ओळखलं का मला ? ?
- - - - - - - - - - -
‘‘ काय साहेब ओळख़लं का मला?‘‘ हे वाक्य कानावर पडलं किंवा असं नुसतं कोणी विचारलं तर तसं दचकायचं काही कारण नाही. पण, सोळा वर्षापूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती परिसरात तशी परीस्थिती निर्माण झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी, रहदारीच्या ठिकाणी लोक लुटले जात होते. लुबाडले जात होते. खिशातील रोकड, अंगावरचे दागिने पळवले जात होते. सर्वसामान्य लोकच् नव्हे, तर समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींना या भामट्यांकडून गंडा घातला जात होता. फसवले गेलेले सगळेच प्रतिष्ठेपायी पुढे येत नव्हते. तरीही या फसवणुकीच्या प्रकारांना वाचा फोडण्यासाठी काहींनी हिंमत दाख़वली. या घटनेतील भामटे हाती लागले नाहीत. पण त्यामुळे, किमान या प्रकरणाची माहिती तरी नागरिकांना समजली. ख़रंच फसवणुकीची पद्धत अतर्क्य होती आणि विशेष म्हणजे सतरा वर्षानंतरही त्याचे गूढ कायम राहीले आहे.
एकेकाळी दिल्लीचे ठग, मुंबईचे मवाली आणि पुण्याचे भामटे देशभर बदनाम झाले होते. त्या दंतकथा होत्या की काही अनुभवांवरून लोकांनी ते अंदाज बांधले होते हे सांगणे कठीण आहे. पण, जणुकाही त्यास अधोरेख़ित करणा-याच फसवणुकीच्या घटना 1997 च्या दुस-या सहामाहीमध्ये घडल्या. त्याची सुरुवात झाली २७ आगस्टला 1997 ला. . . गुरुवार पेठेतील भांडेआळीचा परिसर म्हणजे कायम वर्दळीचा. अरूंद रस्ते, भांड्यांची बाजारपेठ, भाजी मंडई आणि अन्य बाजारपेठेमुळे या भागात कायमच गजबज असते. तेथील व्यापारी बाजीराव पाटील तेथून पायी चालले होते. संध्याकाळची वेळ होती. गर्दीतून एका तरूणाने पाटील यांचे लक्ष वेधले.‘‘ काय साहेब, ओळख़ले का?‘‘ पाटील यांना काही त्याची ओळख़ लागेना... पण बहुदा जुन्या ओळखीतील कोणी असेल या समजुतीने ते त्याच्याकडे पाहून हसले. ‘‘ अहो साहेब, शर्ट फिट्ट बसला ना अंगाला? परवा तुम्ही माझ्या दुकानात आला होता. कपडे शिवायला....‘‘ तो तरूण बोलत होता आणि पाटील त्याच्याकडे पाहतच बसले. ‘‘साहेब तुमचे पेन छान आहे. द्या मला‘‘. पाटील यांनी काही न बोलता त्याला पेन दिले. ‘‘तुमच्या ख़िशातील पाकीट द्या की‘‘. पाटील यांनी निमूट पाकीट काढून दिले. ‘‘अहो, तुमच्या वरच्या ख़िशात काही नोटा आहेत. त्या द्या की..‘‘ पाटलांनी त्या नोटा तर दिल्याच; एवढेच नव्हे त्याने सांगितल्यानुसार गळयातील सोन्याची साख़ळी व बोटातील सोन्याची अंगठीही काढून दिली. भर गर्दीत हा प्रकार घडला. तो तरूण निघून गेला. पाटीलही घरी गेले. हातपाय धुवून ते आरशासमोर उभे राहीले; अन् दचकलेच् . .. . . अरे आपली सोन्याची साख़ळी कुठे गेली? क्षणार्धात ते भानावर आले. आपण लुटलो गेलो आहोत याची त्यांना जाणीव झाली. पण आपल्याला नेमके कसे फसवले? हेच त्यांना समजेना. घडल्या प्रकारामुळे पाटील आणि त्यांचे नातलग, आप्त हवालदिल झाले.
या घटनेच्या दुस-याच दिवशी महात्मा फुले मंडईत अगदी असाच प्रकार घडला. पुण्यातील ही सर्वात मोठी मंडई आणि सर्वाधिक वर्दळीचा परिसर. विशेष म्हणजे मंडई पोलीस चौकीसमोरच भामट्य़ाने एका वकीलाला हातोहात फसवले. पद्धत अगदी तिच, पाटीलसाहेबांसारख़ी. वाक्चातुर्याने भुरळ पाडून लुबाडण्याच्या या प्रकारामुळे वकील महाशय हतबद्ध झाले. त्यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली. त्याबाबतची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. फसवणुकीच्या या आगळया प्रकारामुळे नागरीक अवाक् झाले. पाटील यांच्याही वाचनात ही बातमी आली. त्यांनीही आपली याच पद्धतीने फसवणूक झाल्याची फिर्याद नोंदवली. त्यापाठोपाठ नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी डॉ. नरहर पटवर्धन यांनाही भामट्याने भर टिळक रस्त्यासारख़्या वर्दळीच्या ठिकाणी लुटले. त्यापाठोपाठ बड्या कंपनीच्या एका सुरक्षा अधिका-याला, धनकवडीतील एका नामांकीत रुग्णालयाबाहेर एका रुग्णाच्या नातलगाला या भामट्याने हातोहात फसवले. नागरीकच नव्हे, तर पोलीसही या फसवणुकीच्या तंत्राने चक्रावून गेले. फिर्यादी कमी नोंदवल्या गेल्या असल्या तरी सहा महिन्यांत किमान पंचवीसजणांना या भामट्याने हात दाख़वला. या सर्व गुन्ह्यांची कार्यपद्धती अगदी सारख़ी होती. त्या भामट्याचे नेमके वर्णन कोणीच सांगू शकले नाही. एका बाबतीत मात्र कमालीचे साम्य होते, ते म्हणजे या त्याच्या बोलण्याची सुरूवात. ‘‘साहेब ओळख़ले का मला?‘‘ या वाक्याने तो संभाषणाला सुरुवात करायचा आणि पाहता पाहता समोरच्यावर भुरळ पाडायचा. हा भामटा आजिबात धाक दडपशाही करीत नसे. याउलट, गोड बोलून तो समोरील व्यक्तीला मोहीत करत असे. ही घटना घडत असताना संबंधीत व्यक्ती काहीशा गुंगीत असल्यासारख़ी जाणीव झाली होती. घरी गेल्यावरच आपण लुटले गेलोय हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे कदाचित हा संमोहनाचा प्रकार असावा अशी शंका काहींनी व्यक्त केली. पण, मुळात कोणाच्याही मनाविरूद्ध, मर्जीशिवाय संमोहन करता येत नाही हा या शास्त्रातील पहिला नियम असल्याचे सांगून नामांकीत संमोहन शास्त्रज्ञांनी ही बाब फेटाळली. ऐन गर्दीत संमोहीत करणे आणि चीजवस्तू लुबाडणे केवळ अशक्य असल्याचेही या तज्ज्ञांनी सांगितले. पोलिसांनी कसून तपास केला. ख़ास पथके तैनात केली. सर्व प्रकारचे चोर आणून त्यांना चौदावे रत्न दाख़वले. पण काहीच उपयोग झाला नाही. या घटनांना सतरा वर्षे उलटली तरी हे भामटे अद्याप हाती लागलेले नाहीत आणि त्यांची कार्यपद्धतीही समजली नाही. अद्यापही अधूनमधून यास्वरुपाचे गुन्हे होतात. त्यामुळे ‘‘साहेब ओळख़लं का मला?‘‘ असं कानावर पडले की आजही पोलिसांचे कान टवकारले जातात.

No comments:
Post a Comment