भेटला होऽऽऽऽऽभेटलाऽऽऽ
= = = == = = = = = =
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज विनोद खन्नाचा लाईफटाईम अचिव्हमेंट अवोर्ड देऊन संध्याकाळी सन्मान केला जाणार आहे...म्हणजेच तो आज पुण्यात ...मग भेटायला तर हवंच्....काल संध्याकाळपासून ट्रॅकवर होतो...पण तो कधी येणार, कुठे राहणार? काहीच समजतं नव्हत..खूपजणांना कामाला लावलं होतं....सगळे पीआर चेक केले...स्टार हॉटेल्समध्ये निरोप ठेवले...पण रात्री उशीरापर्यंत काहीच ट्रेस लागेना...त्या अस्वस्थेतच रात्री मग थेट खन्नालाच मेसेज केला...पण काहीच रिप्लाय नाही...परत सकाळी उठल्यावर फोनाफोनी सुरू....अखेर एकाला दया आली बहुदा किंवा माझ्या फॉलोअपला वैतागून त्याने मला एक नंबर दिला व त्यावर कॉल करायला सांगितले.. दुपारी बारा वाजले होते..त्याने ठिकाण सांगून मेसेज दिला साडेबारापर्यंत पोहोचा....मग काय....जे सुटलो पंधरा मिनिटांत ठिकाण्यावर.. तोपर्यंत सात-आठ मिसकॉल येऊन गेले होते...एक मेसेजही....आणि हो...मेसेज त्याचाच होता...विनोद खन्नाचा....एक वाजेपर्यंत पोहोचा म्हणून ...त्याचा अनपेक्षित सुखद धक्का...लाऊंजमध्ये पोहोचल्यावर पाच-दहा मिनिटांत तो आला..जीन्स, व्हाईट टीशर्ट आणि ब्ल्यू स्वेट शर्ट...झकासच दिसत होता तो... तोपर्यंत आणखी दोन-चार पत्रकार आले...हॉलमध्ये बसलो आम्ही...क्या प्लिझ आप अपना इंट्रोड्युक्शन करेंगे..म्हणत सुरुवात त्यानेच केली....एका-दोघांनी नावे सांगितली...मी आबिद शेख असे म्हणताच..आबिद! हां.. अरे अपनी तो बात हुई है...असे तो म्हणाला आणि सगळेजण बघतच बसले....विनोदच्या या वाक्याने पुन्हा एकवार मी चकीत...पुढे तास-दीडतास गप्पांचा मस्त फड जमला....चित्रपट, राजकारण, अध्यात्म अशा निरनिराळ्या विषयांवर त्याने दिलखुलास गप्पा मारल्या

No comments:
Post a Comment