक त्या साहेबांच्या भोवताली होती...कितीतरी जण त्यांचा शब्द झेलत होते....पण माझ्या काही लक्षातच येईना . . . .अस्वस्थता अधिक वाढली....आईस्क्रीम, गप्पा वगैरे सगळं आटपलं....मी जायला निघालो पण त्या साहेबांचं नावच आठवेना....अखेर न राहवून सातव साहेबांना विचारंल.... ते साहेब कोण हो??? त्यांनी तिकडे पाहिलं ...माझ्याकडं पाहिलं.....पुन्हा काहीशा अविश्वासानं माझ्याकडं पाहत ते म्हणाले...तुम्ही ओळखताना त्यांना..... म्हटलं तर हो...म्हटलं तर नाही...अशा बेतानं मी मान हलवली....माझ्या डोळ्यांतील गोंधळ जाणला बहुधा त्यांनी....अहो ते तर आपले .....बोर्डे साहेब.....मी अजून गोंधळलो......अहो असं काय करता....चंदू बोर्डे आहेत ते.......सातव साहेबांच्या त्या आवाजानं धरणी पोटात घेतेय की काय असं वाटू लागलं......काहीही न बोलता मी तिथून काढता पाय घेतला......
अरे सचिन काय विक्रम करायचा राहतोय का??? त्याच्यासारखा कोण दुसरा प्लेअर आहे...दाखवून द्या मला.....कशाला त्याच्यावर प्रेशर टाकता....तो करणारच सेंच्युरीची सेंच्युरी.......बघ मी काय म्हणालो होतो???केला का नाही विक्रम त्याने.....मऽऽऽऽऽग्ग????? बोर्डे साहेबांचा आवाज कानात घुमत होता........तसा बोर्डे साहेबांचा माझा जुना परीचय नाही...आमच्या अनोषचे ते सासरे....सच्चा क्रिकेटपटू.....क्रिकेटच्या सुवर्णकाळात देशाचे प्रतिनिधीत्व केलेल्या या ग्रेट व्यक्तिमत्वाशी मागे दोनवेळा फोनवर बोललो होतो .. .एकदा सचिनचे महाशतक हुकल्यावर...आणि त्याचा शतकांचा विक्रम झाल्यावर....त्यानंतर एकदोनवेळा भेटलोही होतो.....पण त्यापूर्वी किमान शंभरवेळा त्यांची भाषणं ऐकलीत....कित्येकदा कार्यक्रमांमधून पाहिलंय....त्यांचे फोटो अनेकदा पाहिलेत....पण ......म्हटलं ना मी....तसंच एरवी मैदानावर, कार्यक्रमांमध्ये, उच्चभ्रू वर्तुळात वावरणारे चंदू बोर्डे दिसले ते लग्नात...ते ...ही पोलिसांच्या गोतवळ्यात....आणि त्यामुळंच बल्ल्या झाला. . . .

No comments:
Post a Comment