जव्हारची डाक्टरबाई :-
- - - - - - - - - - - - -
जव्हारमधील डाकटरबाई . . .
- - - - - - - - - - - - - - - - - - -
पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर ही शहरे अलिकडच्या काळात महानगरे बनली. विकासाची गंगोत्री बहुदा या शहरांपुरतीच मर्यादीत राहीली. जव्हार-मोखाडा या भागात तर विकास अद्याप कित्येक कोस दूर आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि गुजरातच्या बेचक्यात हा आदिवासीबहुल जव्हार तालुका आहे. उन्हाळ्यात कमालीचे उन, पावसाळ्यात धो धो पावसाच्या संततधारा आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी असे या इथले हवामान. या तिन्ही ऋतूंपासून बचाव करण्याची शारीरिक, मानसिक, आर्थिक ताकद येथील आदिवासींमध्ये आजिबात नाही. पुण्यामुंबईचे कित्येक भाग, काही मॉल अगदी परदेशांची आठवण करू देण्याइतके चकचकीत आणि पॉश आहेत. बिचा-या आदिवासांची घरे मात्र आजही शेणामातीचीच आहेत. भाताची, नागलीची शेती हा त्यांचा उपजिवीकेचा मुख्य व्यवसाय. कमालीचे दारीद्र्याने आणि अंधश्रद्धांनी हा समाज पिचून गेलाय. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना आताशा त्यांच्यापर्यंत पोचू लागल्यात. काही स्वयंसेवी संस्था, संघटना तेथे कार्यरत आहेत. पण, शहरातील माणूस अद्याप तेथे पोचत नाही. आपले बांधव म्हणून या भूमीपुत्रांची गळाभेट घेत नाही. त्यामुळे ही मंडळी अद्यापही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. शहरातली ही माणसं आपल्याला स्विकारतील की नाही याची त्यांना भीती वाटते ...निसर्गाच्या नवनवीन रुपाशी जुळलेले त्यांचे सण असतात आणि ते त्याचा मनमुराद आनंद लुटतात. त्यांचे देवही अनोखे...आणि त्यांची भक्तीही आगळी...आजही संध्याकाळी सहानंतर जव्हारमधून यायला आणि जायला दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळेच या दुर्गम भागातील विकासाला खीळ बसली आहे. शिक्षणासाठी शाळा अलिकडच्या काळात उघडल्या गेल्यात. जव्हारला नगरपालिकाही आहे पण बजेट सगळे घाट्यात...आता मार्चनंतर तेथे कडाक्याचा उन्हाळा असेल आणि पिण्याच्या पाण्याची ओरड....अक्षरश: गाळातील गढूळ पाणी हे लोक वापरतात. साप, विंचूसारखे प्राण्यांची येथे कायमच भीती असते. गर्द जंगलामध्ये बहुतेक सर्व श्वापदे आहेत. वैद्यकीय सुविधांची मारामार आहे आणि त्यासाठी लागणारा पैसाही येथील माणसांकडे नसतो....मग या भागात जाऊन दवाखाना थाटण्याचा आतबट्ट्याचा व्यवसाय करणार कोण??? कोणीच नाही...जव्हार-मोखाडा आण् विक्रमगड या तीन तालुक्यांमध्ये मिळून एकच सरकारी डॉक्टर आहे. डॉ. भरतकुमार महाले...याच आदिवासी भागात लहानाचे मोठे झालेल्या डॉ. महाले अत्यंत सेवाभावी, त्यागी वृत्तीने हे काम करतात. त्यात त्यांना मोलाची साथ आहे ती त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अनिता यांची...
डॉ. अनिता यांच्याशी काल गप्पा मारताना इतके दिवस उत्सुकता असलेल्या आदिवासी भागाचे चित्र लख्खपणे डोळ्यांसमोर उभे राहीले. त्यांनी त्या भागात स्वत:चे रुग्णालय था्टले आहे. तसे पाहिले तर कोणत्याही शहरात, महानगरात रुग्णालय थाटून अभिजन,महाजनांसाठी सेवा केली असती, तर त्यांना बक्कळ माया कमवता आली असती... पण, नाही....मुळातच सेवाभावी वृत्तीच्या अनिता यांनी या आदिवासी भागात काम करण्याचा ठाम निर्णय घेतला आणि गेल्या सहा- सात वर्षांपासून त्या तेथे कार्यरत आहेत. केवळ रुग्णांसाठी डॉक्टर म्हणूनच नव्हे, तर त्यांच्या एकूणच जीवनमान उंचावण्याच्या प्रत्येक कामाशी त्यांची नाळ जुळली आहे. आदिवासींची खडतर जीवनपद्धती, परंपरांशी एकरूप होऊन त्या तेथे काम करतात. वैद्यकीय पेशाविषयी असलेले गैरसमज दूर करून त्यांना वेळोवेळी आवश्यक त्या लसी देण्याचे काम करतात. गरोदर महिला, प्रसुती झालेल्या महिलांची जीवापाड काळजी घेतात आणि नवजात शिशूलाही ममतेने आवश्यक ती औषधे, लसी देतात...औषधे-इंजेक्शने घ्यायला कुचराई करणा-या तेथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगतात. त्यांच्यासाठी केसांना लावायची तेले,कंगवे, फण्या देतात. टापटीप राहण्यासाठी जनजागृती करतात. उपक्रम राबवतात.दुर्गम भागातील पाड्यांवर राहणा-या आदिवासी बांधवांना कधी कुणाकडून सायकली घेऊन देतात, कधी शाळकरी मुलांना शालेय साहित्य देतात....चित्रकार, कलाकारांना उत्तेजन देतात...त्यांच्या कलांना वाव मिळवून देण्यासाठी, व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न करतात. आदिवासी समाजात राहून तेथील चालीरीती त्यांनी उत्तम अवगत केल्या आहेत. तेथील आदिवासींची बोलीभाषा त्यांना समजते व बोलताही येते. जंगलात एखादा प्राणी जखमी अवस्थेत आढळला, तर त्याच्यावरही उपचार करून ते त्याची शुशृषा करतात. या भागातील रानभाज्यांची चव त्यांना खूप आवडतात. त्या आदिवासी जीवनाशी त्या समरस झाल्यात. एकरूप झाल्यात. अर्थात, हे सगळं बोलायला सोप्प आहे ....पण महानगरांमधील सुखासीन आयुष्याकडे पाठ फिरवून थेट जव्हार, मोखाडासारख्या दुर्गम आदिवासी भागात जाऊन काम करायचे, तेथेच रहायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही....पण अनिताने हे करून दाखवलंय . . .
अनिता काल भेटली...गोरी...नाजूक चणीची, बोलक्या डोळ्यांची...निगर्वी आणि निर्मळ मनाची...रात्री उशीरापर्यंत आम्ही खूप गप्पा मारल्या...त्यात तिच्या आदिवासी भागातील कामाचा पट उलगडला...पण आपण फार काही वेगळं करतोय असा अभिनिवेश तिच्या बोलण्यात आजिबात नाही....हे तर आपलं कामच आहे..आपलं कर्तव्यच आहे ही तिची भावना ...समाजाप्रती उत्तरदायित्वाची तिची वृत्ती खूप आश्वासक आहे...आदिवासी सर्वचदृष्ट्य़ा मागास असले, तरी मूळ प्रवाहात येण्यासाठीची त्यांची प्रक्रीया सुरू झालेली आहे. त्यांची उगवती पिढी या प्रवाहात सामील होण्यास उत्सुक आणि प्रयत्नशील आहे..त्यामुळे आगामी काळात हे परीवर्तन नक्कीच होईल यात शंकाच नाही...असं सांगताना डॉ. अनिता यांचे डोळे लकाकले...जुनी हिंदी गाणी तिला आवडतात....अध्यात्मामध्ये रस आहे...कितीतरी विषयांवर आम्ही गप्पा मारल्या....तरीही अजूनही खूप काही राह्यलयं असं वाटतं... Hatts Of You Anita . ..
(फेसबुकच्या मार्कबाबा . .. . तुझ्यामुळे माझ्या मित्रांच्या खजिन्यात डॉ. अनिता यांच्यासारख्या काही अमूल्य रत्नांची भर पडली...अनिता,.... सकाळी थोडक्यात चुकामूक झाल्याची चुटपूट नक्कीच आहे....पण हरकत नाही....आपल्या अत्तराच्या भेटीतील सुगंधी क्षण मनाच्या कुपीत कायम राहतील..भेटू लवकरच

No comments:
Post a Comment