शिक्क्याची गंमत बटणात नाय
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
आज मतदान केलं खरं....आनंद झाला...अभिमानही वाटला...पण एक पुन्हा एकदा जाणवलं...शिक्का मारण्यातली गंमत बटण दाबण्यात नाही....आपल्या उमेदवाराच्या नावापुढं शिक्का मारताना कसा आगळाच जोष असायचा...दाब कसा दणकून असायचा...बटण दाबण्यात ती गंमत नाही...उगा ते लिफ्टचं बटण दाबल्यासारखं वाटतं..आपल्या उमेदवाराला हक्काने मत दिल्याचं समाधान नाही त्यात......तसंही एकंदरच इलेक्शनमधली गंमत हरवलीय...एक कार्यकर्ता म्हणून आपल्या('आप' च्या नव्हे )उमेदवारासाठी इलेक्शनमध्ये केलेली धडपड आठवली की आताचे कार्यकर्ते किती सुखी आहे हे लगेच लक्षात येतं...
पूर्वी एकंदरच निवडणुकीचा माहोलच आगळा असायचा...आमच्याकडे कॉलनीत कार्पोरेशनच्या निवडणुकीला अख्ख्या कॉलनीने भानुदास गेजगेचा प्रचार केलेला...एका चाळीने शंकरराव मात्रेंचा...मात्रेवाले चरखा काढायचे भिंतीवर मोठा...आम्ही भानुदासची तलवार रंगवायचो भलीमोठी.... विधानससभेच्या निवडणुकीला आम्ही भाजपच्या गांगुर्डेंचा प्रचार करायचो एकदिलाने...जोमाने....पण हे गृहस्थ कधी निवडून आले नाहीत...आमच्या कॉलनीत कधीही न आलेले रणपिसे कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून कसे येतात हे ही कोडे कधी उलगडले नाही . .पुढे कधीतरी आम्ही रणपिसेंचा झेंडा हाती घेतला आणि ते ही पडले...कार्पोरेशनला गेजगे मात्रेंच्या वादातून हत्तीच्या चिन्हावर लढलेले व्ही. आर. शिंदे निवडून आले तेव्हा सगळेच चकीत झालेले...कारण तेव्हा साधारणत: 1984-85 च्या सुमारास बहुजन समाज पार्टीचं नाव आम्हाला माहिती नव्हतं...जातीपातीची समिकरणे समजत नव्हती...जाणून घ्यायचीही इच्छा नव्हती....इलेक्शन लागल्या की पोरांसोबत ठरलेल्या उमेदवाराचा जोमाने प्रचार करायचा...भिंती रंगवायच्या...बॅनर लावायचे....पक्षाचे बिल्ले वगैरे आले की मोठ्या टेचात ते शर्टला लावून रूबाबात छाती काढून फिरायचं यातच आम्ही मग्न...90 पर्यंत निवडणुकीत फार पैसा नव्हता....सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत तर तो आला नव्हताच. . .
प्रचाराच्या रणधुमाळीत मजा यायची....आपला उमेदवार आपल्या गल्लीत आला की उर कसा भरून यायचा..त्याच्यासोबत चालताना पावले अंमळ सहा इंच उंचावरूनच पडायची...त्यातही त्याने आपल्या घरच्यांना जरा ओळख दिली की मग काय विचारूच नका...आपल्या खांद्यावर वगैरे हात ठेवला की मग गल्लीत वट वाढल्यागत फिरायचो...निवडणुकीच्या आदल्या रात्री सगळी पोरं जागायची...पैशाचा पाऊस कुठं पडल्याचं तेव्हा कधी आमच्या नजरेसमोर घडलं नाही. . . अर्थात त्यावेळी पैसे वाटपाची सिस्टीम माहिती नव्हती...त्या पदाधिका-यांपर्यंत पोच नव्हती आमची....ती मंडळी निराळीच असायची...आम्ही आपले प्रचारात गर्क असायचो...हाताने स्लिपा लिहायचो...त्या स्लिपा घरोघरी पोचवण्यात मज्जा असायची...एरवी ज्या घरी जाता येत नसे, तेथे स्लिपा वाटण्याच्या निमित्ताने छाती काढून जायचो...नाजूक, हळवे बंध असलेल्या ठिकाणी जायची इच्छा तर असायची पण जाताना पायात गोळे यायचे...दार वाजवताना अंगाला घाम फुटलेला असायचा...आपल्या हस्ताक्षरातील स्लीप ''त्या'' घरात द्यायचा आनंद काही अनोखाच असायचा. .. .
इलेक्शनच्यादिवशी कुठे बूथ लावायची याची आखणी असायची. सकाळी लवकर स्ननशूचिर्भूत होऊन बूथवर जायची आगळीच गंमत असायची.... त्यातही आमच्यापैकी कित्येकांना वयाच्या अटीमुळे तेव्हा मतदानाचा अधिकारच नव्हता . .. . समोरच प्रतिस्पर्धी उमेदवाराचा बूथ असायचा...एरवी एकत्रच असणारे आमचेच काही मित्र त्या दिवशी मात्र प्रतिस्पर्धी बूथवर असायचे. खुन्नस द्यायचे. . .दुपारी रिक्षातून पक्षाचे लोक पुरीभाजीची पाकी्टं घेऊन यायचे...रणरणत्या उन्हात तेलकट, चिवट पु-या आणि बटाट्याची उग्र भाजी खातानाही भारी वाटायचं...हे कुठून येतं?? कोण पाठवतं??? हे प्रश्न तेव्हा पडायचे नाहीत...आपल्यासाठी कोणीतरी जेवण पाठवतंय ही भावनाच खूप सुखावणारी असायची... या पुरीभाजीव्यतिरीक्त इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यांना बाकी काही मिळायचं नाही....ज्यांना मिळायचे त्या पदाधिका-यांपर्यंत, भाई, भाऊ, दादा, अप्पापर्यंत आमची पोहोच नसायची त्यावेळी......फारतर फार क्वचित भेळीची पार्टी होत असे...जेवणं आपापल्या घरी. . .इलेक्शन झाली की उमेदवाराशीही कधी भेटीगाठी होत नसत. . ....संध्याकाळी इलेक्शन संपली की समोरच्याचा बूथ उखडायचा किंवा त्याने आमचा बूथ उखडायचा असे प्रकार चालायचे...मग त्यावेळी पोरांची जमवाजमव केली जायची...पण हा प्रकार तिथंच संपायचा...पुन्हा दुस-या दिवशी एकमेकांच्या कट्ट्यावर, एकमेकांच्या चौकात ये-जा व्हायची...वातावरण निवळायचं....बुजूर्गांनी मांडवली केलेली असायची....
मतदानाच्यावेळी पूर्वी एक गमतीशीर प्रकार असायचा, तो म्हणजे मतपेटीत मताच्या स्लीपसोबत काहीजण चिठ्ठ्याही टाकायचे...त्यामध्ये राजकीय पुढा-यांना उद्देशून पत्रे, मागण्या, गा-हाणी असायची...काहीजण एकाहून एक इरसाल शिव्या लिहून टाकायचे...इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना उद्देशून काहीजण कैफीयत मांडत असत...गल्लीतील विरोधकांबाबत अश्लाघ्य मजकूर असे..काहीजण सुविचार, मार्मिक टिप्पण्या, राजकीय चारोळ्या, आणि चक्क कविताही टाकत असत....मतपेटीतील मते मोजून झाल्यावर या चिठ्ठ्या वाचणे हा निवडणूक अधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विरंगुळा असायचा....'' सत्ता आणि सत्य यांच्यात कधीच सख्य नसते'' असं लिहिलेली एक चिठ्ठी आजही चांगली लक्षात आहे ....या चिठ्ठ्यांवर अनेकदा नावे कुणाचीच नसायची....आणि असलीच तर हमखास आपल्या वै-याची नावे लोक टाकत असत, ज्यायोगे त्याच्याबाबत संभ्रम निर्माण व्हावा...
निकालाच्या दिवशी एक गोष्ट हमखास व्हायची ती म्हणजे अफवा...तेव्हा ना पेजर होते ना मोबाईल...ना चॅनेल्स...दुस-या दिवशीची वर्तमानपत्रं आणि रेडिओवरच्या बातम्यांवरूनच निकाल समजायचा...लोकसभेच्या निकालपत्रांमध्ये हमखास पहिला निकाल...राजापूर मतदारसंघाचा....जनता पक्षाचे मधू दंडवते अमुक अमुक मतांनी विजयी हे ऐकायची सवय झालेली....मागे एकदा गांगुर्डेंचा आम्ही चांगलाच खपून प्रचार केलेला...प्रत्यक्ष निकाल लागल्यावर ते पराभूत झाल्याचं समजलं...खूप निराश होऊन घरी परतलो.... हातपाय धुवून ताटावर बसलो, तोच उमेश सांगत आला गांगुर्डे एका मताने निवडून आले. आत्ताच रेडिओवर सांगितलंय तसं...पुन्हा उठलो...खाली कट्ट्यावर गेलो....काहीनाही कुणीतरी अफवा पसरवलेली होती...रणपिसेच निवडून आले होते....असं पुढं अनेकदा झालं...प्रत्येकवेळी ही अफवा आहे हे समजूनही फसायचो....
मतमोजणी केंद्रावरही गंमत असायची..एरवी अन्य कारणाने असलेली खुन्नस तिथं काढायचे अनेक प्रकार घडायचे..खुर्च्यांची फेकाफेकी व्हायची....सोडा वॉटरच्या बाटल्यांची फेकाफेकी व्हायची..वातावरण गरम व्हायचं...पुढे बरेच दिवस त्याचे पडसाद जाणवायचे.....निकाल लागल्यावर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका झोकात निघायच्या...गुलालाची उधळण व्हायची....या मिरवणुकीत एक बाब हमखास व्हायची...ती म्हणजे ज्या गल्लीने, वसाहतीने असहकार केला असेल, तेथून मुद्दाम संथपणे मिरवणूक न्यायची...गुलाल जास्त उधळायचा. . .त्यातून अनेकदा वाद-विवाद, हाणामा-यांचे प्रकार व्हायचे. . .पण मजा असायची एकंदरच....

No comments:
Post a Comment