Friday, 6 June 2014

डॉक्टरांचा जीव गेला ....आपलं काय जातंय...??? 
- - - - - - - - -- - - -- - --- - -- -------------
काल होतो मी तिथं.....डॉक्टरांना जाऊन तीन महिने झाले काल...अजून आरोपी सापडले नाहीत..कोणी षड्यंत्र रचलं अद्याप समजलेलं नाही...पोलिसांवर विश्वास आहे....पण तरी मनाला बोचतं आतून..अंनिसच्या कार्यकर्ते काल ''त्या'' पुलावर..घटनास्थळावरच धरणे आंदोलन करणार होते..डॉक्टरांच्या हत्येनंतर अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला..काही नासक्या प्रवृत्ती वगळता सर्वांनी एकमुख़ाने या हत्येचा तीव्र निषेध नोंदवला. ठिकठिकाणी उग्र् आंदोलने झाली. जादुटोणा विरोधी कायद्याचा वटहुकूम काढणं सरकारला भाग पडलं. जनमताच्या रेट्‌याचा तो परीणाम होता. पण हा रेटा निर्माण होण्यासाठी डॉक्टरांना जीव गमवावा लागला ही कमालीची वेदनादायक बाब ....हा कायदा केंद्रातही लागू करावा अशी अं निसची मागणी आहे. डॉक्टरांचे खुनीही सपडले पाहिजेत ... डॉक्टरांचा मुलगा हमिद त्याच्या काकांसोबत आला होता. सगळे ओंकारेश्वर पुलावर जमणार होते. दोन रिपोर्टर्स आणि फोटोग्राफरला तिथं पाठवले. ..अर्ध्या तासाने मी गेलो. गर्दीचा अंदाज नव्हताच तसा... आधी वाटलं दिवस चुकला..मग वाटलं वेळ चुकली..मग वाटलं जागा चुकली...पण पाहतो तर हमीद तिथं भाषण करीत होता..भोवताली मोजून वीस-पंचवीस माणसं..त्यात पत्रकार व छायाचित्रकार पाच-सात...गर्दी कशामुळे झालीय हे पाहणारे बघे पाच सात..मग अंनिसचे काय पाच-दहाच कार्यकर्ते होते?? डॉक्टर गेल्यानंतर गळे काढणा-यांपैकी एकालाही तिथं जावं असं वाटलं नाही?? ज्या कायद्याच्या निर्मितीसाठी डॉक्टर झटत होते, तो प्रत्यक्षात यावा असं कुणालाच वाटतं नाही ?? डॉक्टरांचे मारेकरी सापडावेत असं कुणालाच वाटत नाही ?? डॉक्टर काय स्वत:च्या फायद्यासाठी कायदा करा म्हणून झटत नव्हते..जादुटोण्याने, मंत्रतंत्राने मूलबाळ होण्याचे, गुप्तधन देण्याचे अमिष दाखवून समाजाला नागवणा-यांविरुद्ध हा माणूस अखेरपर्यंत झटत होता..घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाचं भलं करायला निघाले होते डॉक्टर...बदल्यात काय मिळालं??? पिस्तुलाच्या तीन गोळ्या... .. .कुणी मारल्या??? माहिती नाही...का मारल्या?? माहिती नाही....मारेकरी सापडले पाहिजेत का??? होऽऽऽऽऽऽऽऽऽ.....मग आंदोलनाला कोण येणार?????कुणी नाहीऽऽऽऽऽऽऽकिती बधीर झालोय ना आपण??? नोकरी-धंदा, टीव्ही, क्रिकेट, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अप्प यातनं वेळ आहे कुणाला??? डॉक्टरांचा जीव गेला ...जाऊ दे...आपलं काय जातंय...??? पुण्यात राहणं दिवसेंदिवस निराशाजनक वाटतंय....कालच्या घटनेने निराशा आणखी वाढली. . .

No comments:

Post a Comment