अध्यात्मिक गुरू 'एम' यांची पदयात्रा
देशात सामाजिक विषमता नष्ट करून धार्मिक सलोख्याची भावना जागविण्यासाठी केरळमधील अध्यात्मिक गुरू श्री. एम हे कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान पदयात्रा काढणार असून, देशातील तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.अध्यात्म क्षेत्रात ' श्री. एम' या नावाने परीचित असलेले मुमताज अली मूळचे केरळचे. महाअवतारबाबा आणि श्री महेश्वरनाथ यांचा अनुग्रह प्राप्त झालेल्या श्री. एम यांनी हिमालयात अनेक वर्षे साधना केली. त्यानंतर बंगलुरू जवळील मदनापल्ली येथे त्यांनी आश्रमाची व सत्संग फाउंडेशन व मानव एकता मिशनची स्थापना केली. त्याच माध्यमातून त्यांनी देशभर भ्रमंती करून नागरिकांना भेडसावणार्या तसेच देशापुढील प्रमु.ख समस्यांचा उहापोह करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री. एम गेले दोन दिवस शहरात वास्तव्याला होते. त्यांच्या सत्संगाचा तसेच उपनिषदांवरील व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी 'दै. पुण्यनगरीशी' संवाद साधताना श्री. एम यांनी या पदयात्रेची माहिती दिली.
ते म्हणाले, की आत्मसाक्षात्कार, शांततापूर्ण वातावरण, जातीय व धार्मिक सलोखा आणि बालकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही कन्याकुमारी काश्मीरपर्यंत पदयात्रा काढणार आहोत. थोर राष्ट्रपुरुष असलेले अध्यात्मिक गुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी २0१५ला कन्याकुमारी येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेदरम्यान सर्व जाती, धर्म, पंथाच्या नागरिकांशी आम्ही संवाद साधणार आहोत. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यातून मार्गकाढण्याचा प्रय▪करणार आहोत. देशातील सर्व राज्यांतून आमची यात्रा जाईल. या स्वरुपाची आखणी करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये कोणाही राजकीय व्यक्तीचा समावेश नाही. देशाच्या नवनिर्माणाच्या भावनेने सर्मपित असलेले सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीच फक्त या यात्रेत असतील.
हिंदू धर्मातील उपनिषदांचे महत्त्व अमूल्य आहे. अलिकडच्या काळात त्यांचे अवमूल्यन होत असल्याची टीका केली जात आहे. पण, वस्तुस्थिती निराळी आहे. उपनिषदांचे स्थान व दर्जा अमूल्य आहे. पण, ते समजावून सांगणार्यांचा दर्जा हलका झाला आहे. त्यामुळे या उपनिषदांमधील अर्क काहीसा कमी होऊ लागला आहे. त्यांचा परिणाम धूसर होऊ लागला आहे. मूळ उपनिषदे संस्कृत भाषेत आहेत. अलिकडच्या काळात या भाषेचे अभ्यासकही कमी होऊ लागले आहेत. साहजिकच वेद व उपनिषदांचे अभ्यासक कमी होऊ लागले आहेत. मधल्या कालखंडामध्ये संस्कृत ही भाषा काहींनी आपली मिरासदारी मानली. त्यामुळे त्यांनी अन्य समाजांना या मोलाच्या ठेव्यापासून दूर ठेवले. कोणतीही विद्या, भाषा, योग अभ्यासण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. नव्या पिढीची ही मेहनत करण्याची तयारी नाही. त्यामुळे महान संस्कृतीची ओळ.ख करून घेणारी आणि ती समजावून सांगणारी मंड़ळी काळाच्या ओघात कमी झाली आहे, असे श्री. एम यांनी सांगितले.
देशात धार्मिक सलोखा अबाधित राहणे सर्वांच्याच हिताचे असून त्यासाठी आम्ही आमच्या संस्थांमार्फत विशेष प्रय▪करीत आहोत. आमच्या देशभरातील पदयात्रेचाही हाच उद्देश आहे असे सांगून ते म्हणाले, की धर्म हे राजकारण्यांचे शस्त्र व साधन बनले आहे. त्यामुळे जातीजातींमध्ये तेढ निर्माण केली जाते. धर्माला साधन बनवून सत्ता साध्य करण्याचा राजकारण्यांचा कुटील हेतू आहे.
सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वच धर्मांमध्ये जीवन सुंदर होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ते समाजापुढे ठसवून सांगण्यासाठी धर्माचा गाढा अभ्यास असणार्यांनी तसेच अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांनी समाजाचे नेतृत्व करायला पुढे येण्याची हिच वेळ आहे. या सागररुपी भावतालामध्ये पाण्याचा एक थेंब बनून मी
काम सुरू केले आहे. त्यामध्ये या क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment