Thursday, 5 June 2014


फेसबुकवरची मांडुळं. . . .
- - - - - - - - - - - - - - - -
मांडूळ....बहुदा हा सापाचा एक प्रकार....अलिकडच्या काळात तो प्रसिद्धीच्या झोतात आला ते गुप्तधनामुळं...म्हणजे असं म्हणतात की मांडुळाची पूजा केली की घरात पैशांचा पाऊस पडतो....गुप्तधन सापडतं.....त्यामुळे अलिकडच्या काळात मांडुळांची मोठी तस्करी होते.........या मांडुळांचं एक वैशिष्ठ्य असतं....हा एकमेव साप असा आहे की त्याला दोन्ही बाजूला तोंड असतं...असं मानलं जातं . .(तज्ज्ञांच्या मते त्याचं शेपूट आणि तोंडाचा भाग सेम दिसतो..त्यामुळं हा समज आहे)...असो...तर या दोन तोंडांच्या मांडुळांप्रमाणे समाजातही कित्येक लोक दुतोंडी असतात. ते बोलतात एक आणि प्रत्यक्षात वागतात वेगळंच ...या दुतोंडी मांडुळांचा प्रादुर्भाव फेसबुकवरही बराच झालाय . .. खरंतर फेसबुकवरचे मित्र ही निराळीच ओळख झालीये....पूर्वी कुठं हॉटेलमध्ये, रस्त्यावर, थिएटरमध्ये...आकस्मिकपणे कुणी पुढ्यात उभं राहून विचारायचा? ओळखंल का? मग आपण जरा विचारात पडायचो...मग हळू हळू लक्षात यायचं ..अरे हा तर आपल्या कॉलेजचा दोस्त...हा तर आपल्या प्राथमिक शाळेतला मित्र...हा गाववाला...हा पूर्वीच्या कंपनीतला सहकारी असं काहीतरी लक्षात यायचं [ इंटरनॅशनल 'उद्योग'पती दाऊद इब्राहिम याच्यामुळं 'कंपनी' या शब्दाला अलिकडं वेगळा अर्थ प्राप्त झाला असला, तरी मला कंपनी म्हणजे कामाचे ठिकाण हाच अर्थ येथे अभिप्रेत आहे.  ] ..त्यामध्ये आता एफबी फ्रेंड्सची भर पडलीये . .. थेट ओळख नसलेले एफबी फफ्रेंड्स कुठे भेटले की म्हणतात...''ओळखलं का??आपण एफबी फ्रेंड'' आहोत....'' छान वाटतं... तसं एफबीचे फायदे-तोटे यावर अनेकदा उलटसुलट चर्चा यापूर्वी कैकवेळा झाल्यात.....पण आज बोलतोय ते इथल्या मांडुळांबाबतीत.. दुर्दैवाची बाब म्हणजे ती आपल्याच आसपास आहेत. म्हणजे काही व्यक्ती आपल्या एफबी फ्रेंड असतात...त्यांच्या काही पोस्ट चांगल्याही असतात....काहीजण तत्ववेत्त्याच्या अविर्भावात ओशोंचं तत्वज्ञान सांगत बसतात... पांचट उद्योगांमुळे काहींची अकाऊंट हॅक होतात. . . .काही मैत्रिणी इकडच्या तिकडच्यांच्या पोस्ट कॉपी पेस्ट करून खूप युनिक असल्याचं भासवतात...लाडी.. लाडी...गोड...गोड बोलतात....ही मंडळी व्यक्तीश: ठीक असतीलही. . .पण त्यांचं वागणं कमालीचं कृत्रीम...औपचारीक . . आणि मुख्य म्हणजे दुहेरी....म्हणजे ते आपले मित्र असल्याने आपल्याशी नीटच वागणार...बोलणार... पण फ्रेंडलिस्टमधल्या मैत्रिणींसोबत त्यांचा व्यवहार पूर्ण निराळा असतो....म्हणजे गोड गोड बोलत फोन नंबर विचाराचा.... मग वॉट्स अप वर मेसेज सुरू करायचे...गुड मॉर्निंग..गुड नून....गुड नाईट मेसेजेस...मधून मधून शेर शायरीचे, ओशोच्या तत्वज्ञानांचे फिलर्स. . . मग फुलं...मग गुलाब....आणि मग प्रत्येक मेसेजनंतर थेट पिंक हार्टच्‌....विचारा तुमच्या मैत्रिणींना लोक असे वागतात की नाही??....त्या देवेंद्रने असाच उद्योग केला...खरंतर मला त्याची किवच येते...कारण काय माहितीय का?? या एफबीमुळे सर्वाधिक तोटा झालाय तो पन्नाशी ओलांडलेल्या स्त्री-पुरुषांचा..('मधल्यां'चं मला काही माहिती नाही  ]....कारण पान पिकत असताना असे एकाहून एक सुंदर चेहरे दिसू लागल्यावर ते कसे कासावीस होत असतील याची कल्पनाच केलेली बरी...च्यायला हे एफबी जरा दहा-पंधरा वर्षं आधी आलं असतं तर बरं झालं नसतं का? हे त्यांचे उसासे त्यांच्या कमेंटमधूनही सहज जाणवतात. तर देवेंद्रचंही तसंच काहीसं असावं...एफबीवर बोलता बोलता एकीशी संवाद वाढवला...मग व्हॉट्स अपवर चाटींग...बरं तिच्या काहीच ध्यानीमनी नाही...बोट दिलं की हात धरायला हा झाला सुरू... आपलं वय काय?...तिचं वय काय? आपला उद्योग काय? ती मुलगी काय करतेय?? कशातच साम्यही नाही आणि काहीच नाही....झाला ना मग याचा गुलाबी हार्टसचा वर्षाव सुरू....मला कळल्यावर मी चक्रावलो...कारण याला भेटलोय एकदा मी. फार काही इप्रेसिव्ह नसला तरी ठिक आहे तो.....पण साल्या आमच्याशी मारे सज्जनसारख्या चर्चा करायच्या आणि पोरींना गुलाबी हार्ट पाठवायचे??? हा व्यक्तिमत्वातील दुहेरीपणा खरंच धक्कादायक आहे....तसाच योगेशचाही...तशा ब-या असतात पोस्ट त्याच्याही..कोल्हापूर ते मुंबई त्याची भ्रमंती असते...घरात कौटुंबिक कलह आहे बहुदा त्याच्या...म्हणजे तो आपल्याशी असं नाही बोलत...पण मुलींना हमखास इनबॉक्समध्ये असे मेसेजेस... असं सहानुभूती मिळवून पोरी पटत नाहीत...योगेश...कर्तृत्व लागतं बाबा त्यालाही. बरं ती मैत्रीण गप्प राहीली तरी हा काही पिच्छाच सोडेना ....म्हणजे आपल्यासमोर एक रूप...पोरींसमोर दुसरंच....आणि ही जी मंडळी असतात ना ती एका मुलीला सतावून गप्प नाही राहत....ते एकाचवेळी अनेक गळ टाकून बघत असतात...अनेक मुलींशी असा व्यवहार करत असतात आणि आपल्यासमोर, समाजात उजळ माथ्याने फिरत असतात...बरं यात मुली मागे आहेत का? तर आजिबात नाही...मला तर मध्यंतरी एक विचित्रच अनुभव आला...एक मुलगी ( मी मैत्रीण नाही म्हणू शकत तिला..) छान गप्पा मारायची...इनबॉक्समध्ये मेसेजेस टाकायची...फोनवरही बोलायचो आम्ही...तसा तिच्या गप्पांचा स्तर सभ्य आणि सुसंस्कृतच होता..पण भाषा कमालीची कृत्रीम, औपचारीक आणि पुणेरी नसली तरी आमच्या पेठेतल्यासारखा साजूक स्वर . ....छान गप्पा व्हायच्या...पण त्याचा काही वेगळाच अर्थ घेतला जाईल, काढला जाईल किंवा पसरवला जाईल..असं मला कधीच वाटलं नव्हतं...कारण त्या तशा सुशिक्षित आहेत. अर्थात सुशिक्षित असलेले सुसंस्कृत असतातच असं नाही हे माझ्या ध्यानात आलं नव्हतं.. या बाईसाहेबांनी एकाशी बोलताना माझा उल्लेख करत हा सध्या मला बराच पकवतोय....सारखे फोन करतो....उगाच बड्या बड्या ओळखी सांगतो...काही कळत नाही त्याच्या मनात काय आहे???'' असं सांगितल्याचं कानावर आलं आणि मी उडालोच्‌....म्हणजे मी साधू संत आहे असा माझा कधीच दावा नव्हता आणि नाही...पण मी एवढा चीपही नाही आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मला चॉईस आहे....ही मांडूळ संस्कृती कमालीची फोफावतेय बहुदा...माझ्या लक्षात आलं .. . त्यामुळंच इजा बिजा तिजा झाल्यावरमात्र फेसबुकवरच्या या मांडूळ संस्कृतीबद्दल लिहायचा मोह आवरला नाही.
(ता.क. :- फेसबुकवर लफडेबाजी करणा-या ठाण्याच्या बशीरभाईबद्दल 25 फेब्रुवारीला मी पोस्ट लिहिली होती. त्या बशीरभाईला शुक्रवारी (ता.21) ठाण्यातच कुणीतरी चांगलाच बडवला....असे ऐकीवात आहे)

No comments:

Post a Comment