मानसा,मानसा कधी व्हशील मानूस...!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - --
'त्यांच्या ' कवितांना, गाण्यांना कधी कोणताही पुरस्कार लाभला नाही.. अलंकारीकतेचा कोणताही स्पर्श नसलेली, अकृत्रिम आणि मनाला भिडणारी "त्यांची' गाणी गावकुसाच्या कक्षा ओलांडून शहरी माणसांच्याही ओठांवर रेंगाळतात.. त्यांच्या कविता मुलांना मुखोद्गत असतात... मन गहिरे करणा-या आशयामुळे "त्यांच्या' कविता शाळकरी मुलींपासून समस्त महिलांच्या ओठी असतात.. गावातील शिवारात घडणा-या घटनांपासून ते विवाहित स्त्रियांच्या सुखदु:खांचा वेध घेणारी गाणी ,समाजातील अनिष्ट प्रथांबाबत कडक भाषेत हजेरी घेणारी कवने,ज्योतिषापासून ते सोन्याने मढलेल्या देवापर्यंत आणि आई-वडिलांच्या मायेपासून ते थेट मानवी मनाच्या भूमिकेपर्यंत सर्व क्षेत्रात लिलया मुशाफिरी करणारी, गोड अहिराणी भाषेतील "त्यांची' कविता म्हणजे मराठी भाषेचे वैभव आहे. "त्यांची' अर्थात या कवयत्रिची म्हणजेच बहिणाबाई चौधरींची जयंती नुकतीच झाली. बहिणाबाई हे नाव जरी ऐकले तरी त्यांच्या एकाहून एक सरस कवितांचा पट डोळ्यासमोरून सरकत जातो.
सध्या चाळीशीत असलेल्या अनेकांना बहिणाबाईंची ओळख झाली ती शालेय जीवनातील त्यांच्या कवितेने. "अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर..' ही ती कविता होती. त्यावेळी मुलांना जरी या कवितेचे फारसे अप्रूप वाटत नसले, तरी यौवनाच्या उंबरठ्यावरील आणि मुलांपेक्षा निसर्गत:च अधिक समज असलेल्या मुलींना त्यामागील वेदना समजत असत. काही भावूक मुलींच्या डोळ्यांत टचकन पाणी तरळलेले अजून स्मरणात आहे. पुढे कधीतरी त्याच कवितेतील "माझं दु:ख माझं दु:ख तळघरात कोंडलं, माझं सुख, माझं सुख हंडी झुंबरा टांगलं..' या पंक्तींचा अर्थ जेव्हा शिक्षकांनी समजावून सांगितला तेव्हा बहिणाबाईंच्या शब्दांची ताकद समजली आणि मग सुरू झाला बहिणाईंच्या प्रकाशित, अप्रकाशित कवितांचा शोध. त्यातून हाती लागलेल्या कवितांनी अक्षरश: आमची पिढी भारावून गेली. नंतर लक्षात आले की केवळ आमचीच पिढी नव्हे, तर अशा कितीतरी विद्यार्थ्यांच्या पिढ्यांवर बहिणाबाईंच्या कवितेने गारूड केले होते. मराठी साहित्याचे उपासक बहिणाबाईंचे भक्त बनले होते. ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदीन जीवनाशी, त्यांच्या भावभावनांशी संबंधीत या रचना मराठी साहित्यात अजरामर झाल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व कविता बहिणाबाईंच्या मृत्यू पश्चात प्रकाशित झाल्या आहेत.
खान्देशात जळगाव जिल्ह्यातील आसोदा हे बहिणाबाईंचे जन्मगाव. 1880च्या ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या बहिणाबाईंचे सासरही खान्देशातच होते. त्या भागातील अहिराणी बोलीवर त्यांचे प्रभुत्व होते. आपल्या साध्याभोळ्या आयुष्यात अनेक टप्पेटोणपे खाल्लेल्या, कित्येक अडिअडचणींवर मात केलेल्या, अनेक खाचखळगे जवळून पाहिलेल्या, कितीतरी कडूगोड प्रसंगातून तावूनसुलाखून निघालेल्या, जीवनाचे मर्म ओळखलेल्या बहिणाबाईंनी आपल्या साध्या, सरळभाषेतून कितीतरी ओव्या रचल्या. मनाला भिडणा-या कविता लिहिल्या. या कविता त्यांनी कोठे प्रकाशित करण्याच्या हेतूने कधी रचल्या नव्हत्या. त्यांचे पुत्र व पुढे महाराष्ट्रात उत्तम कवी म्हणून परीचित झालेले सोपानराव चौधरी यांनी त्या जमेल तशा लिहून ठेवल्या होत्या. बहिणाबाईंच्या निधनानंतर सोपानरावांनी या कविता आचार्य अत्रेंना दाखविल्या.अत्रेंना पहिल्या एक-दोन कविता, गाणी वाचूनच त्यातील ताकद लक्षात आली आणि त्यानंतर बहिणाबाईंची गाणी तमाम रसिकांसाठी, अभ्यासूंसाठी, जिज्ञासूंसाठी पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाली. त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला या खान्देशातील केवळ डोळसच नव्हे, तर प्रतिभावंत, द्रष्ट्या कवयत्रिची ओळख पटली. तिच्या कसदार, मनाला भिडणा-या कवितांनी अनेक मने घायाळ केली. माहेराहून सासरी चाललेल्या सासुरवाशिणीचा गहिवर जसा बहिणाबाईंनी टिपला, तसाच वारीला चाललेल्या
वारक-यांच्या भावनांचीही स्पंदने त्यांनी टिपली.
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुसोनिया गेले कुंकू रेखा उघडी पडली
या हृदयद्रावक शब्दांत वैधव्याची वेदना बहिणाबाई व्यक्त करतात. जात्यावर बसून पीठ दळतानाच त्यांच्या मुखातून आपोआप ओव्या बाहेर पडत असत. खान्देशी भाषेतील घरोट्यातून म्हणजे जात्यातून पिठ बाहेर पडल्याप्रमाणेच आपल्याही तोंडून ओव्या आपोआप बाहेर येतात हे सांगताना त्या म्हणतात
अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पिठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं व्होटी
उन, वारा, पावसाची तमा न बाळगता पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीच्या वारीला चाललेला एखादा वारकरी दृष्टीस पडला की बहिणाबाई गहिवरून जात असत. त्या विचारत
अरे,वारक-या तुले
नही ऊन वारा थंडी
झुगारीत अवघ्याले
झाली पंढरीची दिंडी
आयुष्यात अनेकांना आपल्या मनाविषयी प्रश्न निर्माण होतात. ईश्वराने मुळात हे मनच का निर्माण केले, असा प्रश्न अनेकांना पडतो बहिणाबाईंनी नेमक्या शब्दांत याविषयी दोन शतकांपूर्वीच गाणे लिहीले आहे.
मन मोकाट मोकाट
त्याले ठाईठाई वाटा
जशा वा-यानं चालल्या
पान्याव-हल्या रे लाटा
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आत व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याला उतारे मंतर
देवा असं कसं मन
असं कसं रे घडलं
कुठे जागेपणी तुले
असं सपन पडलं!
मनासंदर्भात लिहिलेल्या या कवितेने हजारोंच्या मनाचा ठाव घेतला हे ही तितकेच खरे. देशभर आणि जगभर सध्या अस्थिरता माजली आहे.भ्रष्टाचार,काळापैसा,हि ंसाचार,गुन्हेगारीने कळस गाठला आहे.जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर जातीपातींची उतरंड मोडून टाकण्याऐवजी तिची नव्याने मांडणी करण्याचे उद्योग विशिष्ठ वृत्ती करीत आहेत. मूठभर जात्यंध संपूर्ण समाजाला बदनाम करणारी कृत्ये करीत आहेत. एखाद्या ग़टाच्या कृत्यामुळे संपूर्ण संबंध समाजालाच आरोपीच्या कोठडीत उभे करण्याचेही उद्योग जोमाने वेग धरीत आहेत. माणूसकी हरवू लागल्याच्या, विरळ होऊ लागल्याच्या आणि समाजमन संभ्रमित होत असल्याच्या या काळात कणखर, सडेतोड बहिणाबाई हव्या होत्या. त्यांनी पूर्वी लिहिलेलाच सवाल आताही केला असता
मानसा,मानसा कधी
व्हशील मानूस?
संसार करताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. पै, पै, जमवून, काटकसर करून संसार रेटावा लागतो. आयुष्यातील सुख:दुखांचेही तसेच असते हे सांगताना बहिणाबाई म्हणतात
कधी नगद उधार
सुखादु:खाचा वेपार
अरे,संसार संसार
असा मोठा जादुगार बहिणाबाईंना ही गाणी, या कविता कशा सुचतात?याचे अनेकांना कोडे पडत असे. त्याबाबत त्यांनीच लिहून ठेवले आहे की
माझी माय सरसोती,माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपितं पेरली
माझ्यासाठी पांडुरंगा,तुझं गीता-भागवत
पावसात समावतं माटीमधी उगवतं...
आयुष्यात कित्येकजण कायम मृत्यूला किंवा मरणाला घाबरून जगतात. पण जन्म आणि मृत्यू यामध्ये फारच कमी अंतर आहे हे खुबीने सांगताना बहिणाबाई म्हणतात
आला सास गेला सास,जीव तुझं रे तंतर
अरे जगनं-मरनं,एका सासाचं अंतर...
स्त्रीला वैधव्य आल्यावर खूपजण तिचे सांत्वन करतात.पण सहानुभूतीवर आयुष्यभर जगता येत नाही. कधीतरी, काहीकाळाने का होईना तिला स्वत:च्या कर्तृत्वाच्या बळावरच आयुष्यात उभे राहवेच लागते. बहिणाबाईंनी त्याचे समर्पक वर्णन केले आहे.त्या म्हणतात
सांग सांग धर्ती माता,अशीकशी जादू झाली
झाड गेलं निघीसनी,मांघे सावली उरली
रडू नको माझ्या जीवा,तुला रड्याची रे सव
रडू हासव रे जरा,त्याला संसाराची चव!
नका नका आयाबाया, नका करू माझी किव
झालं झालं समाधान,आता माझा माले जीव
विवाहित स्त्रिच्या आयुष्यात तिच्या माहेराविषयी अनन्यसाधारण स्थान असते. माहेराच्या आठवणीने मोहोरून जाणारी,गहिवरणारी,तेथील मोरपंखी क्षणांच्या ठेवींवर पुढले आयुष्य जगणा-या महिलांसंदर्भात बहिणाबाईंनी अनेकविध कविता रेखाटल्या. आपल्या या कवितांमधून त्यांनी माहेरचे क्षण अजरामर केले आहेत. कोणतीही विवाहित स्त्री सासरी का राहते?या प्रश्नाचे अत्यंत भावस्पर्शी उत्तर देताना त्या म्हणतात
देरे देरे योग्या ध्यान,ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते
तिरुपतीचे बालाजीचे श्रीमंत देवस्थान आणि आपल्या गावातील शेतक-यांचे साधेसुधे विठ्ठल मंदीर यांतील फरक स्पष्ट करताना त्या म्हणतात
सोन्यारुप्यानं मढला,मारवाड्याचा बालाजी
शेतक-याचा इठोबा, पानाफुलामध्ये राजी
गावात वर्षानुवर्षे वीटा तयार करण्याचा व्यवसाय करणारा परशुराम बेलदार विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी चालढकल करीत असतो.त्याला त्या सुनावतात
अरे सर्व्या जगामधी,तूनं कधी ना देखली
अशी देख एक ईट,इठ्ठलाच्या पायाखाली
भट्टीतल्या इटेवरी,तुझ्या संसाराचा रंग
तठी एका ईटेवरी,देख उभा पांडुरंग
आयुष्यात कितीतरी निरनिराळे कडूगोड प्रसंग अनुभवलेल्या बहिणाबाईंनी सरळधोट आणि नेमकेपणाने हे अनुभव शब्दबद्ध केले. मराठी साहित्यातील अलौकीक लेणे असलेल्या या कविता, गाणी अपघातानेच जगासमोर आल्या. कवी सोपानदेव यांनी जर त्या आचार्य अत्रेंना दाखवल्या नसत्या, तर त्या आजतागायात अप्रकाशित राहील्या असत्या. महाराष्ट्रही प्रतिभावंतांची खाण आहे आणि ही प्रतिभा कोणत्याही ठराविक वर्गाची मक्तेदारी नाही याचे ग्रामीण भागातील, लौकीकार्थाने अशिक्षित असलेल्या बहिणाबाईं या सर्वोत्तम प्रतिक आहेत. सध्याचा काळ प्रगत आहे. दळणवळण आणि संपर्काची एकाहून एक सरस साधने आपल्याला उपलब्ध झाली आहेत. चंद्र मोहीमांपाठोपाठ आता मंगळावर स्वारी करण्याची तयारी होऊ लागली आहे. सर्वच क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. विकासाची, उत्कर्षाची नवनव्या वाटा दिसू लागल्या आहेत. या प्रगत काळात उपलब्ध ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या, दडलेल्या प्रतिभावंतांचा शोध घेऊन त्यांना दुनियेसमोर पेश करण्याचा निर्धार बहिणाबाईंच्या स्मृतीदिनी करूयात.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - --
'त्यांच्या ' कवितांना, गाण्यांना कधी कोणताही पुरस्कार लाभला नाही.. अलंकारीकतेचा कोणताही स्पर्श नसलेली, अकृत्रिम आणि मनाला भिडणारी "त्यांची' गाणी गावकुसाच्या कक्षा ओलांडून शहरी माणसांच्याही ओठांवर रेंगाळतात.. त्यांच्या कविता मुलांना मुखोद्गत असतात... मन गहिरे करणा-या आशयामुळे "त्यांच्या' कविता शाळकरी मुलींपासून समस्त महिलांच्या ओठी असतात.. गावातील शिवारात घडणा-या घटनांपासून ते विवाहित स्त्रियांच्या सुखदु:खांचा वेध घेणारी गाणी ,समाजातील अनिष्ट प्रथांबाबत कडक भाषेत हजेरी घेणारी कवने,ज्योतिषापासून ते सोन्याने मढलेल्या देवापर्यंत आणि आई-वडिलांच्या मायेपासून ते थेट मानवी मनाच्या भूमिकेपर्यंत सर्व क्षेत्रात लिलया मुशाफिरी करणारी, गोड अहिराणी भाषेतील "त्यांची' कविता म्हणजे मराठी भाषेचे वैभव आहे. "त्यांची' अर्थात या कवयत्रिची म्हणजेच बहिणाबाई चौधरींची जयंती नुकतीच झाली. बहिणाबाई हे नाव जरी ऐकले तरी त्यांच्या एकाहून एक सरस कवितांचा पट डोळ्यासमोरून सरकत जातो.
सध्या चाळीशीत असलेल्या अनेकांना बहिणाबाईंची ओळख झाली ती शालेय जीवनातील त्यांच्या कवितेने. "अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर..' ही ती कविता होती. त्यावेळी मुलांना जरी या कवितेचे फारसे अप्रूप वाटत नसले, तरी यौवनाच्या उंबरठ्यावरील आणि मुलांपेक्षा निसर्गत:च अधिक समज असलेल्या मुलींना त्यामागील वेदना समजत असत. काही भावूक मुलींच्या डोळ्यांत टचकन पाणी तरळलेले अजून स्मरणात आहे. पुढे कधीतरी त्याच कवितेतील "माझं दु:ख माझं दु:ख तळघरात कोंडलं, माझं सुख, माझं सुख हंडी झुंबरा टांगलं..' या पंक्तींचा अर्थ जेव्हा शिक्षकांनी समजावून सांगितला तेव्हा बहिणाबाईंच्या शब्दांची ताकद समजली आणि मग सुरू झाला बहिणाईंच्या प्रकाशित, अप्रकाशित कवितांचा शोध. त्यातून हाती लागलेल्या कवितांनी अक्षरश: आमची पिढी भारावून गेली. नंतर लक्षात आले की केवळ आमचीच पिढी नव्हे, तर अशा कितीतरी विद्यार्थ्यांच्या पिढ्यांवर बहिणाबाईंच्या कवितेने गारूड केले होते. मराठी साहित्याचे उपासक बहिणाबाईंचे भक्त बनले होते. ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदीन जीवनाशी, त्यांच्या भावभावनांशी संबंधीत या रचना मराठी साहित्यात अजरामर झाल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व कविता बहिणाबाईंच्या मृत्यू पश्चात प्रकाशित झाल्या आहेत.
खान्देशात जळगाव जिल्ह्यातील आसोदा हे बहिणाबाईंचे जन्मगाव. 1880च्या ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या बहिणाबाईंचे सासरही खान्देशातच होते. त्या भागातील अहिराणी बोलीवर त्यांचे प्रभुत्व होते. आपल्या साध्याभोळ्या आयुष्यात अनेक टप्पेटोणपे खाल्लेल्या, कित्येक अडिअडचणींवर मात केलेल्या, अनेक खाचखळगे जवळून पाहिलेल्या, कितीतरी कडूगोड प्रसंगातून तावूनसुलाखून निघालेल्या, जीवनाचे मर्म ओळखलेल्या बहिणाबाईंनी आपल्या साध्या, सरळभाषेतून कितीतरी ओव्या रचल्या. मनाला भिडणा-या कविता लिहिल्या. या कविता त्यांनी कोठे प्रकाशित करण्याच्या हेतूने कधी रचल्या नव्हत्या. त्यांचे पुत्र व पुढे महाराष्ट्रात उत्तम कवी म्हणून परीचित झालेले सोपानराव चौधरी यांनी त्या जमेल तशा लिहून ठेवल्या होत्या. बहिणाबाईंच्या निधनानंतर सोपानरावांनी या कविता आचार्य अत्रेंना दाखविल्या.अत्रेंना पहिल्या एक-दोन कविता, गाणी वाचूनच त्यातील ताकद लक्षात आली आणि त्यानंतर बहिणाबाईंची गाणी तमाम रसिकांसाठी, अभ्यासूंसाठी, जिज्ञासूंसाठी पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाली. त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला या खान्देशातील केवळ डोळसच नव्हे, तर प्रतिभावंत, द्रष्ट्या कवयत्रिची ओळख पटली. तिच्या कसदार, मनाला भिडणा-या कवितांनी अनेक मने घायाळ केली. माहेराहून सासरी चाललेल्या सासुरवाशिणीचा गहिवर जसा बहिणाबाईंनी टिपला, तसाच वारीला चाललेल्या
वारक-यांच्या भावनांचीही स्पंदने त्यांनी टिपली.
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुसोनिया गेले कुंकू रेखा उघडी पडली
या हृदयद्रावक शब्दांत वैधव्याची वेदना बहिणाबाई व्यक्त करतात. जात्यावर बसून पीठ दळतानाच त्यांच्या मुखातून आपोआप ओव्या बाहेर पडत असत. खान्देशी भाषेतील घरोट्यातून म्हणजे जात्यातून पिठ बाहेर पडल्याप्रमाणेच आपल्याही तोंडून ओव्या आपोआप बाहेर येतात हे सांगताना त्या म्हणतात
अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पिठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं व्होटी
उन, वारा, पावसाची तमा न बाळगता पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीच्या वारीला चाललेला एखादा वारकरी दृष्टीस पडला की बहिणाबाई गहिवरून जात असत. त्या विचारत
अरे,वारक-या तुले
नही ऊन वारा थंडी
झुगारीत अवघ्याले
झाली पंढरीची दिंडी
आयुष्यात अनेकांना आपल्या मनाविषयी प्रश्न निर्माण होतात. ईश्वराने मुळात हे मनच का निर्माण केले, असा प्रश्न अनेकांना पडतो बहिणाबाईंनी नेमक्या शब्दांत याविषयी दोन शतकांपूर्वीच गाणे लिहीले आहे.
मन मोकाट मोकाट
त्याले ठाईठाई वाटा
जशा वा-यानं चालल्या
पान्याव-हल्या रे लाटा
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आत व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याला उतारे मंतर
देवा असं कसं मन
असं कसं रे घडलं
कुठे जागेपणी तुले
असं सपन पडलं!
मनासंदर्भात लिहिलेल्या या कवितेने हजारोंच्या मनाचा ठाव घेतला हे ही तितकेच खरे. देशभर आणि जगभर सध्या अस्थिरता माजली आहे.भ्रष्टाचार,काळापैसा,हि
मानसा,मानसा कधी
व्हशील मानूस?
संसार करताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. पै, पै, जमवून, काटकसर करून संसार रेटावा लागतो. आयुष्यातील सुख:दुखांचेही तसेच असते हे सांगताना बहिणाबाई म्हणतात
कधी नगद उधार
सुखादु:खाचा वेपार
अरे,संसार संसार
असा मोठा जादुगार बहिणाबाईंना ही गाणी, या कविता कशा सुचतात?याचे अनेकांना कोडे पडत असे. त्याबाबत त्यांनीच लिहून ठेवले आहे की
माझी माय सरसोती,माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपितं पेरली
माझ्यासाठी पांडुरंगा,तुझं गीता-भागवत
पावसात समावतं माटीमधी उगवतं...
आयुष्यात कित्येकजण कायम मृत्यूला किंवा मरणाला घाबरून जगतात. पण जन्म आणि मृत्यू यामध्ये फारच कमी अंतर आहे हे खुबीने सांगताना बहिणाबाई म्हणतात
आला सास गेला सास,जीव तुझं रे तंतर
अरे जगनं-मरनं,एका सासाचं अंतर...
स्त्रीला वैधव्य आल्यावर खूपजण तिचे सांत्वन करतात.पण सहानुभूतीवर आयुष्यभर जगता येत नाही. कधीतरी, काहीकाळाने का होईना तिला स्वत:च्या कर्तृत्वाच्या बळावरच आयुष्यात उभे राहवेच लागते. बहिणाबाईंनी त्याचे समर्पक वर्णन केले आहे.त्या म्हणतात
सांग सांग धर्ती माता,अशीकशी जादू झाली
झाड गेलं निघीसनी,मांघे सावली उरली
रडू नको माझ्या जीवा,तुला रड्याची रे सव
रडू हासव रे जरा,त्याला संसाराची चव!
नका नका आयाबाया, नका करू माझी किव
झालं झालं समाधान,आता माझा माले जीव
विवाहित स्त्रिच्या आयुष्यात तिच्या माहेराविषयी अनन्यसाधारण स्थान असते. माहेराच्या आठवणीने मोहोरून जाणारी,गहिवरणारी,तेथील मोरपंखी क्षणांच्या ठेवींवर पुढले आयुष्य जगणा-या महिलांसंदर्भात बहिणाबाईंनी अनेकविध कविता रेखाटल्या. आपल्या या कवितांमधून त्यांनी माहेरचे क्षण अजरामर केले आहेत. कोणतीही विवाहित स्त्री सासरी का राहते?या प्रश्नाचे अत्यंत भावस्पर्शी उत्तर देताना त्या म्हणतात
देरे देरे योग्या ध्यान,ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते
तिरुपतीचे बालाजीचे श्रीमंत देवस्थान आणि आपल्या गावातील शेतक-यांचे साधेसुधे विठ्ठल मंदीर यांतील फरक स्पष्ट करताना त्या म्हणतात
सोन्यारुप्यानं मढला,मारवाड्याचा बालाजी
शेतक-याचा इठोबा, पानाफुलामध्ये राजी
गावात वर्षानुवर्षे वीटा तयार करण्याचा व्यवसाय करणारा परशुराम बेलदार विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी चालढकल करीत असतो.त्याला त्या सुनावतात
अरे सर्व्या जगामधी,तूनं कधी ना देखली
अशी देख एक ईट,इठ्ठलाच्या पायाखाली
भट्टीतल्या इटेवरी,तुझ्या संसाराचा रंग
तठी एका ईटेवरी,देख उभा पांडुरंग
आयुष्यात कितीतरी निरनिराळे कडूगोड प्रसंग अनुभवलेल्या बहिणाबाईंनी सरळधोट आणि नेमकेपणाने हे अनुभव शब्दबद्ध केले. मराठी साहित्यातील अलौकीक लेणे असलेल्या या कविता, गाणी अपघातानेच जगासमोर आल्या. कवी सोपानदेव यांनी जर त्या आचार्य अत्रेंना दाखवल्या नसत्या, तर त्या आजतागायात अप्रकाशित राहील्या असत्या. महाराष्ट्रही प्रतिभावंतांची खाण आहे आणि ही प्रतिभा कोणत्याही ठराविक वर्गाची मक्तेदारी नाही याचे ग्रामीण भागातील, लौकीकार्थाने अशिक्षित असलेल्या बहिणाबाईं या सर्वोत्तम प्रतिक आहेत. सध्याचा काळ प्रगत आहे. दळणवळण आणि संपर्काची एकाहून एक सरस साधने आपल्याला उपलब्ध झाली आहेत. चंद्र मोहीमांपाठोपाठ आता मंगळावर स्वारी करण्याची तयारी होऊ लागली आहे. सर्वच क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. विकासाची, उत्कर्षाची नवनव्या वाटा दिसू लागल्या आहेत. या प्रगत काळात उपलब्ध ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या, दडलेल्या प्रतिभावंतांचा शोध घेऊन त्यांना दुनियेसमोर पेश करण्याचा निर्धार बहिणाबाईंच्या स्मृतीदिनी करूयात.
शेख साहेब खूप अप्रतिम.....सलाम तुमच्या लिखाणाला.
ReplyDelete