अवलिया . . .
- - - - - -
मागं एकदा भटकंतीमध्ये हे बाबा भेटले....भलताच अवलिया माणूस हो....कुठेतरी मराठवाड्यात अजिंठयाजवळ महादेवाचं मंदीर आहे......तिथं होते हे कित्येक वर्षं.....नंतर हरीद्वार आणि हिमालयात......माहिमला पूर्वी मस्केवाले बाबा होते.......असं म्हणतात की त्यांचं निर्वाण झाल्यानंतर सबंध समुद्रातील पाण्याला सुगंधीत वास येत होता.....हे महाराज त्यांचे अनुयायी....नेमकं वय काय? माहिती नाही....नाव काय??? माहिती नाही....आणि मी ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही.....म्हणतात ना ऋषीचं कुळ शोधू नये.....एकदा भ्रमंतीमध्ये दिवसभर होतो मी त्यांच्याबरोबर.....त्यावेळी जे काही अनुभवलं ना ते शब्दातीत आहे....त्या गोष्टींची कधी वाच्यता करायची नसते.....
बाबांना आताही भेटतो अधूनमधून.....बम्म भोलेनाथ म्हणत चिलीम पेटवून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या की अध्यात्मापासून राजकारणापर्यंत सर्व सर्व विषयांवर ते तासोनतास गप्पा मारतात.....त्यांना मराठी समजतं.....पण बोलता येत नाही.....हिंदीत ते तासोन्तास गप्पा करतात....एक समजत नाही त्यांचं.....ते कधी कोणता पेपर वाचत नाहीत...टीव्ही पाहत नाहीत....फक्त देशभरातले दर्गे आणि भोलेनाथाची मंदीरं फिरत राहतात....मग यांना हे सारं कसं समजतं.... पार स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रपुरुषांपासून....मधल्या काळातील जयप्रकाश नारायण, मदनमोहन मालवीय, राममनोहर लोहिया ते अलिकडच्या सा-या राजकीय नेत्यांची त्यांना सखोल माहिती कशी? हेच कळत नाही.....राज्यात, देशात काय चाललंय? कोणते वारे चालू आहेत? हे त्यांना ठावूक असतं......पण, त्यांना आपलं काय सांगायला, विचारायला जावं...तर नुस्तं बघतात माझ्याकडं....हसतात आणि म्हणतात...सब अच्छा होगा....चिंता मत कर...अपना अपना काम कर.....बाबा....अहो अजून कशातच काय नाहीये....आणि कधी अच्छा होगा...? मी त्यांना असं म्हटलं...की पुन्हा पाहतात ......हसतात....त्यांची नजर आता काळजाचा ठाव घेणारी असते....पण एक वैशिष्ठ्य आहे त्यांचं.....का कुणास ठावूक.... पण माझ्यावर खूप प्रेम करतात.....ते कधी कुणाच्या घरी जात नाहीत...स्वत:चा शिधा स्वत: शिजवून खातात....त्यांचं वास्तव्याचं ठिकाणही बदलतं असतं....पण ते आले, की निरोप मिळतो......मग जातो भेटायला....मला पाहून बच्चा आया मेरा म्हणतात..... आनंदानं त्यांचे डोळे लकाकतात.....मी समाधान पावतो....

No comments:
Post a Comment