Friday, 6 June 2014

'हाय''
''हॅलो''
''काय विशेष?''
''काय नाही..पण आज मूड नाही खास''
''संध्याकाळी येणार ना?''
''कुठे?''
''मेणबत्ती आंदोलन''
''हां..हां...नाही यायचो मी. तू जा''
''का रे?''
''असंचं''
''का''
''मला नाही ते बरं वाटंत''
''म्हणजे?''
''काय ते मेणबत्त्या लावायचं?''
''आपली माणसं गेली.जीवाभावाची, जबरदस्त माणसं गेली''
''हो ना..''
''आपण मेणबत्त्या लावण्याशिवाय काहीच करू शकत नाही का?''
''काय करणार? सरकार आहे ना..पोलीस आहेत ना...गुप्तचर यंत्रणा आहेत..''
'' हो..त्यांनी पकडलं ना मग कसाबला...दिलं की फासावर...''
''मग संपलं का सगळं?? ''
''म्हणजे?''
''संपला का दहशतवाद?''
''ते एवढं सोप्प नाही''
'' ते तर आहेच रे..पण आपण मुळावर घाव घालायला कचरतोय?''
''आपण??''
''म्हणजे आपलं सरकार रे''
''कसं काय?''
''विनिताताईंचं पुस्तक वाचलंस ना?''
''बुलेट फॉर बुलेट??''
''नाही रे ..ते रिबेरोंचं आहे..मी म्हणतोय द लास्ट बुलेट''
''हां ते वाचलं ना...''
''मग त्यात त्यांनी विचारलेल्या प्र्श्नांचं काय?''
''कोणत्या?''
''अनेक आहेत..पण कामटे, करकरे आणि साळसकरांना तीन निरनिराळ्या भागातून एकाच ठिकाणी कुणी पाठवलं?''
''कोणी?''
''अजूनही तो प्रश्न अनुत्तरीत आहे''
''तो आवाज कोणाचा? हे अजून समजलेलं नाही''
''हो ना...''
'' 'त्या' आवाजाचा शोध कोणीच का घेत नाही?''
''तो कोण होता? ज्यानं आपले तीन धडाकेबाज अधिका-यांना थेट यमसदनी पाठवलं?''
''कोण असू शकेल?''
''ते तर तसं ओपन सिक्रेट आहे..''
''काय बोलतोस?''
''हो ..पण त्याला कुणी हात लावू शकत नाही. काही पुरावाच ठेवला नाहीये त्याने..राजकीय नेतेही काही करू शकत नाहीत त्याला''
''एवढी अगतिकता का?''
''आयपीएस अधिकारी हुशार तर असतातच..हा कमालीचा धूर्त आहे..''
''हं''
''मुश्रीफांचं 'हु किल्ड करकरे वाचलंस का?''
''नाही''
''वाच..आपली गुप्तचर विभाग आणि अन्य यंत्रणांचं पितळ उघडं पाडलंय त्यांनी''
''काय बोलतोस?''
''हो ना..ते ही एक आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या या पुस्तकातील खळबळजनक दाव्यांना अजून कुणी आक्षेप घेतला नाही..''
''काय बोलतोस्स..''
''.हो ना...हे पुस्तक वाचल्यावर तर मी पुढे कितीतरी दिवस अस्वस्थ झालो होतो''
''का?''
''हा देश माझा आहे. पण ही यंत्रणा माझ्या भल्यासाठीची आहे यावरचा विश्वास उडाला..''
अर्रे...''
''हो रे...एक कसाब आपण पकडला...पण त्याला साथ देणारे देशातील कुणी कसाब होते का? हा तपास आपण केलाच नाही''
''हो''
''तो झाल्याशिवाय...घरभेदी सापडल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही..आपण सुरक्षित असणार नाही''
''हो... आड्रीन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क या दोन ब्रिटिश पत्रकारांनी अमेरिकेने मुंबईचा बळी दिलाय असा गौप्यस्फोट
' द ‌सीज ' या पुस्तकात केलाय.''
''म्हणजे?''
''अरे तो डेव्हीड हेडली डबल एजंट होता. तो अमेरिकेचाही एजंट होता. त्यानेच माहिती दिली होती.''
''काय बोलत्तोस?''
''हो. डेव्हीडने हा हल्ला होणार होती याची पूर्वसूचना अमेरिकेला दिली होती..पण ते शांत पाहत राहीले..''
''कठीण आहे रे सगळं?''
'' हो. अंधारून आलंय खरं''
''हो ना ''
''पण सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही''...

No comments:

Post a Comment