डोंट सेंड एनी मेसेज . . .
- - - - - - - - - - - - - - - - -
अभय भोसले,वय...जेमतेम पंचवीस.. व्यवसाय..इंज़िनीयर..,आवड.. सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून जगभरातील मित्रमैत्रीणी जमविणे आणि ती मैत्री जोपासणे.. हे सर्व सांगण्याचं कारण काय तर सध्या सुरू असलेली सोशल नेटवर्किंगबाबतची चर्चा. त्यातील फायदे आणि तोट्यांबाबत असलेले उलटसुलट मतप्रवाह. सध्या जगभर फेसबुकची जबरदस्त धूम आहे. पाच-सात वर्षांपूर्वी आकुर्ट ची जबरदस्त क्रेझ होती. फेसबुक जॉईन केल्यावर महिन्याभराने साधारणतः लोक 'ऑर्कुट'च्या अकाऊंटकडे फिरकतही नाही असा एक सर्वसाधारण अनुभव आहे. अर्थात, तिकडे फिरकले नाही म्हणून ते अकाऊंट बंद केले असंही होत नाही. ऑर्कुट एवढी बनावट अकाऊंट फेसबुकला नसतात. येथील अकाऊंटच्या प्रोफाईलला बहुतेकवेळा खरे फोटो असतात. 'ऑर्कुट'ला मुलांच्या प्रोफाइलचे फोटो म्हणून सलमान, ऋत्विक व मुलींमध्ये कॅटरीना, जेनेलिया ठायीठायी भेटतात. अगदीच काहीनाही तरी मनीमाऊ, फुलपाखरे किंवा लहान बाळं तरी भेटतातच. अभय भोसले आर्कुटवर मला केव्हा आणि कसा जॉईन झाला, हेच् आठवत नाही. पण एकंदरच या कलंदर मुलाने अनेकांना वेड लावलेले. तो लक्षात राहण्याचे कारण त्याचे सुरेख़, नेटके प्रोफाईल आणि त्यावरील फोटो. गांधीटोपी घातलेला निळू फुले यांचा एक वेगळाच फोटो अभयच्या प्रोफाईलला आहे. अभय मूळचा खानदेशातील. चाळीसगावजवळच्या एका खेड्यात लहानाचा मोठा झालेला. शिक्षण पुण्यात. नोकरीनिमित्ताने देशभर भ्रमंती. ऑर्कुटच्या माध्यमातून त्याने ठिकठिकाणच्या मित्रांचे भक्कम जाळे विणलेले.नेहमी कोणाची तरी टोपी उडवायची, कुणाला सल्ले द्यायचे, कुणाला हाय हॅलो, कुणाच्या आप्तेष्टांची आस्थेने विचारपूस.. असा या सोशलनेटवर्कींगचा त्याने पुरेपुर फायदा करून घेतलेला. घरापासून दूर असलेल्या अभयला आपल्या गावाची, मातीची कमालीची ओढ. खानदेशाबाबत कमालीची आत्मियता. अहिराणी बोलीचा अभिमान. कुटुंबियांविषयी लळा. त्याच्या 'ऑर्कुट'च्या प्रोफाईलवर सहजपणे नजर फिरवली तरी हे सहजपणे लक्षात येईल. त्यामध्ये त्याने एक कविता लिहिलीय. ''बालपणीच्या आठवणी आठवतात ...आठवतात अजूनही ते पावसाचे दिवस''
यामध्ये ब-याच गोष्टी लिहून अखेरीस "...आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे..'' असाही उल्लेख त्याने केला आहे. 'ऑर्कुट'वर आपल्या आवडत्या व्यक्ती, संस्था, वाहन अथवा कोणत्याही गोष्टीची कम्युनिटी जॉईन करता येते. साधारणतः मुले दोन- पाच कम्युनिटीजची मेंबर होतात. हा पठठ्या चक्क पासष्ठ कम्युनिटीजना जॉईन झालेला. सावित्रीबाई फुलेंपासून ते काजोलपर्यंत आणि महात्मा गांधी, राम मनोहर लोहियांपासून ते सुरेश भटांच्या "एक दिवस आमुचाही येईल...'या कवितेपर्यंत. कितीतरी निरनिराळ्या गोष्टींशी तो बांधला गेलेला. त्याचं व्यक्तिमत्व निर्लेपपणे त्याने मित्रांसमोर मांडलं होतं. निळू फ़ुले यांचा तो वेगळाच फ़ोटो मध्यंतरी पेपरमध्ये आला आणि त्यानिमित्ताने अभय मला आठवला.
तीन वर्षांपूर्वी आर्कुटवर स्क्रॅप म्हणजे मेसेजेस पाहत असताना स्वातीचा स्क्रॅप नजरेस पडला. 'अभय इज नो मोअर' या स्वातीच्या मेसेजने उडालोच..मला नेमका काही अर्थ लागेना. तेव्हा माझी फ्रेंड लिस्टला ऊत आला होता. त्यामुळं मित्रांमध्ये कोण, कुठला हे काळजीपूर्वक पाहत नव्हतो. त्यामुळे ही स्वाती कोण? आणि अभय कोण? याचा पत्ताच लागेना. मग स्वातीचे प्रोफाईल शोधले. त्यात तिने मोबाईल नंबर दिलेला. मी फोन लावला आणि त्या स्क्रॅपबाबत विचारले. तिने सविस्तर खुलासा केला. स्वाती धुळ्याची. अभयची मैत्रीण. त्या दोघांचा मी म्युच्युअल फ्रेंड होतो. मुंबईहून 20 सप्टेंबरला पुण्याला परतताना खंडाळ्याजवळ अभयचा अपघात झाला. त्या मध्यरात्रीच तो गेला. त्यामुळे स्वातीने तिच्या व अभयच्या कॉमन मित्रांना तो मेसेज पाठवला होता.
स्वातीशी फोनवर बोलल्यावर मन खिन्न झालं. अभयचं प्रोफाईल पुन्हा एकदा नजरेखालून घातलं. त्याच्या अपघाताची खात्री करून घेतली. दुर्दैवाने ते वृत्त खरेच होते. मी त्याच्या वॉलवर स्क्रॅप लिहीला '' प्लिझ डोंट सेंड एनी स्क्रॅप टू अभय....ही इज नो मोअर...ही डाईड इन आक्सिडंट''. ही पोस्ट अनेकांनी पाहिली. खूप हळहळले त्याचे मैत्र. पण खूपजण असेही होते की जे त्याच्या निधनाच्या वार्तेबाबत अनभिज्ञ होते.त्यामुळे पुढे कितीतरी दिवस त्याच्या मित्र-मैत्रिणींचे स्क्रॅप्स येतच होते. 20 जुलैला त्याचा वाढदिवस. त्या दिवशी तर त्याच्या वॉलवर अक्षरश: स्क्रॅप्सचा पाऊस पडला.दसरा, दिवाळी आणि सणावारीही भरपूर स्क्रॅप यायचे. अभयच्या अफाट मित्र परिवाराची आणि त्याच्यावर प्रेम करणा-या मित्रांची, कल्पना त्यामुळं पुन्हा एकदा आली.सहज आठवलं अभयला जाऊन चार वर्षे झाली. त्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्याला अखेरचा मेसेज कोणाचा आणि काय असावा? याबाबत कुतूहूल चाळवलं.मागचे स्क्रॅप पाहता पाहता 21 सप्टेंबरपर्यंत गेलो. तेथे स्वातीचा स्क्रॅप..'अभय इज नो मोअर'...आणि त्याआधी कुणाल नावाच्या त्याच्या एका मित्राने एक स्क्रॅप पाठवला होता..तारीख होती 19 सप्टेंबर...'केव्हा फ्री होणारेस?...भेटू एकदा...'' आणि 20 सप्टेंबरला पुन्हा त्याचाच एका ओळीचा स्क्रॅप..''टेक केअर''.. पण तो स्क्रॅप वाचण्यापूर्वीच अभयने आर्कुटच्या दुनियेचा नव्हे, तर एकंदरच या जगाचा निरोप घेतला होता . . . . .

No comments:
Post a Comment