Friday, 6 June 2014

* * * बरसात चांदण्यांची * * * * 

''हॅलो''
''कोण''?
''प्रथमेश बोलतोय ना?''
''हो...हो...'बोला ''
''तुझं अभिनंदन करायचं होतं...भन्नाट काम केलंयसं रे तू.....''
''हा..हा....थॅंक्यू...थॅंक्यू...'''
''पुढं काय आता? नवीन पिक्चर कोणते?''
'' नाय हो.....माझी परीक्षाये आता....टीवायलाये ना मी?''
''बरं..बरं......कर मग अभ्यास....''
''आल द बेस्ट....''
''तुमचं नाव काय म्हनले?'''
'' * * * *....''
'' तू येणारेस का पुण्यात एवढ्यात???''
''नाय ओ...परीक्षा झाल्यावर यीन...तेव्हा नक्की फोन करतो तुम्हाला...''
''बरं ......बर....ठिक आहे...बाय''
''बाय...''
'टाईमपास'मधला दगडू म्हणजे प्रथमेश परब बोलत होता......कालच ''टाईमपास'' बघितला...प्रोमोजमुळं अपेक्षा उंचावल्या होत्याच....थिएटरवरची गर्दीही ओसंडून वाहते आहे...मराठी प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरलाय पिक्चर...काल तर जवळपास सगळे शो हाऊसफुल्ल...Sunil भाऊंमुळं तिकीटं मिळाली....पिक्चर मस्तच आहे....बालवयातली तरल प्रेमकथा, चुरचुरीत संवाद, झकास गाणी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दगडू आणि प्राजक्ता म्हणजेच प्रथमेश व केतकी माटेगावकरच्या सहजसुंदर अभिनयाने चित्रपट झकास बनलाय. प्रथमेशने कमाल आक्टींग केलीय...कित्येकदा तर तो अभिनय करतोय हे खरं वाटतंच नाही...तीच बाब केतकीचीही....नाजूक-निरागस प्राजक्ता तिने छान रंगवलीय. थिएटरला पिक्चर हाऊसफुल्ल तर होताच, पण ब्लॅकही जोरात चालू होते....नाही म्हटलं तरी, मनातून थोडं बरं वाटलं...नाहीतर कधी मराठी पिक्चरची तिकीटं ब्लॅक होणार??? कधी थिएटर रसिकांच्या गर्दीने फुलणार?? पण 'शाळा' 'बालक-पालक', 'दुनियादारी' पाठोपाठ 'टाईमपास'ने ही कमाल केलीये. प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्याची किमया या चित्रपटांनी करून दाखवलीय. उत्तम चित्रपट दिले तर मराठी प्रेक्षक निश्चित कौतुक करतात, याचे ''टाईमपास'' उत्तम प्रतिक आहे. त्यातील केतकीने तरुणाईसह समस्त प्रेक्षकांची मने जिंकलीत...कॅटरीना, करीना, प्रियांका या हिंदी अभिनेत्रींचे फोटो फेसबुकवर कित्येकांची प्रोफाईल पिक्चर्स बनलीत. मराठीत तसं स्थान मिळवणारी केतकी बहुदा पहिलीच मराठीच अभिनित्री असावी. नाजूक आवाजातील तिच्या संवादफेकीने, ''मला वेड लागले'' या गाण्याने तिने कित्येकांच्या काळजाला हात घातलाय. तिच्याशीही बोललो सकाळी...तिचे बाबा होते फोनवर...मी परिचय देऊन केतकीचं कौतुक केलं. त्या पित्याचा उर अभिमानाने भरून आला. एक मिनिट हं ...म्हणून त्यांनी केतकीला फोन दिला....पाच-सहा सेकंद गेले अन्‌ . . हॅलोऽऽ असा मंजुळ स्वर कानावर पडला.अर्थातच केतकी होती ती...तिचं कौतुक केलं..ती ही छान बोलली. तिच्या नाजूक, अनुनासिक मंजुळ स्वराने '' टाईमपास''मधील संवादांची आठवण करून दिली. प्रथमेश आणि केतकीला शुभेच्छा देऊन बाहेर पडलो....गाडी सुरू केली अन्‌ नेमके गाणे लागले..मला वेड लागलेऽऽऽऽ'....चित्रपटाचा पट डोळ्यासमोरून सरकला आणि अचानक आठवलं ते सुहास शिरवळकरांचं ब-याच वर्षांपूर्वी वाचलेले ''बरसात चांदण्यांची'' हे मस्त पुस्तक . . .. किशोर वयातील प्रेमासंदर्भातील खास सुशींच्या शैलीतील बहारदार कादंबरी....वाचणा-याला
वाटावं जणुकाही आपल्यावरच पुस्तक लिहिलंय की काय...!इतकं अस्सल आणि नेमकं वर्णन. .. . पेठेतील मध्यमवर्गिय वातावरण, त्याच नजरभेटी, त्याच चोरट्या भेटीगाठी, चिठ्याचपाट्या पोचवणारे मध्यस्थ वगैरे...भारी...नॉस्ट्रेल्जिक व्हायला लावणारं, भूतकाळ आठवून हूरहूर लावणारं सुरेख़ पुस्तक...मला वाटतंय...त्यातल्या काही बाबी '' टाईमपास''मध्येही आहेत.....''टाईमपास'' सुरेखच सर्वच बाबतीत...माझ्यासाठी '' बरसात चांदण्यांची'' आठवण करून दिल्याबद्दल अधिक स्पेशल... 

No comments:

Post a Comment