एका मैत्रिणीच्या पोस्तला उत्तर
- - - - - - - - - - - - - - - - - - -
सुप्रसिद्ध व्यक्तिंना सोशल नेटवर्कींग साईटवरून पाठींबा मिळतो या तुझ्या विधानाशी मी सहमत नाही. कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती सोशल मिडीयाच्या पाठिंब्याने सुप्रसिद्धही होत नाही आणि कुप्रसिद्धही...माणूस् आपल्या कर्माने मोठा होतो किंवा बदनाम होतो..डॉक्टरांच्या निकटवर्तियांनी जमायला हवे होते म्हणजे आपला काहीच संबंध नाही का त्यांच्याशी?...त्यांच्या कार्याशी..?डॉक्टर काय त्यांच्या निकटवर्तियांसाठीच फक्त काम करत होते का? ते संपूर्ण समाजाच्या प्रबोधनाचे काम करीत होते...अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाला बाहेर काढण्यासाठी सारे आयुष्य वाहून घेतले होते त्यांनी..मग आपली काहीच जबाबदारी नाही का??? आपण आपापल्या माध्यमांमधून तर व्यक्त व्हायलाच हवे. त्याचबरोबरच रस्त्यावर उतरून जनमताचा रेटा निर्माण करण्यातही आपण पुढं आलं पाहिजे...आज काय डॉक्टर गेले..उद्या दुसरा कोणी जाईल...परवा तिसरा कोणी....आपण काय फक्त बघत बसायचं????एवढे बथ्थड झालोय का आपण??? सोशल मिडीयावर शोक व्यक्त करून काही होत नसतं....त्याला माणूस जातीने मैदानात उतरावा लागतो..हा माणूस आता आत्मकेंद्रीत, स्व्यंकेंद्रीत, आत्ममग्न होत चालला आहे की काय? अशी शंका येते...आणि ती खरी असेल तर आपण वेगाने अराजकतेकडे वाटचाल करतोय हे समजायला काहीच हरकत नाही..शेजारचा मेला..मरू दे...मी आहे ना जिवंत...माझे जवळपासचे आहेत ना बरे!...मग ठिक आहे...ही वृत्तीच आपल्याला मातीत घालणारी आहे....कारण एक..दोन..तीन....करत आपल्या नजिकच्याचा नंबर कधी येईल हे आपल्या लक्षातही येणार नाही...आणि तेव्हा आपले डोळे उघडूनही काही फायदा नाही..वेळ केव्हाच निघून गेलेली असेल....एवढी संवेदनहीनता किंवा कोरडी संवेदना काय कामाची????स्वातंत्र्यपूर्व काळात असा सोशल मिडीया असता आणि माणसं अशी बथ्थड झाली असती ना...तर आपण अजून पारतंत्र्यातच असलो असतो....नशीब इंग्रजांना तेव्हा ही फेसबुकवगैरेची कल्पना सुचली नाही....नाहीतर अजून आपण त्यांचे गुलामच राहीलो असतो. विरंगुळा म्हणून ठिक आहे सोशल मिडीया...पण प्रत्येक गोष्ट त्याच माध्यमातून करणं चुकीचं आहे..अशानं क्रांती होत नसते...एका क्रांतीने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं....पण देशाच्या नवनिर्माणासाठी अजून एक क्रांती आवश्यक आहे मधुरा...आणि ती होणारही आहे....तुझे चॉंद के बहाने देखू म्हणत आपंण गाणी ऐकत असतो ना...तशी पोस्ट टाकत असतो ना...त्यावेळी आपल्याच देशातील एक मोठा वर्ग भाकरीच्या चंद्रासाठी संघर्ष करत असतो..हे कटू वास्तव आहे.....हा वर्ग शांत आहे असं अनेकांना वाटतं...पण, हस्तीदंती मनो-यात बसून आपल्याच विश्वात रममाण असलेल्या या वर्गाला धक्का द्यायला गावकुसाबाहेरची नवी पिढी सज्ज झालीये...तापत्या सूर्याचे चटके खाऊन पिऊन कणखर बनलेली ही पोरं या हस्तीदंती मनो-यांचे स्तंभ गदागदा हलवून त्यांच्या भाकरीचा हक्क मागणार आहेत....एवढं सोपं नाहीये मधुरा...एवढं सहजही नाहीत या गोष्टी...आपण खूप अंडरएस्टीमेट करतो सगळ्या बाबी. . .एक डॉक्टर गेले म्हणजे सगळं काही संपलं अशातला भागच नाही...पण आपली काही नैतिक जबाबदारी आहे की नाही???समाजाप्रती काही उत्तरदायित्व आहे की नाही आपलं...????ते गेले तेव्हा पेटून उठलेल्या समाजाची आग जागृत ठेवायची जबाबदारी फक्त त्यांच्या अनुयायांची आहे असं तू म्हणतेस..आपली काहीच नाही???अरे सा-यांची जबाबदारी आहे ती...सर्वसामान्य नागरिकांची, नोकरदारांची, व्यापा-यांची, बिझनेस क्लासवाल्यांची, मिडीयाची, सर्वांचीच..(जर आपण संवेदनशील असू तर....)शेवटचा मुद्दा पुण्याबाबतचा...जन्मापासून पुण्यात राहिलेल्या मला अलिकडच्या काळात या शहरात उदासवाणं वाटतं..निराश वाटतं हे अगदी खरं आहे...केवळ डॉक्टरांची हत्या इथं झाली म्हणून मी आजिबात असं म्हणत नाही...त्यामागे काही वैयक्तिक कारणं आहेत, तशीच अनेक सामाजिकही. सदाशिव पेठेत वाढलेल्या, एसपी कॉलेजला शिकलेल्या या आबिद शेखला आता सदाशिव पेठेत पूर्वीची एकही खूण दिसत नाही...मॉडर्न हायस्कूल सुटल्यावर जंगली महाराज रस्त्याने आम्ही मुले आरडाओरडा करीत पळत बसस्टॉपवर जात असू..त्या रत्यावर आता पायी चालणंही एवढं मुश्कील झालंय की आमच्या शाळेला या रस्त्यावरच मेन गेट कायमचं बंद करायला लागलंय...34 लाखांच्या या शहरात 25 लाखाहून अधिक वाहनं आहेत..पाहू तिकडे गर्दीच गर्दी..नुसता वाहनांचा धूर...माणसं कमी आणि वाहनं जास्त झालीयेत...पेठांची रया गेली..वाडे पडले...नुसते सिमेंट कॉंक़्रीटचे इमले उभे राहीले...पुण्याची, पेठेची खास अनुनासिक भाषा बदलली..संस्कृती बदलली..या पुण्यातच पुणेरी माणसाचा टक्का कमी झाला...महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोप-यातील लोक इथं स्थायिक झाले...विकास होत असताना या सा-या बाबींमध्ये बदल होतच असतो आणि तो आपल्याला स्विकारावाच लागतो हे मान्य आहे मला...पण पुण्याचा विकास हा एवढा वेगवान आणि भयचकीत करणारा असेल असं कधीच वाटलं नव्हत मला...पुण्याच्या या गर्दीत मी पेठेतला माणूस शोधता शोधता गुदमरून गेलोय मी . .जीव घुसमटतो या पुण्यात आता . . .या सा-या गोष्टी मला नैराश्य आणतात. तुला आठवत असेल पुणे हे सभांचेही शहर होते...अत्रे, गाड्गीळ, भोपटकर,मोरे, जेधे असे एकाहून एक फर्डे वक्ते या शहराने दिले..कोणत्याही सभेला, आंदोलनाला कुणाला कधी आमंत्रण देऊन बोलवावं लागत नव्हतं..त्याच पुण्यात डॉ. दाभोलकरांसाठी केलेल्या धरणे आंदोलनात अवघे वीस-पंचवीस लोक असतात ही बाब निराशाजनक नाही का???????????????????????????? .
- - - - - - - - - - - - - - - - - - -
सुप्रसिद्ध व्यक्तिंना सोशल नेटवर्कींग साईटवरून पाठींबा मिळतो या तुझ्या विधानाशी मी सहमत नाही. कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती सोशल मिडीयाच्या पाठिंब्याने सुप्रसिद्धही होत नाही आणि कुप्रसिद्धही...माणूस् आपल्या कर्माने मोठा होतो किंवा बदनाम होतो..डॉक्टरांच्या निकटवर्तियांनी जमायला हवे होते म्हणजे आपला काहीच संबंध नाही का त्यांच्याशी?...त्यांच्या कार्याशी..?डॉक्टर काय त्यांच्या निकटवर्तियांसाठीच फक्त काम करत होते का? ते संपूर्ण समाजाच्या प्रबोधनाचे काम करीत होते...अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाला बाहेर काढण्यासाठी सारे आयुष्य वाहून घेतले होते त्यांनी..मग आपली काहीच जबाबदारी नाही का??? आपण आपापल्या माध्यमांमधून तर व्यक्त व्हायलाच हवे. त्याचबरोबरच रस्त्यावर उतरून जनमताचा रेटा निर्माण करण्यातही आपण पुढं आलं पाहिजे...आज काय डॉक्टर गेले..उद्या दुसरा कोणी जाईल...परवा तिसरा कोणी....आपण काय फक्त बघत बसायचं????एवढे बथ्थड झालोय का आपण??? सोशल मिडीयावर शोक व्यक्त करून काही होत नसतं....त्याला माणूस जातीने मैदानात उतरावा लागतो..हा माणूस आता आत्मकेंद्रीत, स्व्यंकेंद्रीत, आत्ममग्न होत चालला आहे की काय? अशी शंका येते...आणि ती खरी असेल तर आपण वेगाने अराजकतेकडे वाटचाल करतोय हे समजायला काहीच हरकत नाही..शेजारचा मेला..मरू दे...मी आहे ना जिवंत...माझे जवळपासचे आहेत ना बरे!...मग ठिक आहे...ही वृत्तीच आपल्याला मातीत घालणारी आहे....कारण एक..दोन..तीन....करत आपल्या नजिकच्याचा नंबर कधी येईल हे आपल्या लक्षातही येणार नाही...आणि तेव्हा आपले डोळे उघडूनही काही फायदा नाही..वेळ केव्हाच निघून गेलेली असेल....एवढी संवेदनहीनता किंवा कोरडी संवेदना काय कामाची????स्वातंत्र्यपूर्व काळात असा सोशल मिडीया असता आणि माणसं अशी बथ्थड झाली असती ना...तर आपण अजून पारतंत्र्यातच असलो असतो....नशीब इंग्रजांना तेव्हा ही फेसबुकवगैरेची कल्पना सुचली नाही....नाहीतर अजून आपण त्यांचे गुलामच राहीलो असतो. विरंगुळा म्हणून ठिक आहे सोशल मिडीया...पण प्रत्येक गोष्ट त्याच माध्यमातून करणं चुकीचं आहे..अशानं क्रांती होत नसते...एका क्रांतीने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं....पण देशाच्या नवनिर्माणासाठी अजून एक क्रांती आवश्यक आहे मधुरा...आणि ती होणारही आहे....तुझे चॉंद के बहाने देखू म्हणत आपंण गाणी ऐकत असतो ना...तशी पोस्ट टाकत असतो ना...त्यावेळी आपल्याच देशातील एक मोठा वर्ग भाकरीच्या चंद्रासाठी संघर्ष करत असतो..हे कटू वास्तव आहे.....हा वर्ग शांत आहे असं अनेकांना वाटतं...पण, हस्तीदंती मनो-यात बसून आपल्याच विश्वात रममाण असलेल्या या वर्गाला धक्का द्यायला गावकुसाबाहेरची नवी पिढी सज्ज झालीये...तापत्या सूर्याचे चटके खाऊन पिऊन कणखर बनलेली ही पोरं या हस्तीदंती मनो-यांचे स्तंभ गदागदा हलवून त्यांच्या भाकरीचा हक्क मागणार आहेत....एवढं सोपं नाहीये मधुरा...एवढं सहजही नाहीत या गोष्टी...आपण खूप अंडरएस्टीमेट करतो सगळ्या बाबी. . .एक डॉक्टर गेले म्हणजे सगळं काही संपलं अशातला भागच नाही...पण आपली काही नैतिक जबाबदारी आहे की नाही???समाजाप्रती काही उत्तरदायित्व आहे की नाही आपलं...????ते गेले तेव्हा पेटून उठलेल्या समाजाची आग जागृत ठेवायची जबाबदारी फक्त त्यांच्या अनुयायांची आहे असं तू म्हणतेस..आपली काहीच नाही???अरे सा-यांची जबाबदारी आहे ती...सर्वसामान्य नागरिकांची, नोकरदारांची, व्यापा-यांची, बिझनेस क्लासवाल्यांची, मिडीयाची, सर्वांचीच..(जर आपण संवेदनशील असू तर....)शेवटचा मुद्दा पुण्याबाबतचा...जन्मापासून पुण्यात राहिलेल्या मला अलिकडच्या काळात या शहरात उदासवाणं वाटतं..निराश वाटतं हे अगदी खरं आहे...केवळ डॉक्टरांची हत्या इथं झाली म्हणून मी आजिबात असं म्हणत नाही...त्यामागे काही वैयक्तिक कारणं आहेत, तशीच अनेक सामाजिकही. सदाशिव पेठेत वाढलेल्या, एसपी कॉलेजला शिकलेल्या या आबिद शेखला आता सदाशिव पेठेत पूर्वीची एकही खूण दिसत नाही...मॉडर्न हायस्कूल सुटल्यावर जंगली महाराज रस्त्याने आम्ही मुले आरडाओरडा करीत पळत बसस्टॉपवर जात असू..त्या रत्यावर आता पायी चालणंही एवढं मुश्कील झालंय की आमच्या शाळेला या रस्त्यावरच मेन गेट कायमचं बंद करायला लागलंय...34 लाखांच्या या शहरात 25 लाखाहून अधिक वाहनं आहेत..पाहू तिकडे गर्दीच गर्दी..नुसता वाहनांचा धूर...माणसं कमी आणि वाहनं जास्त झालीयेत...पेठांची रया गेली..वाडे पडले...नुसते सिमेंट कॉंक़्रीटचे इमले उभे राहीले...पुण्याची, पेठेची खास अनुनासिक भाषा बदलली..संस्कृती बदलली..या पुण्यातच पुणेरी माणसाचा टक्का कमी झाला...महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोप-यातील लोक इथं स्थायिक झाले...विकास होत असताना या सा-या बाबींमध्ये बदल होतच असतो आणि तो आपल्याला स्विकारावाच लागतो हे मान्य आहे मला...पण पुण्याचा विकास हा एवढा वेगवान आणि भयचकीत करणारा असेल असं कधीच वाटलं नव्हत मला...पुण्याच्या या गर्दीत मी पेठेतला माणूस शोधता शोधता गुदमरून गेलोय मी . .जीव घुसमटतो या पुण्यात आता . . .या सा-या गोष्टी मला नैराश्य आणतात. तुला आठवत असेल पुणे हे सभांचेही शहर होते...अत्रे, गाड्गीळ, भोपटकर,मोरे, जेधे असे एकाहून एक फर्डे वक्ते या शहराने दिले..कोणत्याही सभेला, आंदोलनाला कुणाला कधी आमंत्रण देऊन बोलवावं लागत नव्हतं..त्याच पुण्यात डॉ. दाभोलकरांसाठी केलेल्या धरणे आंदोलनात अवघे वीस-पंचवीस लोक असतात ही बाब निराशाजनक नाही का????????????????????????????
No comments:
Post a Comment