पाटील . .
--------
पुणे विद्यापीठाच्याच आवारात पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाणे आहे. त्याची हद्द दूरवर पसरलीय. पंधरा वर्षांपूर्वी या पोलीस स्टेशनच्या हद्दित सगळा निर्जन परिसर होता. छोट्या वाड्या, वस्त्या होत्या. हातभट्टी दारूच्या भट्टया होत्या. वस्त्यांमधून संध्याकाळी हाणामा-या चालायच्या. पोलिसांची संख्या खूपच कमी होती. तो साधारणत: 1997 डिसेंबर महिना होता. पोलीस निरीक्षक विलास जाधव कामात व्यग्र होते. सध्या क्राईम ब्रांचला इन्स्पेक्टर असलेले बाप्पू कुतवळ, सीआयडीमधील प्रतिभा जोशी ही मंडळी तेव्हा या पोलीस स्टेशनच्या निरनिराळ्या चौक्यांमध्ये कार्यरत होती. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी कुतवळ यांच्यावर होती. एके दिवशी नेहमीप्रमाणे ते सहका-यांसमवेत कामाची आखणी करण्यात मग्न होते. त्यावेळी सहाय्यक फौजदार अजिनाथ सलगर या त्यांचा विश्वासू साथीदाराला एक महत्वाची खबर मिळाली. पुनावळे गावाजवळ पाटील नावाची एक संशयित व्यक्ती असून त्याच्याकडून काही महत्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता खब-याने व्यक्त केली होती. सलगर यांनी ही माहिती ती इन्स्पेक्टर कुतवळ यांना सांगितली.
खब-याने दिलेल्या माहितीनुसार इन्स्पेक्टर कुतवळ (मोबाईल 9823680999) आणि त्यांचे सहकारी पाटीलची माहिती काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यावेळी पिंपरी-चिंचवड भागातील वस्ती फारशी वाढली नव्हती. या जुळ्या शहराजवळील पुनावळे हे गाव तर खूपच निर्जन होते. गावाबाहेर वीटभट्टया होत्या. पुण्यातील औंध, बाणेर, पाषाण, सांगवी, तसेच पिंपरी- चिंचवड परिसरातील बांधकाम व्यावसायिक तेथून विटांची खरेदी करीत असत. तेवढाच शहराचा आणि या भागाचा काय तो संबंध. एरवी वर्दळ फारशी नव्हती. वस्ती विरळ होती. संध्याकाळनंतर तेथून जायला यायला लोक घाबरत असत. कामकरी माणसे जथ्याने सायकलवरून घरी परतत असत. चोर-चिलटांबरोबरच या भागात असलेल्या दाट झाडीमुळे जंगली प्राण्यांचीही त्यांना भीती असायची. फौजदारमंडळी बुलेटवरून रात्री या भागात गस्त घालत असत. पाटील या आसामीभोवती पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले. पाटीलचा दिनक्रम, त्याच्या संपर्कातील व्यक्ती, त्याचे व्यवहार याबाबत पोलिसांनी नजर ठेवली. इन्स्पेक्टर कुतवळ व आदिनाथ सलगर हे अनेकदा साध्या वेशात पाटीलच्या ठिकाणावर जाऊन यायचे.जीपमधून तो तेथील एका वीटभट्टीवर यायचा. तेथून जवळच थेरगावमध्ये तो राहत होता. एरवीचा त्याचा दिनक्रम अनिश्चित होता. पण, दर शनिवारी डांगे चौकातील एका छोटेखानी हॉटेलमध्ये तो आवर्जून बसायचा. तेथे कामगारांची बैठक घ्यायचा. त्यांना पगार द्यायचा. सगळे कामगार त्याला आदराने ‘पाटील’ म्हणत असत. त्याचे नाव काही वेगळे असेल असे त्या गरीब मजुरांच्या गावीही नव्हते. पाटीलने त्याच्या मुलाला काळेवाडी येथील शाळेत घातले होते. आजिनाथ सलगर यांना या पाटीलचे नेमके नाव समजले आणि सगळेच पोलीस चक्रावून गेले. पोलिसांनी या पाटीलभोवतीचा फास आवळत आणला.
27 डिसेंबर 1997 चा दिवस उजाडला. पाटीलचे दिवस आता भरत आले होते. सहा फूट उंच, गो-यापान वर्णाचा पाटील संध्याकाळी डांगे चौकात आला. नेहमीप्रमाणे तो हॉटेलमध्ये शिरणार एवढ्यात इन्स्पेक्टर कुतवळ, सहाय्यक फौजदार सलगर आणि त्यांच्या बलदंड सहका-यांनी पाटीलला घेरले व काही कळण्यापूर्वीच त्याला बेड्या ठोकल्या. त्याला जीपमधून पोलीस स्टेशनला नेले. तेथे पाटीलची तपशीलवार चौकशी केली आणि पाटीलचा बुरखा फाटला. आपण किती मोठ्या गुन्हेगाराला अटक केली आहे याची जाणीव पोलिसांना झाली. पाटील नाव धारण केलेला तो होता कर्नाटकमधील खतरनाक गुन्हेगार मल्लिकार्जून शांताप्पा चडचण. चडचण टोळीचा सूत्रधार. कित्येक खून, अपहरण, खंडण्यांच्या गुन्ह्यात तो फरारी होता. तेथील पोलीस अधिक्षकांच्या ड्रायव्हरचा खून करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. चडचण येथील सराफी पेढीवर दरोडा टाकून त्याने एक कोटी रुपये किमतीचे दागिने पळवून नेले होते. त्यावेळी त्याने तेथे चार खून केले. पण, या टोळीच्या दहशतीमुळे त्याच्याविरुद्ध कोणी तक्रार देण्यास धजावत नव्हते. मल्लिकार्जूनचे मूळ गाव होते उमराणी. तेथूनच त्याने गुन्हेगारीची सुरुवात केली .त्याने व व त्याचा धाकटा भाऊ श्रीशैल यांनी अख्ख्या कर्नाटक राज्यात आपल्या टोळीची दहशत निर्माण केली होती. मल्लिकार्जूनविरुद्ध सदुसष्ठ गुन्ह्यांची नोंद होती. या टोळीचे नाव काढले तरी व्यापारी, व्यावसायिक चळाचळा कापत असत. पोलिसांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. पोलीस अधिक्षकांच्या ड्रायव्हरच्या खुनानंतर कर्नाटक पोलीस हात धुऊन त्याच्या मागे लागले. या टोळीने सोलापूर भागातही काही गुन्हे केले होते. त्यामुळे महाराष्ट्र पोलीसही त्याच्या मागावर होते. परीस्थितीचे गांभिर्य ओळखून मल्लिकार्जूनने तेथून पळ काढला. तो पुण्यात वास्तव्यास आला. पुण्याच्या मुख्य वस्तीत राहणे धोकादायक राहील हे त्याच्या लक्षात आले. त्याने पुनावळेसारख्या कमी वर्दळीच्या भागात बस्तान ठोकले. तेथे त्याने वीटभट्टी सुरू केली होती. पाटील हे बनावट नाव धारण करून तो पत्नी व मुलासमवेत राहत होता. दरम्यान, मल्लिकार्जून हाती लागत नाही हे लक्षात आल्यावर कर्नाटक पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी तब्बल 50 हजार रुपये इनाम जाहीर केले होते. तो पुण्यात असल्याची कुणकुण त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीला लागली होती. त्या टोळीतील गुन्हेगार गुप्तपणे त्याची माहिती काढत होते. थेरगावमध्येच मल्लिकार्जूनला खलास करण्याचा त्यांचा डाव होता. ते मल्लिकार्जूनचा काटा काढण्याच्या प्रयत्नात असतानाच तो पुण्याच्या पोलिसांच्या हाती लागला. त्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांना घसघशीत रकमेचे आमिष दाखवून मल्लिकार्जूनला त्या टोळीच्या ताब्यात देण्याचा अथवा त्याचे एन्काऊंटर करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. पण, इन्स्पेक्टर कुतवळ व त्यांच्या सहका-यांनी त्यांना भिक घातली नाही. मल्लिकार्जूनला पुण्यात पकडल्याचे महाराष्ट्र् पोलिसांनी वायरलेस यंत्रणेद्वारे कर्नाटक पोलिसांना कळवले. दुस-याच दिवशी कर्नाटक पोलिसांचे भलेमोठे पथक मल्लिकार्जूनला ताब्यात घ्यायला आले. त्या पथकातील पोलिसांची संख्या, त्यांच्याकडील शस्त्रे आणि वरिष्ठ हुद्दयाचे अधिकारी पाहून पुण्याच्या पोलिसांची छातीच दडपली. अर्थात आख्ख्या कर्नाटकात धुमाकूळ घालणा-या खतरनाक मल्लिकार्जून चडचणला पकडण्याचे श्रेय पुण्याच्याच पोलिसांना मिळाले. मुधोळ येथील न्यायालयात 20 मे 2004 ला प्रतिस्पर्धी भैरगोंडा टोळीने केलेल्या हल्ल्यात मल्लिकार्जून जबरजखमी झाला.सध्या तो कर्नाटकमधील एका कारागृहात जेरबंद आहे.....

No comments:
Post a Comment