डॉन जेव्हा घाबरतो....
- - - - - - - - - - - - - -
पुण्याच्या चितळे बंधुंना, किर्लोस्करांना, गाडगीळांना खंडणीसाठी धमक्या आल्याचे कानावर आलंय का हो कधी? कारण सरळ आहे. सरळमार्गी व्यावसायिकांना अथवा उद्योजकांना अंडरवर्ल्डचे लोक कधी त्रास देत नाहीत, असा सर्वसाधारण अनुभव आहे. सचोटीच्या माणसांना, परस्परांच्या नातलगांना त्रास द्यायचा नाही, असा अंडरवर्ल्डमध्ये अलिखित संकेत आहे. अगदी गेल्या चार दशकाचे हे निरीक्षण आहे. त्याला कोणी अपवाद करण्याचा प्रयत्न केला तर काय परीस्थिती ओढावते किंवा सामान्य माणसाची ताकद काय असते , हे अबू सालेमच्या उदाहरणावरून लक्षात येते. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये 70 व 80 च्या दशकामध्ये हाजी मस्तान बेताज बादशाह होता. त्याचकाळात करीमलाला, युसुफ पटेल, वरदराजन मुदलीयार, सुकूर नारायण बाखिया या नावांचाही कमालीचा दबदबा होता. समुद्रकिना-यावर होणा-या सोन्याच्या तस्करीमध्येही मंडळी गुंतली होती. सोन्याबरोबरच विदेशी घड्याळे, कपड्यांचीही चोरटी तस्करी होत असे. त्यामुळे या दादा लोकांकडे अमाप पैसा आणि मनगटी ताकद होती. त्यांच्यात परस्परांमध्ये कितीतरीवेळा संघर्ष झाला; पण समाजातल्या सर्वसामान्य लोकांना त्यांचा कधी थेट उपद्रव नव्हता. त्यापुढील पिढ्यांमधील दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, अमर नाईक यांचा समाजाशी संबंध आला खरा,पण त्यांनीही सरळमार्गी लोकांना कधी त्रास दिल्याची उदाहरणे नाहीत. त्यांच्या शिलेदारांनीही अंडरवर्ल्डमधील हा संकेत तंतोतंत पाळला. दाऊदसाठी बॉलीवूडचे काम पाहणा-या अबु सालेमने मात्र एकदा हा संकेत तोडला.
अबु सालेम म्हणजे अंडरवर्ल्डमधील जणु जितेजागते क्रौर्यच. कॅसेटकिंग गुलशनकुमार याच्या हत्येपासून अनेकांच्या हत्या घडवलेला सालेम बोटाच्या इशा-यावर बॉलीवूडला नाचवत होता. कोणत्या पिक्चरमध्ये कोणाला घ्यायचे? कोणाला नाकारायचे?येथपासून ते कलाकारांची मानधने, त्यांच्यातील भांडणे या सर्वांत सालेमचा थेट हस्तक्षेप असे. कोणत्याहीवेळी कोणत्याही कलाकाराला अथवा निर्माता दिग्दर्शकाला कोठेही बोलावून घेण्याइतपत त्याची दहशत होती. त्या बळावर त्याने बॉलीवूडमध्येच नव्हे, तर देशाच्या उद्योग विश्वात भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडले होते. विदेशात वास्तव्य असणारा सालेम एका फोनवर कितीही बड्या हस्तीला वाकवू शकत होता. त्याला उडवू शकत होता. सालेम अंडरवर्ल्डचा डॉन बनला होता. सध्या जरी तो दाऊद टोळीपासून फुटला असला; तरी त्याकाळात दाऊदची खास मर्जी असल्यामुळे सालेमने उच्छाद मांडला होता. मुंबईमधील एका उद्योजकाला एकदा त्याचा फटका बसला. साधारणत: दहा वर्षांपूर्वीची ही घटना आहे. अबु सालेम तेव्हा दुबईत होता. मुंबईतील एका बड्या उद्योजकाचा दूरध्वनी ख़णखणला. पलीकडून थेट डॉन अबु सालेम बोलत होता. त्याने या उद्योजकाला धमकावून पंचवीस लाखाची खंडणी मागितली. सालेमचे नाव ऐकून हा उद्योजक हादरला. पण काही वेळातच त्याने स्वत:ला सावरले. बिलीयर्डर्स आणि स्नूकरची टेबल्स तयार करण्याचा या उद्योजकाचा मोठा व्यवसाय आहे. विदेशातही त्याची ही टेबल्स निर्यात होतात. त्यामुळे त्याच्याकडे पैशाची वाहती गंगा होती. अर्थात असे असले, तरी हा व्यावसायिक अत्यंत सरळमार्गी होता.त्याचे व्यवहार स्वच्छ होते. सचोटीने व्यवसाय करून त्याने या उद्योगात नाव कमावले होते. त्यामुळे कोणालाही घाबरायचे नाही असा निर्धार त्याने मनाशी केला. या उद्योजकाचे दुबईत नेहमी येणे जाणे होते. तेथूनच सालेमला त्याच्याबद्दल "टीप' मिळाली होती. सालेमचा दुस-यांदा फोन आल्यावर या व्यावसायिकाने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्याने सालेमचे ऐकून घेण्याऐवजी त्यालाच दम भरला. "मी बब्बर खालसा दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मला खंडणी मागण्याऐवजी तूच आम्हाला 50 लाखाचे खंडणी दे, नाहीतर आमच्या संघटनेचे लोक तुला कोठे उडवतील याचा पत्ता लागणार नाही... ''या उद्योजकाचे हे बोलणे ऐकून सालेमचीच बोबडी वळाली. काही काळ तो शांत बसला. पण त्याने त्याच्या पंटरकरवी या उद्योजकावर नजर ठेवली होती. त्या महिन्यातच हा उद्योजक दुबईला गेला. त्यावेळी सालेमने दुस-या नावाने फोन करून व्यवसायाची बोलणी करण्याच्यानिमित्ताने त्याला तेथील एका कॅसिनोमध्ये बोलावले. आवाज ओळखीचा वाटल्याने हा उद्योजक सतर्क झाला. बराच विचार केल्यावर हा अबू सालेमचाच आवाज असल्याचे त्याने ओळखले. कॅसिनोत भेटायला गेल्यावर तो सालेमच असल्याचे त्याच्या लक्षात आले. कारण, दरम्यानच्या काळात त्याने पोलिसांकडे सालेमची छायाचित्रे पाहिली होती. आपल्या पुढ्यात साक्षात सालेमच बसला असल्याची खात्री पटताच त्याने थेट मुद्यालाच हात घातला. तो म्हणाला,"तू डॉन असशील तुझ्या घरी. आम्हाला त्याचे काय विशेष वाटत नाही. आमच्याकडे असे कितीतरी देशांचे डॉन येत- जात असतात. आमच्या संघटनेला देणगी देत असतात. तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. तुझ्या आगावूपणाची माहिती मी आमच्या संघटनेत सांगितली. आमच्या काही लोकांनी तुला उडवायचा प्रयत्न केला होता. याच कॅसिनोमध्ये तू त्यांच्या हातून दोनवेळा थोडक्यात वाचलास. आत्ताही आमची अनेक माणसे या कॅसिनोभोवती घिरट्या घालत आहेत.माझ्या एका इशा-यासरशी तुझा जीव जाईल. तुला तुझा जीव प्यारा असेल, तर मुकाट्याने दुबई सोड आणि माझ्या नादाला लागू नकोस.''
या व्यावसायिकाने दिलेल्या सज्जड दममुळे सालेम नखशिखांत हादरला. आपली खेळी चुकल्याचे त्याच्या लक्षात आले. आपण उगाचच हे संकट ओढवून घेतल्याची भावना त्याला झाली. त्याने या व्यासायिकाची माफी मागितली. विनवण्या केल्या. पुन्हा अशी चूक होणार नाही याची वारंवार खात्री दिली. तातडीने दुबई सोडण्याची ग्वाहीही दिली. अखेर व्यावसयिकाने काहीसा नरमाईचा आव आणून त्याला माफ केल्याचे सांगितले. तेव्हा सालेमने त्याच्या पायावर अक्षरश: लोळण घेतली.महत्वाचे म्हणजे त्यानंतर त्याने खरोखरच काही दिवसांसाठी दुबई सोडली. एवढेच नव्हे, तर स्वत:चा फोन नंबरही बदलून टाकला. एका भल्या गृहस्थाच्या पुण्याईचा, आम आदमीचा हा विजय होता. अत्यंत क्रूर डॉन अशी ओळख असलेल्या या डॉनला एका सरळमार्गी माणसाच्या तेजापुढे हार पत्करावी लागली. सरळमार्गी, सचोटीच्या तेजाचा हा विजय मानला पाहीजे. एका सर्वसामान्य माणसाने केलेल्या या पचक्यामुळे सालेमचे सा-या अंडर्वल्डमध्ये हसेही झाले हे वेगळेच....

No comments:
Post a Comment