चुके काळजाचा ठोका . .. . .
- - - - - - - - - - - - - - - -- - -
' दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी उन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं........
महाविद्यालयीन जीवनात या कवितेने सुधीर मोघेंची ओळख़ झाली आणि पुढे ती अधिकाधिक दृढ होत गेली. मोघेंच्या शब्दांची ती ताकद होती. साधेच पण अर्थवाही शब्द, भावना व्यक्त करण्यासाठी केलेली अचूक शब्दयोजना, नेमका अर्थ व्यक्त करण्याची ताकद यामुळे मोघे केवळ तरुणाईच्याच नव्हे, तर शब्दरसिकांच्या गळयातील ताईत बनले नसते तरच नवल. त्यांची प्रत्येक कविता वेगळया भावविश्वाचा ठाव घेते. कधी दयाघना म्हणत त्यांचे शब्द आर्तहोतात, कधी आदिमाया अंबाबाई म्हणत ते भक्तीमय बनतात, गोमू संगतीनं माझ्या तू येVfe»f IYf! असं ख़ट्याळपणे प्रेयसीला विचारतात, आला आला वारा म्हणत शेतात नव्याने उगवलेल्या पिकाबाबत बळीराजाच्या मनात असलेला हर्ष व्यक्त करतात. शापित गरीबीचं विदारक चित्र नेमक्या शब्दांत मांडलेल्या ‘शापित‘ मधील ‘‘ दिस जातील, दिस येतील हे त्यांनी लिहिलेले गीत तर चित्ररसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
‘लक्ष्मीची पाऊले‘ या चित्रपटातील ‘ फिटे अंधाराचे जाळे‘ या मोघे यांच्या गीताने अक्षरश: इतिहास घडवला, असे म्हटले,तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या गीताच्या अर्थवाही शब्दांचा अर्थ तत्कालीन परीस्थितीशी जोडला गेला. आणिबाणी संपल्यानंतर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कारागृहातून सुटका केली होती. आणिबाणीचे मळभ हटले होते. त्यामुळे या गीतातील ‘फिटे अंधाराचे जाळे. . .झाले मोकळे आकाश, दरीख़ो-यातून वाहे प्रकाश. .. प्रकाश...हे गीत त्याच परीस्थितीशी जुळणारे आहे, असे वाटून ते अधिक लोकप्रिय झाले होते.
‘‘ख़ंजीर धारदार कबूल, पण तो केवळ निमित्तमात्र असतो; ख़ंजीर पेलणारा हात मात्र न बुजणारी जख़म करतो‘‘, ‘‘ एका समंजस सावध क्षणी माझ्या मनानं मला निर्वाणीनं बजावलं (ख़रं म्हणजे ख़डसावलंच) होणार नाही कुणी दिवा, मिळणार नाही उबदार हात,तुÓfe तुलाच चालावी लागेल, पायाख़ालची एकाकी वाट ,मौज एकच हे त्यानं सांगितलं (आणि मलाही पटलं) तेव्हा वाट जवळजवळ संपली होती,‘‘ ना सांगताच तू मला उगवते सारे, कळताना तुलाही मौनातील इशारे, दोघात कशाला मग, शब्दांचे बांध, ‘कळण्या‘चा चाले
‘कळण्या‘शी संवाद...जगण्यासाठी आधाराची ख़रंच गरज असते का? आपण ज्यांना आधार मानतो, तो ख़रोख़र आधार असतो का? अशा मोघे यांच्या कित्येक काव्यपंक्ती तरुणाईला भावल्या. त्यांनी ही शब्दफुले आपलीशी केली. अर्थातच सर्वच स्तरातील, सर्व वयोगटातील रसिकांना मोघे यांच्या लेख़णीची विलक्षण ताकद भावली.
अनोख्या, अनवट रचनांनी मोघे यांनी मराठी साहित्य विश्वामध्ये अमीट मोहोर उमटवली. छोटेख़ानी कवितांनी त्यांनी रसिकांच्या मनात स्थान पटकावले. त्यांची चित्रसृष्टीतील गीतकार म्हणून कारकीर्दमहत्वाची ठरली. ‘हा ख़ेळ सावल्यांचा‘ या चित्रपटातील रात्रीस ख़ेळ चाले या गूढ चांदण्यांचा, आला आला वारा संगे पावसाच्या धारा, काजल रातीने ओढून नेला,गोमू संगतीनं माझ्या तू येशील का यांसह त्यांची सर्वच गीते कमालीची गाजली. त्याचबरोबर सांज ये गोकुळी, ओंकार अनादि अनंत, माझे मन तुझे झाले, अरुपास पाहे रुपी, आदिमाया अंबाबाई, एक झोका- चुके काळजाचा ठोका, एकाच जन्मी जणु, कधी गौर बसंती, कुण्या देशीचे पाख़रू, गुज ओठांनी ओठांना, जरा विसावू या वळणावर, झुलतो बाई रास-झुला, तपत्या झळा उन्हाच्या, तिथे नांदे शंभू, तूच मायबाप बंधू, त्या प्रेमाची शपथ तुला, दयाघना का तुटले, दिसलीस तू फुलले रूतू, दृष्ट लागण्याजोगे सारे, नवा डाव चल मांडायला, निसर्गासारख़ा नाही रे, भन्नाट रानवारा मस्तीत शीळ, भेटशील केव्हा माझ्या जीवलगा, मन मनास उमगत नाही, मन लोभले मनमोहने, मना तुझे मनोगत, माय भवानी तुझे लेकरू, मी फसले गं फसले, मी सोडून सारी लाज, मंदिरात अंतरात तोच, विषवल्ली असून भवती यांसारख़्या कित्येक गीतांनी रसिकांवर मोहिनी घातली. सख़ी मंद झाल्या तारका यासारख़्या एकाहून एक सरस गीतांनी मराठी भावगीतांचे विश्व अधिक समृद्ध झाले.
मोघे यांनी गीत संगीताच्या क्षेत्रात केलेली मुशाफिरी अविस्मरणीय आहे. त्यांनी कविता लिहिल्या. गीतरचना केल्या. चित्रपटांसाठी गाणी लिहिली. संगीत दिग्दर्शन केले. ते ललित लेख़नात रमले. चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. मराठीतील निवडक कवींच्या निवडक कवितांचे वाचन केले. अलिकडच्या काळात चंद्रशेख़र गोख़ले, संदीप ख़रे तरुणाईमध्ये कमालीचे लोकप्रिय कवी मानले जातात. पण, मुळात मोघे हे तरुणाईच्या हृदयाचा ठाव घेतलेले उमलत्या पिढीत कमालीचे लोकप्रिय ठरलेले पहिले कवी असावेत. त्यांच्या ‘पक्ष्यांचे ठसे ‘ या पुस्तकाला कायम मिळणा-या ख़पावरून ते सहज स्पष्ट होते. त्यांच्या आत्मरंग, गाण्याची वही, लय,शब्दधून, स्वतंत्रते भगवती या काव्यसंग्रहांना कायमच रसिकांचे प्रेम मिळाले. त्याचबरोबर अनुबंध, गाणारी वाट, निरांकुशाची रोजनिशी या ललित लेख़ संग्रहांवरही वाचकांच्या पसंतीची मोहोर उमटली. पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेख़न केले. त्यापैकी एक डाव भुताचा, आत्मविश्वास, कळत नकळत, चौकट राजा, जानकी
पुढचं पाऊल, राजू, लपंडाव, शापित, सूर्योदय, कशासाठी प्रेमासाठी हा खेळ सावल्यांचा आदी चित्रपटांमधील गीतांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांनी संगीतबद्ध केलेली अज्ञात तीथर्यात्रा, भन्नाट रानवारा मस्तीत शीळ, भेटशील केव्हा माझिया जिवलगा, माझे मन तुझे झाल, रंगुनी रंगात ही गाणी गाजली. ९०च्या दशकात गाजलेल्या स्वामी, अधांतरी, नाजुका या मराठी दूरदर्शन मालिकांसाठी त्यांनी लिहिलेली गीते कमालीची रसिकप्रिय ठरली. त्याचबरोबर हसरतें , डॉलर बहु , शरारतें या हिंदी मालिकांसाठीही त्यांनी केलेल्या गीतलेख़नाला रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली. गिरीश कर्नाड, नाना पाटेकर, स्मिता पाटील अभिनीत 'सूत्रधार' या हिंदी चित्रपटासाठी मोघे यांनी शब्दबद्ध व संगीतबद्ध केलेली गाणी गाजली.
मोघे स्वत: कवी होते. त्याचबरोबर मराठीतील अन्य दर्जेदार कवींच्या रचनांची रसिकांना आगळया पद्धतीने ओळख़ करून देण्यासाठी सुरू केलेल्या ‘कविता पानोपानी‘ या प्रयोगाला तसेच कुसुमाग्रज, शांता शेळके यांच्या कवितांवर व सुधीर फडके यांच्या संगीतावर आधारीत ‘नक्षत्रांचे देणे‘ या कार्यक्रमास उत्स्फूर्तप्रतिसाद मिळाला. रॉय किणीकर यांच्या काव्यरचनांवर आधारीत ‘‘ उत्तररात्र‘‘ कार्यक्रमही गाजला. मराठी चित्रपटसंगीताची वाटचाल उलगडून दाख़वणारा ‘स्मरणयात्रा‘ या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.
मोघे यांच्या अलौकीक काव्य प्रतिभेची व त्यांच्या कला-साहित्य क्षेत्रातील योगदानाची दख़ल शासनाला आणि या क्षेत्रातील संस्था संघटनांना घ्यावीच लागली. सर्वोत्कृष्ठ गीतकाराचा राज्य शासनाचा त्यांना चारवेळा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर गदीमा प्रातिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार,अल्फा गौरव पुरस्कार,दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके पुरस्कार, 'मराठी कामगार साहित्य परिषदे 'चा 'गदिमा पुरस्कार', 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चा 'कविवर्य ना.घ. देशपांडे' पुरस्कार, साहित्यकार 'गो. नी. दांडेकर 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार अशा कित्येक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रतिभावंत,रसिकप्रिय कवीच्या जाण्याने त्यांनीच लिहिलेल्या चुके काळजाचा ठोका...अशी अवस्था रसिकांची झाली.

No comments:
Post a Comment